Nepal Information In Marathi नेपाळ हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जातो नेपाळमध्ये 80 टक्के लोक हिंदू असून तेथील टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळची राजधानी काठमांडू ही आहे. तसेच येथील चलन हे नेपाळी रुपया आहे. या देशातील अधिकृत भाषा नेपाळी असून येथे नेवारी ही भाषा प्रचलित आहे. तर चला मग नेपाळ या देशाविषय आपण सविस्तर माहिती पाहूया.
नेपाळ देशाची संपूर्ण माहिती Nepal Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
देशाचे क्षेत्रफळ हे 1,41,720 चौरस किमी असून उत्तर दिशेला चीन देश पूर्वेस सिक्कीम व पश्चिम बंगाल, दक्षिणेस बिहार व उत्तर प्रदेश आणि पश्चिमेस उत्तर प्रदेश ही भारताची राज्ये असल्यामुळे या देशाच्या चारही बाजू जमिनीने व्यापलेल्या आहेत, म्हणून याला भूवेष्टित नेपाळ असेही म्हटले जाते. भारत व नेपाळ सीमा 960 किमी आहे.
हवामान :
येथे पाऊस हा अनुकूल स्वरूपाचा असून वातावरणामध्ये नेहमीच बदल होत असतात. या देशाच्या पूर्व भागात मोरांग येथे 180 सेंमी तर पश्चिम भागात कांचनपूर येथे 80 सेमी असा पाऊस पडतो. काठमांडू मध्ये हिवाळ्यातील 10° सेल्सिअस पर्यंत तापमान खाली येते. तर जुलै मध्ये 26° तसेच पाऊस हा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये पडतो.
इतिहास :
नेपाळ या देशाचा इतिहास हा गौतम बुद्ध यांच्या जन्मापासून उपलब्ध होतो. नेपाळ हे पूर्वी जन्मे होते. कश्यप मुलींनी पाठ फोडून कश्मीरमधील पाणी काढून टाकले तेव्हा येथे वस्तीसाठी जागा निर्माण झाली अशी नेपाळ विषयी दंतकथा आहे.
गौतम बुद्धाचे जन्म गाव हे लुंबिनी असून ते नेपाळ देशामध्ये आहे. तसेच सम्राट अशोक ने नेपाळमध्ये जाऊन तेथे चार स्तूप बांधलेले आहे ते स्तंभ स्वरूपात आहे. श्रीराम यांची पत्नी सीता यांचा जन्मही नेपाळमधील जनकपूर येथे झाला असे म्हटले जाते.
नेपाळ या देशांमध्ये राजपूत घरांनी केव्हा व कशी आली त्या विषयी काही माहिती उपलब्ध नाही. गुरखा याठिकाणी गोरखनाथ आणि कालिकादेवी यांची दोन मंदिरे आहेत.
14 व्या शतकात नेवारी मल्ल या राजाचा प्रभाव पडू लागला त्यामुळे जयस्थितीमल्ल आणि त्याचा नातू यक्षमल्ल या दोघांचेही कामगिरी खूप मोठी होती. आजचे महान राजप्रसाद काही मंदिरे आणि जयस्तंभ हे मल्ल राजवटीचे अवशेष होते.
सनी देवल यांची व्यवस्था चांगली लावली तसेच नववी वस्ती निर्माण केली रयतेला योग्य ते नियम घालून दिले मल्ल घराण्याच्या आणखीन कर्तबगार यांचा इतिहास 1963 च्या इटालियन संशोधक जूझेप्पे तूची याला मिळाला. तसेच या शास्त्रज्ञाने बरेच शिलालेख शोधून काढले परंतु त्यावरून संकरित इतिहास कोणीही आतापर्यंत लिहू शकले नाही.
शेती :
या देशामध्ये डोंगराळ स्वरूपाची जमीन असली तरीही येथील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेतीच आहे. पोखरा, काठमांडू यांसारख्या उंचावरील नद्या खोऱ्यांच्या भागात तसेच तराईचा दक्षिण भाग हे प्रमुख शेती प्रदेश असून येथे 92 टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत.
या देशात शेतीमध्ये बार्ली, ज्वारी, गहू, भात, मका, बाजरी, ऊस, बटाटे, कडधान्ये–डाळी, मिरच्या, कांदे व तीळ, मोहरी तसेच तेलबिया, तंबाखू, कापूस, ताग, अफू, चहा तसेच अक्रोड, सफरचंद, जरदाळू, बोर, पीच, डाळिंबे, आंबा, पेरू, चिंच, संत्री, नासपती, पपई, फणस इत्यादी भारताप्रमाणेच फळे पिकवली जातात.
खनिज संपत्ती :
नेपाळ या देशांमधील खनिज संपत्ती पैकी अभ्रक हे सर्वश्रेष्ठ खनिज आहे. याव्यतिरिक्त कोबाल्ट, तांबे व लोहधातुक यांचे काही साठे आहेत. जस्त, शिसे, निकेल, ग्रॅफाइट यांचेही काही साठे आहेत. चुनखडक व जिप्सम येथे आढळते.
काही जागी सदाप्रज्वलित नैसर्गिक वायू आहे. सांगलेखोजा, बरहाधरे येथे चांदी तसेच काही नद्यांच्या वाळूमध्ये सोन्याचे कान वाहून येत असतात तसेच डोंगराळ भागात गेरू व सुरमा नावाची खनिजे सापडतात.
उद्योग :
या देशांमध्ये लाकूड काम, कापड विणणे, धातुकाम, कलाकुसरीच्या वस्तू बनविणे इ. हे गृह उद्योग व लघुउद्योग चालत असून काही उद्योग शेतीवर व जंगलावर आधारित आहेत. नेपाळमध्ये खनिजांचे साठे मर्यादित असल्यामुळे भारी उद्योग विकसित झालेले नाहीत. विराट नगर येथील ताग उद्योगामुळे या देशाला विदेशी चलन प्राप्त होते.
समाज जीवन :
नेपाळ या देशातील समाज जीवन हे सुखदायक असून तेथे 30 प्रकारचे नेपाळी जातींची गट आढळतात. त्यामध्ये क्षेत्री, बाहुन, मगर, थारू, नेवार, गुरूंग, तामाड, किरॉंत राई, लिंबू, यादव, शेर्पा, नेपाळी मियॉ यांचा समावेश होतो. नेपाळी कामकाज देवनागरी लिपीत चालते. यांच्या लिपी व भाषेत 30 प्रकारच्या बोली आहेत. नेपाळी लोक हे उदार, धार्मिक व कष्टाळूक्तीचे असून ते लहान लहान गावांमध्ये राहतात.
त्यांची घरे दगड-माती विटांची असून दुमजली असतात. खालच्या मजल्यावर गुरीढोरे बांधतात व सामान ठेवतात तसेच वरचा मजला त्यांच्या राहण्यासाठी असतो. घराची छप्पर हे बांबू व गवत यांनी शाकारलेली असतात. म्हणजे एक सदरा व त्यावर कोट, कमरेला कापडी कमर बंद, मी अंगाबरोबर पायजमा डोक्यावर नेपाली टोपी असा असतो.
शहरातही असाच वेश असतो तसेच शहरी लोकांचे कपडे स्वच्छ असतात. स्त्रियांच्या वेशामध्ये खेड्यातील स्त्रिया घागरा पेहरातात, कर शहरांमधील बहुतेक स्त्रिया साडी वापरतात. नेपाळी लोकांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ किंवा गहू, डाळी, कडधान्य भाजीपाला, फळ व मास यांचा उपलब्धतेनुसार समावेश केला जातो.
नद्या :
नेपाळ या देशामध्ये गंडकी, कर्नाली व कोसी या प्रमुख नद्या असून चमलिया, कर्नाली, सेती, भेरी, काली गंडक, त्रिशूली, सुन, कोसी, अरुण व तमुर या नद्यांनी मध्य नेपाळचे नऊ भागात विभाजन केले आहे.
या नद्यांत शिवाय नारायणी, राप्ती, बाघमती आणि हुमला, रुद्रमती, मणिमती, हनुमती, भद्रमती, विष्णुमती, प्रभावती, कर्मनाशा इ. नद्याचे विस्तृत जाळे पसरलेले आहे. काली, कर्नाली, राप्ती, घागरा सप्तगंडक, सेती, नारायणी, गंडकी आणि सप्त कोसी, अरुण, तमुर या सर्व नद्या भारतातील गंगा नदीच्या मोठ्या उपनद्या बनतात.
सरोवरे :
या देशांमधील सरोवरं पैकी फोकसुंद, फेवा, रारा, रूपा, देपांग व मैदी ही प्रमुख सरोवरे होत.
वनस्पती व प्राणी :
या देशांमध्ये पर्वतीय भाग तसेच सकल भाग आहे तेथे वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आढळून येतात. त्यात शिसू, साल, खैर, बर्च इ. वृक्षही आढळतात. शिवालिक व महाभारत पर्वतश्रेणींच्या 1,500 ते 3,000 मी. उंचीच्या भागात देवदार, चीड, ओक, उंच ऱ्होडोडेंड्रॉन, पॉप्लर, अक्रोड व लार्च वनस्पतींची मिश्र जंगले आढळतात.
तर शिवालिक जंगलातील जमीन खडकांची व कमी पोषण युक्त असल्यामुळे तेथे छोटी छोटी झुडपे आढळतात. तसेच हिमालय प्रदेशात दाट वने असून त्यामध्ये फर, सायप्रस, प्रूस जूनिपर, बर्च इ. वृक्ष तसेच वेगवेगळी रंगीत फुल झाडे व कमी उंचीची ऱ्होडोडेंड्रॉन झाडे आढळतात. जपापुष्प हे नेपाळची राष्ट्रीय फूल आहे.
प्राणी :
नेपाळमधील तराईच्या प्रदेशात चित्ता, वाघ, महिष, गौर, हत्ती, चितळ, सांबर, बारशिंगा, माकडे व चितवन भागातील राप्ती खोऱ्यात भारतीय एकशिंगी गेंडा, अनेक जातींचे सर्प, मोठमोठे विंचू व इंगळ्या, नद्यांतून मासे व सुसरी आहेत. ज्या प्रमाणे भारतामध्ये पक्षी आढळतात ते पक्षी येथे आढळतात.
दळणवळण :
नेपाळी अतिशय मध्ये बरीच जमीन डोंगराळ असल्यामुळे तेथे वाहतूक ही एक मोठी समस्या आहे परंतु तेथील शनाने या देशांमध्ये महामंडळाकडे लोहमार्ग सडका दोर मार्ग इत्यादींची व्यवस्था केलेली आहे. लोहमार्ग कमी असून येथे मतदारसंघा व वायू मार्ग यावरच वाहतूक चालते.
पर्यटन स्थळ :
नेपाळ हा देश नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने नटलेला आहे. या देशांमध्ये अनेक धार्मिक स्थळ, ऐतिहासिक स्थळ आहे. एक नव्हतं बुद्धाची जन्मभूमी आहे. या देशाला भेट देण्यासाठी पर्यटक दरवर्षी येत असतात. तसेच अनेक भाविक भक्त देव दर्शनासाठी येत असतात. येथे जगातील उंच शिखरांपैकी बरेच शिखर येथे आहेत. ते पाहण्यासाठी हे येथे पर्यटक येतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
नेपाळची राजधानी काय आहे?
नेपाळची राजधानी काठमांडू ही आहे.
नेपाळची चलन काय आहे?
नेपाळची चलन हे नेपाळी रुपया आहे.
नेपाळ या देशाची मुख्य भाषा काय आहे?
नेपाळ या देशातील अधिकृत भाषा नेपाळी असून येथे नेवारी ही भाषा प्रचलित आहे.
नेपाळ सर्वात प्रसिद्ध कशासाठी आहे?
नेपाळबद्दलच्या काही सर्वात प्रसिद्ध गोष्टींमध्ये त्याच्या पर्वत रांगा, माउंट एव्हरेस्ट, विविध जाती आणि भाषा आणि दोलायमान कला आणि हस्तकला यांचा समावेश आहे.
नेपाळमधील लोक कोणत्या राष्ट्रीयत्वाचे आहेत?
नेपाळी