म्यानमार देशाची संपूर्ण माहिती Myanmar Information In Marathi

Myanmar Information In Marathi म्यानमार हा दक्षिण पूर्व आशियातील एक स्वतंत्र देश आहे. आग्नेय आशियातील हा सर्वात मोठा देश म्हणून ओळखला जातो. या देशाचे पूर्वीचे नाव बर्मा असे होते, नंतर कालांतराने या देशाचे नाव म्यानमार असे पडले. या देशाची राजधानी नेपिडो आहे. येथे मोठ्या प्रमाणात व्यापार उद्योग केले जातात, आणि या देशातील सर्वात मोठे शहर यांगोन आहे. म्यानमार देशाला युनायटेड किंग्डम कडून 4 जानेवारी 1948 ला स्वतंत्र मिळाले आहे आणि या देशाचे राष्ट्रगीत ‘काबा मा केई’ हे आहे, याचा अर्थ जगाच्या शेवटपर्यंत असा होतो. तर चला मग या देशाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Myanmar Information In Marathi

म्यानमार देशाची संपूर्ण माहिती Myanmar Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

म्यानमार देशाचे ऐकूण क्षेत्रफळ 6,76,578 किलोमीटर येवढे आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीकोनाने हा देश जगात 40 व्या क्रमांकावर येतो. तसेच या देशाच्या सीमेला लागून वायव्य दिशेला बांगलादेशचा चितगाव विभाग आहे, आणि भारतातील मिझोरा, मणिपूर, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश ही राज्ये आहेत.

तसेच उत्तर आणि ईशान्य दिशेला तिबेट प्रदेश आणि युनान या चीन म्यानमार सीमा आहे. आणि आग्नेय दिशेला लाओस आणि थायलंडच्या सीमा आहेत. नैऋत्य दिशेला बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्राचा किनारा लाभलेला आहे. आणि उत्तरेला हेंगडुआन पर्वत आहे.

लोकसंख्या :

म्यानमार देशाची लोकसंख्या 2009 च्या जनगणनेनुसार 50,02,000 ऐवढी आहे, आणि लोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात 24 वा क्रमांक लागतो. येथे विविध जाती व धर्माचे लोक राहतात. येथे सर्वात जास्त बौद्ध धर्माचे लोक राहतात. बाकी मुस्लिम, ख्रिचन व इतर समाज येते राहतो. यंगुन हे शहर या देशातील सर्वात जास्त लोकसंख्येच शहर आहे.

चलन :

म्यानमार देशाचे चलन म्यानमार क्यात हे आहे. भारतीय चलनाच्या तुलनेत एक म्यानमार क्यात कॉइन म्हणजे 0.043 रुपये होतात. येथील लोक व देशाचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात या चनलांचा वापर केला जातो.

हवामान :

म्यानमार देशातील हवामान हे कोरडे व थंड आहे. या देशाचा भाग कर्क विषुववृत्ताच्या मध्ये येतो. त्यामुळे या देशातील वातवणार सतत बदल होत असतो. हा देश आशियातील मान्सून प्रदेशात एक प्रदेश आहे. या देशाच्या किनारपट्टीच्या प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो. येथे दरवर्षी येथे 6,000 मि मी पेक्षा जास्त पाऊस पडतो. तर म्यानमार मधील कोरड्या भागात खूप कमी प्रमाणात पाऊस होतो.

म्यानमार मधील उत्तरेकडील सर्वात थंड प्रदेश मानला जातो. या देशात खूप कमी प्रमाणात उष्ण वातावरण राहते. येथे उन्हाळी सरासरी तापमान 21°c ते 25°c पर्यत राहते. या देशामध्ये सागरी वारे वाहत असल्यामुळे येथील हवामान सतत बदलत राहते.

पक्षी व प्राणी :

म्यानमार देशा मध्ये मोठया प्रमाणात वनक्षेत्र असल्यामुळे येथे विविध पक्षी व प्राणी आढळून येतात. या वनविभागात 314 सस्तन प्राणी, 1133 पक्षी, 295 सरपटणारे प्राणी, आणि 135 उभयचर प्रजाती पाहायला मिळतात. येते प्रामुख्याने गेंडा, रान म्हशी, बिबट्या, रानडुक्कर, हरीण, काळवीट आणि हत्ती हे प्राणी येते जास्त संख्येने दिसतात. त

सेच यांना लाकूड उद्योगात कामाचे प्राणी म्हणून वापरण्यासाठी बंदिवासात ठेवले जाते, किंवा प्रजनन केले जाते. येथील जंगल मध्ये लहान सस्तन प्राणी देखील असंख्य आहेत. येथील जंगलमध्ये विशेष वाघ म्यानमारमध्ये क्वचितच आढळून येतात.

येथे पक्षी मध्ये पोपट, मैना यासह 800 हून अधिक प्रजातींसह पक्ष्यांची विपुलता लक्षणीय आहे. मोर, लाल जंगली पक्षी, विणकर पक्षी, कावळे, बगळे, आणि धान्याचे कोठार घुबड या सारखे अनेक पक्षी येथे आहेत. तसेच सरपटणाऱ्या प्रजातींमध्ये मगरी, गेको, कोब्रा, बर्मी अजगर आणि कासव आहेत. काही स्थलांतरित पक्षी सुध्दा येथे आढळून येतात.

व्यवसाय व उद्योग :

म्यानमार येते प्रामुख्याने शेती हा व्यवसाय केला जातो. येथील मुख्य पीक ते तांदूळ उत्पादन आहे. यावर येथील लोकांचे जीवन आधारित आहे. तांदूळ पिका साठी हा देश जगात पहिल्या क्रमांकावर येतो. याच बरोबर येते पशू पालन आणि मासेमारी हे व्यवसाय केले जातात. इतर उद्योगांमध्ये कृषी वस्तू बनवणे, तसेच कापड आणि लाकूड उत्पादन, बांधकाम साहित्य, रत्ने, धातू, तेल यांचे व्यवसाय व उद्योग केले जातात.

या देशात मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती उपलब्ध आहे. म्यानमारमध्ये माणिक, नीलम, मोती आणि जेड यांसारखे मौल्यवान खडे तयार होतात. रुबी सर्वात मोठी कमाई करतात. येथे लाल दगड त्यांच्या शुद्धता आणि रंगासाठी बहुमोल आहेत. हे मौलवान वस्तू थायलंड देशात अनेक रत्ने खरेदी करतो. येथे आढळून येणारे खनिज संपत्तीचे मोठे व्यापार केले जातात, आणि विदेशात पाठवून विकले जातात.

खेळ :

म्यानमार देशामध्ये लेथवेई, बांडो, बांशाय, आणि पोंगी थाईंग मार्शल आर्ट्स आणि चिनलोन हे येथील मुख्य खेळ आहेत. त्याचबरोबर या देशात बाकी खेळ सुद्धा खेळले जातात.

फुटबॉल हा खेळ या देशात खेळला जातो, आणि या देशामध्ये त्याच्या राष्ट्रीय संघावर म्यानमार फुटबॉल फेडरेशनचे राज्य आहे. 2013 मध्ये आयोजित केलेल्या स्पर्धेत आशियान नेपिडाव, यंगून, मंडाले येथे झाले होते. ही स्पर्धा म्यानमारमध्ये आयोजित करण्यात आली होती. येथील लोक जास्त प्रमाणात खेळ खेळतात.

भाषा :

म्यानमार या देशामधील मुख्य भाषा बर्मी आहे. या देशात चार प्रमुख भाषा कुटुंबे आहेत. चीन तिबेटी, ताई कदई, ऑस्ट्रोएशियाटिक आणि इंडो युरोपियन हे आहेत. चीन तिबेटी ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाते. यामध्ये बर्मीज, कॅरन, काचिन, चिन आणि चिनी या भाषेचा समावेश आहे. आणि मोन, पलाउंग आणि वाया म्यानमारमध्ये बोलल्या जाणार्‍या ऑस्ट्रोएशियाटिक भाषा आहेत.

आणखी दोन इंडो युरोपियन भाषा येथे बोलल्या जातात. येथील थेरवाद ही भाषा बौद्ध धर्माची धार्मिक भाषा म्हणून ओडखली जाते. अजून इग्रजी भाषेचा वापर सुध्दा या देशात केला जातो. म्यानमार देशामध्ये 100 पेक्षा जास्त भाषा बोलल्या जातात. तसेच येथील देशाचे व्यवहार व व्यापारसाठी बर्मी भाषेचा वापर केला जातो.

इतिहास :

म्यानमार देशाचा इतिहास खूप प्राचीन व मध्ययुगीन इतिहास आहे. काही वर्षा पूर्वी होमो इरेक्टस हा व्यक्ती म्यानमार म्हणून ओळखल्या जाणार्‍या देशात राहत होता. नंतर या देशात म्यानमारमध्ये दगडी हत्यारांचा शोध लागला आहे. पुढे आणखी काही शोध लागत गेले.

कांस्ययुग मध्ये देशात लोक तांब्याचे कांस्य बनवत होते, तांदूळ उत्पादन वाढवत होते, आणि कुक्कुटपालन आणि डुकरांना पाळीव करत होते. असे करणारे हे जगातील पहिले मानव लोक होते. या काळातील मानवी अवशेष आणि कलाकृती सागिंग प्रदेशातील मोनीवा जिल्ह्यात शोधाद्वारे सोडण्यात आले. नंतर लोहयुगाची सुरुवात इ.स.पू.500 च्या कालखंडात आजच्या मंडालेच्या दक्षिणे कडील भागात लोहकाम करणाऱ्या वसाहती स्थापन झाली.

म्यानमार देशात 16 व्या शतकाच्या मध्यात राजकीय एकीकरण टांगूच्या प्रयत्नांद्वारे परत आले होते. आणि पूर्वीचे वासल राज्य टॅंगूचा तरुण हा राजा होता. दक्षिण आणि पूर्व आशियाचा एक विशाल भाग जिंकून घेतला, आणि दक्षिण तथापि आग्नेय आशियाच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य स्थापन केले. नंतर 1582 मध्ये बेयिनौंगच्या मृत्यूनंतर दुसरे राज्य स्थापन केले. अयुथयाने तेनासेरिम आणि लॅनना या दोघांनी ताब्यात घेतले, आणि पोर्तुगीज भाडोत्री सैनिकांनी येथे पोर्तुगीज राजवट स्थापन केली, व आपली हुकूमत चालवली.

पर्यटक स्थळ :

म्यानमार देशात श्वेडगॉन पॅगोडा हे बौद्ध धर्माचे सर्वात मोठे धार्मिक व पवित्र स्थळ आहे. येथे भिक्खू व सामाजिक लोक प्रार्थना करण्यासाठी जात असतात.

म्यानमारमध्ये मंडालेमधील यू बीन ब्रिज सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळापैकी एक आहे. हे स्थळ पाहण्यासाठी विदेशातून लोक येत असतात. तसेच या देशात एक मशिद आहे, जे इस्लामिक लोकांचे धार्मिक स्थळ आहे. हे लोक येथे नमाज करण्यासाठी जात असतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment