दक्षिण आफ्रिका देशाची संपूर्ण माहिती South Africa Information In Marathi

South Africa Information In Marathi दक्षिण आफ्रिका हा आफ्रिकामधील सर्वात मोठा स्वतंत्र देश आहे. हा देश दक्षिणेकडील सर्वात जास्त लोकसंख्याचा देश म्हणून या देशाला ओळखले जाते. दक्षिण आफ्रिका हे नाव आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील देशाच्या भौगोलिक स्थानावरून आले आहे. या देशाला इंग्रजीमध्ये युनियन ऑफ साउथ आफ्रिका म्हणून ओळखला जातो. हा देश प्रिटोरिया, ब्लोमफॉन्टेन आणि केपटाउन ह्या 3 राजधानी असलेला शहराचा देश आहे. या देशातील सर्वात मोठे शहर जोहान्सबर्ग आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापार व उद्योग केले जातात. दक्षिण आफ्रिका देशाला युनायटेड किंगडम कडून 31 मे 1910 रोजी स्वतंत्र मिळाले. या देशाचे बोधवाक्य ‘विविधतेत एकता’ हे आहे. या देशात स्वतंत्र संविधान आहे. चला तर या देशाविषयी सविस्तर माहिती आपण जाऊन घेऊया.

South Africa Information In Marathi

दक्षिण आफ्रिका देशाची संपूर्ण माहिती South Africa Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

दक्षिण आफ्रिका देशाचे एकूण क्षेत्रफळ 1,21,9,912 किलोमीटर एवढे आहे. दक्षिण आफ्रिका हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनाने जगात 24 वा क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून दक्षिण दिशेला किनारपट्टी आहे.

जी दक्षिण अटलांटिक आणि हिंदी महासागरांच्या बाजूने पसरलेली आहे आणि उत्तर दिशेला नामिबिया आणि बोत्सवाना आणि झिम्बाब्वे हे देश आहेत आणि पूर्वे आणि ईशान्य दिशेला मोझांबिक आणि इस्वाटिनी या देशाची सीमा आहे. बाकी इतर दिशेला समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.

लोकसंख्या :

दक्षिण आफ्रिका देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणणेनुसार 5,17,70,565 ऐवढी आहे. आणि लोकसंखेच्या बाबतीत हा देश जगात 18 व्या क्रमांकावर येतो. आफ्रिका खंडातील हा देश सर्वात जास्त लोकसंख्येचा देश म्हणून ओळखला जातो. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे प्रामुख्याने जास्त प्रमाणात ख्रिचन धर्माचे लोक राहतात, इतर मुस्लिम हिंदू आणि इतर समाज आहे.

हवामान :

दक्षिण आफ्रिकेतील हवामान हे उष्ण व दमट आहे. कारण या देशाच्या तीन बाजूंनी अटलांटिक आणि हिंदी महासागरांची किनार पट्टी लाभलेली आहे, त्यामुळे या देशात सागरी वारे वाहतात. कारण त्याची सरासरी उंची उत्तरेकडे दिशेने सतत वाढते. सागरी प्रभावामुळे विविध प्रकारचे हवामान क्षेत्र निर्माण होतात.

दक्षिण आफ्रिका देशातील हवामान हे सतत बदलत राहते. या देशात वायव्य आणि दक्षिणकडील नामीबच्या अत्यंत वाळवंटापासून ते मोझांबिक आणि हिंदी महासागराच्या सीमेपर्यत अती उष्ण वाटेवर राहेत. दक्षिण आफ्रिकेत हिवाळा जून ते ऑगस्ट दरम्यान येतो, यामधे अती थंड वातावरण होते.

या देशातील काही भागात ओला हिवाळा आणि उष्ण कोरड्या उन्हाळा सारखे समुद्रासारखेच हवामान आहे. या देशामध्ये उन्हाळी तापमान हे 40° ते 48° पर्यत राहते आणि वर्षाला पाऊसाची सरासरी हे 760 मी मी येवढी आहे. या देशात मोठा प्रमाणत पाऊस होत असतो. वातावरणात सतत बदल होत असल्याने येथील लोकांवर त्याचा परिमाण होत असतो.

प्राणी :

दक्षिण आफ्रिका मध्ये मोठ्या प्रमाणत जंगले आढळून येतात. त्यामधे विविध प्रकारचे प्राणी व पक्षी पाहायला मिळतात. प्राण्यांमध्ये सिंह, आफ्रिकन बिबट्या, दक्षिण आफ्रिकन चित्ता, पांढरा गेंडा, निळा वाइल्डबीस्ट, कुडूस, इम्पालास, हायनास, हिप्पोपोटॅमस आणि जिराफ यासारखे असंख्य सस्तन प्राणी पाहायला मिळतात.

काही वने क्रुगर नॅशनल पार्क आणि साबी सँड गेम रिझर्व्ह तसेच वॉटरबर्ग बायोस्फीअरमध्ये अगदी उत्तरेकडे बुशवेल्डचा एक महत्त्वाचा भाग अस्तित्वात आहे. येथे जास्त प्राणी व पक्षी आढळून येतात. दक्षिण आफ्रिकेत अनेक स्थानिक प्रजाती आहेत.

वनस्पती :

दक्षिण आफ्रिकामध्ये वनस्पतीच्या 23,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या उच्च वनस्पती आढळून येतात. त्यातील काही औषधी वनस्पती तर काही साधे वनस्पती आहेत. पृथ्वीवर जेवढा वनस्पती आहेत त्यापैकी जास्त वनस्पती ह्या दक्षिण आफ्रिकामध्ये उपलब्ध आहेत.

दक्षिण आफ्रिकेतील सर्वात प्रचलित बायोम हे गवताळ प्रदेश आहे. येते प्रामुख्याने हायवेल्डवर जेथे वनस्पतींचे आच्छादन विविध गवत, कमी झुडुपे आणि बाभूळ झाडे आणि उंट काटे यांनी भरलेल आहे.

वाहतूक व्यवस्था :

दक्षिण आफ्रिकेतील वाहतुक व्यवस्था चांगली आहे. यामधे रस्ते, रेल्वे, विमानतळ, पाणी आणि पेट्रोलियम तेलासाठी पाइपलाइन या सर्व गोष्टीचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेतील लोक त्यांच्या वाहतुकीचे मुख्य साधन म्हणून मिनीबस टॅक्सी किंवा मोटार सायकल वापरतात. अधिक आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा देखील येथे उपलब्ध आहेत.

येथील लोकांच्या सोयीसाठी सार्वजनिक व खासगी बस सेवा उपलब्ध आहे. यांचा मोठ्या प्रमाणत येथील लोक उपयोग घेतात. विदेशी व्यापार करण्यासाठी विमान सेवा व जहाज सेवा उपलब्ध आहेत. येथील लोकांना देशात रेल्वे सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

चलन :

दक्षिण आफ्रिका देशाचे चलन दक्षिण अफ्रीकी रेंड आहे. येथील स्थानिक लोक व विदेशी व्यापार करण्यासाठी या चलनाचा वापर करण्यात येतो. हे चलन भारतीय चलनाच्या तुलनेत एक दक्षिण अफ्रीकी रेंड कॉइन म्हणजे 4.72 रुपये होतात.

खेळ :

दक्षिण आफ्रिका देशातील सर्वात लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे. याच बरोबर या देशात आणखी पण खेळ खेळले जातात. त्यामुळे रग्बी युनियन आणि क्रिकेट, जलतरण, ऍथलेटिक्स, गोल्फ, बॉक्सिंग, टेनिस, रिंगबॉल, फील्ड हॉकी आणि नेटबॉल हे खेळ खेळले जातात.

या देशात फुटबॉलला तरुणांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय व पसंतीचा खेळ मानला जातो. आणखी बास्केटबॉल, ज्युडो, सर्फिंग आणि स्केटबोर्डिंग यासारखे इतर खेळ लोकांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत. हे खेळ मोठ्या प्रमाणात खेळले जातात. या देशात क्रिकेट हा कमी खेळला जाणार खेळ आहे.

भाषा :

दक्षिण आफ्रिका देशामध्ये 11 मुख्य भाषा आहेत. यामध्ये झुलू, झोसा, आफ्रिकन, इंग्रजी, पेडी, त्स्वाना, दक्षिणी सोथो, त्सोंगा, स्वाझी, वेंडा, आणि दक्षिणी नेबेले ह्या भाषा येथे बोलल्या जातात. काही भाषा इतरांपेक्षा जास्त बोलल्या जातात.

त्यामध्ये झुलू, झोसा आणि आफ्रिकन या तीन सर्वात जास्त बोलल्या जाणार्‍या भाषा आहेत. इंग्रजी ही वाणिज्य आणि विज्ञानाची भाषा म्हणून ओळखली जाते. या देशातील कमी लोक इंग्रजी बोलू शकतात. येथील शाळा व महाविद्यालये मध्ये ही भाषा शिकवली जाते.

व्यवसाय व उद्योग :

दक्षिण आफ्रिका देशामध्ये खूप कमी प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. पण हा येथील काही लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. येथे प्रामुख्याने तंबाखू, कापुस, भुईमुग व मका यासारखे पीक घेतले जातात. तसेच फळामध्ये द्राक्षे, डाळिंब, आंबा, संत्रा व केळी हे फळबाग घेतले जातात. तसेच येथे पशुपालन व्यवसाय सुध्दा केले जातात.

उद्योगाच्या बाबतीत या देशामध्ये मोठ्या प्रमाणत खनिज संपत्ती उपलब्ध आहेत. सोन्याचे दागिने करून विकले जातात. त्याचबरोबर येथे लोखंड, पोलाद उद्योग आणि सिमेंट आणि यंत्र बनवणे. विमानाचे सामान बनवणे असे उद्योग केले जातात. यातून मोठया प्रमाणत रोजगार उपलब्ध आहे.

इतिहास :

दक्षिण आफ्रिका देशाचा इतिहास खूप प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. जगातील सर्वात जुनी पुरातत्व आणि मानवी जीवाश्म अवशेष मिळवले आहेत. या काळात येथे मोठ्या प्रमाणात शोध लागले. आफ्रिकेत सापडलेले पहिले होमिनिन जीवाश्म तौंग चाइल्ड 1924 मध्ये ओळखले गेले होते.

या देशात 17 व्या शतकाच्या सुरुवातीस पोर्तुगालची सागरी शक्ती कमी होऊ लागली होती, आणि इंग्लिश आणि डच व्यापार्‍यांनी लिस्बनला मसाल्यांच्या व्यापारावरील फायदेशीर मक्तेदारीतून बाहेर काढण्यासाठी स्पर्धा करण्यात आली होती. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या 1601 च्या सुरुवातीला तरतुद शोधात केप येथे तुरल केले. नंतर 1647 नंतर डच येथील लोकांमध्ये रस निर्माण झाला. तेव्हा डच ईस्ट इंडिया कंपनीने या देशावर आपले राज्य स्थापन केले.

पर्यटक स्थळ :

दक्षिण आफ्रिकामध्ये झिओन येथे ख्रिचन धर्माचे पेंटेकोस्टल चर्च आहे. येथे मोठ्या प्रमाणत लोक आपली प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

या देशात मुस्लिम समाजाची एक मसजित आहे. हे इसलामिम लोकाचे धार्मिक स्थळ आहे. दक्षिण आफ्रिका हा देश एक पर्यटक स्थळ आहे. विदेशातून येथे लोक हा देश पाहण्यासाठी येत असतात.

ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment