Israel Information In Marathi इस्राईल हा पश्चिम आशियातील व मध्य संघाच्या किनाऱ्याला लागून असलेला दिशेला वसलेला एक देश आहे या देशाची राजधानी जेरुसलेम ही असून या देशाची मुख्य भाषा ही अरबी व हिब्रू ही असून येथील चलन इस्रायली नवा शकेल हे आहे. इस्रायल ह्या नावाचा उगम हिब्रू बायबलमध्ये आढळून येतो. जेकबचे एका विचित्र शक्तीबरोबर मल्लयुद्ध झाल्यावर त्याला इस्रायल हे नाव मिळाले. त्याच्या पितृछायेखाली वाढलेल्या लोकांना इस्रायलची मुले किंवा इस्रायली असे नाव पडले. सध्याच्या आधुनिक इस्रायलच्या लोकांना मराठीत इस्रायली असे संबोधले जाते. तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.
इस्राईल देशाची संपूर्ण माहिती Israel Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
इस्रायल या देशाचे एकूण क्षेत्रफळ हे 22,145 चौरस किमी. आहे. या देशाच्या उत्तरेला लेबेनॉनला लागून आहे तर पूर्व दिशेला सीरिया व जॉर्डन हे देश आहेत तसेच नैऋत्य दिशेला इजिप्त हा देश असून पश्चिम दिशेला भूमध्य व दक्षिण दिशेला इलाटचे आखात आहे.
हवामान :
या देशाला समुद्रकिनारी लाभल्या असल्यामुळे या देशाचे हवामान हे भूमध्य सागरी प्रकारचे आहे. या देशात हिवाळ्यामध्ये पाऊस पडतो तर उन्हाळी ही कोरडे असतात जानेवारी महिन्यातील कमाल तापमान 20.90°c तर किमान तापमान हे 4.40°c असते. या देशातील पर्जन्यमानाचा विचार केला असता उत्तरेकडे 107cm व दक्षिणेकडे 3cm पाऊस पडतो.
दक्षिण उत्तर भागात पावसाचे प्रमाण असामान्य तर उंच सखल प्रदेशात व वाळवंटी प्रदेशाच्या सानिध्यात शेतीसाठी पाहिजे तशी जमीन उपयुक्त नाही त्यामध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आहे.
लोकसंख्या व भाषा :
या देशातील लोकसंख्येचा विचार केलास का 2010 च्या जनगणनेनुसार 76,02,400 एवढी असून येथे 76.2% हे ज्यू धर्माचे लोक असून 16.1% मुस्लिम आहेत. 2.1% ख्रिश्चन आणि इतर उर्वरित 3.9% लोक आहे. या देशाची सरकारी कामकाजात वापरली जाणारी व प्रमुख भाषा ही अरबी व हिब्रू आहेत. तसेच या देशात हिब्रु साहित्य आहे परंपरा बरीच जुनी आहे.
इतिहास :
इसराइल या देशाचा इतिहास ही प्राचीन इतिहास आहे. ज्यू परंपरेनुसार इस्रायलची भूमी ही 3,000 वर्षांपासून ज्यू लोकांसाठी पवित्र भूमी व वचन भूमी आहे. इस्रायलची भूमी ज्यू लोकांसाठी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्चाची आहे.
कारण तिथे ज्यू लोकांची अनेक पवित्र धर्मस्थळे आहेत. त्यांमध्ये ज्यूंचा राजा सोलोमनच्या पहिल्या व दुसऱ्या मंदिराचे अवशेष येथे आढळतात. ह्या दोन मंदिरांशी संलग्न असलेल्या ज्यूंच्या अनेक महत्त्वाच्या चालीरिती आहेत. त्या आधुनिक ज्यू धर्माचा पाया समजल्या जातात.
इ.स.पू. 11 व्या शतकापासून ज्यू राज्यांच्या समूहाने इस्रायलच्या जमीनीवर राज्य केले. ते राज्य साधारण एका सहस्त्रकाहून अधिक काळ टिकून राहिले. नंतर असीरियन, बॅबिलोनियन, पर्शियन, ग्रीक, रोमन, बॅझंटाईन आणि काही काळापुरते सॅसेनियन राज्यांच्या प्रभावामुळे व समूहांनी विस्थापित झाल्यामुळे त्या विभागातील ज्यूंचा प्रभाव कमीकमी होत गेला. विशेषकरून इ.स. 132 साली रोमन साम्राज्या विरुद्ध केलेल्या बार खोबाच्या बंडाला आलेल्या अपयशामुळे मोठ्या प्रमाणावर ज्यूंची हाकालपट्टी झाली.
ह्याच काळात रोमन लोकांनी ह्या भूभागाला सीरिया पॅलेस्टिना असे नाव देऊन ह्या भूमीशी ज्यूंचे असलेले नाते तोडून टाकण्याचा प्रयत्न केला. मिस्नाह आणि जेरुसलेम तालमूद हे दोन ज्युडाइझमचे सर्वांत महत्त्वाचे धर्मग्रंथ ह्याच काळात ह्या भूमीवर लिहिले गेले.
त्यानंतर मुसलमानांनी हा प्रांत बॅझंटाईन साम्राज्याकडून 638 साली जिंकून घेतला. त्यानंतर 1517 पर्यंत ह्या भागावर विविध मुसलमान राज्यांचे अधिपत्य होते. 1517 साली हा प्रांत ओटोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली गेला.
वनस्पती व प्राणी :
या देशांमध्ये नैसर्गिक वनस्पती बऱ्याच पैकी नष्ट झालेले असून शासनाने काही ठिकाणी उपक्रम हाती घेऊन वृक्षारोपण केले आहे. त्यामध्ये पाईन, ओक, निलगिरी या वृक्षांची लागवड केलेली दिसते. सेच कारोबा, खजूर, बाभूळ या वनस्पती औषधी व इतर वनस्पती देखील आढळतात.
फुल झाडांमध्ये क्रोकस, ट्यूलिप, हायसिन्थ ही तर मोसंबी, संत्री, केळी, अननस व पेरू ह्या अशा फळांच्या बागा लावलेल्या आहेत. या देशात जंगलाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथे प्राणी देखील कमीच प्रकारात आढळून येतात प्राण्यांमध्ये रानडुक्कर, तरस, कोल्हा, हरिण, रानमांजर, मुंगूस इ. प्राणी येथे असून अनेक जातींचे पक्षी येथे आढळतात.
शेती व उद्योग :
इस्रायलमधील पूर्णतः शेतीयुक्त नसल्यामुळे जिथे सुपीक जमिनी आहे त्या भागामध्ये शेती केल्या जाते. या शेतीमध्ये ज्वारी, गहू, डाळी बार्ली, सूर्यफूल, तीळ, तंबाखू, टरबुजे, हिरवा चारा, कापूस, बीट, मोसंबी, संत्रे, ऑलिव्ह, केळी, द्राक्षे, सफरचंद इ. पिके घेतली जातात. या देशातली संत्र मोसंबी ही फळे जगप्रसिद्ध असून त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते.
या देशात शेती व्यतिरिक्त इतर उद्योगधंदे सुद्धा केली जातात त्यामध्ये सौंदर्य प्रसाधने, लोखंडी वस्तू, औषधे, कातडी वस्तू, कागद, काच सामान, टायर प्लॅस्टिक, तंबाखू , हलकी यंत्रे, विद्युत् उपकरणे, प्रशीतकांची जुळणी या उद्योगांचा समावेश असून हे झपाट्याने वाढत आहेत. त्याव्यतिरिक्त फळांवर क्रिया करणारे कारखाने, रसायने कापड गिरण्या यांची ही वाढ झपाट्याने होत आहे. याव्यतिरिक्त देशांमध्ये मच्छीमारी हा व्यवसायही केला जातो.
खनिज संपत्ती :
या देशांमध्ये खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणावर आढळते त्यामध्ये मृत समुद्रातील क्षार-पोटॅश, ब्रोमीन
फॉस्फेट व मीठ यांचा समावेश होतो. तसेच या देशातील इलॉथ या शहराजवळ तिम्ना येथे तांब्याचे साठे आढळतात. तसेच मृत समुद्राजवळ रोश जोहार येथे नैसर्गिक वायूचे साठे सापडतात.
समाज जीवन :
इसराइल या देशातील समाज जीवनाविषयी विचार केला असता सध्याच्या काळात इतर लोकसंख्येपैकी 44% ज्यू या धर्माचे लोक इस्रायल मध्ये जन्मलेले असून बाकीचे प्रामुख्याने आफ्रिकेतून व आशियातून आलेले आहेत. मूळ इसराइल लोक असले तरीही येथे इतर देशातून लोक स्थलांतरण करून आल्यामुळे येथे संस्कृती संस्काराची भिन्नता आपल्याला पाहायला मिळते.
खेळ :
इसराइल या देशांमध्ये लोकप्रिय खेळांमध्ये हॉलीबॉल, फुटबॉल, बास्केटबॉल व जलतरण हे प्रिय आहेत. तसेच या खेळांसाठी क्रीडांगणे व तलावाच्या सोयी देखील देशांमध्ये उपलब्ध आहेत या देशातील खेळाडूंचा सर्वांगीण विकास होण्यासाठी 1961 मध्ये क्रीडा शरीर संवर्धन मंडळी स्थापन करून त्यांच्याशी देशातील सहा विख्यात क्रीडा संस्था संलग्न झालेले आहेत.
पर्यटन स्थळ :
इसराइल या देशाला समुद्रकिनारा सौंदर्य सृष्टी लाभलेली आहे तसेच येथे इतर देशातून स्थायिक झालेले लोक असल्यामुळे येथील लोकांमध्ये भिन्नता पाहायला मिळते. ऐतिहासिक वास्तू, जुनी मंदिर, तसेच ज्यू धर्माविषयी असलेली आस्था हे पर्यटन स्थळ आहेत. तर चला मग जाणून घेऊया या देशांमधील पर्यटन स्थळ.
शाल्मोंचे मंदिर :
इस्रायलचा सम्राट सालोमन यांनी दहाव्या शतकात या मंदिराची स्थापना केली. येहुदयानने बायबलच्या पवित्र पुस्तकात सॅल्मन मंदिराचा उल्लेख केला असून नंतर रोमन लोकांशी झेलल्या लढाईत, हे मंदिर पूर्ण उद्ध्वस्त झाले. टेंपल माउंट, अल-अक्सा मशिद आता येथे पवित्र स्थान अहे.
जेरुसलम :
जेरुसलम ही इस्राइल या देशाची राजधानी असून या शहरात ख्रिश्चन धर्माचे स्थान आणि तसेच ज्यू आणि मुस्लिम एकत्र राहतात. त्यांच्यासाठी हे शहर पवित्र आहे. हे एक पवित्र स्थळ मानले जाते एवढेच नाही तर येथे प्रसिद्ध होलोकॉस्ट म्युझियम देखील आहे.
इस्रायल म्युझियम :
इस्राइलमधील हे एक प्राचीन वास्तू कला व संस्कृतीसाठी प्रसिद्ध असे म्युझियम आहे. द सेकंड टेम्पल मॉडेल आणि बिल्ली रोज गार्डन देखील आहे.
येथे राजा सॅलोमल याला याच ठिकाणी पुरविण्यात आल्याचे सांगितले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटतली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.