आसाम राज्याची संपूर्ण माहिती Assam Information In Marathi

Assam Information In Marathi आसाम हा विरळ वस्तीचा पण सुसंघटित समाजव्यवस्था असलेला अविकसित पावसाळी प्रदेश आहे. चहा, ताग, तांदूळ, पेट्रोल, कोळसा इ. साठी भारतात तो महत्त्वाचा असला तरी प्रामुख्याने सरहद्दीवरील राज्य म्हणून त्याला अधिक महत्त्व आहे. बांगला देशची सरहद्द आसामला लागून आहे, तर चीन व ब्रह्मदेश यांची हद्द फारशी दूर नाही. तर चला मग पाहुया आसाम राज्याविषयी माहिती.

Assam Information In Marathi

आसाम राज्याची संपूर्ण माहिती Assam Information In Marathi

आसाम राज्याचा विस्तार व लोकसंख्या :

आसामच क्षेत्रफळ 78,523 चौ. किमी. आसाम ईशान्य भारतातील एक व सर्वात मोठे राज्य आहे.  आसामच्या उत्तरेला भूतान व
अरुणाचल प्रदेश आहे.  पूर्वेला नागालँड व मणिपूर ही राज्ये आहेत.

तर दक्षिणेला मेघालय, त्रिपुरा  व  मिझोरम ही राज्ये आहेत. ईशान्यातील सात राज्य आसाममुर्ती भारत राज्य आहे.  आसामची  लोकसंख्या 3,11,69,272 (2011 च्या जनगणनेनुसार) एवढी आहे.  आसामची  साक्षरता  73.18 टक्के एवढी आहे.  तांदूळ व मोहरी ही येथील प्रमुख पिके आहेत.

आसामचे तीन नैसर्गिक विभाग पडतात. ब्रह्मपुत्रा खोरे, सुरमा खोरे व या दोन्हीमधल्या डोंगररांगा. ब्रह्मपुत्रा नदीचे 80 ते 160 किमी. रुंदीचे आणि 800 किमी.  लांबीचे पूर्व-पश्चिम खोरे हा आसामचा मुख्य प्रदेश. त्याच्या उत्तरेस हिमालयाच्या पायथ्याकडील टेकड्या असून दक्षिणेला मेघालयाच्या गारो, खासी, जैंतिया तसेच पूर्वेला नागालँडच्या पातकई टेकड्यांचे समूह आहेत.

आसाममधील जिल्हे :

आसाममधील एकूण जिल्ह्यांची संख्या 27 आहे. आसाममधील जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत. उत्तर कचर, करीमगंज, कामरूप, कोक्राझार, गोलाघाट, चिखल, गोवळपारा, जोरहाट, दिब्रुगड, तिनसुकिया, दरंग, धुबरी, धेमाजी, नलबारी, नागाव.

आसाममधील प्रमुख नद्या :

उत्तरेकडून दिबांग, सुबनसिरी, भरेळी, धनसिरी, बोरनदी, मनास, पामती, सरलभंगा व संकोश, पूर्वेकडून लोहित आणि दक्षिणेकडून नोआ,  बुरी, दिहिंग, दिसांग, दिखो, झांझी व दक्षिण धनसिरी या मुख्य नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात.  दक्षिण धनिसिरीच्या संगमानंतर काही अंतरावर ब्रह्मपुत्रेचा एक फाटा कलांग या नावाने नौगाँग जिल्ह्यातून वाहून गौहातीच्या वर 16 किमी. पुन्हा मुख्य नदीला मिळतो.

त्याआधी कलांगला कपिली व दिग्‍नू नद्या मिळालेल्या असतात. गौहातीखालीही कलसी व जिंजीराम सारख्या काही नद्या ब्रह्मपुत्रेला मिळतात. सुरमेला मिळणाऱ्या मुख्य नद्या उत्तरेकडून जिरी व जनिंगा आणि दक्षिणेकडून सोनाई व ढालेश्वरी या आहेत.  उत्तर सुबनसिरी-ब्रह्मपुत्रा संगमाजवळ सिबसागरसमोर माजुली हे 1, 261 चौ. किमी.  क्षेत्रफळाचे बेट सर्वांत मोठे असून त्याखेरीज अनेक लहानमोठी बेटे नदीच्या पात्रात आहेत.

See also  थायलंड देशाची संपूर्ण माहिती Thailand Information In Marathi

आसामची शेती व पिके :

आसाममध्ये सर्व उत्पादक क्षेत्रांमध्ये, कृषी क्षेत्र त्याच्या देशांतर्गत क्षेत्रांमध्ये सर्वाधिक योगदान देते, जे आसामच्या उत्पन्नाच्या एक तृतीयांशपेक्षा जास्त आहे आणि 69% लोक ही शेतीवरअवलंबून आहेत. आसामचे जगातील सर्वात मोठे योगदान आसाम चहा आहे. आसाम मधील बहुतेक लोक चहाच्या शेतीतून उत्पन्न मिळवतात. चहाच्या बागेत पाने तोडणारे बहुतेक मजूर आसाम मधील आहेत.

समाजजीवन :

आसामच्या लोकात अनेक वंशीयांचे मिश्रण आहे. मिकीर, नागा, पाची,  लखेर, कुकी, हमार व चकमा या डोंगरी जमाती आणि बर्मान, बोरोकाचारी, लालुंग, राधा, मिरी, देवरी, व मेच या मैदानी जमाती आहेत.  काचारी व हनाँग या जमाती डोंगरी व मैदानीही आहेत.

चहाच्या मळ्यांतून काम करणारे मजूर बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश येथून आलेले आहेत.  बांगला देशातून आलेले मुस्लिम शेतकरी काचार व गोआलपाडा जिल्ह्यांत वसले आहेत.  इतर निर्वासित नौगाँग, कामरुप व गोआलपाडा जिल्ह्यांतून पसरले आहेत.

मैदानातील ग्रामीण प्रजा कुडाच्या भिंती आणि गवताची छपरे असलेल्या घरातून राहते. नागरी वस्तीतही पक्की घरे कमी. लोकांचा पोषाख, सामान्यतः पुरुषांचा धोतर व पांघरण्याची शाल आणि स्त्रियांचा साडी व शाल असा असतो.

कृषीखालोखाल हातमाग हा पूरक उद्योग मैदानी व डोंगरी प्रदेशातही महत्त्वाचा आहे. हे काम बहुधा स्त्रिया करतात. रेशमाची पैदास, कताई व सुती-रेशमी कापड विणकाम मुख्यत: कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी होते तथापि उत्पादन वाढविण्यासाठी शासनाने सहकारी संस्थांमार्फत व यंत्रशक्ती उपलब्ध करून देऊन उत्तेजन दिले आहे.

कुटीरोद्योगात बांबू, वेत व गवताच्या टोपल्या, इतर कलापूर्ण वस्तू, विशेषत: झापी या शेतकामाच्या वेळी वापरण्याच्या मोठ्या गोल गवती टोप्या या वस्तू विशेष उल्लेखनीय आहेत. आसामी लोकांचा सर्वसाधारण आहार, भात, डाळी, भाज्या व मासे आणि मधूनमधून मांस असा असतो.

See also  राजस्थान राज्याची संपूर्ण माहिती Rajasthan Information In Marathi

आसाम राज्यातील बोलीभाषा :

असमीया ही आसामची प्रमुख भाषा आहे. आसामी आणि बोडो या आसामच्या अधिकृत भाषा आहेत, तर बंगाली बराक खोऱ्यातील तीन जिल्ह्यांमध्ये अधिकृत आहे. जेथे सिल्हेती ही भाषा सर्वात जास्त बोलली जाते. बोडो ही तिसरी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा असून त्यानंतर हिंदी चौथ्या क्रमांकावर आहे.

आसाममधील कला व क्रीडा :

आसामात ‘अंकिया नाट’ हा प्राचीन लोकनाट्यप्रकार आजही रूढ असून त्यास ‘भावना’ म्हणतात.  ‘ओजापाली’ ह्या दुसऱ्या लोकनाट्य प्रकारात एक माणूस गात असतो व त्या अनुषंगाने इतर पात्रे मूकाभिनय करतात.

दुर्गापूजा आणि होळी ह्या सणांव्यतिरिक्त आसाममध्ये नूतनवर्ष, शेतीचा हंगाम, गौहातीच्या कामाख्या मंदिरातील अंबुबाशी मेळा इ. प्रसंग नृत्यसंगीताने साजरे केले जातात. प्राचीन आसामी संगीताच्या कंठसंगीत आणि वाद्यसंगीत अशा दोन्ही प्रकारांचे उल्लेख  कालिकापुराणात सापडतात.

आसाममधील भक्तिमार्गी चळवळीमुळे आसामी संगीतामध्ये नवचैतन्य निर्माण झाले.  ‘बरगीत’ हा वीरश्रीयुक्त आणि उमद्या गीतांचा प्रकार, तसेच ‘अंकियागीत’ ह्या नावाने ओळखली जाणारी नाट्यगीते आसामी संगीताला उपकारक ठरली. आसामी मुलांमध्ये विशेष प्रचलित असलेला काठ्यांचा खेळ म्हणजे ‘भंटा’ हा होय.  आसामात खूप पाऊस पडत असल्यामुळे आसामी मुले घरातील बैठे खेळ खेळणेच अधिक पसंत करतात.

दळणवळणाची साधने :

आसाम मधील पांडू येथे रेल्वेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. सभोवार अनेक शिक्षणसंस्था व उद्योगधंदे असून ते नदी, रस्ते, रेल्वे व विमानमार्गाचे मुख्य केंद्र आहे. दिब्रुगड ही प्रामुख्याने चहानगरी समजली जाते. येथून थेट कलकत्त्यापर्यंत 1,280 किमी. नदीमार्गे वाहतूक होते.

आसामचा इतिहास :

आसाम राज्याचा इतिहास हा खूप प्राचीन असा समजला जातो. प्राचीन आसाम नावाची व्युत्पत्ती आसाममध्ये राज्य करणाऱ्या अहोम राजघराण्या मधून झाली. आसामला बंगाल प्रेसिडेन्सीचा एक भाग बनवण्यात आला, नंतर 1906 मध्ये तो पूर्व बंगाल आणि आसाम प्रांताचा एक भाग बनवण्यात आला आणि 1912 मध्ये त्याची पुनर्रचना मुख्य आयुक्तांच्या प्रांतात करण्यात आली. 1913 मध्ये, एक विधान परिषद आणि, 1937 मध्ये, आसाम विधानसभा, शिलाँग येथे स्थापन करण्यात आली.

See also  आंध्रप्रदेश राज्याची संपूर्ण माहिती Andhra Pradesh Information In Marathi

1874 मध्ये ‘उत्तर-पूर्व सीमावर्ती’ नॉन-रेग्युलेशन प्रांत म्हणून आसामचा प्रदेश बंगालपासून प्रथम वेगळा करण्यात आला. ज्याला आसाम चीफ-कमिशनरशिप म्हणूनही ओळखले जाते. बंगालच्या फाळणीनंतर 1905 मध्ये पूर्व बंगाल आणि आसाम या नवीन प्रांतात त्याचा समावेश करण्यात आला आणि 1912 मध्ये आसाम प्रांत म्हणून त्याची पुनर्स्थापना झाली.

पर्यटन स्थळे :

आसाम हे भारतातील नैसर्गिक सौंदर्य आणि वैविध्यपूर्ण इतिहास पर्यटकांना वेगळाच आनंद देणारे असे एक राज्य आहे.

उमानंद द्विप हे देखील आसामची शान आहे. हे सर्वात लहान नदीचे बेट आहे. उमानंद द्विप हे ब्रह्मपुत्रा नदीच्या मध्यभागी वसलेले आहे. कामदेव भगवान शंकराची तपस्या करताना भस्मसात झाले होते अशी मान्याता आहे.

नामेरी नॅशनल पार्क हे आसाम राज्यातील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. जे हत्ती आणि इतर प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

शिवसागर हे आसाममधील अनेक भव्य मंदिरांसह एक सांस्कृतिक शहर आहे. शिवसागर आपल्या अनेक स्थापत्य चमत्कारांसह, इतिहास आणि संस्कृतीशी संबंधित विविध पर्यटन आकर्षणे लोकांना आकर्षित करते.

डिब्रूगढ़ हे आसाममधील सर्वात मोठे शहर आहे, गुवाहाटीपासून 439 किमी अंतरावर आहे. या ठिकाणचे सौंदर्य वेगळे आहे. हे शहर भारताचे चाहाचे शहर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला अनेक सुंदर चहाच्या बागा पाहायला मिळतात.

आसामधील जोरहाट इतिहास, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याने भरभरुन आहे. हे आशियातील पहिले आणि जगातील तिसरे सर्वात जुने शहर आहे.

आसाम राज्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Election In Marathi

Essay On Yoga In Marathi

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Leave a Comment