स्वीडन देशाची संपूर्ण माहिती Sweden Information In Marathi

Sweden Information In Marathiस्वीडन या देशाची राजधानी व प्रमुख शहर हे   स्टॉकहोम आहे. या देशाचे चलन स्वीडिश क्रोना हे आहे. ऐतिहासिक व मध्ययुगीन काळापासून स्वीडन हा एक स्वतंत्र देश राहिला आहे. सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे.  कार्ल सोळावा गुस्ताफ हे येथील विद्यमान राजे आहेत. अत्यंत विकसित व समृद्ध असलेल्या स्वीडनला लोकशाही निर्देशांकानुसार जगात प्रथम स्थान मिळाले आहे. जगातील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार नोबेल हा असून या पुरस्काराचा जन्म स्वीडन मध्ये झाला होता याची सुरुवात सन 1901 मध्ये झाली. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Sweden Information In Marathi

स्वीडन देशाची संपूर्ण माहिती Sweden Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

स्वीडन या देशाचे क्षेत्रफळ 4,50,295 क्षेत्रफळ चौरस किलोमीटर असून या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने युरोपियन संघामधील तिसरा क्रमांक लागतो. स्वीडन या देशाच्या वायव्य व पश्चिम दिशेला नॉर्वे तर पूर्व दिशेला बॉथनियाचे आखात व फिनलंड तसेच आग्नेय दिशेला बाल्टिक समुद्र व नैऋत्य दिशेला स्कॅगरॅक व कॅटेगॅट हे उत्तर समुद्राचे भाग आहेत.

कॅटेगॅट व बाल्टिकसमुद्र यांना जोडणाऱ्या 5.6 किमी. रुंदीच्या उरसुंद (द साउन्ड) या सामुद्रधुनीमुळे डेन्मार्क व स्वीडन हे दोन देश एकमेकांपासून वेगळे झाले आहेत. या देशाचा उत्तर व दक्षिण विस्तार हा देशाचा दक्षिण- उत्तर विस्तार हा 1600 किमी. व पूर्व पश्चिम विस्तार 500 किमी. आहे.

हवामान :

स्वीडन या देशाच्या हवामानाचा आपण विचार केला तर उत्तरेकडील अधिक उंचीचा प्रदेश असल्यामुळे उत्तर आणि दक्षिण भागातील हवामानात बदल दिसतो.

तर आर्टिक वृत्ताच्या उत्तरेस मे महिन्याच्या शेवटपर्यंत ते मध्य जुलै या काळात 24 तास दिवस राहतो. दक्षिण भागात असलेल्या स्टॉक होम येथेही या काळात जेमतेम काही तास अर्ध अंधुक प्रकाशयुक्त रात्र तर डिसेंबरच्या मध्यात साडेपाच तास दिवस राहतो.

या देशात अटलांटिक महासागरावरून गल्फ या उबदार सागरी प्रवाहावरून वाहत येणाऱ्या पश्चिमे वाऱ्यांमुळे येथील तापमान हे उबदार राहते. या वाऱ्यांमुळेच दक्षिण स्वीडन मधील वातावरण उन्हाळ्यात अल्हाददायक हिवाळ्यामध्ये सौम्य राहते.

स्वीडनच्या उत्तरेकडे वर्षातील आठ महिने मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होते त्यामुळे तापमान -30°c ते -40°c पर्यंत जाते. तर दक्षिणेकडील भागातील तापमान हे -5°c ते 0°c असते.

इतिहास :

स्वीडन हा प्रदेश पूर्णतः बर्फाच्छादित होता. काही काळ व्यतीत झाल्यानंतर 14 हजार वर्षांपूर्वी येथील हिमाच्छादन कमी झाले व त्यानंतर युरोप खंडाच्या मुख्य भूमीवरून येथे शिकारी लोकांचे आगमन सुरू झाले. ही माझी प्रदेशाची मर्यादा जशी कमी झाली, तशी उत्तरेकडे सरकल्यानंतर शिकारी व मासेमारी करणाऱ्या लोकांनी उत्तरेकडे आपल्या वसाहती निर्माण करायला सुरुवात केल्या.

येथे 9000 वर्षापासून स्वीडनच्या दक्षिण भागात मानवी वस्ती असल्याचे पुरावे मिळतात. तसेच सहा हजार वर्षापासून येथील लोक विशिष्ट प्रकारच्या हत्यारांचा वापर शिकार व मासेमारी करण्याकरिता करत होते. इ.स.पू. 2500 पासून येथिल लोक शेती व पशुपालन हा व्यवसाय करत होते.

ब्राँझयुगात म्हणजे इसवी सनाच्या 1500 ते 1000 या काळात लोकांची डेन्यू नदीच्या खोऱ्यातील लोकांशी व्यापार संबंध झाल्याचे पुरावे आढळतात. नवाश्मयुगापासून येथील हवामान सौम्य होत गेले.

नंतर येथील लोकांनी हळूहळू व्यापार करायला सुरुवात केली फर आणि तृण्मणी यांच्या बदल्यात ते काचेच्या व ब्रांचच्या वस्तू आणि चांदीची नाणी घेत असत. स्वीडिश लोकांबद्दलची माहिती पहिल्यांदाच रोमन लोकांनी लिहून ठेवली होती.

रोमन इतिहासकार स्टॅसिटस याने इ.स. 98 मध्ये लिहिलेल्या जर्मन या ग्रंथात स्वीडिश यास स्कॅनडीनिव्हियन लोकांबद्दल लिहून ठेवले गेले. त्यामध्ये त्यांनी स्वीअर असा उल्लेख केलेला आहे.

प्राणी व वनस्पती :

स्वीडन या देशातील एकूण क्षेत्रापैकी हार्दिक क्षेत्र हे वनांखाली आहे. त्यामुळे या जंगलामध्ये   वेगवेगळी वृक्ष आढळून येतात त्यामध्ये फर, प्रूस, बर्च, पाइन, हे सूचीपर्णी वृक्षांची वने आहेत त्या व्यतिरिक्त उत्तरेकडून दक्षिणेकडे तेथील वनांमध्ये आपल्याला बदल दिसून येतो.

उत्तर भागात व सर्वाधिक उंचीच्या प्रदेशांमध्ये अल्पाइन वने आहेत. ही एक प्रकारची झुडपे असून येथे लहान बर्च, विलो, हे झाडे हे आपल्याला पहावयास मिळतात. दक्षिण स्वीडन मध्ये पानझडी वसूची परी मिश्रवणे आहेत त्यामध्ये ओक, बीच, लींडेन, मॅपल, ॲश, एल्म व इतर जातींची वृक्ष देखील दिसतात.

स्वीडन मधील जंगलात अनेक प्रकारचे प्राणी जीवन नांदत असते त्यामध्ये आपल्याला भिन्नता पाहायला मिळते. या प्राण्यांमध्ये रेनडियर, मृग, सांबर, एल्क, अस्वल, कोल्हा, लांडगा, रानमांजर, लेमिंग, खार, मार्टिन, वीझल, बिजू , साळिंदर, चिचुंद्री इ. प्राणी येथे आढळतात.

खनिज संपत्ती :

या देशात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. येथे लोहखनिजाचे समृद्ध साठे आपल्याला आढळतात. जागतिक उत्पादनाच्या दोन टक्के लोहखनिज या देशातून उपलब्ध होतो. त्या व्यतिरिक्त या देशांमध्ये तांबे, चांदी, सोने, शिसे, जस्त इत्यादी धातूखाणीजांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

शेती :

स्वीडन मध्ये विसाव्या शतकाच्या मध्यापासूनच शेती, जंगलातील उद्योग व मत्स्य व्यवसाय केला जातो. या देशांमध्ये कृषी योग्य जमिनीची मर्यादा 84 टक्के असून येथे शेतीच्या दृष्टीने अनुकूल अशी योग्य जमीन आहे. तसेच या देशातील हवामानही शेतीच्या दृष्टीने अनुकूल आहे.

उत्तर स्वीडनचा बहुतांश भाग हा अति थंड हवामानाचा व नापीक जमिनीचा आहे. मध्ये स्वीडन मधील सरोवरांभोवती कृषी क्षेत्र मोठ्या प्रमाणात दिसून येतात. या देशातील दक्षिण भागांमध्ये ऊस, गहू, बार्ली, ओट, बीट, तेलबिया बटाटे व इतर भाजीपाला अशी पिके घेतली जातात.

लोक व समाज व्यवस्था :

स्वीडन मधील मोठ्या प्रमाणावर देशाच्या दक्षिण भागात व शहरी भागात राहतात. येथील लोकांची मुख्य भाषा ही स्वीडीश असून बऱ्याच लोकांची मातृभाषा सुद्धा आहे. त्या व्यतिरिक्त ही इतर भाषा येथे बोलल्या जातात. येथे वेगवेगळ्या शतकामध्ये स्थलांतरांकडून आलेले विविध लोकसमुहांचा परिणाम या संस्कृतीवर झालेला दिसतो.

दुसरा महायुद्धाच्या समाप्तीनंतर स्वीडन मधील लोकसंख्येत सांस्कृतिक धार्मिक व भाषिक रचनेमध्ये एकजीनसीपणा दिसून येत होता. येथे इंग्लिश मिशनऱ्यांनी दहाव्या शतकात ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला. देशातील 98 टक्के लोक ख्रिश्चन धर्म आहेत.

या देशातील लोकांवर इव्हँजेलिकल, ल्यूथरन चर्चचा प्रभाव सर्वाधिक आहे. 1995 च्या कायद्यानुसार 2500 पासून चर्च आणि शासन यांच्यामध्ये फारकत करण्यात आली. पूर्वीच्या युगोस्ला-व्हियातून आलेल्या तुर्क व मुस्लिम लोकांमुळे इस्लाम तसेच ज्यू धर्मीय लोक येथे आहेत.

स्वीडन मधील पर्यटन स्थळ :

या देशात पर्यटन स्थळ पैकी बरेच पर्यटन स्थळ हे नैसर्गिक सौंदर्याने नटलेले आहे. येथील दृश्य मनाला मोहन टाकणारे आहे. युरोप खंडातील हा देश असून येथे बऱ्याच कालावधीमध्ये 24 तास सूर्यप्रकाश असतो. तसेच या देशाच्या चारही बाजू समुद्रांनी वेढलेल्या आहेत. तर चला मग पाहूया या देशातील पर्यटन स्थळ.

गोटेनबर्ग :

येथे लिसेबर्ग नावाचे एक प्रसिद्ध मनोरंजन असे पार्क आहे. हे स्वीडन मधील आकर्षणांपैकी एक आहे. येथे लहान मुले व खेळा विषयी आवड असलेले पर्यटक आवडीने मनोरंजन करू शकतात.

रॉयल पॅलेस :

रॉयल पॅलेस हे स्वीडन आणि स्टॉकहोम या देशाच्या मध्यवर्ती असे पर्यटन स्थळ आहे याविषयी लोकांना आकर्षण वाटते. हे एका स्टॅन्ड स्टॅडहोल्मेन बेटाच्या पाणवठ्यावर आहे. या ऐतिहासिक वास्तूमध्ये विविध शैलीच्या सहाशे खोल्या आहेत. येथे एक राजवाडा असून तोच राजेशाही निवासस्थान आहे आणि हे पर्यटकांना पाहण्यासाठी खुले केले असून पर्यटक येथे येतात व आनंद घेतात.

ॲलेस स्टेनर :

ॲलेश स्टेनर ही एक वस्तुस्थिती आहे की स्थानिक दगड इंग्रजांच्या विपरीत जहाजांच्या आकारात स्थितत आहेत, तसेच पौराणिक कथेनुसार वायकिंग्सचा दिग्गज नेता ओलावा स्टिंगसन इथे पुरवला गेला आहे. ही स्मारकीय रचना मेगालिथिक काळातील आहे. तसेच त्या काळातील येथे 59 मोठे दगड आहेत. हे दृश्य पाहण्यासाठी तुम्हाला देशाच्या दक्षिणेकडील कासिबर्ग या गावांमध्ये जावे लागेल.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

स्वीडन हा कोणत्या प्रकारचा देश आहे?

स्वीडन एक घटनात्मक राजेशाही आहे. किंग कार्ल सोळावा गुस्ताफ यांच्याकडे कोणतीही वास्तविक राजकीय शक्ती नाही आणि संसद, रिक्सडेगन ही देशाची सर्वोच्च सत्ता आहे.

स्वीडन कशासाठी प्रसिद्ध आहे?

स्वीडन, विपुल जंगलांचा आणि नयनरम्य तलावांचा देश, मुख्यत्वे चित्तथरारक दृश्ये आणि तीव्र हिवाळ्यासाठी ओळखला जातो.

स्वीडनचे मुख्य चलन कोणते आहे?

स्वीडनमधील आर्थिक एकक क्रोना SEK (बहुवचन “क्रोनर”) आहे आणि 100 öre आहे.

स्वीडनची राजधानी आणि चलन काय आहे?

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आहे. स्वीडिश क्रोना हे स्टॉकहोमचे चलन आहे.

स्वीडन उत्पादनासाठी काय ओळखले जाते?

स्वीडन हा वन उत्पादनांचा जागतिक निर्यातदार देश आहे. लाकडाची वाहतूक दाट रस्ता आणि रेल्वे नेटवर्कद्वारे केली जाते. सॉमिल आणि लगदा आणि कागदाचे कारखाने वन उत्पादनांवर प्रक्रिया करतात.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment