पेरू देशाची संपूर्ण माहिती Peru Information In Marathi

Peru Information In Marathi पेरू या देशाची राजधानी लिमा असून तेथिल हे सर्वात मोठे शहर आहे. विकुना हा पेरू या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे. सिनकोना हा पेरू या देशाचा राष्ट्रीय वृक्ष आहे. पेरू हा देश खूप प्राचीन देश मानला जातो कारण सर्वात जुने रहिवाशी येथे 15000 वर्षांपूर्वी आले होते असा लोकांचा समज आहे. ब्राझील आणि अर्जेटिना नंतर पेरू हा दक्षिण अमेरिकेतील तिसरा मोठा देश मानला जातो.

Peru Information In Marathi

पेरू देशाची संपूर्ण माहिती Peru Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

या देशाचे क्षेत्रफळ 12,85,215 चौरस किलोमीटर आहे. या देशाच्या लगतच्या सिमा पाहिल्या तर उत्तरेला इक्वेडोर व कोलंबिया तर पूर्वेला ब्राझिल व आग्नेये दिशेला बोलिव्हिया आणि दक्षिण दिशेला चिले हे देश तर पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.

इतिहास :

पेरू या देशाचा प्राचीन इतिहास फारसा उपलब्ध नाही परंतु पुरातत्वीय अवशेषांवरून अँडीज पर्वतश्रेणींच्या भागात अखंडपाषाणस्तंभी अवशेष सापडले. त्यावरून अँडियन संस्कृती या प्रदेशात इ.स. पू. 3500 ते 1000 च्या दरम्यान येथे नांदत असावे असे अनुमान आहे. टिटिकाका सर्व राज्या दक्षिण किनाऱ्याजवळ तसेच डोंगराळ भागातही प्राचीन अवशेष सापडले.

यावरूनच असे लक्षात येते की लोकवस्ती तेव्हा ही असावी इ.स.पू. 2500 नंतर त्यांच्यात झपाट्याने सुधारणा झाली आणि ते स्थिर वस्ती निर्माण होऊन शेती करून राहू लागले. लिमा येथील परमिट प्रसिद्ध असून येथे लोकांचे तांत्रिक ज्ञान तसेच शिल्पकलेतील व वास्तुकलेतील कौशल्याची जाणीव होते.

भाषा व साहित्य :

पेरू या देशाची राष्ट्रीय भाषा स्पॅनिश व केचुआ ह्या आहे. परंतु अनेक इंडियन आपआपल्या जुन्या बोलीभाषाच बोलतात. येथील लेखकांनी स्पॅनिश ही भाषा समृद्ध बनवली असून काव्य नाट्य निबंध ललित कला कादंबरी सर्व या क्षेत्रात अनेक पेरूव्हियनांनी मान्यता मिळविलेली आहे.

भौगोलिक रचना :

पेरूच्या भौगोलिक रचनेचा विचार केला असता यामध्ये प्रशांत महासागराच्या किनार्‍यावरील वृक्ष व सपाट प्रदेश व अ‍ॅमेझॉन नदीच्या खोऱ्यात घनदाट जंगल आहे.  अ‍ॅमेझॉनचा उगम पेरूच्या दक्षिण भागातील नेव्हादो मिस्मी ह्या ॲंडीझमधील एका शिखरावर होतो.

See also  उत्तर कोरिया देशाची संपूर्ण माहिती North Korea Information In Marathi

उकायाली व मारान्योन ह्या अ‍ॅमेझॉनच्या पेरूमधील प्रमुख उपनद्या आहेत.  टिटिकाका हे दक्षिण अमेरिकेमधील सर्वात मोठे सरोवर देशाच्या आग्नेय भागात बोलिव्हियाच्या  सीमेवर स्थित आहे.

हवामान :

फिरूया देशातील हवामानामध्ये प्रदेशानुसार आपल्याला भिन्नता दिसून येते किनारपट्टीवरील हवामानात दमटपणा व हम बोल्ड या शीतसमुद्र प्रवाहामुळे थंड वातावरण निर्माण होते. कधी कधी किनाऱ्यालगतचे तापमान हे गोठणबिंदूच्या खाली जाते. लिमा येथे वर्षाला सरासरी 3.90 सेमी पाऊस पडतो.

तर सिएरा प्रदेशातील हवामान कोरडे व आरोग्यकारक असून तापमानात बरेच बदल दिसून येतात. हे बदल पर्वतांच्या उंचीवर अवलंबून असतात. उंचीवरील शहराचे तापमान विषुववृत्त सानिध्यात असूनही -3.9° से ते 23.9° से या दरम्यान असते. या विषुवृत्तीय सपाट प्रदेशामध्ये पावसाचे प्रमाण हे प्रतिवर्षी 254 सेमि. पेक्षा जास्त असते.

खनिज संपत्ती :

पेरू या देशात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आढळते. चांदीच्या उत्पादनात या देशाचा जगात तिसरा क्रमांक लागतो तर तांब्याच्या उत्पादनात पाचवा क्रमांक लागतो. त्याव्यतिरिक्त जस्त, लोखंड, सोने, शिसे, दगडी कोळसा व खनिज तेल यांचेही उत्पादन येथे होते.

वनस्पती व प्राणी :

पेरू या देशातील स्थानानुसार हवामानात भिन्नता असल्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारची वृक्ष आढळतात. त्यामध्ये कमी पावसाच्या प्रदेशात शमी व तळा सारखी झाडे तर मेस्किट, निलगिरी, ऑलिव्ह व काही प्रमाणात फळझाडे आढळतात. अधूनमधून वाळवंटी झुडुपेही दिसतात.

काही प्रदेशात गवताची कुरणे असून निलगिरी, कोकाची झुडुपे व अनेक औषधी वनस्पती आहेत. कोका ही पेरूची वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असून त्यापासून कोकेन हे मादक द्रव्य तयार करतात. इथे वनस्पतीचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. त्यामध्ये मॉहॉगनी, एबनी, सीडार, ड्रायवुड, सिंकोना, सार्सापरिला, बार्बास्को, व्हॅनिला हे आहेत.

तसेच येथील जंगलांमध्ये अँडीज पर्वतातील अल्पाका व नामा हे माणसाळलेले प्राणी आहेत. त्याव्यतिरिक्त उंटा सारखा ग्वानाको व विकून हे प्राणी प्रसिद्ध आहे. चींचिल्ला, कॉडर, माकडे, जॅगुआर, नर्भक्षकहे प्राणी आढळतात. प्यूमा, टॅपिर, विविध प्रकारचे साप तसेच रॉबिन, फ्लायकॅचर, बदके, पारवे, फिंच, इ. अनेक जातींचे पक्षी आढळतात.

See also  अफगानिस्तान देशाची संपूर्ण माहिती Afghanistan Information In Marathi

शेती व्यवसाय :

पेरू या देशातील पन्नास टक्के लोक शेतीवर निर्भर आहेत. डोंगराळ भागातील शेतीचे लहान लहान भागांमध्ये विभाजन केले असून ती इंडियन जमातीच्या मालकीची आहे. येथील लोक पेरणी सामुदायिक पद्धतीने करतात.

या देशात बटाटा, तांदूळ, द्राक्षे, अननस व ऑलिव्ह हे फळ पिकवली जातात. त्याव्यतिरिक्त प्रमुख पिकांपैकी मक्का, ऊस, बटाटे, मका, तांदूळ, कापूस, इतर धान्ये, व कॉफी यांचे हे पीक घेतले जाते. हा देश मासेमारी व माशांच्या उत्पादनात जगात सर्वप्रथम आहे.

खेळ :

फिरवेल देशातील शहरांमध्ये मुष्टियुद्ध, कुस्त्या व टेनिस हे खेळ लोकप्रिय आहेत. नीलिमा या राजधानीच्या शहरांमध्ये बैलझोंबीची दोन मैदाने आहेत. तसेच येथे सामान्य लोकांमध्ये कोंबड्याची झुंज व्हॉलीबॉल फुटबॉल घोड्याच्या शर्यती हे खेळही प्रिय आहेत.

समाज जीवन :

पेरू या देशांमध्ये 12% गोरे लोकांची संख्या असून इंडियन लोक लहान लहान खेड्यात राहतात. तेथील बरेच लोक निरक्षर आहेत तसेच येथे शुद्ध इंडियन 50 टक्के व मिश्र वंशीय व 40 टक्के लोक राहतात.

इंडियन जमातीत केचुवा व आयमारा या जमाती मुख्य असून त्यांची वस्ती अँडीज पर्वतावरील उंच पठारावर आहे. येथील बऱ्याच लोकांनी पाश्‍चात्त्य संस्कृती आत्मसात केलेली असून अजूनही काही जमाती पारंपारिक पद्धतीने राहतात. काही जमातींत विषयी माहिती नसून ह्या जमाती जमला मध्ये राहतात.

तेथील लोकांची घरे ही माती व दगडांचे तसेच छपरे धाब्याची असून मोठमोठ्या कुटुंबांमध्ये हे एकत्रित राहतात. यांच्या घरांना दरवाजे खिडक्या क्वचित आढळतात त्यासाठी ते एखादे कातडे टांगून दरवाजाचे काम भागवते किंवा मग झाडांच्या पानांनी घरे शाकारलेली असतात.

येथील लोकांच्या आहारामध्ये मका, तांदूळ, कडधान्य आणि केळी, अंजीर, आंबे हे फळं असतात तसेच डुकरे, सरडे, कोंबडी इत्यादी प्राण्यांचे मास, मासे समावेश असतो. त्यांचे जेवणात खूप तिखट घालतात व पाण्याऐवजी चा नावाची मक्या पासून केलेली दारू पितात.

वाहतूक व्यवस्था :

पेरू या देशांमध्ये रस्त्यांची एकूण लांबी 56,940 किमी. असून त्यापैकी 5,949 किमी.चे डांबरी रस्ते होते. एका दूरच्या सीमेवरून किनाऱ्याने लिमा पर्यंत जाणारा रस्ता पॅन अमेरिकन हायवे असून ट्रान्स-अँडियन हायवे मुळेच लिमा व पुकाल्पा ही शहरे जोडलेले आहेत. येथील लोहमार्ग महत्वाचे असून त्याची लांबी 3292 किमी व 527 किमी. हे सरकारी व खाजगी लोहमार्ग आहे. सेंट्रल रेल्वे हा 513 किमी लांबीचा जगातील सर्वात उंचीचा लोहमार्ग असून त्याची उंची 4,818 मी. आहे.

See also  आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

या देशातील सागरी बंदरातुन बऱ्याच देशांशी व्यापार चालतो. कायाओ हे बंदर महत्त्वाचे असून उत्तर पेरूमध्ये पाकाझमायो, सलाव्हेरी, पाइता ही बंदरे खोल पाण्याची सात बंदरे या देशात आहे तसेच दक्षिण पेरूमध्ये 4 बंदरे आहे. पेरू या देशात जगातील सर्वात मोठे मासेमारी बंदर चींबोते हे आहे.

एरोपेरू हे शासकीय विमान कंपनी अंतर्गत व आंतरराष्ट्रीय असून 4 विमा कंपन्या आणखीन अंतर्गत हवाई वाहतूक करतात. लिमा शहराजवळ होसे चावेस हा आंतरराष्ट्रीय विमानतळ असून निमा जवळ आणखीन एक दुसरा आंतरराष्ट्रीय विमानतळ व पहिला विमानतळ अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी वापरण्याची सुविधा आहे.

पर्यटन स्थळे :

पेरू या देशामध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत त्यामध्ये ऐतिहासिक स्थळ किंवा शहरांची संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. अनेक पर्यटक दरवर्षी येथे भेट देत असतात. पेरू येथील कुस्को व माचू हे इनका अवशेष मोठी पर्यटकांचे आकर्षण असून आहे. अनेक पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात.

लिमा या देशाच्या राजधानीच्या शहरांमध्ये स्पेनच्या साम्राज्याचे वैभव आपल्याला पहावयास मिळते. देशातील पर्वत रांगांमधील सौंदर्यदृष्टी मनमोहनारे आहे तसेच उंचीवरून टिटिकाका हे सरोवर पाहायला मिळते.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment