Australia Information In Marathi ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा हे असून हा देश पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातील हे खंड आहे. या देशामध्ये ऑस्ट्रेलिया खंड, तास्मानिया बेट व हिंदी महासागर व पॅसिफिक महासागरातील अनेक छोट्या बेटांचा समावेश होतो. ऑस्ट्रेलिया खंडाच्या नावाविषयी एक आख्यायिका युरोपातील पुराणामध्ये आढळते.तर चला मग या देशाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.
ऑस्ट्रेलिया देशाची संपूर्ण माहिती Australia Information In Marathi
मॅथ्यु फ्लिंडर्स या दर्यावर्दी खलाशाने ऑस्ट्रेलिया खंडाला प्रदक्षिणा पूर्ण केली त्यावेळी त्याला वाटले की ऑस्ट्रालिया सापडले. म्हणून त्याने नकाशावर ऑस्ट्रेलिया अशी नोंद केली. व या खंडाला ऑस्ट्रेलिया हे नाव मिळाले.
क्षेत्रफळ विस्तार :
ऑस्ट्रेलियाचे क्षेत्रफळ 7,686,850 चौरस किलोमीटर असून या देशाच्या उत्तर दिशेला हिंदी महासागर उत्तरेला हिंदी महासागर आणि इंडोनेशिया, पूर्व तिमोर व पापुआ न्यू गिनी हे देशच ईशान्येला पॅसिफिक महासागर आणि सोलोमन द्वीपे, व्हानुआटु व न्यू कॅलिडोनिया हे देश तर आग्नेयेला न्युझीलँड हा देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या दक्षिणेला दक्षिणी महासागर आहे.
लोकसंख्या :
ऑस्ट्रेलिया या देशाची 2010 च्या जनगणने प्रमाणे लोकसंख्या ही 21,262,641 एवढी होती.
चलन :
ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन ऑस्ट्रेलियन डॉलर हे आहे.
भाषा :
ऑस्ट्रेलिया या देशाची प्रमुख भाषा इंग्रजी आहे. इंग्रजी व्यतिरिक्त तेथे 283 भाषा बोलल्या जातात. इंग्रजी ही तेथील सर्वात जुनी भाषा आहे. व बरेच लोक आपली बोली बोलतात.
राष्ट्रीय प्राणी :
ऑस्ट्रेलिया या देशाला कांगारूचा देश म्हणूनही ओळखले जाते कारण त्यांची संख्या माणसांपेक्षा जास्त असते. ऑस्ट्रेलियामध्ये कांगारूचे अनेक प्रजाती आहे आणि त्यातील लाल कांगारू हे या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे.
हवामान :
ऑस्ट्रेलिया हा देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे येथील हवामान हे उष्ण व उपोषण कटिबंधीय स्वरूपाचे आहे. किनाऱ्याजवळच्या प्रदेशात वार्षिक तापमान कक्षा कमी असते.
देशांतर्गत तापमान 19°c पेक्षा अधिक असते तर उत्तरेकडील किनारी प्रदेशात सरासरी तापमान 23.90°c असते. पूर्वेकडील गिरीभूमी प्रदेशात व टास्मानिया या प्रदेशात जुलै महिन्यातील तापमान 7°c पेक्षाही कमी असते. येथील हिवाळा वनस्पतींच्या वाढीच्या दृष्टीने फारच कडक असतो.
शेती व उद्योग :
ऑस्ट्रेलियातील लोक इतर उद्योगांबरोबर शेती हा व्यवसाय ही देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्वाचा आहे. येथील मुख्य पिकांमध्ये ऊस बार्ली गहू फळे ही पिके मुख्यतः शेतीमध्ये घेतली जातात त्या व्यतिरिक्त शेतीवर आधारित गुरेढोरे मेंढी व कुक्कुटपालन या सर्व उत्पादनांचा समावेश केला जातो. ऑस्ट्रेलिया या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा खाणकाम, औद्योगिक व वाहतूक यंत्रे फूड प्रोसेसिंग, रसायनेआणि स्टील उत्पादन हे आहेत.
खनिज संपत्ती :
ऑस्ट्रेलियामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणात असून येथे चांदी, शिशे, सोने, जस्त, लोह व युरेनियम ह्यांचे साठे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
इतिहास :
ऑस्ट्रेलियाच्या इतिहासाविषयी फारच कमी माहिती उपलब्ध असून येथे मानवांचे व सस्तन प्राण्यांचे अवशेष सापडले. मेलबर्न या ठिकाणी सापडलेल्या मानवाच्या कवटीवरून येथील मानव ऑस्ट्रेलॉइड वंशाचा होता हे कळते. काहींच्या मते टास्मानिया येथील आदीवासी नेग्रिटो वंशाचे आहेत, तर काहींच्या मते निग्रीटो आणि ऑस्ट्रेलॉइड वंशाचे मिश्रण येथे दिसतात.
ऑस्ट्रेलियन प्राचीन मानवाला गुहा चित्रे काढण्याची कला अवगत असावी असेही मानले जाते काही अज्ञात प्राणी, मानवी आकृत्या, कांगारू यांची चित्रे प्रस्तरालयात आढळून येतात. युरोपियन लोक येण्यापूर्वी वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या अनेक जमाती ऑस्ट्रेलिया या देशात राहत होत्या.
तसेच बहुतेक भटके आदिवासी हे शिकार करून आपला उदरनिर्वाह भागवत होते. मागासलेल्या अवस्थेत रानटी जीवन जगणाऱ्या या जमातींनी गोऱ्या लोकांचा तिरस्कार केला. या जमातींपैकी सर्वच मूळ ऑस्ट्रेलियन भूखंडावरील नसाव्यात. येथे परकीय आक्रमणामुळे हे लोक मला या व इतर बेटांवरून समुद्रमार्गाने येथे आले असावेत व स्थायिक झाले असा अंदाज आहे.
ऑस्ट्रेलिया खंड 18 व्या शतकापर्यंत कोणालाही माहीत नव्हते नवीन भागाच्या शोधार्थ भटकणारे काही प्रवासी या खंडाच्या जवळपास पोहोचले होते. 1642 मध्ये टास्मान या प्रवाशाने शोधलेल्या प्रदेशाला टास्मानिया हे नाव दिले गेले. 1688 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर विल्यम डॅम्पियर पोचला.
खेळ :
ऑस्ट्रेलिया या देशातील अतिशय लोकप्रिय खेळ क्रिकेट पोहणे व टेनिस हे आहे. तसेच येथील लोकांना खेळाविषयी अतिशय आवड आहे. तसेच ऑस्ट्रेलिया हा देश खेळांमध्ये तरबेज मानला जातो.
त्या व्यतिरिक्त या देशांमध्येलांब अंतर धावणे जलद धावणे, मोटारींच्या जागतिक शर्यती, गोल्फ, सायकल शर्यती इ. इत्यादी खेळ पुरुष व महिला दोघांमध्येही खेळले जातात.
वनस्पती व प्राणी :
ऑस्ट्रेलियातील उत्तरेकडे असणाऱ्या उबदार भागामध्ये हुप व जुन्या पाईन या वृक्षांची वने आढळतात. जसजसे उत्तरेकडे जावे तसे तसे वर्षावणामध्ये रुंद पर निवृक्ष दिसतात. 50 सेमीपेक्षा कमी पावसाच्या भागात निलगिरीची जंगले आढळतात. ऑस्ट्रेलियाच्या अंतर्भागात जावे तसे पर्जन्यमान कमी होते व तेथील भागात निलगिरी खुजी झाडे, मॉली, बुटकी बाबळीची झाडे यांना मल्गा असून नाव आहे.
तसेच येथील जंगलात आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये बॉटल ट्री, परोपजीवी ख्रिसमस वृक्ष, टास्मानियातील विशिष्ट पानझडी फांद्यांची झाडे, सूचिपर्णी वृक्षांची जंगले येथे आढळतात. तसेच ब्लॅकवुड, रेड सीडार, गोरख चिंच कोचवुड, मॅपल, अक्रोड, ओक या वृक्षांचा समावेश होतो.
येथील प्राणी जीवनामध्ये विविधता दिसून येते. प्लॅटिपस व एशिड्ना हे दोन सस्तन प्राणी अंडी घालणारे असून ते केवळ ऑस्ट्रेलियातच सापडतात.आपल्या पिल्लांना पोटाच्या पिशवीमध्ये ठेवणाऱ्या संस्थान प्राण्यांमध्ये कांगारू आहेच. तसेच येथे एक प्रकारचा लांडगा, चिचुंद्री, मांजर, अँटईटरइत्यादी प्राणी आढळतात.
ऑस्ट्रेलियातील प्राण्यांमध्ये वटवाघळे व पकोळ्या तीक्ष्णदंत प्राण्यांच्या अनेक जाती आहेत. कॅसोबेरी, येमू हे उडता न येणारे म्हणून बॉवरबर्ड हा घरट्यांसाठी वैशिष्ट्यपूर्ण शेपूट असलेला लायरबर्ड हा नक्कल करणे व नरपक्षाचे प्रेक्षणीय नृत्य यांसाठी असे प्रसिद्ध पक्षी आहेत.
किंगफिशर, कोकीळ, हनीईटर, पोपट, बदक, क्वेल, फ्लायकॅचर, पेंग्विन वगैरे पक्ष्यांच्याही अनेक जाती आहेत. सरीसृप व जलचर प्राण्यांमध्ये नाग, सरडे, गोड्या पाण्यातील कासव, मगर इ. च्या जाती आढळतात.
ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट :
ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये आहे. येथे दरवर्षी पर्यटक भेट देण्यासाठी येतात व येथील पाहण्यासारख्या ठिकाणाचा आनंद घेतात.
गोल्ड कोस्ट :
गोल्ड कोस्ट हे नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सागरी किनारा असून हे एक सुंदर स्थळ आहे. येथे पर्यटक भेट देतात व त्याचा आनंद घेतात. तेथील आकर्षक समुद्र व बंदराचे सुंदर दृश्य म्हणजे डोळ्यांचे पारणे फिटण्यासारखेच आहे. गोल्ड कोस्टमधील शॉिपगमध्ये रिसॉर्ट सौंदर्य-बाजारपेठा, आऊटलेट मॉल्स, बुटिक्स व उच्च डिझाइनर्स यांचा समावेश आहे.
हील्लर तलाव :
ऑस्ट्रेलियामध्ये Hillier (हिल्लर) नावाचे तलाव असा आहे ज्या तलावाचा रंग हा गुलाबी असून येथे अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येतात परंतु आज पर्यंत वैज्ञानिकांना गुलाबी रंग कसा आला याचा शोध लागलेला नाही.
हॉट एअर बलून राईड :
ऑस्ट्रेलियातील हे ठिकाण अतिशय हिरवाईला नटलेले असून येथे आपण प्रवासाचा आनंद घेऊ शकतो. जोडप्यांसाठी ही स्थळ एक पॉईंट आहे. येथील कला संस्कृती सुंदर उद्याने पर्यटकांची मने आकर्षित करतात.
कोस्टल रोड ट्रिप्स :
ऑस्ट्रेलियामध्ये जगातील सर्वात सुंदर असे रस्ते असून कोणालाही त्या रोडवर चालण्यासाठी आनंद वाटेल अशी रोड ऑस्ट्रेलियामध्ये आहे तेथे सर्वात निसर्गरम्य वातावरण व ड्रायव्हिंगचा अनुभव देणारी स्थळ हे मानले जाते. सिडनी पासून गोल्ड कोस्टपर्यंतचा पॅसिफिक रूट तुम्हाला रेन फॉरेस्ट रॉक पूल्स किनारपट्टीवरील गावे व समुद्रकिनाऱ्याचे सुंदर असे दृश्य दर्शवितो.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी काय आहे?
ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी कॅनबेरा हे आहे.
ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन काय आहे?
ऑस्ट्रेलिया या देशाचे चलन ऑस्ट्रेलियन डॉलर हे आहे.
ऑस्ट्रेलिया या देशाची प्रमुख भाषा काय आहे?
ऑस्ट्रेलिया या देशाची प्रमुख भाषा इंग्रजी आहे.
ऑस्ट्रेलिया या देशातील अतिशय लोकप्रिय खेळ कोणता आहे?
ऑस्ट्रेलिया या देशातील अतिशय लोकप्रिय खेळ क्रिकेट, पोहणे व टेनिस हे आहे.
ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?
कांगारू