Arunachal Pradesh Information In Marathi भारतातील प्रथम सूर्योदयाचे स्थान म्हणून अरुणाचल प्रदेश ओळखला जातो. प्रथम सूर्योदय झाल्यामुळेच या राज्याला ‘अरुणाचल प्रदेश’ असे नाव देण्यात आले. अरुणाचल प्रदेश एक मागासलेले राज्य आहे. तेथील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती व जंगलातील छोटे-मोठे उद्योग यांवर चालतो. येथील बोलीभाषा व लोकांचे राहणीमान वेगळे आहे.
अरुणाचल प्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Arunachal Pradesh Information In
Marathi
हिमालयाच्या उत्थापनाच्या वेळेसच येथील पर्वतश्रेणीस एकदम दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे वळण मिळाले. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तौलनिक दृष्ट्या थोड्याशा भागात निसर्गाची विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. तर चला मग पाहूया अरुणाचल प्रदेश या राज्याविषयांची माहिती.
अरुणाचल प्रदेशचा इतिहास :
अरुणाचल प्रदेशाचा इतिहास फारसा ज्ञात नाही. अतिशय डोंगराळ व घनदाट अरण्ये असलेला मुलूख, दुर्गम रस्ते, अवखळ द्रुतवाह, अत्यंत मागासलेले रानटी लोक इत्यादींमुळे या भागावर सुरळीत शासकीय अंमल कधीच चालू शकला नाही.
जमातप्रमुखच जमातीचा कारभार पाहत असत. आसामबरोबर या जमाती ब्रिटिशांकडे आल्या. या लढाऊ जमातींकडून उपद्रव पोहचू नये म्हणून ब्रिटिशांनी येथे काही ठाणी उभारली. महसूल गोळा करण्यापलीकडे या भागात ब्रिटिश शासनालाही फारसे स्वारस्य नव्हते.
राजव्यवस्था :
20 व्या शतकाच्या सुरुवातीस उत्तरेकडील प्रदेशावर चीनने हक्क सांगितल्यामुळे ब्रिटिश सरकारने या भागाचा वेगळा शासकीय उपविभाग बनविला. हिमालयाच्या शिखररेषेनुसार उत्तरेची हद्द 1912-13 साली सर हेन्री मॅक्मोहन यांनी योजिली.
तथापि चीनने या मॅक्मोहन-रेषेस अधिकृत मान्यता दिली नसल्याने अरुणाचलचा उत्तर भाग नेहमी वादग्रस्त राहिला. 1959 साली व 1962 साली चीनने या भागावर आक्रमण केले. 1963 साली चीनकडून हा भाग परत मिळाला असला, तरी भारत-चीन तणावामध्ये या प्रदेशाला मोठा धोका असल्याने अरुणाचलवर भारत सरकारला विशेष लक्ष द्यावे लागत आहे.
अरुणाचल प्रदेशाचा विस्तार व लोकसंख्या :
अरुणाचल प्रदेशाचा विस्तार भारताच्या ईशान्य कोपऱ्यामधील केंद्रशासित प्रदेश 20 जानेवारी 1972 पूर्वी ‘नॉर्थ-ईस्ट फ्राँटियर एजन्सी’ अथवा ‘नेफा’ या नावाने प्रसिद्ध 26°28’उ. ते 29°30′ उ. आणि 91°30′ पू. ते 97°30′ पू. क्षेत्रफळ 83,578 चौ. किमी.
लोकसंख्या 4,67,511. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील पंचविसावे आणि भारताच्या 0.08% लोकसंख्या असलेले हे राज्य लष्करी दृष्ट्या अतिशय महत्त्वाचे आहे कारण याच्या उत्तरेस तिबेट, पूर्वेस चीन व ब्रह्मदेश, दक्षिणेस आसाम व पश्चिमेस भूतान आहे. राज्याची राजधानी शिलाँग येथे आहे.
अरुणाचल प्रदेशाचा भूगोल :
भारतातील सर्वात प्रथम सूर्योदयाचे स्थान अरुणाचल प्रदेश असल्यामुळे या प्रदेशास ‘अरुणाचल’ हे नाव मिळाले आहे. आसाम हिमालयाच्या शाखोपशाखांनी हे राज्य व्यापलेले आहे.
हिमालयाच्या उत्थापनाच्या वेळेसच येथील पर्वतश्रेणीस एकदम दक्षिणेकडे व नैर्ऋत्येकडे वळण मिळाले. त्यामुळे अरुणाचल प्रदेशातील तौलनिक दृष्ट्या थोड्याशा भागात निसर्गाची विविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. राज्याचा 60% भूभाग जंगलव्याप्त आहे.
अका, डफला, मीरी, अबोर, मिशमी, पातकई इ. टेकड्यांचा समावेश अरुणाचलमध्ये होतो. बहुतेक टेकड्या ईशान्य-नैर्ऋत्य पसरलेल्या असून त्यांची उंची 800 ते 4000 मी. पर्यंत आहे. उत्तरेकडे 3000-5200 मी. उंचीपर्यंतची अनेक हिमाच्छादित शिखरे आढळतात.
प्रमुख नद्या :
कामेंग, सुबनसिरी, सियांग अथवा दिहांग, दिबांग अथवा सिकांग, लोहित आणि बुरीदिहींग या ब्रह्मपुत्रेला मिळणाऱ्या या राज्यातील प्रमुख नद्या. या नद्या तसेच लहानसहान नद्यानाले यांकाठची जमीन तेवढी सुपीक आहे. नद्यानाल्यांनी हिमालयामध्ये कित्येक घळी व खिंडी बनविल्या आहेत.
अशाच एका घळीतून तिवेटमध्ये पश्चिम-पूर्व वाहणारी त्सांगपो (ब्रह्मपुत्रा) दक्षिणवाहिनी बनते तिला अरुणाचलमध्ये ‘दिहांग’ म्हणतात, तर लोहित नदीच्या संगमानंतर आसाममध्ये तिला ब्रह्मपुत्रा नाव मिळाले आहे.
मुख्य व्यवसाय :
अरुणाचल प्रदेश हे अत्यंत मागासलेल्या राज्यांपैकी एक आहे. येथे 97 टक्के लोक ग्रामीण भागात राहतात. येथील लोकांचे मुख्य व्यवसाय हा शेती आणि जंगलावर आधारित उद्योगधंदे व शिकार, मच्छीमारी, विणकाम इ. उद्योगधंदे हा आहे. शेती अत्यंत मागासलेल्या पद्धतीने केली जाते. अद्याप बैल व नांगर हेही या राज्यातील बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. पायऱ्या-पायऱ्यांची शेती आणि झूमिंग अथवा फिरती शेती ही येथील वेशिष्ट्ये आहे.
शेतीवर बायका पुरुषांच्या बरोबरीने वाटा उचलतात. अरुणाचलमधील स्त्री-कामगारांपैकी 97.6% स्त्री-कामगार शेतीवर काम करीत असल्याची नोंद आहे. या प्रदेशात एकूण एक लाख हेक्टर जमीन लागवडीखाली असून भात, मका, नाचणी, रताळी ही येथील प्रमुख पिके होत.
एकूण कामगारांपैकी 83.92% शेती, 2.22% शेतमजूरी व 13.86% इतर उद्योगांत आहेत. येथे निकेल, कोबाल्ट, तांबे व गंधक यांचे साठे मोठ्या प्रमाणावर असले, तरी आर्थिक दृष्ट्या ते अद्याप किफायतशीर नाहीत.
येथील जंगलसंपत्ती मोठी असून 1971 साली त्यापासून सरकारला 1.4 कोटी रुपयांच्या वर उत्पन्न मिळाले होते. प्रशिक्षण देणे व उत्पादननिर्मिती यांसाठी शासनाने 21 केंद्रे काढली असून तेथे कताई, विणाई, कटाई, शिवणकाम, सतरंजी बनविणे, वेतकाम, सुतारकाम, बांबूकाम, रेशीमकाम, भांडी तयार करणे इ. लघुउद्योग चालतात.
येथे भात सडण्याची गिरणी, तेलाची गिरणी, प्लायवूडचा कारखाना व लाकूड कापण्याच्या गिरण्या यांची या प्रदेशात भर पडली आहे. 43 समूह- विकास-प्रकल्प आणि 97 सहकारी संस्था यांच्या साहाय्याने शासनाने येथील लोकांना उन्नत करण्याच्या योजना आखलेल्या आहेत.
परंपरागत चालत आलेल्या विणकाम व कलापूर्ण वस्तुनिर्मिती या उद्योगांस या सहकारी संस्थांमार्फत मोठी चालना देऊन, आंतरराज्यीय व्यापारपेठेत त्यांचा शिरकाव करण्याच्या योजना आहेत. उठावदार आकृतिबंधांच्या व ओजस्वी रंगांतील वस्तू, नक्षीदार लाकडी वस्तू, टंकचित्रे, चांदीचे दागिने, कातडी वस्तू यांबाबत अरुणाचल प्रदेशातील कारागीर प्रसिद्ध आहेत.
बोलीभाषा व जाती :
1961 च्या जनगणनेनुसार अरुणाचलमध्ये 82 विविध अनुसूचित जमाती होत्या आणि 1971 च्या लोकसंख्येपैकी 79.01% लोक आदिवासी होते. मंगोलॉइडवंशीय, मध्यम बांध्याचे, अधिकतर मध्यमकपालाचे हे आदिवासी लोक प्रामुख्याने हिंदू असून जडप्राणवादी आहेत. त्यांच्यात बौद्ध, ख्रिश्चन व इस्लामधर्मीयही थोड्याफार प्रमाणात आढळतात.
मोनपा, शेर्डूकपेन, बांगनी, अका, खोवा, मिजी, सुलूंग, बांगरो या कामेंग जिल्ह्यातील तागिन, डफला, निशांग, अपातानी, बांगरो, मीकीर, सुलुंग या सुबनसिरी जिल्ह्यातील आदी, खांबा, मेंबा, इदुमिशमी या सियांग जिल्ह्यातील पदम, मिशमी, इदु, मिजी, सिंगफो, खाम्पटी या लोहित जिल्ह्यातील आणि नॉक्टे, सिंगफो, तांगसा, योबीन, वांचो या तिराप जिल्हातील काही प्रमुख जमाती होत. येथे आंतरजातीय विवाह होत नाही व बहुपत्नीत्वाची चाल आहे.
समाजजीवन :
जमात-प्रमुख व जमातीच्या पंचायती यांच्यामार्फत यांचे सामाजिक प्रश्न सोडविले जातात. या लोकांची घरे बांबूची असतात. राहणी साधी असते व पूर्वापार चालत आलेले आचार हे लोक सोडण्यास तयार नसतात. बायकांना गोंदवून घेण्याची व दागिन्यांची हौस असते. वधूशुल्काची चाल येथे आढळते.
जादूटोण्याचा प्रभाव जमातींमध्ये फार मोठ्या प्रमाणावर आहे. संगीत व नृत्य यांची आवड सर्वत्र आढळते या लोकांची नृत्ये, विशेषतः जोमदार समरनृत्ये आणि समूहनृत्ये प्रसिद्ध आहेत. बहुतेक वस्ती नद्यांकाठी असून डोगराळ भागात विरळ लोकवस्ती आहे. राज्यात विविध 50 भाषा व बोलीभाषा बोलल्या जातात.
पर्यटन स्थळ :
अरुणाचल प्रदेश हे भारतातील सर्वात सुंदर राज्यांपैकी एक आहे. ईशान्येला वसलेले हे राज्य तीन बाजूंनी भूतान, चीन आणि म्यानमारने वेढलेले आहे. येथील सुंदर पर्वत आणि वळणदार मार्ग पर्यटकांना मोहित करतात. नयनरम्य पर्वत, बर्फाच्छादित धुके, प्रसिद्ध बौद्ध मठ, खिंड आणि निर्मळ तलाव मिळून अरुणाचल प्रदेशला एक सुंदर हिल स्टेशन बनवते.
हिवाळ्याच्या मोसमात, शांत पर्वत आणि चित्तथरारक दृश्ये पर्यटकांची भेट संस्मरणीय बनवतात. तुम्हाला ही आपली उन्हाळ्याची सुट्टी घालवायची असेल तर अरुणाचल प्रदेश हे पर्यटन स्थळ तुम्हाला नक्की आवडेल.
अरुणाचल प्रदेश विषयी माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.
Good information ,I am going to visit such lovely place.please add important places with photo graphs to visit.
Thanks.