पोर्तुगाल देशाची संपूर्ण माहिती Portugal Information In Marathi

Portugal Information In Marathi पोर्तुगाल हा युरोपातील सर्वात पश्चिमेकडील देश असून तो पश्चिम युरोपामधील इबेरिया द्वीपकल्पावर वसलेला आहे. या देशाच्या उत्तर व पूर्वेला स्पेन हा देश तर दक्षिणेला व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे.  लिस्बन ही पोर्तुगालची  राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. तसेच या देशाचे चलन हे युरो आहे. तर चला मग पाहूया पोर्तुगाल या देशाविषयी सविस्तर माहिती.

Portugal Information In Marathi

पोर्तुगाल देशाची संपूर्ण माहिती Portugal Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

पोर्तुगाल या देशाचे क्षेत्रफळ हे अझोर्स व मादीरा हे बेट मिळून 92,072 चौरस किलोमीटर असून या देशाच्या दक्षिण व पश्चिम दिशेला अटलांटिक महासागर तर उत्तर व पूर्व दिशेला पेन हा देश आहे. देशाच्या पश्चिम दिशेला 1200 किलोमीटर वरील ओझर्स आणि त्यांच्या नैऋत्य व मोरोक्कोच्या पश्चिम दिशेला 560 किलोमीटर वरील अटलांटिक महासागरातील मादिरा बेटे पोर्तुगाल मध्ये समाविष्ट आहेत.

हवामान :

या देशाला समुद्राचे सानिध्य असल्यामुळे येथील तापमान हे सम स्वरूपाचे दिसून येते. या देशातील हवामानाचा विचार केलास वायव्य, ईशान्य, दक्षिण असे तीन विभाग पडतात. वायव्य भागात पावसाचे प्रमाण जास्त असून हिवाळा हा अति थंड असतो तसेच तेथील पर्वत शिखरांवर बर्फ कित्येक महिने राहते. त्यामानाने उन्हाळा हा शितल असतो.

ईशान्य भागात हिवाळा थंड आणि दीर्घकालीन असून उन्हाळा हा तीव्र असतो. जानेवारीत वायव्य व ईशान्य भागांत सरासरी तपमान अनुक्रमे 11° से. व 7° से. असते. इश्त्रेला या पर्वतीय भागात तपमान 0° से.पेक्षाही कमी आढळते. या देशांमध्ये ऑगस्ट महिना हा खूपच उष्णतेचा असून येथे सरासरी तापमान 20° से. असते. येथील उत्तर भागात पावसाचे प्रमाण हे 125 ते 150 cm तर मध्य भागामध्ये 50 ते 70 सेंटीमीटर पाऊस पडतो.

भाषा :

पोर्तुगाल या देशाची राष्ट्रीय भाषा पोर्तुगीज ही असून ही भाषा इंडो-युरोपियन या गटातील लॅटिन शाखेची रोमांस बोलली आहे. या भाषेमध्ये बाराव्या तेराव्या शतकातील भावकविता आणि धार्मिक गद्य यांचा समावेश होतो.

See also  जर्मनी देशाची संपूर्ण माहिती Germany Information In Marathi

इतिहास :

पोर्तुगाल या देशाचा इतिहास प्राचीन इतिहास म्हणून ओळखला जातो त्यामध्ये आठव्या शतकात आयबेरियाच्या द्वीपकल्पात राहणाऱ्या लोकांना आयबेरियन म्हटले जात असे. त्यानंतर तीन शतकांनी टेगस नदिच्या मुखाजवळ ग्रीकांनी वसाहती स्थापन केल्या व दुसऱ्या शतकात रोमन सत्ता येथे स्थापन झाली.

रोमन साम्राज्याच्या ल्यूसिटेनीया प्रदेशात आधुनिक पोर्तुगालच्या बऱ्याच प्रदेशांचा समावेश होता. चारशे वर्षानंतर रोमन साम्राज्यात संस्कृतीचा सर्वत्र प्रसार होऊन, त्यांनी अनेक शहरी विकसित केली. पक्क्यासारखा निर्माण झाल्या व दळणवळण कार्य सुलभ झाले.

शेती :

पोर्तुगाल हा एक कृषीप्रधान देश आहे तेथील निम्म्यापेक्षा जास्त लोक शेती हा व्यवसाय करतात. या देशांमध्ये ऑलिव्ह या वृक्षांच्या रांगा देशभर पसरलेल्या आहेत. यापासून तेलाची निर्मिती केली जाते. शेती पिकांमध्ये गहू मका तांदूळ राय ओठ बारली बटाटे ही पिके व अंजीर, बदाम, सफरचंद व संत्री इत्यादी फळाचे उत्पादन घेतले जाते.

त्याव्यतिरिक्त शेतीवर निर्भर असणाऱ्या व्यवसाय देखील येथे चालतात जसे दुग्ध पालन, पशुपालन व कुक्कुटपालन हे व्यवसाय चालतात. निकृष्ट जमिनी गुराढोरांना चराईसाठी राखीव ठेवली जातात. शेती कामामध्ये बैलांचा उपयोग केला जातो.

प्राणी व वनस्पती :

पोर्तुगाल या देशाला युरोपची बाग असे सुद्धा म्हटले जाते कारण या देशांमध्ये वृक्षवेलींची व फळाफुलांची विविधता व विपुल प्रमाणात हे आढळतात. येथे 2,700 वनस्पती प्रकार पाहायला मिळतात अटलांटिक पानझडी आफ्रिकन सुद्धा हरित आणि भूमध्य सामुद्रिक यांची मिश्रण येथे आहे.

उत्तर विभागात ओक, पाइन, चेस्टनट, एल्म, लिंडन, पॉप्लर, युकॅलिप्टस ही झाडे सर्वत्र दिसतात.
तर पश्चिम आलेंतेझू भागात बूच ओक, तर सादू खोऱ्यात छत्री पाइन आहे. दक्षिणेत बदाम, अंजीर, तर देशभर ऑलिव्हची फळझाडे आढळून येतात . टेगस-सादू नदीखोऱ्यांत दलदलीत पाणथळ वनस्पती असून पर्वतीय भागात अल्पाइन वनस्पती आढळतात.

पोर्तुगाल या देशातील जंगलांमध्ये रानडुक्कर, हरिण, लांडगा, रानशेळी, ससा, लिंक्स, कोल्हा, पाली, सरडे, साप हे प्राणी आढळतात, त्याप्रमाणे पक्षांमध्ये बलाक, लाल तीतर, गिधाड, कोकीळ, ससाणा, दयाळ, स्नाइप, क्केल असे विविध पक्षी असून उन्हाळ्यात स्थलांतर करणारे आफ्रिकन पक्षीही देशाच्या किनारी भागात आढळतात. सागरात ट्यूना, सार्डीन, कालवे इ. मासे सापडतात.

See also  मलेशिया देशाची संपूर्ण माहिती Malaysia Information In Marathi

लोक व समाज जीवन :

पोर्तुगाल मधील लोक हे नवाश्मयुग व ताम्र युगामध्ये खेडेकरून राहत असत असा पुरावे पोर्तुगाल मधील टेकड्यांवर सापडलेला आहे. येथे प्राचीन काळापासून ग्रीक, फिनिशियन, केल्ट अशा वंशांच्या लोकांनी एकामागून एक येऊन या भागात वस्ती केली व ते तेथील लोकांत ते एकत्रित झाले. याच लोकांनी 200 वर्ष रोमन साम्राज्याचा प्रतिकार केला.

रोमनांशिवाय मूर, स्वेबियन, व्हिसिगॉथ, अरब आणि यहुदी यांचा प्रभाव वेळोवेळी या प्रदेशावर होता. या देशात पोर्तुगीज यांच्याशिवाय ब्राझिलियन व स्पॅनिश लोक सुद्धा राहतात पण विविध वंशीय असून त्यांचेही हे भूमध्य समुद्र सभोवताच्या इतर देशांशी मिळते जुळते दिसतात. त्यांची उंची ही मध्यम आकाराची व तपकिरी रंगाचे डोळे तसेच कुरळे काळे केस गौरवर्ण अशी त्यांची शरीरचना आहे.

पोर्तुगाल या देशाची लोकसंख्या 10,49,5000 एवढी आहे. येथील लोक समाजाने राहतात. तसेच शेती श्रमिक खाजगी व नोकरी वर्ग, तसेच सामाजिक वर्ग मालमत्तेचे धनी आहेत येथे उद्योगपती सत्ताधारी देखील आहेत. या देशातील राज्यघटनेने स्वतंत्र्य तसेच धर्म स्वातंत्र्य दिले आहे. तुरळक प्रॉटेस्टंट पंथीय व यहुदी धर्माचे लोकही देशात आहेत, येथील बहुसंख्य लोक हे रोमन कॅथलिक आहेत.

वाहतूक :

या देशामध्ये वाहतूक सुविधा उपलब्ध आहेत. देशामध्ये 46,945 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी 18,462 किलोमीटर हे रस्ते मुख्य व राष्ट्रीय मार्ग होत आहे. लोहमार्ग या देशात अस्तित्वात असून त्यांची लांबी 2,829 किमी आहे. 1975 मध्ये यांचे राष्ट्रीयकरण झाले. मेट्रो नावाची भुयारी लोहमार्ग वाहतूक देखील आहे. त्या व्यतिरिक्त देशांमध्ये प्रमुख बंदरे आहेत.

See also  युगांडा देशाची संपूर्ण माहिती Uganda Information In Marathi

पॉर्तीमँओ व अझोर्स या बंदरांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासी जहाजे थांबतात. डोरू, टेगस व ग्वाद्याना या नद्यांतून अंतर्गत जलवाहतूक केली जाते. देशात आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाले आहे. फूंशाल येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. आंतरराष्ट्रीय व अंतर्गत हवाई वाहतुकीसाठी सरकार मालकीच्या दोन स्वतंत्र विमान कंपन्या आहेत.

कला व खेळ :

पोर्तुगाल मध्ये कलांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. बाराव्या शतकापासून सतत पोर्तुगीज कलेची परंपरा ही दिसून येते. लोकसंगीत, लोकनृत्य, वस्तू कला, वास्तुकला, मृत्पात्री ह्या क्षेत्रात पोर्तुगीज आपल्या कलेचे विशेष पण दाखवून देतात.

पूर्वी प्राचीन रोमन काळातील वस्तूंचे कला अवशेष येथे अजूनही सापडतात. याची उदाहरण पहायचे झाल्यास तर एव्हुरा येथील डायना देवतेच्या मंदिराचे अवशेष, कोईंब्रा येथील रोमन नगरीचे अवशेष पूर्वकाला परंपराचे एक विशेष उदाहरण आहे. पोर्तुगाल या देशाचा लोकप्रिय खेळ फुटबॉल हा असून येथे बैलांच्या झुंजी देखील लोकप्रिय आहेत.

पर्यटन स्थळ :

पोर्तुगाल या देशातील पर्यटन स्थळांमध्ये कलापरंपरा, ऐतिहासिक स्थळ, प्राचीन मंदिर यांचा समावेश होतो. येथे दरवर्षी पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात येथील सुंदर असे नैसर्गिक सौंदर्य असणारे समुद्रकिनारी व वनश्रींचे मनमोहक दृश्य येथे आपल्याला दिसतात.

बाराव्या शतकामध्ये कॅथीड्रल, सतराव्या शतकातील साताक्रुज चर्ज, बॉम जिझस दो मातीचे टेकडीवरील चर्च, दुर्मिळ ग्रंथांचे व हस्तलिखितांचे ग्रंथालय हे प्रशंसनीय आहेत येथे अनेक पर्यटक हे स्थळ पाहण्यासाठी येतात.

पोर्तुगाल मधील सर्वात जुने विद्यापीठाचे शहर कोईब्रा तिथे बोरिक शैलीतील बांधलेले ग्रंथालय वास्तू ही प्रेक्षणीय आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा .

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment