Chile Information In Marathi चिली हा देश दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक आहे. सोळाव्या शतकामध्ये स्पॅनिश शोधक येथे येण्यापूर्वी इनका साम्राज्याची सत्ता होती. आजच्या स्थितीमध्ये चिली हा देश दक्षिण अमेरिकेतील सर्वात स्थिर व समृद्ध देश आहे. चिली या देशाला 18 सप्टेंबर 1810 रोजी स्पेन कडून स्वातंत्र्य मिळाले तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.
चिली देशाची संपूर्ण माहिती Chile Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
चिली या देशाचे एकूण क्षेत्रफळ 7,56,945 चौरस किलोमीटर एवढे असून चिलीच्या पश्चिम दिशेला पॅसिफिक महासागर व उत्तेरस पेरू, बोलिव्हिया, पूर्वेस अर्जेंटिना व बोलिव्हिया, दक्षिणेस ड्रेक पॅसेजअसून आग्नेय टोकाचा काही भाग अटलांटिकच्या किनाऱ्यावर आहे. अर्जेंटिना-चिली यांची सीमा 3200 किमी आहे.
भूगोल :
हा देश दक्षिण गोलार्धात येतो तो स्वतःला तीन खंडांचा देश मानतो. म्हणजेच स्वतःला तीन खंडावरील प्रदेश आपल्या ताब्यात घेतो. इन्सुलर चिली, उपविभाग चिली महाद्वीपीय बेट आणि चिली महासागरीय बेट आणि चिली अंटार्क्टिक प्रदेश, प्रादेशिक हक्क कराराच्या तरतुदींनुसार, चिलीमध्ये निलंबित केले गेले आहे.
भाषा व चलन :
चिली या देशातील लोकांचा मुख्य धर्म ख्रिश्चन असून स्पॅनिश येथील राष्ट्रभाषा आहे. तसेच या देशाचे चलन पेसो हे आहे. या देशाची प्रति व्यक्ती उत्पन्न 10,084 अमेरिकन डॉलर आहे.
खनिज संपत्ती :
चिली हा देश जगातून सर्वाधिक जास्त तांबे या धातूचे उत्पादन करतो त्यामुळे हा जगात प्रसिद्ध आहे. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये सोने, चांदी, नायट्रेट, लिथियम व लोहाचे सुद्धा प्रचंड साठे आहेत.
लोकसंख्या :
चिली या देशाची लोकसंख्या ही 2002 च्या जनगणने प्रमाणे 1.5 दशलक्ष एवढी नोंदवली गेली. या देशातील जन्मदर हा कमी असून 2000 पर्यंत ही लोकसंख्या 2050 पर्यंत लोकसंख्या 2.02 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या देशातील 85 टक्के लोक शहरी भागात तर 40 टक्के लोक लोक ग्रेटर सॅंटियागोमध्ये राहतात.
इतिहास :
चिली या देशामध्ये स्पॅनिश हे सोळाव्या शतकात आले. त्या आधीचा इतिहास हा चिली या देशाचा माहीत नाही. अँडीजच्या भिंतीमुळे अलग व आटाकामा रणामुळे कष्टप्रद झालेला हा प्रदेश इंकासारख्या लढाऊ आक्रमकांनाही भीतिप्रदच वाटला.
पेरू देशातील इंका जातीची लोक येथे आल्यानंतर त्यांनी आपली वसाहत येथे स्थापन केले. काही लोक दक्षिणेकडे गेले तर काही पेटागोनिया मध्ये गेले व त्यांचे वंशज आजही तेथे आढळतात.
इंकांचे वर्चस्व उत्तर चिली मध्ये बऱ्याच प्रदेशांवर होते. चिलीतील काही प्रदेशांवर इनकांचे राज्य होते. पंधराशे 35 मध्ये त्यांनी व त्यांच्या नेत्यांनी चिली मध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना तू जिंकता आला नाही त्यांनी 1541 मध्ये पुन्हा चिली जिंकण्याचा प्रयत्न केला. त्या शतकाच्या शेवटी देशातील लोकांनी या आक्रमणास प्रखर विरोध केला परंतु स्पेनच्या साम्राज्यात चिली जोडणारा पेद्रो दे व्हालदीव्ह्या याचा त्यांनी पराभव व वध केला.
येथील एक अशी दंतकथा प्रचलित आहे की सर्व स्पॅनिश आक्रमकानप्रमाणे व्हालदीव्ह्यालाही प्रदेशापेक्षा सोने हवे होते. तेव्हा कैद केल्यावर वितळलेले सोनेच त्याच्या घशात ओतण्यात आले परंतु त्याचे काम गारथीआ ऊरतादो दे मेनदोथा याने 15157 ते 1561 पर्यंत लढाई करून ते पुरे गेले.
या काळात स्पॅनिश आक्रमक मॅगेलन सामुद्रधुनी पर्यंत पोहोचले परंतु चिलीतील आराऊकानियम जमातीचा पाडाव करणे त्यांना शक्य झाले नाही. म्हणून येथील शूर लोकांचा चिली देशाच्या पराक्रमामध्ये कथा अजरामर आहेत.
वनस्पती व प्राणी :
या देशाच्या मध्य भागामध्ये बीच लॉरेल, एक प्रकारचा सायप्रस, असे अनेक जातींचे कॅक्ट्सची अनेक वने आहेत. ही वने तोडली गेली आहेत व तेथील जमीन शेती खाली आणली गेलेली आहे. शेती योग्य नसलेल्या ही जमीन सराव रान किंवा शुष्क हवेतील खुरटी झाडे तिथे दिसतात
. चिली देशातील कन्सेप्शनपासून दक्षिणेकडील जंगलामध्ये पानझडी सदाहरीत व सूचीपर्णी वृक्षांची दाट वने आपल्याला दिसतात. काही ठिकाणाकडे थंडी व वादळामुळे येथील वनस्पती खुजा व विरळ होतात.
चिलिया देशांमध्ये मोठ्या प्राण्यांपैकी जॅगुअर, ग्वानाको, प्यूमा, व्हायकूमा, हरिण, लांडगा हे प्राणी आढळतात तसेच या अरण्यात पुढून नावाचे खोजे हरिण दिसतात. या देशात लहान पक्षी अनेक आहेत परंतु त्या खंडावरील मोठे पक्षी या देशात नाहीत.
शेती :
चिल्या देशातील मध्यचिली हा शेतीसाठी अत्यंत सुपीक भाग असल्यामुळे येथे बार्ली, ओट, गहू ही पिके घेतली जातात. याव्यतिरिक्त मका, कडधान्ये, भात, मटार, बटाटे, कांदे, लसूण व फळे निघतात. टरबूज व द्राक्षे, टरबूस अमेरिकेला निर्यात केली जातात. या देशात कापसाचे हे पीक घेतले तर ते परंतु ते कमी असते.
वाहतूक :
चिली या देशाच्या आकारामुळे येथील दळणवळण हे खूप कठीण कार्य आहे. परंतु बरीच वस्ती ही मध्यचिलीत स्थापन झाल्यामुळे आता ही अडचण कमी झाली आहे. चिली या देशांमध्ये लोहमार्ग आहेत तसेच बहुतेक शहरे बंदरे आणि उद्योग केंद्र या लोहमार्गांना जोडली गेलेली आहे. त्या व्यतिरिक्त देशांमध्ये रस्ते वाहतूक व विमान सेवा उपलब्ध आहे. येथील रेल्वे मार्ग हे राष्ट्रीय आहेत.
समाजजीवन :
चिली देशातील एका या साम्राज्याचा नाश झाल्यानंतर स्पॅनिश आक्रमकानी चिली मध्ये प्रवेश केला व उत्तरेकडून दक्षिणेकडे आपला विस्तार करताना त्यांचा आराउकानीयन या जमातींनी विरोध केला व आता दक्षिण चिलीमध्ये त्यांचीच येथे मुख्य वस्ती आहे. बीओ व्हीओ व तोल्तेन या नद्यांच्या दुआबात हे लोक असून त्यांची संख्या एक लाखापर्यंत पोहोचले आहे. चिली मध्ये जे शुद्ध इंडियन आहेत त्यापैकी त्यांचे प्रमाण 95 टक्के आहे.
चिलिया देशातील वातावरण व अलिप्ततेमुळे बरेच स्पॅनिश लोक येथे आले नाहीत. व याच कारणाने त्यातील बहुतेकांनी येथील देशातील स्त्रियांशी विवाह केला. व त्यांचेच वंशज आज चिली या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
1925 च्या पर्यंत कॅथलिक धर्म येथील राजधर्म होता व त्यानंतर धर्म व शासन यांची फारकत करण्यात आली. या देशांमध्ये कॅथलिक हे लोक बहुसंख्य असल्याने येथे त्याच पंथाचे सण उत्सव साजरे केली जातात. तसेच येथील आराऊकानियम लोकांचे सण उत्सवांचे मिश्रण झाले आहे.
येथील शहरी लोक नेहमीचा युरोपीय पोशाख घालतात मात्र सण, जत्रा व उत्सव यामध्ये रंगीबिरंगी पोशाख वापरतात.
आराऊकानियम मधील स्त्रिया भडक रंगाच्या शाल व दागिने चांदीचे वापरतात. चिलीच्या गुरख्यास वासोस म्हटले जाते. याच्या डोक्यावर सपाट आकाराची काळी टोपी खांद्यावर आखूड झूल, गळापट्टा पायाबंद आणि गुडघ्यापर्यंत भरीव टाचेचे बूट असा याचा पोशाख असतो.
महत्त्वाची स्थळे :
चिलिया देशांमध्ये आपल्याला भिन्न स्वरूपाची समाज व्यवस्था त्यांचे राहणीमान सण उत्सव याविषयीचे आकर्षण वाटते. या देशामध्ये पाहण्यासारखे बरेच स्थळ आहेत कारण या देशाला समुद्र किनारा लाभलेला आहे.
तसेच अँडीजमधील मध्य चिलीतील रम्य सरोवरे व
व्हिन्या देल मार यावेळी पारिजा उपनगरातील पुलीने व द्यूतगृह, ईस्टर बेटातील असे पुतळे आणि अर्जेंटिना व चिली या देशातील एक सीमावाद मिटल्याचे स्मारक म्हणून अँडिजमध्ये उभारलेल्या ख्रिस्तांचा महाप्रचंड पुतळा हा येथील प्रमुख आकर्षण आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
चिली हा कोणत्या प्रकारचा देश आहे?
चिलीच्या सरकारी जुंटाने स्पॅनिश राजेशाहीमध्ये चिलीला एक स्वायत्त प्रजासत्ताक घोषित केले।
चिली हा जगातील सर्वात पातळ देश आहे का?
चिली, जगातील सर्वात लांब आणि पातळ देश , अँडीज पर्वत आणि पॅसिफिक महासागर यांच्यामध्ये पसरलेला आहे.
चिली हे व्यवसाय करण्यासाठी चांगले ठिकाण का आहे?
चिली हा व्यवसाय करण्यासाठी सर्वात सुरक्षित देशांपैकी एक आहे. संपूर्ण लॅटिन अमेरिकेत याला सर्वात कमी राजकीय धोका आहे .
चिली कोणत्या वस्तू आणि सेवांचे उत्पादन करते?
चिलीच्या मुख्य कृषी निर्यातीत वाइन, ताजी फळे, दुग्धजन्य पदार्थ, सॅल्मन, डुकराचे मांस, पोल्ट्री आणि वनीकरण उत्पादने यांचा समावेश होतो.
चिलीमध्ये व्यवसाय का करायचा?
चिलीमध्ये व्यवसायाची नोंदणी करण्याचा आणखी एक फायदा म्हणजे देशात दिले जाणारे असंख्य कर सवलती . लॅटिन अमेरिकेतील इतर देशांच्या तुलनेत चिलीमध्ये कर आकारणीचे दर कमी आहेत, जे देशात कार्यरत कंपन्यांसाठी मजबूत आणि गतिमान व्यावसायिक वातावरण निर्माण करतात.