ग्रीस देशाची संपूर्ण माहिती Greece Information In Marathi

Greece Information In Marathi ग्रीस हा दक्षिण युरोपातील भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक देश आहे. बाह्यजगात याचे नाव ग्रीस असले तरी ग्रीसमध्ये त्या देशाला हेलास अथवा हेलेनिक रिपब्लिक असे म्हणतात. अथेन्स ही ग्रुपच्या देशाची राजधानी असून तेथील सर्वात मोठे शहर आहे. या शहराची लोकसंख्या 50 लाखापेक्षा जास्त असून देशाच्या जवळपास अर्धी जनता अथेन्समध्ये रहाते.तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Greece Information In Marathi

ग्रीस देशाची संपूर्ण माहिती Greece Information In Marathi

ग्रीस हा विकसित देश असून 1981 पासून युरोपीय महासंघांचा प्रमुख सभासद आहे. या देशाचे चलन युरो असून,  पश्चिम युरोपीय देशांच्या तुलनेत अर्थव्यवस्था मध्यम स्वरूपाची आहे. ग्रीस या देशाची राष्ट्रीय भाषा ग्रीक ही आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

या देशाचे क्षेत्रफळ हे 1,31,986 चौ.किमी.   असून या देशाच्या दक्षिण दिशेला भूमध्य समुद्र तर पूर्वेस इजीअन व पश्चिमेस आयोनियन समुद्र असून वायव्ये दिशेला अल्बेनिया, उत्तरेला यूगोस्लाव्हिया व बल्गेरिया आणि ईशान्य व पूर्वेला तुर्कस्तान आहे.

या देशाचा 25,202 चौरस किमी. प्रदेश बेटांनी व्यापलेला असून त्यांत सिक्लाडीझ, डोडेकानीझ, स्पॉरडीझ व आयोनियन हे द्वीपसमूह व क्रीट, यूबीआ, लेझ्बॉस, कीऑस, रोड्झ, सेफालोनिया, कॉर्फ्यू व सेमॉस ही मोठी बेटे समाविष्ट आहेत.

हवामान :

या देशाचे हवामान हे उन्हाळा कडक व हवा कोरडी असून हिवाळा ओला असतो. हे त्याचे वैशिष्ट्य आहे. समुद्रसपाटलेला सरासरी तापमान 27° से. असते. पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे पिंडस पर्वताच्या पश्चिमेकडे जास्त पाउस पडतो. त्यामुळे ग्रीसची पूर्व किनारपट्टी ही खूपच कोरडी असते.

अथेन्सच्या परिसरात फिरताना हा कोरडेपणा चांगलाच जाणवतो. ग्रीसच्या पर्वतीय क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडतो व हिवाळ्यात बर्फ पडतो उत्तरेकडील डोंगराळ भागात अल्पाईन जंगले आहेत. ग्रीसची एजियन समुद्रातील बेटांवर खूपच कोरडे हवामान आहे.

भूरचना :

ग्रीस या देशाची दोन भागात विभागणी केली जाते. भौगोलिक दृष्ट्या ग्रीस हा बाल्कन द्वीपकल्पाचा दक्षिण टोकाचा भाग आहे. एजियन समुद्रातील अनेक बेटांचे समूहांमुळे ग्रीसचे बेटे व मुख्य भूमी असे वर्गीकरण करता येईल. ग्रीसमध्ये अनेक बेटे असून एकूण 1400 बेटे ग्रीसच्या अखत्यारीत येतात त्यापैकी 227 बेटांवर मनुष्यवस्ती आहे. ग्रीसला अतिशय लांब असा समुद्र किनारा, एकूण 14,880 किमी. समुद्रकिनारपट्टी लाभली आहे.

See also  फ्रान्स देशाची संपूर्ण माहिती France Information In Marathi

विविधरंगी बेटे हे ग्रीसचे विशिष्ट आहे. ग्रीसच्या बेटांमधील भौगोलिक विविधता खूप आहे तरीही बहुतांशी बेटे ही ज्वालामूुीपासून तयार झालेली आहे. सॅंटोरिनी ह्या बेटावर इस पूर्व 1600 साली जबरदस्त ज्वालामुखी फुटला होता त्यामुळे या बेटाची भौगोलिक रचनाच बदलून गेली.

आज हे बेट ग्रीसचे सर्वांत प्रसिद्ध बेट आहे. क्रेटा हे सर्वांत मोठे बेट असून एकूण 1400 लहानमोठी बेटे ग्रीसच्या अख्यारीत आहेत. ग्रीसचा एगियन समुद्र हा त्याच्या पाण्याच्या रंगासाठी प्रसिद्ध आहे. एजियन समुद्राचे पाणी अतिशय गडद निळ्या रंगाचे दिसते, जे एका प्रकारचे भौगोलिक आश्चर्य आहे.

प्रमुख नद्या :

ग्रीस या देशातील वार्दर व स्त्रूमा त्यातून नद्यांना वर्षभर पाणी असते. इजीअन समुद्राला ग्रीसमधून मिळणाऱ्या इतर नद्यांमध्ये नेस्तॉस, आलीआक्‌मॉन, पिनीअस व स्पेर्खीऑस, पेलोपनीससमधील सर्वात मोठी नदी युरोतस, कॉर्फ्यू बेटावर मेगॉसी आणि आयोनियन समुद्राला मिळणाऱ्या ॲकिलोअस, आराख्थॉस आणि थीअमिस आहे.

इतिहास :

ग्रीस हा देश जगातील प्राचीन देशात गणला जातो. ग्रीक संस्कृती ही तुलनात्मकदृष्ट्या प्राचीन भारत, इराण, इजिप्त, चीन, इटली, कोरिया, जपान या संस्कृतींइतकीच जुनी आहे. जिथे मानवी सभ्य संस्कृतीची सुरुवात झाली, असा ग्रीस हा युरोपमधील पहिला देश आहे.

ग्रीक संस्कृतीची मुळे क्रेटा परिसरात सापडतात. इ.स.वी पूर्व 6 व्या ते 7 व्या शतकात ग्रीक संस्कृती ही अनेक स्वायत्त शहरात विभागली होती. प्रत्येक शहर हे एका देशाप्रमाणे असे. अशी अनेक शहरे एजियन समुद्रापासून  ते इटलीपर्यंत  होती.

अथेन्स, स्पार्टा, थेस्पीया ही त्यातील काही प्रमुख शहरे होती. या शहरांमध्ये परस्पर मैत्रिभााव तसेच शत्रुत्व असे. ही शहरे एकमेकांत अनेकदा युद्धे देखील करत. इसवी सनपूर्व 4 थ्या ते 5 व्या शतकात ग्रीक संस्कृती या शहरांमध्ये भरभराटीस आली. हा काळ प्राचीन ग्रीसचा सुवर्ण काळ मानला जातो.

या काळात असे मानतात की प्राचीन जगातील अनेक आश्चर्ये ग्रीसमध्ये होती. जी कालाओघात नष्ट झाली. यातील खुणा अजूनही अथेन्समधील प्राचीन मंदिरांमध्ये दिसून येतात.  होमरने इलियड, ओडिसीसारखी महाकाव्ये या काळात रचली गेली. वाणिज्य, कला, तत्त्वज्ञान,  तर्कशास्त्र यांचा ग्रीसमध्ये उदय झाला व भरभराटीस पावले.

See also  अर्जेंटिना देशाची संपूर्ण माहिती Argentina Information In Marathi

ऑलिंपिकसारख्या खेळा-महोत्सवांचा उदय झाला. ग्रीसवर या काळात पर्शियाची मोठी आक्रमणे झाली जी परतवून लावण्यात स्पार्टा व अथेन्सने हिरिरीने सहभाग घेतला. पहिल्या युद्धात अथेन्सने मॅराथॉन येथे पर्शियाचा पराभव केला ज्याच्या स्मरणार्थ आज मॅरॅथॉन धावण्याची स्पर्धा आयोजित होते.

दुसऱ्या युद्धात थर्मिस्टीकलीस या सेनापतीने नौदलीय युद्धात पर्शियाचा पराभव केल.  फिलिप्स या  मॅसेडोनियाच्या राजाने सर्व ग्रीक राज्ये जिंकून ग्रीस एका छत्राखाली आणली. याच्याच मुलगा जो महान अलेक्झांडर द ग्रेट सिकंदर म्हणून ओळखला जातो, याला आतापर्यंत सर्वात महान सेनापती मानले जाते. त्याने ग्रीकांचे साम्राज्य भारतापर्यंत वाढवले.

वनस्पती व प्राणी :

ग्रीसमधील दक्षिण व मध्य प्रदेशात भूमध्य सागरी वनस्पती तसेच पर्वत प्रदेश आढळतात. उत्तरेस मध्य युरोपीय प्रदेशात खुरटी झुडपे, पानगळ व सदाहरित वृक्ष आढळतात त्यामध्ये ओक, चेस्टनट, फर, पाइन हे वृक्ष देखील आढळतात. वसंत ऋतूत खडकाळ भागात विविधरंगी फुलझाडांना बहर येतो.

डोंगराळ प्रदेशात रानडुक्कर, रान मांजर, लांडगे, लिंक्स, मोर्टेन-पिंगट अस्वल, हरिण, पश्चिम व दक्षिण प्रदेशांत खोकड, रानबकरा, साळू हे प्राणी आढळतात. तर पेलिकन बगळे, ठिपक्यांचा कोकीळव करकोचे हे पक्षी असून उत्तर यूरोपमधले अनेक जातींचे पक्षी हिवाळ्यात या देशात येतात. समुद्रात मासे, कवची जलचर, कासव, स्पंज इ. सापडतात.

शेती :

ग्रीस या देशांमध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. त्यामध्ये ओट, मका, गहू, बार्ली, कलिंगडे, बटाटे, टोमॅटो, तंबाखू, कापूस, साखर, आल्फा-आल्फा, बीट, ऑलिव्ह, बेदाणा, मोसंबी, लिंबे, सफरचंद, द्राक्ष, पीच हे महत्त्वाचे पिके ही घेतली जातात.

समाज व्यवस्था :

ग्रीस या देशाची संस्कृती ही प्राचीन मानली जाते. तसेच हा देश प्राचीन देशांमध्ये गणला जातो. प्राचीन काळी येथे बारा देवतांना पुजले जाईल. अपोलो, झेउस, व्हिनस, तीतीका अश्या काही देवता होत्या.

ख्रिस्ती धर्माच्या आगमनानंतर हा प्राचीन धर्म लुप्त पावला. कॉन्स्टंटाईन या रोमन सम्राटाने ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर ख्रिस्ती धर्म हा ग्रीक लोकांनी स्वीकारला.

See also  ओमान देशाची संपूर्ण माहिती Oman Information In Marathi

या देशातील ग्रामीण भागातील लोकांची राहणीमान साधी आणि आहारामध्ये गहू-रोटी, ऑलिव्ह, शेळीचे दूध, कांदा, पावटे, पालेभाजी, ताजा किंवा खारा मासा यांपैकी असतो.

त्यांच्या घरांच्या भिंती ह्या दगड मातीच्या व पांढऱ्या रंगाचे लहान घर असून जवळ एखादे बदामाचे किंवा डाळिंबाचे झाड तसेच आजूबाजूला फुल झाडे खिडक्यातून एक दोन कुंड्या पाणी भरलेले माठ तसेच जळण्यासाठी कोळशाच्या शेगड्या ही पद्धत सर्वत्र दिसून येते.

10 व्या शतकापर्यंत पोपशी संबध ताणल्यानंतर ग्रीक व बायझंटाईन नागरिक स्वतःला पारंपारिक ख्रिस्ती म्हणू लागले, तुर्की काळात ग्रीसमध्ये इस्लामी करणात प्रखर विरोध झाला व तुर्की सम्राटांनीही धार्मिक भावना न दुखावता राज्य करावयाचे ठरवले त्यामुळे ग्रीसची ख्रिस्ती परंपरा अबाधित राहिली. संविधानाप्रमाणे पारंपारिक ख्रिस्ती धर्म हा ग्रीसचा अधिकृत धर्म आहे. ग्रीस संविधानाप्रमाणे सर्व नागरिकांना आपपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य आहे.

खेळ :

ग्रीस या देशांमध्ये ऑलम्पिक खेळ खेळला जातो म्हणून या देशाला ऑलिम्पिकची जन्मभूमी असेही म्हटले जाते. ऑलम्पिक खेळ हा प्राचीन काळी ग्रीस मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांप्रमाणेच भरवले जात होते. 1896 च्या पहिली ऑलिंपिक स्पर्धा व 2004 मधील ऑलिंपिक स्पर्धा ग्रीसमध्ये भरवली गेली. फुटबॉल व बास्केटबॉल हे ग्रीसमधील आवडीचे खेळ आहेत.

पर्यटन स्थळ :

ग्रीस या देशांमध्ये अनेक बेटे असल्यामुळे येथे प्राचीन अवशेष आढळून येतात त्या अवशेषांवर जुन्या संस्कृतीचे शिल्प, सुंदर निसर्ग दृश्य व सुखद हवामान असल्यामुळे येथे अनेक युरोपिय व अमेरिकन पर्यटक हा आनंद घेण्यासाठी दरवर्षी येथे येतात. तसेच येथे ऐतिहासिक व धार्मिक सण उत्सव पाहण्यासाठी सुद्धा पर्यटक येतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment