Uzbekistan Information In Marathi उझबेकिस्तान या देशाची राजधानी ताश्केंत ही असून येथील सर्वात मोठे शहर देखील आहे तसेच या देशाचे राष्ट्रीय चलन उझबेकिस्तानी सोम हे आहे. हा एक मध्ये आशियातील देश असून देशाच्या स्वातंत्र्य पूर्वी हा सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक राज्य होते. या देशाचे क्षेत्रफळ, इतिहास, हवामान, शेती उद्योग व व्यवसाय तसेच पर्यटन स्थळ या विषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
उझबेकिस्तान देशाची संपूर्ण माहिती Uzbekistan Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
उझबेकिस्तान या देशाचे क्षेत्रफळ हे 4,47,600 एवढे असून त्याच्या पश्चिम व उत्तर दिशेला कजाकस्तान, तर पूर्वेला ताजी की स्थान व किर्गीस्तान आहे व दक्षिण दिशेला अफगाणिस्तान व तुर्कमेनिस्तान हे देश आहेत. या देशाचा विस्तार 37° उत्तर ते 40° उत्तर अक्षांशदरम्यान आणि 56° पूर्व ते 74° पूर्व रेखांश दरम्यान पसरला आहे. त्यांची पूर्व पश्चिम रुंदी 1425 किलोमीटर असून दक्षिणोत्तर अंतर 930 किलोमीटर आहे.
हवामान :
या देशांमध्ये हवामान हे खंडांतर्गत प्रकाराचे आहे. येथील हिवाळा हा अतिशय कडक स्वरूपाचा असून येथील हिवाळ्यातील तापमान -2° सेल्सिअस असते तर उन्हाळी हे त्या मनाने खूप उष्ण असतात. उन्हाळ्यातील येथील जुलै महिन्यातील तापमान हे 27° से. ते 30° से. असते.
डोंगराळ भागातील तापमानामध्ये भिन्नता दिसून येते. येथे तीव्र स्वरूपाचे दिवाळी तर अतिशय उष्ण उन्हाळे अशी परिस्थिती दिसून येते. येथे पर्जन्यवृष्टी ही खूपच कमी प्रमाणात होते, त्याचे प्रमाण 100 ते 200 मिलिमीटर एवढे आहे.
भूवर्णन :
उझबेकीस्थानचा बराचसा प्रदेश हा वाळवंटी व मैदानी असून देशाच्या आग्नेय भागांमध्ये तियेनशान व पामीर-आलाय पर्वतांचे फाटे घुसलेली असून त्यात सिरदर्याच्या फरगान खोऱ्याचा समावेश आहे. या खोऱ्याची लांबी 320 किमी. असून 110 किमी. रुंद आहे. फरगानाच्या खोरेच्या बाजूला डोंगर उतारावर जमलेल्या दगड कॉटन वर बारीक मातीचा थर असलेली जमीन येथे आढळते तसेच खोऱ्यात एस जातीची वाळू व सिरदर्या नदीने आणून टाकलेल्या गाळाची गाळाची जमीन निर्माण झाली आहे.
लोकसंख्या व भाषा :
उझबेकिस्तानमधील 30.2 दशलक्ष लोक राहतात तसेच मध्य आशियातील सर्वात मोठी लोकसंख्या उझबेक या जातीची असून तेथील भाषा ही उझबेक व तूर्किक ह्या मुख्य भाषा असून त्याव्यतिरिक्त कझाक उगार वा तुर्कमेन या भाषा सुद्धा बोलल्या जातात.
इतिहास :
उझबेकिस्तान या देशाचा इतिहास हा ताम्र युगापासून तारीफ खोऱ्याच्या परिसरात मानवी वस्ती पासून सुरू झाला. इ.स.पू. 1 ल्या सहस्त्रकात अहिराणी भटक्या लोकांचे मोठ्या प्रमाणात मध्य आशियामध्ये स्थलांतरण झाले तसेच इराणी भाषा कुळातील भाषा बोलणारे लोक सध्याच्या उझबेकिस्तानच्या भूप्रदेशातील गवताळ प्रदेशामध्ये स्थानपन्न झाले आहे.
इ.स.पू. 5 व्या शतकात सोग्दयी, तुखार, बाख्तरी या राज्यांचा या प्रदेशात उदय झाला. बुखारा व समरकंद हे शहरी संस्कृती व राजकीय केंद्र म्हणून प्रसिद्ध झाली. तसेच चीनने रेशीम मार्गाद्वारे पश्चिमेकडील प्रदेशांची व्यापार संबंध वाढवला तेव्हाही इराणी शहरे आंतरराष्ट्रीय व्यापाराची केंद्रे बनली होती. तसेच व्यापारी केंद्र असलेल्या धनगरांचा विस्तार होऊन ती नगरे वैभवसंपन्न झाली.
इ.स.पू. 327 मध्ये महान अलेक्झांडरने सोग्दा व बाख्तरावर वर आक्रमण करून हा प्रदेश जिंकला. नंतर त्याने रोक्साना नावाच्या बाख्तारी राजकुमारीशी विवाह केला. तरीपण ग्रीकांना येथे यश मिळाले नाही. बऱ्याच काळानंतर अलेक्झांडरचे सैन्य येथे चालू असलेल्या प्रतिकारामुळे मागे सरकले. नंतर पुढे अनेक वर्ष वर्तमान उझबेकिस्तानच्या भूभागावर पार्थियन व सासानी, इराणी साम्राज्याची सत्ता होती.
इ.स.च्या आठव्या शतकात अमूदर्या व सिरदर्या नद्यांमधील ट्रान्सऑक्सियाना दुआबाचा प्रदेश अरबांनी जिंकला. नवव्या व दहाव्या शतकात हा भाग सामानी या राज्याची जोडला गेला.
तेराव्या शतकामध्ये चंगीझ खानच्या नेतृत्वाखाली मंगोल फौजांचे आक्रमण या भागातील इतिहास वळण देणारे होते. मंगू आक्रमणात झालेल्या क्रूर कत्तलीमुळे येथील मुळच्या इंडो पारसिक सिथियनांचा वंशसंहार केला गेला. तसेच त्यांच्या सांस्कृतिक वारसा देखील खंडित होऊन पुढील काळात ते मंगोल व तुर्क लोकांच्या संस्कृतीने मूळ धरले.
इ.स.च्या 19 व्या शतकात रशियन साम्राज्याने मध्य आशियात राज्यविस्तार करण्यास सुरुवात केली. इ.स. 1813 पासून इ.स. 1907 मध्ये या देशात रशियन प्रभाव वाढत गेला. 1912 मध्ये उझबेकिस्तानात 2,10,306 एवढ्या संख्येने रशियन लोक राहत होते.
नंतर 27 ऑक्टोबर 1924 रोजी सोव्हिएत संघांतर्गत उझबेकिस्तानाचे सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताक निर्माण करण्यात आले. 31 ऑगस्ट 1991 रोजी हा देश सोव्हियेत संघापासून स्वतंत्र झाल्याचे जाहीर केले व 1 सप्टेंबर हा दिवस उझबेकिस्तानात राष्ट्रीय दिन म्हणून पाळला जातो.
वाहतूक व्यवस्था :
येथेल राजधानीचे शहर ताश्कंद येथे सार्वजनिक वाहतुकीसाठी मार्गाचे तीन जलद परिवहन सेवा कार्यरत असते. येथे भुयारी मेट्रो रेल्वे असलेला उझबेकिस्तान व कझाकस्तान हे मध्य आशिया मधील फक्त दोनच देश आहेत.
2011 साली येथे ताश्कंद-समरकंद द्रुतगती रेल्वेमार्ग सुरु करण्यात आला असूनही रेल्वे 344 किलोमीटर अंतर दोन तासांमध्ये पार करते. याव्यतिरिक्त येथे एअरवेज ही राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी ताश्कंदच्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमान तळ आवरून देशातील अनेक शहरांना व मध्य आशिया युरोप आग्नेय आशियातील अनेक देशांना हवाई वाहतूक सेवा यांच्यामार्फत पुरवली जाते.
खनिज संपत्ती व उद्योग :
या देशात कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू, जस्त, तांबे, ओझोसेराईट, अँटिमनी, सोने इत्यादीचे साठे मुबलक प्रमाणात असून तांब्याच्या साठ्यात रशियामध्ये या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो.
या देशात 1600 लहान-मोठे कारखाने असून या कारखान्यांमध्ये धातुकाम सिमेंट व शेती उपयोगी अवजारे कातडी काम, कागद, कापड, कपडे, तेल शुद्धी, गंधक, रसायन इत्यादींचा समावेश होतो. त्या व्यतिरिक्त पूर्वीपासून प्रसिद्ध असलेले भरत काम आणि गालिचे हस्तव्यवसाय यांचाही येथे उद्योग भरभराटीला आला आहे.
पर्यटन स्थळ :
चार्वाक तलाव :
चार्वाक तलाव हे ताश्कंदमधील एक लोकप्रिय रिसॉर्ट असून येथे पूर्ण देशातून अनेक पर्यटक येत असतात. तसेच शेजारील देशातील लोकही हा तलाव पाहण्यासाठी येत असतात.
स्वप्नांचे शहर :
खोरसाम म्हणून ओळखले जाणारे, हे शहर 2000 वर्षचे प्राचीन शहर असून त्याच्या सर्व बाजूंनी विटांच्या भिंतींनी वेढलेली सुंदर ठिकाणे आणि खुणा आहेत. युनेस्कोने खोवाचे वॉल सिटी हे पहिले उझबेक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. शिवा मध्ये तुम्हाला जुन्या शहरात तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदय याची काही सुंदर दृश्य दिसतील. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात म्हणून त्याला स्वप्नांची शहर म्हणून ओळखले जाते.
ताश्कंद-समरकंदसाठी बुलेट ट्रेन :
ताश्कंद आणि समरकंद दरम्यान 344 किमी हाय-स्पीड रेल्वे लिंक ही बुलेट ट्रेन आहे. उझबेकिस्तानमध्ये हा रस्ता ताश्कंद, सिरदारिओ, जिझाख आणि समरकंदमधून जातो. अफ्रोसिब ब्रँड अंतर्गत गाड्या आठवड्यातून सात दिवस धावतात.
अमीर तैमूरचे संग्रहालय :
ताश्कंदमधील अमीर तैमूर संग्रहालय 1996 मध्ये मंगोलियन सरदार अमीर तैमूरच्या स्मरणार्थ उघडण्यात आले. निला कूपोला संग्रहालय समरकंदच्या गुरी अमीर मकबरासारखे आहे. हे मध्ययुगीन स्थापत्य परंपरांवर आधारित आहे. पण आधुनिक गरजाही पूर्ण करते. या वर्गाचा इतिहास 19 व्या शतकापासूनचा असून कोर्ट हे ताश्कंद शहराच्या मध्यभागी व्यायामशाळा इमारतींनी वेढलेले एक छोटेसे उद्यान होते.
चेरसू बाजार :
चेरसू बाजार ताश्कंदच्या मध्यभागी असून ही एक निळ्या-घुमटाची इमारत आहे. ही इमारत तिच्या पारंपारिक बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे. बाजार अभ्यागतांसाठी आणि स्थानिकांसाठी कपड्यांपासून ट्रिंकेटपर्यंत विविध प्रकारच्या वस्तू ऑफर करतो. बाजाराच्या शेवटी, तुम्ही कुक्लदेश मदरसाला भेट देऊ शकता. जे उझबेकिस्तानमध्ये भेट देण्याच्या सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. तेथे अनेक पर्यटक भेट देत असतात.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Makar Sankranti In Marathi
- Rainy Season Essay In Marathi
- Global Warming Essay In Marathi
- Importance Of Education Essay In Marathi
- Essay On Abdul Kalam In Marathi
- Essay On Holi In Marathi
- Essay On Navratri in Marathi
- Essay On Mahashivratri In Marathi
FAQ
उझबेकिस्तान कशासाठी प्रसिद्ध आहे?
उझबेकिस्तान हा जगातील कापूस उत्पादक देशांपैकी एक आहे. हे फळबागा आणि द्राक्षांच्या बागांसाठी ओळखले जाते आणि काराकुल रेशीम कीटक आणि रेशीम कीटकांच्या प्रजननासाठी देखील महत्त्वाचे आहे.
उझबेकिस्तान कोणता देश आहे?
उझबेकिस्तान हा मध्य आशियातील भूपरिवेष्टित देश आहे, त्याचे एकूण क्षेत्रफळ 447 400 किमी 2 आहे. पश्चिमेला कझाकस्तान, ईशान्य अरल समुद्र, उत्तरेला कझाकस्तान, पूर्वेला किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान आणि आग्नेय अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान आहेत.
उझबेकिस्तानमध्ये बहुसंख्य लोक कोठे राहतात?
उझबेकिस्तानच्या लोकसंख्येचा सर्वात मोठा भाग हा ग्रामीण भागातील रहिवाशांचा बनलेला आहे. जवळपास ६०% लोकसंख्या ग्रामीण भागात राहते.
उझबेकिस्तानमधील मुख्य कृषी उत्पादने कोणती आहेत?
मुख्य तृणधान्ये गहू, बार्ली, कॉर्न आणि तांदूळ आहेत, जे सघनपणे सिंचन केलेल्या ओएसमध्ये उगवले जातात. किरकोळ मसाल्यांमध्ये तीळ, ऊस, अंबाडी आणि तंबाखूचा समावेश होतो. ताजी फळे प्रामुख्याने देशात वापरली जातात, तर सुक्या फळांची निर्यात देखील केली जाते
उझबेकिस्तानमध्ये कशाचा शोध लागला?
1925 मध्ये इलेक्ट्रॉनिक टेलिव्हिजनच्या शोधात उझबेकिस्तानचे प्राधान्य आणि 1928 मध्ये जगातील पहिले टेलिव्हिजन प्रसारण जगभरात ओळखले गेले.
Very good