मोरोक्को देशाची संपूर्ण माहिती Morocco Information In Marathi

Morocco Information In Marathi मोरोक्को या देशाला सांस्कृतिक मोठा वारसा लाभलेला असून उत्तर आफ्रिकेतील एक शक्तिशाली देश आहे. आफ्रिका भागातील हा असा एकमेव देश आहे जो आफ्रिका संघाचा सदस्य नाही. याशिवाय हा देश अरब मगरिब संघ, ऑर्गेनायझेशन ऑफ द इस्लामिक कॉन्फरन्स तसेच जी-77 या गटांचा सदस्य आहे. तर चला मग या विषयी सविस्तर माहिती पाहुया.

Morocco Information In Marathi

मोरोक्को देशाची संपूर्ण माहिती Morocco Information In Marathi

मोरोक्को या देशाचा बराचसा भूभाग हा डोंगराळ स्वरूपाचा असून ॲटलास पर्वतरांग ही देशाच्या मध्यातून जाते. मोरोक्कोचा दक्षिणेकडील भाग सहारा वाळवंटाने व्यापला आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

मोरोक्को या देशाचे क्षेत्रफळ 7,10,850 चौरस किमी असून त्यापैकी मोरोक्कोने आपला हक्क सांगितलेल्या पश्चिम सहारा प्रदेशाचे क्षेत्रफळ हे 2,52,1320चौरस किमी आहे. मोरोक्कोच्या उत्तरे दिशेला भूमध्य समुद्र, पूर्वेला व आग्नेय दिशेला अल्जीरिया, दक्षिणेस सहारा व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. मोरोक्कोच्या चोहोबाजूंच्या सरहद्दींची मिळून एकूण लांबी 3,915 किमी. आहे.

हवामान :

मोरोक्को या देशातील हवामानात आपल्याला विविधता पाहायला मिळते. येथील हवामानाची तीव्रताही कमी असून पर्वत शेळ्यांच्या वायव्येकडील प्रदेशात थंड व आदरही वाडे आणि उबदार व कोरडे असे उन्हाळे असतात तर आपल्याकडील सहारा प्रदेशातील हवामान कोरडे असून उन्हाळे हे उष्ण हिवाळे उबदार व रात्र थंड असते.

समुद्र किनारी प्रदेशातील तापमान हे कमी तर अंतर्गत भागातील तापमान जास्त असते अटलांटिक वरून वाहत येणारे वादळवारे ॲटलास पर्वतामुळे अडतात समस्यांमुळे पर्वतांच्या सात सन्मुख पश्चिम उतारावरील हवामान थंड आणि आंध्र राहते तर पूर्वेकडील बाजूचे हवामान सहारा प्रदेशाचे उष्ण व कोरडे बनले आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर व एप्रिल मे या काळात पर्जन्यवृष्टी होत असून वायू भागात त्याचे प्रमाण वार्षिक सरासरी 75-100 सेमी. असते. तर जास्त उंच पर्वतीय प्रदेशात हिमवृष्टी होते.

खनीज संपत्ती :

मोरोक्कोतील मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक प्रकारचे आहे तसेच या देशांमध्ये फॉस्फेट हे सर्वात महत्त्वाचे असे खनिज द्रव्य या देशात आहे. याच्या निर्यातीसाठी मोरोक्को हा जगात प्रसिद्ध आहे.

See also  केनिया देशाची संपूर्ण माहिती Kenya Information In Marathi

त्या व्यतिरिक्त इतर खनिजांमध्ये कोबाल्ट, निकेल जस्त, मँगॅनीज, शिसे व लोह ही मुख्य खनिजे देखील येथे आढळतात तसेच कथील, तांबे, मीठ चांदी, अँटीमनी, बराइट, कोळसा, खनिज तेल व नैसर्गिक वायू हे खनिज संपत्ती देखील येथे आढळते.

भूवर्णन :

मोरोक्कोची बरीचशी जमीन हे डोंगराळ स्वरूपाची असून येथील जमिनीचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग केले जातात. 1) ॲटलास पर्वतीय प्रदेश, 2) अटलांटिक किनाऱ्यावरील मैदानी प्रदेश व 3) पर्वतीय प्रदेशाचा आग्नेय दिशेकडे सहारा वाळवंटी प्रदेश.

नद्या :

देशामध्ये जलसिंचन हे नदीच्या मार्फत केले जाते. 560 किमी लांबीची मूलू ही नदी असून ती ॲटलास पर्वताच्या हाय एक लॉस व मध्य ॲटलास सैन्यादरम्यान उगम पावते तसेच ईशान्य दिशेकडे वाहत जाऊन पुढे भूमध्य समुद्राला मिळते.
याव्यतिरिक्त देशांमध्ये सिबू, ऊम अर रबीआ, बू रेग्रेग, टेनसीफ्ट, द्रा, सुस, गेरीस व झीझ ह्या नद्या प्रमुख नद्या आहेत.

इतिहास :

मोरोक्को येथील संस्कृती ही मिश्र संस्कृती आहे. येथे आफ्रिका, युरोप, अरब लोक व कृष्णवर्णीय आफ्रिकी लोक यांच्यातील संस्कृतीचे नेहमीच आदान प्रदान झाल्यामुळे येथील संस्कृतीवर त्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. येथील जी मुळ रहिवासी आहेत ते बर्बर जमातीचे लोक म्हणून ओळखले जातात.

इ.स.पू. 146 मध्ये प्राचीन कार्थेज नगर संस्कृतीचा भाग हा मॉरीटेनिया असा रोमन प्रांत बनला. इ. स. 429 मध्ये रोमन सत्तेचा ऱ्हास झाला व याच काळात युरोपाततुन व्हँडॉल लोकानी या प्रदेशावर स्वारी केली. सहाव्या शतकातील बायजंट इन साम्राज्याच्या ताब्यात गेले. तर सातव्या शतकामध्ये अरबांनी मोरोक्को जिंकले तसेच संक्रमणाच्या वरील सर्व कालखंडात ब र्बर लोकांचा विरोध कमी जास्त प्रमाणात टिकून राहिला आठव्या व नवव्या शतकात छोटी-मोठी मरूस्थलीय राज्य येथे स्थापन करण्यात आली.

मोरोक्कोचा इतिहास काल हा 1300-1800 चाचेगिरीचा कालखंड म्हणून ओळखण्याला जातो.
चाचेगिरीतुन खूप मोठे उत्पन्न हे मूर सत्ताधाऱ्यांना मिळत असे. अमेरिकेने 1801 मध्ये ट्रीपोलिशी युद्ध करून चाचेगिरीला आळा घालण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ट्रिपोली हे छोटे राज्य होते तिथून अमेरिकी व युरोपीय बोटींवर चे हल्ले करत असत.

See also  पोलंड देशाची संपूर्ण माहिती Poland Information In Marathi

1802 मध्ये मोरोक्कोचा सुलतान मौले सौलीमान याने अमेरिकेविरुद्ध युद्ध घोषित केले पण ही बातमी अमेरिकेला करण्यापूर्वी त्याने माघार घेतली होती. 1841 मध्ये ख्रिस्ती लोकांना पकडून गुलाम करण्याची पद्धत मोरक्को या देशात बंद करण्यात आली. व नंतर 1817 साले मोरोक्को मध्ये चाचेगिरी कायद्याने बंद करण्यात आली.

मोरोक्कोच्या इतिहासामध्ये फ्रेंच आणि स्पॅनिश या वसाहतींना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. फ्रान्सने अल्जेरिया आधीच ताब्यात घेतलेला असताना मोरोक्कोल अंतर्गत संघर्ष याचा फायदा घेऊन फ्रान्सने या देशावर आपला ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला.

परंतु जर्मनीने याला विरोध करून 1906 मध्ये युरोपीय साम्राज्यवादी सत्तांची बैठक घेऊन मोरोक्को हा देश स्वतंत्र घोषित केला व सर्व युरोपीय सत्तांना समान व्यापारी हक्क देण्यात आला. फ्रान्सने 1960 साली व स्पेन 1911 साली मोरोक्कोमधील लष्करी आक्रमण केले. तेव्हाही जर्मनीने विरोध केला परंतु ग्रेट ब्रिटनने फ्रान्सला पाठिंबा दिला.

शेती :

मोरक्को येथील 70 टक्के लोक शेतीवर निर्भर असून त्यावरच आपली उपजीविका भागवत असतात देशातील वीस टक्के जमीन शेतीखाली असून पंचवीस ते तीस टक्के जमीन चराऊ, अरण्य व एस्पाट्रो या गवतांनी व्यापले आहे. या देशांमध्ये शेतीतून सातू, गहू, ऊस, बीट, लिंबूवर्गीय फळे, मका, द्राक्षे, ऑलिव्ह, टोमॅटो, बटाटे, कडधान्य, हरभरा व मेथी ही ही प्रमुख पिके घेतली जातात.

हा देश लिंबूवर्गीय फळे निर्यात करणारा मोठा देश आहे. तसेच देशामध्ये धने-जिरे, जवस, बदाम, कॅनरी गवताचे बी ही उत्पादने घेतली जातात. पशुपालन हा सुद्धा येथे महत्त्वाचा उद्योग मानला जातो तसेच घोडे डुक्कर उंट बकर्‍या मेंढ्या कोंबड्या व गुरे यांचाही त्यामध्ये समावेश आहे.

व्यवसाय व उद्योग :

येथे व्यवसायामध्ये शेतीवर निर्भर असणारे उद्योग पशुपालन, मत्स्योत्पादन हे उद्योग महत्त्वाचे असून साफी, एस्वीर, आगादिर कॅसाब्लांका हे तिल मासेमारीची प्रसिद्ध केंद्र आहेत. त्याव्यतिरिक्त देशांमध्ये अन्न प्रक्रिया मद्य, पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, कापड, सिगरेट तयार करणे, टायर, गालिचे, स्वयंचलित वाहने आणि पादत्राणे हे उद्योग प्रमुख आहेत.

See also  अफगानिस्तान देशाची संपूर्ण माहिती Afghanistan Information In Marathi

कला व संगीत :

इस्लाम एकला परंपरांची सर्वसाधारण आपल्याला वैशिष्ट्ये दिसून येतात. देशात वस्तूकलामध्ये राजवाडे, मशीदी आपल्याला दिसून येतात. उत्तम प्रतीचे रंग विणलेली भरतकाम केलेली वस्त्रे चित्र जीवनिका येथील पारंपारिक हस्तव्यवसाय हे वैशिष्ट्य आहे.

मोरोक्कोच्या संगीत क्षेत्रामध्ये तंबोरा, ढोलक व बासरी यासारख्या वाद्यांचा वापर करण्यात येतो. तर दुसऱ्या बाजूला दरबारी अरबी संगीताची परंपरा ही आपल्या दिसून येते.

पर्यटन स्थळ :

पर्यटन स्थळांमध्ये बरेचसे पर्यटन स्थळे ऐतिहासिक, कलात्मक वैशिष्ट्यपूर्ण आहेत येथे पर्यटक भेट देण्यासाठी येतात. लेक्सस येथील प्राचीन फिनिशियन व रूम अवशेष प्रसिद्ध असून हे एक स्यूता मुक्त असे बंदर आहे. येथून जिब्राल्टरची सामुद्रधुनीचे सुंदर असे दृश्य आपण पाहू शकता.

राबात या हे राजधानीचे शहर असून येथे राजवाडा शासकीय इमारती आणि आधुनिक मशिदी पाहायला मिळतात. तसेच पुरातन वस्तुसंग्रहालय व कला संग्रहालय येथे असून इतिहासकालीन शाही कब्रस्थान सुद्धा आहेत.

राबात आणि कॅसाब्लांका यांच्यामध्ये असलेला अटलांटिक समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक येथील पुळणी येथील सुंदर प्रसिद्ध दृश्य पाहण्यासाठी गर्दी करतात. तसे याच भागात साफी येथे प्राचीन पोर्तुगीजांचा किल्ला आहे. तसेच एस्वीर हा सागरी किनारा लोकप्रिय आहे.

माराकेश हे मरूस्थलीय शहर म्हणजे देशातील गुलाबी नगरी असून येथे इतिहासकालीन अनेक वास्तूंचे अवशेष येथे आढळतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment