पोलंड देशाची संपूर्ण माहिती Poland Information In Marathi

Poland Information In Marathi पोलंड हा देश मध्य युरोपातील देश असून हा देश युरोपातील नवव्या व जगातील 69 या क्रमांकाचा मोठा देश आहे. वॉर्सो ही पोलंड या देशाची राजधानी असून हे सर्वात मोठे शहर आहे. पोलंड या देशाचे चलन न्यु झ्लॅाटी आहे. चला मग या देशाविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

Poland Information In Marathi

पोलंड देशाची संपूर्ण माहिती Poland Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

पोलंड या देशाचे क्षेत्रफळ हे 3,12,685 चौरस किमी आहे. पोलंडच्या उत्तरेला बाल्टिक समुद्र व रशियाचे कालिनिनग्राद ओब्लास्ट, ईशान्येला लिथुएनिया, पूर्वेला बेलारूस व युक्रेन, दक्षिणेला स्लोव्हाकिया तर नैऋत्येला चेक प्रजासत्ताक व पश्चिमेला जर्मनी हा देश आहे.

हवामान :

पोलंड या देशातील हवामानाविषयी बोलायचे झाले तर येथील हवामान ऋतूप्रमाणे बदलते या देशाच्या आग्नेय भागात सरासरी तापमान 8° से. तर ईशान्येकडील थंड भागांमध्ये 6°से. असते. जुलै महिन्यात तापमानात वाढ होत जाऊन ते 21°सेल्सिअस पर्यंत वाढते.

दर जानेवारी मध्ये ते सरासरी तापमान -7° से ईशान्य भागात -1° से असते. पावसाचे प्रमाण हे सरासरी 60 सेंमि असते. डोंगराळ भागात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामानाने ईशान्य भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी असते.

जमीन :

या देशातील जमिनीमध्ये सुद्धा प्रदेशानुसार फरक पडतो. येथे वेगवेगळ्या प्रकारची मृदा आढळते. उत्तर भागात पडलेल्या प्रकारची मृदा असून ती रेताळ स्वरूपाची आहे. त्यामध्ये सेंद्रिय द्रव्याचा अभाव असून रासायनिक खते घालून ती कसदार बनवण्याचा प्रयत्न तेथील लोकांनी केला. सायलीशिया खोऱ्यात आढळणारी लोएस प्रकारची मृदा सर्वोत्कृष्ट आहे. तसेच डोंगराळ भागातील मृदा ही निकृष्ट दर्जाची मृदा आहे.

शेती :

पोलंड या देशातील 45 टक्के जमीन शेती उपयोगा मध्ये आणली गेली आहे. पोलंडच्या उत्तर व मध्य भागातील निकृष्ट दर्जाच्या जमिनीत बटाटे आणि राय यांची पिके घेतली जातात तर गहू हे तेथील अतिशय उच्च दर्जाचे ठीक आहे.

See also  नौरू देशाची संपूर्ण माहिती Nouru Information In Marathi

तसेच येथे शेतीपूरक व्यवसायांमध्ये दुग्धव्यवसाय व वराहपालन हे व्यवसाय महत्त्वाचे आहेत. त्याव्यतिरिक्त त्रिभुज प्रदेशात पासून सायलीच्या वरच्या भागापर्यंत चा प्रदेश सुपीक असून त्यामध्ये बीड, गहू, फळे व फळभाज्या तसेच बटाटे, ओट याचेही उत्पादन घेतले जाते.

इतिहास :

पोलंड या देशाचा इतिहास खूप प्राचीन आहे. या देशातील मातीवर मानवी वस्तीचा नमुना हा 500000 वर्षापूर्वीचा आहे. येथे लोह युगात विविध संस्कृती तसेच जमाती व नंतर पूर्व जर्मनी या मध्ये स्थायिक झाले.

या लोकांनी या भागावर ताबा घेऊन या देशाला पोलंड असे नाव दिले. पहिल्या पोलीश या राज्याची स्थापना इ. स.66 पर्यंत शोधली जाऊ शकते तेव्हा प्रथम मिआस्को याच्या हा पोलंडच्या प्रांतातील सुसंगत अशा ख्रिश्चन धर्मात परिवर्तित झाला.

पोलंड किंगडमची स्थापना 1025 मध्ये झाली आणि 1569 मध्ये त्याने लुब्लिन संघटनेवर स्वाक्षरी करून लिथुआनियाच्या  ग्रँड डचीशी दीर्घकाळपासून चाललेल्या राजकीय संबंधांना घट्ट बनविले.

या संघटनेने पोलिश लिथुआनियन राष्ट्रकुलाची स्थापना केली व सर्वात मोठ्या क्षेत्रातील एक आणि 16 व्या आणि 17 व्या शतकातील युरोपमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये, वेगळाच आपला ठसा उमटवला. तसेच उदारमतवादी राजकीय व्यवस्था ज्यांनी युरोपची पहिली अंगीकारली राष्ट्रीय संविधान हे 3 मे 1791 ची घटना आहे.

त्यानंतरच्या काळात प्रतिष्ठा आणि समृद्धीच्या अस्तित्वामुळे, 18 व्या शतकाच्या शेवटी शेजारील देशांनी देशाचे विभाजन केले आणि 1918 मध्ये व्हर्साय कराराद्वारे त्याचे स्वातंत्र्य पुन्हा मिळवले. प्रादेशिक संघर्षांच्या मालिकेनंतर, नवीन बहु-वंशीय पोलंडने युरोपियन राजकारणातील महत्त्वाचा खेळाडू म्हणून आपले स्थान पुन्हा निर्माण केले.

एक सप्टेंबर 1939 रोजी जर्मनीचा हुकूमशहा हिटलर याने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात करून पोलंडवर हल्ला केला. त्याने या देशातील लक्षावधी ज्यू धर्मियांना गॅस चेंबरमध्ये डांबून ठेवले होते, त्यामुळे असंख्य लोक मारले गेले व केवळ एक लाख ज्यू लोक कसेबसे बचावले. त्यानंतर हा देश बऱ्याच काळापर्यंत रशियाचा अंकित राहिल्याने येथे कम्युनिस्टांची राजवट निर्माण झाली.

See also  इराक देशाची संपूर्ण माहिती Iraq Information In Marathi

देशातील 90% ज्यूंसह सुमारे सहा दशलक्ष पोलिश नागरिक युद्धामध्ये मरण पावले. 1989 पर्यंत पोलंडने सोव्हिएत युनियनशी जवळचा नातेसंबंध ठेवून 1980 च्या दशकातच, पोलंड या देशात औद्योगिक कामगारांनी नागरी अशांतता आणि स्ट्राइक मोठ्या प्रमाणावर अनुभवल्या होत्या.

1989 मध्ये, ट्रेड युनियन सॉलिडेरिटीला परवानगीची निवडणूक म्हणून शासनाच्या निवडणुका देण्यात आल्या आणि 1991 मध्ये पोलंडच्या पहिल्या निवडणुकीत लेक वाल्साने हे स्वतंत्र देशाचे पहिले अध्यक्ष बनले.

प्राणी व वनस्पती :

पोलंडच्या ईशान्यकडील थंड वातावरणाच्या प्रदेशांमध्ये बीच, फर, ओक, ॲश, एल्म, बर्च, पॉप्लर यासारखे रुंदपर्णी व पानझडी असे वृक्ष आढळून येतात. तर डोंगराळ प्रदेशांमध्ये टंड्रा स्वरूपाच्या वनस्पती राखीव म्हणून टिकवून ठेवल्या आहेत. तसेच वनस्पतीच्या वाढीवर जमिनीचा व वातावरणाचा फरक आढळून आल्याने तेथील वनस्पती मध्ये भिन्नता पाहायला मिळते.

येथील पानझडी जंगलांमध्ये रेड हरिण, रानडुक्कर, रो हरीण इत्यादी प्राणी पाहायला मिळतात. तर उंच डोंगराळ प्रदेशातील सूचिपर्णी वृक्षांच्या जंगलांत ब्लॅक ग्राउस, नट, क्रॅकर इ. पक्षी व कार्पेथियन पर्वतात शॅम्वा, माँर्मांट, खार, हॅम्स्टर यांसारखे प्राणी आढळतात. तसेच राखीव जंगलात झूब्र नावाचा युरोपीयन गवा आढळतो.

खनिज संपत्ती :

या देशामध्ये गंधक हे खनिज मोठ्या प्रमाणात आढळून येते. त्या व्यतिरिक्त खानिजा मध्ये चॉक, संगमवर दगड, जिप्सम, मीठ, केओलिन, चुनखडक या खनिजांचे साठे आढळून येतात तसेच सम्झवा चे उत्पादन सैंधवाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. त्याव्यतिरिक्त लावणसाठे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, क्वॉदाव्हा, सुडेटन इ. भागांत आढळतात.

उद्योग :

पोलंड या देशातील उद्योगांमध्ये खाद्य पदार्थांची निर्मिती, कापड उद्योग, यंत्र उद्योगांमध्ये ट्रॅक्टर, रेल्वे, सिमेंट, पोलाद, वाघिणी यासारखे उत्पादन होत असून कारखाने आहेत. काही भागात धातू उद्योग विकसित झाले. येथे मोठ्या प्रमाणावर कच्चामाल व कोळशाची खाली असल्यामुळे येथे उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात.

See also  इंडोनेशिया देशाची संपूर्ण माहिती Indonesia Information In Marathi

भाषा :

या देशातील मुख्य भाषा पोलिश हे मध्य युरोपातील तसेच या देशातील मुख्य भाषा आहे. या भाषेला इथे खूप महत्त्व आहे. या भाषेमध्ये उपलब्ध असलेले प्राचीन साहित्य हे तेराव्या चौदाव्या शतकातील असून ते धार्मिक स्वरूपाचे आहे.
पोलिश या भाषेला महत्त्व प्राप्त करून देणारा पहिला साहित्यिक मिकॉलाय रे हा आहे.

पर्यटन स्थळ :

पोलंड या देशांमध्ये हवामानातील विविधतेमुळे तसेच इतिहास कालीन घडामोडींमुळे अनेक पर्यटन स्थळ निर्माण झाली आहेत. येथे पाहण्यासाठी राष्ट्रीय उद्यान, प्राचीन किल्ले, तलाव निसर्ग सौंदर्य हे पर्यटन स्थळ नेहमी पर्यटकांना आकर्षित करत असतात.

राष्ट्रीय उद्यान :

बेलोवेझस्की राष्ट्रीय उद्यान हे पोलंड आणि बेलारूसच्या सीमेवर स्थापन झालेले असून हे एक सुरक्षित क्षेत्र आहे जे प्राचीन जंगलाच्या अवशेषांचे रक्षण करते. या प्राचीन वनक्षेत्राला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

मालबोर्क किल्ला :

हा किल्ला प्राचीन काळातील असून येथे असंख्य तू टॉनिक किल्ले विस्तुला या नदीच्या काठावर वसलेले आहे. हे एक शहराविषयीचा आकर्षणाचा आहे.

वॉर्सा संग्रहालय :

हे संग्रहालय इतिहास कालीन असून एक सर्वोत्तम संग्रहालय म्हणून याची गणना केली जाते. पोलंडची राजधानी वॉर्सा येथे हे तीन मजली शहराच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या या शहराच्या इतिहासाचे आणि जीवनाचे सर्व पैलू कव्हर करणाऱ्या चित्तथरारक प्रदर्शनांनी भरलेले असून येथे हे संग्रहालय पाहण्यासाठी पर्यटक येतात.

मीठ खाण :

विलिसिझका मधील मिठाची खाण हे एक आश्चर्यकारक जमिनी अंतर्गत असलेले संकुल असून हे मध्ययुगात त्याच्या बांधकामापासून सतत वापरात आहे. आता मात्र युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. येथे ही खाण पाहण्यासाठी पर्यटक भेट देतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

Leave a Comment