Niger Information In Marathi नायजर हा जगातील सर्वांत गरीब व अविकसित देशांपैकी एक आहे. या देशाची राजधानी नियामे ही आहे. या देशाचे 2009 च्या जणगणनेप्रमाणे लोकसंख्या ही 1,53,06,252 एवढी आहे. तसेच या देशाची राष्ट्रीय भाषा ही फ्रेंच असून देशाचे राष्ट्रीय चलन हे पश्चिम आफ्रिकन सीएफए फ्रॅंक आहे. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नायजर देशाची संपूर्ण माहिती Niger Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
नायजर या देशाचे क्षेत्रफळ हे 12,63,000 चौरस किलोमीटर असून या देशाचा 80 टक्के भाग हा सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे. नाही जर या देशाच्या उत्तर दिशेला अल्जेरिया व बिलिया तर पूर्वेला चार दक्षिणेस बेनिन प्रजासत्ताक व नायजेरिया हे देश आहे तर पश्चिमेला अपर व्होल्टा व माली हे देश आहेत. उत्तर व पूर्व या दिशांना सहारा वाळवंट व चॅड सरोवरची सीमा सर्वेक्षण न झालेली आहे.
हवामान :
नाही जर हा देश कर्कवृत्ताच्या दक्षिण दिशेला असल्यामुळे हा एक उष्ण देश व वसाड प्रदेश म्हणून ओळखला जातो. या देशातील तापमान सर्वत्र जास्त उष्ण असते. राजधानीतील तापमान 33° ते 38° सेल्सिअस पर्यंत असते. नैऋत्य भागातील वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण 55 सेमी असून ते उत्तर व पूर्व भागांकडे कमी कमी होत जाते.
जानेवारी फेब्रुवारी या महिन्यांमध्ये ईशान्य व्यापारी वारे कोरडे वाहतात व त्यांची हरमॅटन या उष्ण, धुडयुक्त वायांशी मिळतात. एप्रिल – मेमध्ये अटलांटिक महासागराहून येणाऱ्या वायांमुळे मोठी चक्रीवादळे येथे निर्माण होतात. तसेच जून ते ऑक्टोबर हा महिना थंड व पावसाळी ऋतू येथे समजला जातो.
भाषा :
या देशांमध्ये अनेक जातींचे लोक राहतात व त्यांची बोलीभाषा सुद्धा वेगवेगळी आहे. परंतु या देशाची राष्ट्रीय भाषा ही फ्रेंच असून शासन मान्यता आहे. ही भाषा शिक्षणाचे माध्यम ही आहे काही शाळांमध्ये दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिकवले जाते. प्रत्यक्ष व्यवहार व्यापाराची भाषा हौसा ही असूनही 85% लोकांना समजते व त्या खालोखाल जेरमा,शोंगाई ह्या भाषा ही प्रचलित आहेत.
लोक व समाज जीवन :
नायजर या देशामध्ये वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात. या देशाचे हवामान हे उष्ण तर कोठे थंड असल्यामुळे येथे श्वेतवर्णीय व कृष्णवर्णीय लोक आढळून येतात. नाही जर नदीच्या परिसरात 75 टक्के कृष्णवर्णीय लोक राहतात तर फुलाणी, तुराग श्वेतवर्णीय लोक रहात असून ते पशुपालन हा व्यवसाय करतात व हे भटके लोक आहेत. तुरानी व फुलानी या दोघांमध्येही भिन्नता दिसून येते.
हे लोक तंबूमध्ये वस्त्या करून राहतात व मास आणि खजूर यांच्यावर आपले जीवन भागवतात. फुलांनी जमातीची लोक फिरते पशुपालक व गुरेढोरे पाडतात. त्यांवर जास्त होते अवलंबून राहतात व तात्पुरत्या झोपड्या बांधून वस्ती करतात.
या देशांमध्ये भिन्न समाज व व्यवसायामुळे लोकांमध्ये समान अशा गोष्टी दिसत नाही परंतु येथील बहुसंख्य लोकांचा धर्म हा इस्लाम आहे. जेरमा व सोंघाईरागाचा ओढा शेजारच्या माली देशातील जातींच्या टोलीवालांकडे हौसाचा ओढा नायजेरियातील हौसाकडे तर अल्जेरियातील तुरागांकडे असल्यामुळे येथील लोकांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना कमी आहे.
येथील सण उत्सव व चालीरीती ह्या इस्लाम धर्माला अनुसरून आहेत पण सणांपेक्षा लग्नकार्यात भरपूर पैसा खर्च करणे हे यांचे वैशिष्ट्य आहे. या समाजात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक महत्त्व देतात.
इतिहास :
नायजर या देशाचा इतिहासाची लोकांना खूप प्राचीन काळापासून माहीत होता. एक हजार वर्षापूर्वीचा इतिहास म्हणजे अरब, बर्बर, सोंघाई, हौसा, फुलानी व तुराग यांच्यातील रक्तरंजित लढायांचा इतिहास आहे. त्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिमेटिक व हेमेटिक या लोकांची उत्तर व ईशान्य कडून येथील काळ्या लोकांवर होणारी आक्रमणे आहे.
दहाव्या शतकात चॅड सरोवराचा भाग जिंकून बर्बर लोकांनी हौसा राज्य स्थापन केले. 1882 मध्ये मेजर डिक्सन डेन्हॅम व ले. चेप्परटन या अधिकाऱ्यांना ब्रिटिशांनी पाठवले व त्या क्षेत्रातील वर्णन यांनी करून दाखवले. पहिल्या महायुद्धात जर्मन प्रेरणेने व मदतीने तुरागांनी सशस्त्र क्रांती केली परंतु ती ब्रिटिशांच्या मदतीने पार मोडून काढण्यात फ्रेंच यांना यश मिळाले. 1922 मध्ये फ्रेंच वसाहतींचा नाही जर हा एक भाग बनला.
दुसऱ्या महायुद्धाच्या या वसाहतींवर विशेष परिणाम झाला नाही, परंतु त्यानंतर स्वातंत्र्य चळवळीला येथे गती मिळाली. 1946 मध्ये नाही जर साठी एक प्रादेशिक विधिमंडळ स्थापन करण्यात आले आणि येथील लोकांना फ्रेंच नागरिकत्व देण्यात आले.
नंतर 1958 मध्ये नाही जर हे पाचवे फ्रेंच गणतंत्र झाले. तीन ऑगस्ट 1960 रोजी नायजर हा देश पूर्णपणे स्वतंत्र झाला. तसेच 20 सप्टेंबर 1960 रोजी तो संयुक्त राष्ट्रांचा सभासद झाला.
वनस्पती व प्राणी :
या देशात वनस्पती व प्राणी यांची वाढ हे त्यांच्या जमिनीच्या प्रतीवर अवलंबून आहे. ओसर जंगलात वनस्पतींची उंची जास्त वाढत नाही. साहिल या प्रदेशात शहामृग व हरणांचे कळप मोठ्या संख्येने दिसतात. येथील जंगलामध्ये जिराफ, काळवीट, सिंह, हत्ती, नायजर व इतर नद्यांकाठी पाणघोडे व मगरी आढळतात. तसेच नायजरमध्ये अनेक जातींचे पक्षी माकडे सर्प आढळतात.
शेती :
नायजर या देशातील मुख्य पिकांमध्ये व कापूस ही नगदी पिके असून येथील तृणधान्ये व भात ही दुय्यम पिके घेतली जातात. याव्यतिरिक्त तूर, कांदा, कसावा, खजूर, जोंधळा, रताळी, सुरण, तंबाखू ही इतर पिके होतात.
खनिज संपत्ती :
नायजर या देशांमध्ये खनिज संपत्ती मध्ये लोखंड व खनिज मीठ यांचे अल्प प्रमाणात उत्पन्न मिळते. तसेच खनिज तेल व दगडी कोळसा यांचाही येथे अभाव दिसून येतो. त्या व्यतिरिक्त देशामध्ये युरेनियमचे साठे व नेट्रॉन आणि आयर या ठिकाणी कथिल सापडते.
शिक्षण :
नायजर या देशातील शिक्षणाची अवस्था ही अगदी प्राथमिक स्वरूपाची असून येथील साक्षरतेचे प्रमाण खूपच कमी आहे. येथील 5.8% साक्षरतेचे प्रमाण असून येथे 673 प्राथमिक व 23 माध्यमिक आणि एक तांत्रिक शाळा आहे अध्यापक प्रशिक्षणाची चार विद्यालय आहेत पण एकही महाविद्यालय नाही.
दळणवळण मार्ग :
नायजर हा देश पूर्णतः भूवेष्टित असल्यामुळे या देशाला व्यापारासाठी इतर देशांवर अवलंबून राहावे लागते पूर्वी नायजेरियातील कानो या शहरा मार्गे व्यापार होत होता. या देशात पक्के रस्ते कच्चे रस्ते व लोहमार्ग खंडित मार्ग आहेत.
पर्यटन स्थळ :
नायजर या देशांमध्ये देशाची राजधानी हे सर्वात मोठे शहर असून येथे वेगवेगळे सौंदर्याने हे शहर नटलेले आहे. आज येथे उच्च दर्जाचे रस्ते तसेच आधुनिक इमारती व तेजस्वी रस्त्यावरचा प्रकाश हे परदेशी पर्यटकांना आकर्षित करतात. आपण रात्री जाऊन येथे सुंदर दृश्य पाहू शकता.
तसेच या शहरांमध्ये नायजर राष्ट्रीय संग्रहालय, ग्रँड मशिद, सुंदर करंजे वेढला आहे. येथे आपण आनंद घेऊ शकतो, विविध दागिने खरेदी करू शकतो.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा इतरांना शेअर करा.