मार्शल देशाची संपूर्ण माहिती Marshall Information In Marathi

Marshall Information In Marathi मार्शल हा देश प्रशांत महासागरातील एक स्वतंत्र बेट आहे. पण या बेटाला देश म्हणून ओळखले जाते. मार्शल देशाची राजधानी माजूरो हे शहर आहे. तसेच हे शहर या देशातील सर्वात मोठे सुध्दा आहे. भौगोलिक दृष्ट्या हा देश मायक्रोनेशियाच्या मोठ्या बेटाचा एक भाग आहे. या देशात सर्वात जास्त ख्रिचन समाजाचे लोग राहतात. चला तर मग पाहूया या देशा विषयी सविस्तर माहिती.

Marshall Information In Marathi

मार्शल देशाची संपूर्ण माहिती Marshall Information In Marathi

मार्शल या देशाचे बोधवाक्य “जेपिलपिलिन के इजुका” हे आहे. याचा अर्थ संयुक्त प्रयत्नातून साध्य असा होतो आणि या देशाचे राष्ट्रगीत फॉरएव्हर मार्शल बेटे हे आहे. मार्शल या देशाला 19 ऑक्टोंबर 1986 मध्ये स्वतंत्र मिळाले. मार्शल हे बेट समुद्रतळापासून उत्पन्न झालेल्या ज्वालामुखी पासून बनलेल बेट आहे.

विस्तार व क्षेत्रफळ :

मार्शल या देशाचे एकूण क्षेत्रफळ 181 किलोमीटर येवढे आहे. तसेच क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनाने या देशाचा जगात 213 वा क्रमांक लागतो. मार्शल या देशाच्या सीमेला लागून उत्तरेस नाउरू देश आणि किरिबातीचे देश आहेत. तसेच पूर्वेस फेडरेटेड स्टेट्स ऑफ मायक्रोनेशिया आहे, आणि दक्षिणेस आयलंडच्या विवादित यूएस प्रदेश आहे. तसेच इतर देशाच्या सीमेला लागून समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे.

लोकसंख्या :

मार्शल या देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 61,962 ऐवढी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात 205 वा क्रमांक लागतो. मार्शल बेटांचे बहुतेक रहिवासी मार्शलीज समाजाचे आहेत. मार्शलीज लोक मूळचे मायक्रोनेशियन आहेत, आणि ते आशियातून मार्शल बेटांवर काही वर्षापूर्वी स्थलांतरित झाले आहे. मार्शल देशामध्ये काही अलीकडील देशातील जपानी वंशाचे लोक आहेत. येथे मोठया प्रमाणत ख्रिचन समाजाचे लोक राहतात, व बाकी इतर समाज आहे.

चलन :

मार्शल या देशाचे चलन अमेरिकन डॉलर आहे. येथील लोकांचा व्यवहारामध्ये व देशाच्या व्यवहार मध्ये या चलनाचा वापर केला जातो. भारतीय चलनाच्या तुलनेत एक अमेरिकन डॉलर म्हणजे 78.28 रुपये ऐवढे होतात.

See also  अफगानिस्तान देशाची संपूर्ण माहिती Afghanistan Information In Marathi

हवामान :

मार्शल देशातील हवामान हे उष्ण व दमट आहे. या देशात हवामानात मोठे बदल होतात. डिसेंबर ते एप्रिल या महिन्या मध्ये कोरडे ऋतू आणि मे ते नोव्हेंबरमध्ये ओला ऋतू असतो. हा देश समुद्राच्या मध्ये असल्यामुळे येथे सागरी वारे वाहतात.

अनेकदा पॅसिफिक टायफून मार्शल बेटांच्या प्रदेशात उष्ण व कटिबंधीय वादळ म्हणून सुरू असतात. तसेच ते पश्चिमेकडे मारियाना बेटे आणि फिलिपाइन्सच्या दिशेने सरकत जातात, आणि पुढे जात जात ते अधिक मजबूत बनतात.

या देशातील लोक गोड्या पाण्याचा पुरवठा सामान्यपने पावसाळी पाण्यापासून करत असतात. या देशात दरवर्षी 1,300 मिमी येवढा पाऊस पडतो. या देशात हवामान बदल झाल्यामुळे या मार्शल बेटांसाठी एक गंभीर धोका निर्माण होतो. यामुळे येथील समुद्रपातळी वाढते.

पक्षी :

मार्शल बेटांवर मोठ्या प्रमाणात पक्षी आढळून येतात. येथे आढळणारे बहुतेक पक्षी आपण ओळखतो, तर काही पक्षी अपवादमध्ये वगळले जातात. येथे एकतर समुद्री पक्षी किंवा स्थलांतरित प्रजाती मोठ्या प्रमाणत आढळून येतात. येथे पक्ष्यांच्या सुमारे 70 प्रजाती आहेत.

त्यापैकी 31 जातीमध्ये समुद्री पक्ष्यांचा समावेश आहे.  तर यापैकी 15 प्रजाती प्रत्यक्षात स्थानिक पातळीवर घरटे बांधनारी आहे.  सागरी पक्ष्यांमध्ये ब्लॅक नॉडी  आणि व्हाईट टर्न या पक्षाचा समावेश आहे. तसेच घरातील चिमणी हा एकमेव जमीनीवरील पक्षी आहे, ज्याची ओळख सर्वाना आहे.

इतिहास :

मार्शल या देशाचा इतिहास हा खूप प्राचीन व ऐतिहासिक आहे. सुमारे 2,500 वर्षांपूर्वी आशियातील काही मानवी लोक स्थलांतर करत होते, यांचा लाटा पश्चिम पॅसिफिक महासागरात पसरल्या आणि त्यातील अनेक लहान बेटांवर लोकसंख्या रहिवाशी झाली. मार्शल बेटे हे दुसऱ्या काळामध्ये मायक्रोनेशियन लोकांनी स्थायिक केले.

व या बेटांच्या सुरुवातीच्या इतिहास म्हणजे मार्शल बेटवासी अनेक महान महासागरीय व्हॉयेजर्सपैकी महासागराच्या फुगांचे मॅप करण्यासाठी येत असत आणि बेटांदरम्यान नेव्हिगेट करण्यासाठी स्टिक चार्ट तयार करत. अशा प्रकारे येते लोक स्थापन झाले, व या बेटाला एका देशाची मान्यता प्राप्त झाली.

मार्शल या देशात पहिल्या महायुद्धाच्या सुरुवातीला जपानने मार्शल बेटांवर ताबा केला आणि जपानी मुख्यालयाची स्थापना केली, व जर्मन प्रशासन केंद्र जलुइट येथे स्थापन झाली. 31 जानेवारी 1944 रोजी अमेरिकन सैन्य यादेशाच्या प्रवाळांवर उतरले आणि यूएस मरीन आणि आर्मीच्या सैन्याने नंतर 3 फेब्रुवारीला आक्रमण केले.

See also  मलेशिया देशाची संपूर्ण माहिती Malaysia Information In Marathi

नंतर क्वाजालीन आणि एनीवेटक प्रवाळांवर मोठया प्रमाणात लढाईनंतर जपानी लोकांकडून मार्शल बेटाला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढे 1947 मध्ये युनायटेड स्टेट्सने व्यापलेली पावर म्हणून पॅसिफिक बेटांचा ट्रस्ट टेरिटरी म्हणून मार्शल बेटांसह मायक्रोनेशियाचा बराचसा भाग प्रशासित करण्यासाठी राष्ट्र सुरक्षा परिषदेशी करार करण्यात आला आणि पुढे यांचा कारभार सुरळीत चालू झाला.

मार्शल देशातपुढे 19 व्या शतकात अमेरिकन व्हेलिंग जहाजांनी बेटांना भेट दिली. आणि पुढे यांचात चांगले राष्ट्रीय संबंध झाले, ही बेटे केवळ त्यांच्या वसाहतींच्या इतिहासातील बहुतेक भागावर स्पेनने ताबा मिळवला. आणि युरोपियन नकाशांवर कॅरोलीन बेटांसह गटबद्ध केले. नंतर पुढे त्यांनी अनेक देशावर आपला ताबा मिळवला.

खेळ :

मार्शल या देशाचा लोकप्रिय खेळ हा व्हॉलीबॉल आहे. तसेच या देशात खेळल्या जाणार्‍या प्रमुख खेळांमध्ये व्हॉलीबॉल बास्केटबॉल, बेसबॉल, सॉकर आणि अनेक जलक्रीडा यां खेळाचा समावेश आहे.

या देशात 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक पासून सर्व खेळांमध्ये ऑलिम्पिकमध्ये मार्शल बेटांने प्रती निधित्व केले आहे. त्यानंतर पुढे 2020 मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये मार्शल बेटांचे या स्पर्धेचे प्रतिनिधित्व दोन चांगल्या प्रकारे केले आहे.

मार्शल देशामध्ये एक लहान संघ आहे, ज्यामध्ये कोबीर हा सर्वात यशस्वी संघ आहे. त्यानंतर प्ले सॉकर मेक पीस द्वारे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये माजुरो बेटावर एक लहान फुटबॉल असोसिएशन आहे.

मार्शल बेटांसाठी असोसिएशन फुटबॉल हा खेळ एक नवीन आहे. त्यानंतरपुढे मार्शल बेटांवर राष्ट्रीय फुटबॉल संघ नाही आहेत. मार्शल हा देश हा जगातील असा एकमेव सार्वभौम देश आहे, ज्याकडे राष्ट्रीय फुटबॉल सामन्याचा रेकॉर्ड नाही.

व्यवसाय व उद्योग :

मार्शल या देशामध्ये खूप कमी प्रमाणात शेती हा व्यवसाय केला जातो. तसेच येथे प्रामुख्याने कृषी उत्पादन सर्वात महत्त्वाचे व्यावसायिक पीक म्हणजे कोपरा त्यानंतर नारळ, ब्रेडफुट, पेडनस, केळी, तारो हे पीक घेतले जाते. याचबरोबर या देशात पशुपालन हा व्यवसाय पण केला जातो. यामध्ये डुक्कर आणि कोंबडी पालन केले जाते. हे येथील लोकाचे व्यवसाय आहेत.

See also  इराण देशाची संपूर्ण माहिती Iran information in Marathi

उद्योगामध्ये येते मासेमारी हा व्यवसाय केला जातो. मार्शल या देशात माजुरो हे जगातील सर्वात व्यस्त ट्यूना ट्रान्सशिपमेंट बंदर आहे. येते मोठया प्रमाणत मासेमारी हा उद्योग केला जातो. येथून देशा विदेशात व्यापार केले जातात. यामुळे या देशाला मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न होते.

वाहतूक व्यवस्था :

मार्शल देशामध्ये काही प्रमाणात वाहतूक सेवा उपलब्ध आहे. या बेटांना माजुरो मधील मार्शल आयलंड येथे मासेमारी व्यापार केले जातात. येथील उद्योगाला आंतरराष्ट्रीय विमानतळद्वारे तसेच बुचोल्झ आर्मी आणि इतर लहान विमानतळ आणि हवाई मार्गातून सेवा पुरवली जाते. येथील स्थानिक लोकांसाठी लोकल बस सेवा उपलब्ध आहेत. जे लोकांसाठी खूप फायद्याचे आहे.

पर्यटन स्थळ :

मार्शल या देशात माजुरो येथे अहमदिया मुस्लिम समुदायाद्वारे इस्लाम संदेश दिला जातो. या राजधानी मध्ये पहिली मशिद आहे, हे इस्लामिक लोकांचे लोकप्रिय ठिकाण आहे. येथे लोक नमाज करण्यासाठी मोठया प्रमाणत जात असतात.

या देशामध्ये एक युनायटेड चर्च आहे. जे ख्रिचन समाजाच्या लोकांसाठी खूप प्रसिध्द आहे. हे लोक येथे प्राथर्ना करण्यासाठी मोठा संख्येने जात असतात.

या देशाला काही प्रमाणात समुद्र किनारा लाभलेला आहे. व हे पर्यटक ठिकाण आहे. जे अतिशय सुंदर असे दृश्य आहे. येथील लोक याचा आनंद घेत असतात.

ही माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment