Afghanistan Information In Marathi अफगानिस्तान या देशाची राजधानी काबुल असून हे येथील सर्वात मोठे शहर आहे. या एक या शहराची लोकसंख्या दहा लाख पेक्षा जास्त आहे. अफगाणिस्थान ची लोकसंख्या तीन कोटी आहे. तर चला मग पाहूया अफगाणिस्थान या देशा विषयी सविस्तर माहिती.
अफगानिस्तान देशाची संपूर्ण माहिती Afghanistan Information In Marathi
या देशातला क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशाचा जगात 41 वा क्रमांक लागतो तसेच लोकसंख्येच्या बाबतीत 42 वा क्रमांक लागतो. या देशातील मोठी शहरांमध्ये हेरात मजार ए शरीफ, कंदाहार जलालाबाद, गझनी व कुंडुझ ही मोठी शहरे आहेत.
क्षेत्रफळ व विस्तार
अफगाणिस्तान या देशाचे क्षेत्रफळ हे 6,47,500चौरस किमी या देशाच्या दक्षिण आणि पूर्व भागात पाकिस्तान भारत व पश्चिम दिशेला इराण हा देश आहे. तसेच उत्तरेला तुर्कमेनिस्तान ताजिकिस्तान व उझबेकीस्थान हे देश आहे.
हवामान :
अफगाणिस्तान या देशातील हवामानाचा विचार केल्यास उन्हाळ्यातील सेस्तान व उत्तरेकडे अमुदर्या नदीचा सखल प्रदेश येथील तापमान हे 53.30° सेल्सिअस पर्यंत असते तर तसेच या भागात दोनशे किलोमीटर ताशी वेगाने वाहणाऱ्या धुळीच्या वादळामुळे उन्हाळा खूपचत्रासदायक वाटतो. हिवाळ्यातील बऱ्याच ठिकाणी येथील तापमान हे -180 सेल्सिअस पर्यंत अंतर हिंदुकुश पर्वताच्या भागात तो -260 सेल्सिअसपर्यंत खाली उतरतो.
या देशांमध्ये उत्तरेकडून व पश्चिमेकडून अंगाला झोंबणारी थंड वारे वाहतात. पावसाळ्यामध्ये या उंच पर्वतीय प्रदेशात मध्ये हिमवृष्टी होते. तर कमी उंचीपर्यंतच्या भागात हिवाळा हा समाधान कारक असतो.
खनिज संपत्ती :
हा देश विविध खनिज संपत्तीने संपन्न असून येथे खनिज संपत्तीमध्ये लोखंड, तांबे, शीशे, क्रोमियम, जस्त या धातूंच्या खनिजांचे व सोडियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट, गंधक, ॲस्बेस्टस, मॅग्नेशियम क्लोरेट, बेरिलियम, क्रोमाइट, अभ्रक, भांड्यांची माती व संगमरवर यांचे साठे आहे. तसेच येथे हिंदुकुश च्या कारकर व इशपुस्ट येथे दगडी कोळशांच्या खाणी आढळून येतात.
नद्या :
अफगाणिस्तान या देशातील हेलमंड हिनदी सर्वात मोठी नदी आहे. त्या व्यतिरिक्त या देशात अर्घंदाब, खाश रूद, फरह रूद, हरी रूद पश्चिमेकडे, मुर्घाब, कुंडुझ, कोकचा, काबूल नदी, लोगर, पंजशीर व कुनार, कुर्रम, टोची, गुमल याही, खैबर, टोची व गुमल नद्यांचे जाळे देशभर पसरले आहेत.
इतिहास :
अफगाणिस्तान या देशाचा खूप प्राचीन इतिहास आहे. येथे महाभारत कालीन अवशेष तसेच प्राचीन उल्लेख आढळतात. अफगाणिस्तान या देशाचे प्राचीन नाव हे अहिगणस्थान असे होते. महाभारतामधील कौरवांचा मामा व गांधारीचा बंधू शकुनी मूळ ह्याच देशातला होता.
सिंधू नदीच्या पलिकडे पारसिक राज्या पर्यंत भारतीय गणराज्ये राज्ये पसरलेली होती. हे सर्व लोक वैदिक धर्माचे अनुयायी होते. पूर्वी काबुल या नदीचे नाव कुभा असे होते. खूप प्राचीन काळात येथील वंशातील लोकांची एक शाखा पुढे जाऊन त्यांनी इराण व ग्रीस अशी राजे येथे स्थापन केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा सरनौबत नेताजी पालकर याला औरंगजेबाने जबरदस्तीने मुसलमान करून अफगाणिस्तानातच ठेवले होते. हा देश एकेकाळी सांस्कृतिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न व प्रगत होता. परंतु आज या देशाची आर्थिक स्थिती खालावली असून जागतिक दहशतवादाचे प्रमुख केंद्र बनला आहे.
अफगाणिस्तानमधील सोव्हिएत युद्धानंतर अनेक वर्षे चालू असलेल्या गृहयुद्धामध्ये अफगाणिस्तानचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानवर तालिबान या अतिरेकी गटाची सत्ता होती.
प्रमुख पिके :
अफगाणिस्तान या देशात प्रमुख पिकांमध्ये बार्ली, कापूस, तांदूळ, गहू, बिट, मका, ज्वारी, बाजरी मोहरी, तंबाखू, मसूरही प्रमुख पिके घेतली जातात. गहू येथील प्रमुख पीक आहे. पालेभाज्यांमध्ये मिरच्या कांदे, टोमॅटो, घेवडा, कोबी, गाजर, बटाटे व सलगम क्या पालेभाज्यांचे उत्पादन येथे केले जाते.
त्याव्यतिरिक्त कंधार व कापूस या परिसरात फळांच्या मोठ्या फळबागा दिसून येतात. त्यामुळे फळांच्या उत्पादन करता हा देश प्रसिद्ध आहे. फळांमध्ये येथे केळी, अंजीर, संत्री, सफरचंद, डाळिंब अक्रोड, कलिंगड, जरदाळू, खरबूज, द्राक्षे, मोसंबी व या फळांपासून बनवलेल्या सुकामेवा यांची निर्यात होते.
वनस्पती व प्राणी :
या देशातील जंगलांमध्ये स्प्रूस, पाईन, देवदार, चीड, ज्युनिपर, हॅझल, अक्रोड, यू, बदाम, पिस्ता, ऑलिव्ह, तुती, गूजबेरी, जर्दाळू, विलो, पॉप्लर, ॲश, सतापा, मंजिष्ठ, अकेशिया, बोरी, बाभळी, तसेच हिंग ही मुख्य झाडे दिसून येतात. येथे अनेक प्रकारच्या गुलाबांचे रंगीबिरंगी व फुलांच्या वेली तसेच लिंबू, द्राक्षे यांच्या बागामुळे हा प्रदेश शोभून दिसतो.
याव्यतिरिक्त जंगलामध्ये कोल्हा, तरस, लांडगा, रानकुत्री, चित्ता, रानमांजर, अस्वल, वाघ, रान मेंढी, मुंगूस, रान बोकड, चिचुंद्री, जर्बोआ अशा प्रकारचे अनेक प्राणी व ससे देखील या भागात आढळतात. येथे पक्षांमध्ये हंस, काणुक, बदक, पानकोळी, कुनाल, तीतर, बुलबुल लावा, चिमणी, भांडक ही पक्षी आढळतात.
भाषा :
अफगाणिस्तान या देशात वीस भाषा बोलल्या जातात. त्यामध्ये पुस्तू व फार्सी या भाषांचा वापर राज्यकारभारात चालतो. व या भाषा बोलणारे या देशात 75 टक्के लोक आहेत. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये ताझिकी, उझबेकी, नुरी दार्दिक, किरगिझ तुर्कमेनी, बलुची या भाषा बोलल्या जातात.
लोक व समाज जीवन :
येथील समाजजीवनामध्ये पितृसत्ताक व कुटुंब पद्धतीचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. घरात वडिलांना किंवा वडिलधार्या माणसांना मान दिला जातो. आपापल्या जमातीतच विवाह केले जातात.
ग्रामीण भागातील घरे ही माती व विटांची असून सपाट चक्रांची असतात. प्रत्येक घराला तटबंदी करून घराभोवती द्राक्ष सफरचंदाच्या बागा फुल बागाही लावल्या जातात.
येथील लोकांना अफगाणी असे म्हणतात. येथील लोक धाडसी स्वतंत्र वृत्तीचे आहेत. येथील लोकांचे वर्णन पांडू वर्णन लांब डोके काळे केस व काळे डोळे, मोठे व बाकदार नाक असे आहे. येथील लोकसंख्या मध्ये 60 टक्के प्रमाण हे घिलझई, दुर्रानी, मोहमंद हे यांचे आहेत. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये किरगीझ, बलुची, ब्राह्मनी, नुरी, हिंदू व ज्यू लोकही राहतात.
अफगाणिस्तानातील विमाना विषयीची कथा :
अफगाणिस्तानातील एक कथा प्रचलित आहे ती म्हणजे काही वर्षांपूर्वी, जेव्हा अमेरिकन सेना अफगाणिस्तानमध्ये ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी मोहीम राबवत होते. तेव्हा अमेरिकन सैनिकांनी कंधार मधील एका गुहेमध्ये एक मोठे विमान त्यांना दिसले.
या विमाना विषयी संशोधन केल्यानंतर असे कळले की, हे विमान सुमारे 5000वर्ष जुने असून ते महाभारत काळातील असू शकते. एवढेच नव्हे तर त्या विमाना विषयी टाइम वेलमध्ये अडकल्याचेही सांगण्यात आले.
टाइम वेल म्हणजे विद्युत चुंबकीय शॉकवेव्हपासून संरक्षित क्षेत्र आहे. असे म्हटले जाते की, हे विमान कंधारच्या गुहेत सुरक्षित आहे. या विमानाची असे म्हटले जाते की त्याच्या आकाराचे वर्णन हे महाभारतात व इतर प्राचीन ग्रंथांमध्ये देखील केले आहे.
हे विमान अमेरिकेतील सैन्याने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा अनेक सील कमांडो अचानक गायब झाले, त्यानंतर त्यांच्याबद्दल काहीच कळू शकले नाही व हे एक रहस्य बनून राहिले.
पर्यटन स्थळ :
अफगाणिस्तान मध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे. जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर अशाच काही स्थळांविषयी आपण माहिती पाहूया.
राष्ट्रीय संग्रहालय :
राष्ट्रीय संग्रहालय हे काबुल संग्रहालय म्हणून अफगाणिस्थान मधे प्रसिद्ध आहे. ही दोन मजली इमारत अफगाणिस्तानमधील काबूलच्या मध्यभागी दक्षिण पश्चिमेस नऊ किलोमीटर अंतरावर असून त्याच्या स्थापनेपासून या संग्रहालयात अनेक विकास करण्यात आले. आठ हजारांहून अधिक प्रतिकृती येथे पाहायला मिळतात आणि एक बाग देखील तयार करण्यात आली.
हेरातचा किल्ला :
या किल्ल्याला सिकंदर चा किल्ला म्हणून अशी ओळख आहे तेथे स्थानिक पातळीवर कलांसाठी हा किल्ला ओळखला जातो. अफगाणिस्थान मधील हेरातच्या मध्यभागी हा किल्ला असून इसवी सन पूर्व 330 मध्ये अलेक्झांडर यांनी हा बांधला होता.
दारुल अमन पॅलेस :
दारुल अमन पॅलेस म्हणजे शांततेचे निवासस्थान आहे. हा पॅलेस एक युरोपियन शैलीचा राजवाडा असून आता हे केवळ अवशेष उरले आहेत जो काबुल आणि अफगाणिस्थान च्या मध्यभागी 16 किमीवर आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
अफगाणिस्तान कशासाठी ओळखला जातो?
अफगाणिस्तान त्याच्या बारीक फळांसाठी, विशेषत: डाळिंब, द्राक्षे आणि त्याच्या अतिरिक्त-गोड जंबो-आकाराच्या खरबूजांसाठी प्रसिद्ध आहे.
अफगाणिस्तानात किती भारतीय आहेत?
अफगाणिस्तानमध्ये भारताचे कोणतेही लष्करी अस्तित्व नाही. अफगाणिस्तानमधील अंदाजे 3,000 भारतीय नागरिकांनी पुनर्निर्माण कंपन्या, आंतरराष्ट्रीय मदत संस्था किंवा वाणिज्य दूतावास आणि दूतावासात काम करणार्या मुत्सद्दींसाठी काम केले.
अफगाणिस्तान कोठे आहे?
अफगाणिस्तान पश्चिमेला इराण आणि पूर्वेला पाकिस्तानसह मध्य आशियामध्ये स्थित आहे. उंच, निषिद्ध पर्वत आणि कोरडे वाळवंट अफगाणिस्तानातील बहुतेक भूभाग व्यापतात.
अफगाणिस्तान हे भेट देण्याचे चांगले ठिकाण का आहे?
अफगाणिस्तानला भेट देण्यासाठी जगभरातून लोक येतात. तेथील सौंदर्य, वातावरण आणि सभ्यता ही कारणे आहेत.
अफगाणिस्तानातील मुलांचे जीवन कसे आहे?
मुलांना अत्यंत उपासमार, शोषण आणि त्यांच्या शिक्षणाची हानी, विशेषतः मुलींना सामोरे जावे लागत आहे.