सुडान देशाची संपूर्ण माहिती Sudan Information In Marathi

Sudan Information In Marathi सुडान हा मध्य आफ्रिकेतील एक प्रजासत्ताक देश असून त्याची राजधानी खार्टूम ही आहे. या देशाचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने आफ्रिका खंडात तिसरा व जगातील सोळाव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. या देशातील लोक व समाज तसेच त्यांचा इतिहास येथील हवामान त्याचा लोकांवर काय परिणाम होतो? त्याची भाषा काय? याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया.

Sudan Information In Marathi

सुडान देशाची संपूर्ण माहिती Sudan Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

सुडान या देशाचे क्षेत्रफळ 2,505,813 चौरस किमी. असून या देशाचा विस्तार आपण पाहिल्यास 8° ते 22° उत्तर अक्षांश व 21°ते 39° पुर्व रेखांश या दरम्यान आहे. या देशाला लागून असलेल्या देशांच्या सीमा आपण पाहूया.

या देशाच्या उत्तरेस इजिप्त वायव्येस लिबिया तर पश्चिमेस चॅड, निवृत्ती स्वाध्य आफ्रिका हा प्रजासत्ताक देश तर दक्षिणेस साउथ सुडान व पूर्वेस इथिओपिया, इरिट्रिया असून त्याच्या ईशान्य दिशेला तांबडा समुद्र आहे.

जमीन क्षेत्र :

सुडान या देशांमध्ये नाईल नदीमुळे त्याचे पूर्व व पश्चिम असे दोन भागात विभाजन करण्यात आले आहे. सुडान हा एक विस्तीर्ण पठारी प्रदेश आहे. तसेच देशाचा इथिओपियाच्या सीमाजवळील भाग व तांबड्या समुद्रालगतचा भाग हा पर्वतमय आहे. डेरीबा कॅल्डेरिया हे सुदानमधील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची 3042 मीटर एवढी आहे.

नाईल नदीच्या घोड्याच्या पूर्व भागात नुबियन वाळवंट असून हे वाळवंट तांबड्या समुद्रकिनारी भागात आहे. देशाच्या डोंगराळ भागात जेबेल ओडा हे 2,259 मीटर उंचीचे शिखर आहे. या देशातील मुख्य तीन नद्या असून नाईल, आतबारा व रिबेर ही त्यांची नावे आहेत.

हवामान :

या देशातील हवामान हे उष्णकटिबंधीय प्रकारचे असून वर्षभर तापमान हे मे व जून महिन्यांमध्ये खूपच जास्त असते. खार्टूम लगतच्या प्रदेशात या तापमानाची सरासरी नोंदणीही जानेवारी महिन्यात 23° सेल्सिअस तर जूनच्या सुरुवातीस 34° सेल्सिअस असते. आणि उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात ते 43° पेक्षा जास्त असते. तांबड्या समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्यांचा परिणाम हा त्या भागातील हवामानावर होत असल्याने वातावरणात विविधता आढळून येते.

See also  मोरोक्को देशाची संपूर्ण माहिती Morocco Information In Marathi

देशात पावसाचे प्रमाण खूपच कमी असल्यामुळे खार्टूम लगतच्या भागात पाऊस हा पंधरा मिमी. पर्यंत असतो तर वाळवंटी भागात पाऊस पडत नाही. तांबडा समुद्र किनारी भागात 100 मिमी पाऊस पडतो. तर वाळवंटी प्रदेशात धुळीची वादळे तयार होतात ती हबूब या नावाने ओळखले जातात.

इतिहास :

सुडान या देशाचा प्राचीन इतिहासाविषयी बोलायचे झाले तर पूर्वी येथील भागाला कुश या नावाने ओळखला जात होता. कुश हे राज्य इ.स.पू 750 ते 350 पर्यंत होते. याची राजधानी प्रारंभी नॅपला होती.

ही राजधानी तीनशे मध्ये मेरोवे येथे हलवण्यात आली होती. खुश या राज्याच्या अस्तानंतर या भागात अनेक राज्ये उदयास आली त्यापैकी नोबॅटीआ, मेरोवे आणि मुकूरिया ही राज्य प्रमुख होती. इ.स.पू. 1500 ते 1200 दरम्यान या प्रदेशावर इजिप्तचे राज्य होते.

बायझंटिन साम्राज्यातून धर्मप्रसार करून पाठवलेल्या थिओडोर ने नोबॅटीआ येथे येऊन इ.स.पू. 540 मध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार केला. न्यूबियन या राजाने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. व ईजिप्तच्या आरोप कमांडरने शांततेचा करार केला.

त्यामुळे येथील लोकांमध्ये सामंजस्य निर्माण झाले. या करारानंतर येथे आंतरजातीय विवाह, व्यापाऱ्यांशी संबंध, अरबस्थानातील सुफिंचा उदारपणा यामुळे इस्लामचा प्रसार होण्यास मदत झाली. यानंतर सुडान या प्रदेशातील लोकांचा विस्तार व विकास तसेच शेतीचा ही विस्तार झाला.

1863 मध्ये इस्माईल पाशाने इजिप्तचा भाग आपल्या ताब्यात घेतला व त्याने सर सॅम्युएल बेकर या इंग्रजाच्या नेतृत्वाखाली मध्य आफ्रिकेतील विषुववृत्तीय भागात इजिप्तची सत्ता प्रस्थापित केली व अप्पर नाईलच्या भागातील गुलामांचा व्यापार कमी करण्यासाठी मोहीम तयार केली.

2005 च्या राज्यघटनेप्रमाणे राष्ट्रीय विधानमंडळ ही सुडान या देशाची संसद असून या देशांमध्ये राष्ट्राध्यक्ष हा देशाचा प्रमुख असून येथील राष्ट्रीय विधानमंडळ हे द्विसदनी आहे. यापैकी नॅशनल असेंब्लीमध्ये 450 सदस्य व कौन्सिल ऑफ स्टेट मध्ये 50 सदस्य असतात.

2010 मध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अल बशीर हे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले होते. संसदेच्या पाचशे सदस्यांना अप्रत्यक्ष मतदान आणि राज्य विधिमंडळात मार्फत सहा वर्षासाठी निवडण्यात येते. सुधा या देशात 17 राज्य असून त्यामध्ये 133 जिल्हे आहेत.

See also  तुवालू देशाची संपूर्ण माहिती Tuvalu Information In Marathi

वनस्पती व प्राणी :

सुडान या देशांमध्ये पाण्याचे प्रमाण विविध भागात कमी जास्त असल्याने येथील केवळ 20 टक्के भागातच जंगले आहेत. ही जंगले नाईल नदीच्या खोऱ्यात व तांबडा समुद्र किनारी भागातील डोंगराळ प्रदेशात असून येथे काटेरी वनस्पती आढळतात तसेच प्राण्यांमध्ये येथे उंट, हरीण, माकडे, व रान बकऱ्या आढळतात. तसेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये युरोपमधील व दक्षिण आफ्रिकेतील पक्षी नाईल नदी काठी येतात.

शेती :

सुडान या देशातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. या देशाच्या उत्पादनात 39 टक्के भाग हा शेती उत्पादनाचा असून येथे तिळ, मका, भुईमुंग, बार्ली, तांदूळ, गहू, कांदा, ऊस, खजूर, आंबा, केळी व लिंबूवर्गीय फळे इत्यादीचे उत्पादन घेतले जाते.

उद्योग धंदे :

सुडान या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशातील उद्योगांना चालना मिळाली असून येथील प्रमुख उद्योग यामध्ये कापड उद्योग, साखर उद्योग सूतगिरणी, सिमेंट, साबण तयार करणे, तयार कपडे खनिज शुद्धीकरण यांचाही येथे उद्योग-धंद्यात समावेश आहे.

वाहतूक मार्ग :

अल ओबेद, उब्ररद, खार्टूम, पोर्ट सुडान, न्याला, वाडी हैफा, आतबारा, सना, कोल्टी ही प्रमुख शहरे लोहमार्गाने एकमेकांशी जोडली गेली आहेत. लोहमार्गाची एकूण लांबी 5311 किमी असून वाडी मेदानी ते गेदरुफ हा महामार्ग 1977 मध्ये पूर्ण करण्यात आला. येथील एकूण रस्त्याची लांबी 11900 किमी आहे.

तर नाईल नदीच्या काही भागात जलवाहतूकची सोय उपलब्ध आहे. पोर्ट सूदान हे प्रमुख बंदर असून ट्रिकिटॅट, सॅवॅकिन व ऍक्विक हे मुख्य बंदरे आहेत. तसेच शासकीय सुदान एअर्वेज कंपनीमार्फत देशांमध्ये व आंतरदेशीय हवाई वाहतूक केली जाते. पोर्ट सूदान खार्टूम येथे विमानतळ आहेत.

खेळ :

खेळांमध्ये व्यायामाचे खेळ आणि फुटबॉल हे सुदानमधील प्रमुख खेळ आहेत. तसेच येथे हँडबॉल बास्केटबॉल रोजी खेळला जातो.

See also  म्यानमार देशाची संपूर्ण माहिती Myanmar Information In Marathi

लोक व समाज जीवन :

सुडान या देशातील 2008 च्या जनगणने प्रमाणे उत्तर पश्चिम व पूर्व या तीन भागांची लोकसंख्या मिळूनही 3 कोटी नोंदवली गेली होती. सुदानमध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये 70% अरब लोक असून त्याव्यतिरिक्त न्यूबियन, कॉप्टस, ख्रिश्चन व बेजा या लोकांचा त्यामध्ये समावेश होतो. देशामध्ये 2011साली 597 जमाती होत्या. सुदान या देशामध्ये 400 भाषांपेक्षा जास्त पोट भाषा व बोली बोलल्या जातात.

येथील लोकसंख्येमध्ये अरब लोकसंख्या जास्त असून ते मुस्लिम आहेत व अरब जातीत विशेषता अवदीया, नज्दी व फॅदनिया या जमातीचे लोक अरबी भाषा बोलतात. तांबड्या समुद्रात जवळच्या भागातील लोक बेजा ही भाषा बोलतात तर न्यूबियन लोकांमध्ये न्यूबियन ही भाषा प्रचलित आहे. सूदान या देशाची 2005 वर्षापूर्वीची अधिकृत भाषा ही अरबी होती मात्र आता 2005च्या घटनेप्रमाणे देशाच्या अधिकृत भाषांमध्ये अरबी व इंग्रजी या भाषा समाविष्ट झाल्या आहेत.

पर्यटन स्थळ :

सूदानमध्ये विशेष आकर्षणामुळे पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे. देशाला लागून असलेला समुद्र किनारा वाळवंटी प्रदेश, डोंगर, ऐतिहासिक स्थळ हे येथील विशेष आकर्षण आहे.

खार्टूम हे राजधानीचे शहर असून येथील राष्ट्रीय संग्रहालय खूप प्रसिद्ध आहे. तसेच यातील ऐतिहासिक पुरातन वस्तू बुहेन व सिम्ना ही मंदिरे, खार्टूम विद्यापीठ खूपच प्रसिद्ध आहे. यांची भेट घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे आपली हजेरी लावतात.

कॅरिमा येथील अमुन मंदिर, बर्कर पॅरामिड तसेच ऑम्डरमन येथील महदीचे थडगे, संग्रहालय, धार्मिक विधी विषयक कार्यक्रम तसेच शहरातील उंटाचा बाजार ही विशेष आकर्षणे आपल्याला पाहायला मिळतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment