Gujarat Information In Marathi गुजरात हे असे राज्य आहे की, ज्यांचा जीवंत वारसा भारताच्या इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. त्याच्या प्रेरणादायी संस्कृतीपासून ते समृद्ध इतिहासापर्यंत तो केवळ स्थानिकच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही पर्यटकांना आकर्षित करते. गुजरातमध्ये बरीच ऐतिहासिक स्थळे असून ती जगभरातील पर्यटकांव्यतिरिक्त यात्रेकरू आणि इतिहासकारांच्या भेटीस येते.

गुजरात राज्याची संपूर्ण माहिती Gujarat Information In Marathi
जगातील सर्वात मोठा पुतळा गुजरात मध्ये स्थित आहे. ज्याला ‘Statue of unity’ म्हणतात. हा पुतळा भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. त्यांच्या प्रतिमेची उंची 182 मीटर आहे. तर चला मग पाहूया गुजरात राज्य विषयी माहिती.
विस्तार व क्षेत्रफळ :
गुजरात या राज्याचे क्षेत्रफळ 1,95,984 चौ.किमी. गुजरात पश्चिम भारतामध्ये स्थित अधिक समृद्ध राज्य आहे. हे राजस्थान आणि महाराष्ट्राच्या मध्ये स्थित आहे. याच्या एका बाजूला अरबी समुद्र आणि एका बाजूला कच्छचे आखात आहे. गुजरातच्या भूमीला महापुरुषांची भूमी असे म्हणतात. हे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचे सर्वांत उत्तरेकडील राज्य आहे.
लोकसंख्या :
भारताच्या 6.61% क्षेत्रफळ आणि 4.8 % लोकसंख्या असलेल्या गुजरात राज्याची राजधानी गांधीनगर ही आहे. गुजरातची मुख्य भाषा गुजराती आहे. त्या व्यतिरिक्त तिथे इंग्रजी, हिंदी आणि मराठी भाषा बोलली जाते.
गुजरात मधील जिल्हे :
गुजरातमधील जिल्ह्यांची नावे पुढील प्रमाणे: अहमदाबाद, अमरेली, आणंद, कच्छ, खेडा, गांधीनगर, जामनगर, जुनागढ, दाहोद, नर्मदा, नवसारी, डांग, पाटण, पोरबंदर, पंचमहाल, बडोदा, बलसाड, बनासकांठा, भरूच, भावनगर, महेसाणा, राजकोट, साबरकांठा, सुरत, सुरेन्द्रनगर, छोटा उदेपुर, महीसागर, अरवल्ली, बोटाद, मोरबी, गीर सोमनाथ, देवभूमि द्वारका, वलसाड, तापी.
इतिहास :
गुजरातचा समृद्ध इतिहास जवळजवळ 2,000 वर्षे जुना आहे. हे राज्य समुद्र किनाऱ्यावर स्थित असल्याने तेथे अनेक विदेशी जाती आल्या होत्या. या मधील काही लोकांनी येथेच आपले स्थान वसवले आहे. भगवान श्रीकृष्ण द्वारे वसलेले द्वारिका नगर गुजरात मध्ये स्थित आहे. कृष्णाचा मित्र सुदामा आस्मावतीपुर सध्याच्या पोरबंदर येथे राहत होता.
जे की गुजरातमध्ये आहे. ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. मुघलांपुर्वी राजस्थान व गुजरात मधील काही प्रांत मिळुन गुर्जराष्ट्र किंवा गुर्जरभुमी म्हणुन ओलखला जात असे. त्यामध्ये प्राचीन काळी लोथल, धोलावीरा व गोलाढोरो यांसारखी महानगरे सिंधु सभ्यतेत अस्तित्वात होती. प्रचिन लोथल येथे भारताच्या पहिले बंदर उभारले गेले.
लोक व समाजजीवन :
गुजरात या राज्यात बहुसंख्य लोक आहेत. तरी त्यांच्यात अनुसूचित जाती (6.7%) व अनुसूचित जमाती (11.6%) बऱ्याच प्रमाणात आहेत. आधीचे गिरिजन निसर्ग, दगडधोंडे, भुतेखेते अशा दैवतांचे जडात्मवादी, तर नंतरचे हरिजन अन्य धर्माचे नाहीत म्हणून हिंदूंत जमा, उरलेल्या 62% हिंदूंत बव्हंशी माध्व, रामानुजी, वल्लभाचारी, स्वामी नारायण अशा पंथांचे वैष्णव व बाकीचे काही स्मार्त, शैव, पाशुपत पंथी, माताजीचे पूजक व सूर्योपासक अशा पंथांचे आहेत. कित्येक समन्वयी सत्पुरुष भक्त, अनिश्चित पंथी असेही आढळतात. गुजरातमधील 17.5 लाख मुसलमानांत सुन्नी, शिया, इस्माइली, मेमेन, बोहरी असे पंथोपपंथ आहेत.
पाचव्या शतकात मगध सोडल्यापासून गुजरात ही सध्या चार लाखांवर लोकवस्ती असलेल्या जैनांची साक्षात धर्मभूमीच झाली आहे. श्वेतांबर पंथाचा उगम व प्रसार याच भूमीत झाला आणि गुजरातच्या इतिहासात, राजकारणात, संस्कृतीत व जीवनात जैनांनी महत्वाचा वाटा उचललेला आहे.
हिंदूंची दैवते द्वारकेचा कृष्ण, डाकोरचा रणछोडजी, गिरनारची अंबामाताजी आणि नर्मदातटाकीचा महादेव व जैनांची पूज्य स्थाने शत्रुंजय टेकडीवर व गिरनार पर्वतावर आहेत. पारशी या अल्पसंख्य पण प्रगत जमातीस प्रथम गुजरातमध्येच आश्रय मिळाला व त्यांच्या जरथुश्त्री धर्माचे पालन शेकडो वर्षांपासून त्यांना निर्वेधपणे करता आले आहे. त्यांची भाषा गुजराती असून नवसारी तालुक्यात ते अधिक प्रमाणात केंद्रित झाले आहेत.
गुजरात राज्यातील शेती व उद्योग :
राज्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी निम्म्याहून थोडी अधिक भूमी शेतीखाली आहे. कच्छचा विस्तीर्ण वैराण प्रदेश या राज्याच्या हद्दीत असल्यामुळे उजाड व नापीक जमिनीचे प्रमाण चतुर्थांशाहून जास्त आहेत. गवताळ मैदाने व कायम चराऊ कुरणे मात्र राज्यात पुष्कळ आहेत.
तांदूळ, ज्वारी, बाजरी व गहू ही मुख्य अन्नधान्ये त्यांपैकी तांदूळ दक्षिण गुजरातच्या खेडा, पंचमहाल, बडोदे व सुरत जिल्ह्यांत, ज्वारी व बाजरी उत्तर गुजरातेत व सौराष्ट्रात आणि गहू मुख्यतः उत्तर गुजरातेत व काही प्रमाणात सौराष्ट्रात पिकवण्यात येतो. पंचमहाल जिल्ह्यात मकाही काढण्यात येतो. नगदी पिकांत कापूस, भुईमूग व तंबाखू ही महत्त्वाची आहेत. बटाटे, मिरची, सुंठ यांचेही उत्पन्न येते.
जंगल उत्पादन साग, वेळू, पिवळे, लाल व काळे लाकूड, चंदन, खैर, मिमल, धुमडा, धुडिजा अशा जातींच्या झाडांचे लाकूड असून, दुय्यम उत्पादन गवत, मध, लाख, रंगांसाठी लाकूड व साली या मालाचे होते. डांगमधले सागाचे उत्पादन विशेष उल्लेखनीय होते. उद्योगधंद्यांत गुजरात राज्य व्यापाराप्रमाणेच झपाट्याने प्रगती करीत आहे.
स्वतः शासनाने बडोद्याला एक खत कारखाना काढला असून, भावनगर सार्वजनिक दुग्धालयासारख्या विविध उद्योगात शासन पुढाकार घेत आहे. खाजगी क्षेत्रात मुख्य कारखानदारी धंदे, सूत व कापडगिरण्या, सिमेंट, रासायनिक द्रव्ये, यांत्रिकी व विजेची उपकरणे, खाद्य तेलावर प्रक्रिया असे आहेत. सूत व कापडगिरण्या अहमदाबादेत केंद्रित असल्या तरी भडोच, नवसारी, नडियाद अशा अन्य ठिकाणीही चालू आहेत.
पाटबंधारे योजना :
गुजरात ही राज्य कृषी ज्या क्षेत्रात भरभराटीस आलेले आहे. देशातील पंचमांश कापूसक्षेत्र या राज्यात आहे. गुजरात प्रदेश सुपीक असूनही राज्याला अन्नधान्याची तूट आहे.
चालू पाटबंधारे योजना उकाई, कडाणा, नर्मदा, काक्रापारा, मही उजवा काठ, दंतीवाडा, हठमती, सरस्वती, शत्रुंजयी-पालिताणा, भादर, शत्रुंजयी-खोडिआर, मच्छू व साबरमती-धोरोई अशा एकंदर 14 असून त्या सर्वांनी मिळून 11.47 लाख हेक्टर जमिनीला पाणी मिळेल.
दळणवळण मार्ग :
1970-71 मध्ये राज्यातील एकूण 5,656 किमी. लोहमार्गांपैकी 1,134 किमी. रुंदमापी 3,381 किमी. मीटरमापी व 1,142 किमी. अरुंदमापी होते. लोहमार्गांचे जाळे सौराष्ट्र व बडोदे भागात अधिक दाट आहे. कच्चे व पक्के रस्ते मिळून एकंदर 32797 किमी.
असून चांगले रस्ते डांग, अमरेली, जुनागढ, राजकोट व भावनगर जिल्ह्यांत तर निकृष्ट रस्ते मेहसाणा, साबरकांठा व बनासकांठा जिल्ह्यांत अशी स्थिती होती. सर्व प्रकारची मोटार वाहने 99,621 असून त्यांपैकी राज्य वाहतुकीच्या 3,146 गाड्या रोज अंदाजे 1.37 लाख किमी. मार्गक्रमण करून सरासरी 8.45 लाख उतारू वाहून नेतात व 4.88 लाख रु. मिळवतात.
राज्याचे सर्वात मोठे कांडला बंदर वर्षाला 15.75 लाख टन मालाची चढउतार करते. बाकीच्या 8 मध्यम व 42 सामान्य बंदरांपैकी ओखा, बेडी, वेरावळ, सिक्का व पोरबंदर या बंदरांतून कमाल 6 पासून किमान 2 लाख टनांपर्यंत मालाची चढउतार होते.
अहमदाबाद, राजकोट आणि भूज येथे नभोवाणी केंद्रे आहेत. 1967 अखेर राज्यात 6 लाख रेडिओ संच होते. गुजराती भाषेची एकूण 13 ते 15 लाख खप असणारी 495 नियतकालिके असून त्यांपैकी 35 दैनिके, 128 साप्ताहिके व 228 मासिके आहेत.
पर्यटन स्थळे :
- गीर अभयारण्य : आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध अभयारण्य
- गिरनार : जुनागढ जवळील दत्ता संप्रदायाचे महत्त्वाचे स्थान
- द्वारका : श्रीकृष्णाच्या देवालासाठी प्रसिद्ध. बेट द्वारका हे जवळचे ठिकाण श्री कृष्णाची राजधानी होती असे मानले जाते.
- मोढेराचे सूर्य मंदिर : भारताच्या अतिशय दुर्मिळ असे सूर्य मंदिर.
- राणीनी वाव : पाटण जिल्ह्यातील पायऱ्यांची विहीर. ही युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केली आहे.
- सोरटी सोमनाथ : येथील शिवमंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक मानले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Election In Marathi
- Essay On Yoga In Marathi
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
FAQ
गुजरात कशासाठी प्रसिद्ध आहे?
हे समुद्रकिनारे, मंदिर शहरे आणि ऐतिहासिक राजधानींसाठी प्रसिद्ध आहे. वन्यजीव अभयारण्ये, हिल रिसॉर्ट्स आणि नैसर्गिक भव्यता ही गुजरातची देणगी आहे. शिल्पकला, हस्तकला, कला, उत्सव यामुळेही राज्य समृद्ध होते.
गुजरात राज्याची निर्मिती कधी झाली?
१ मे, १९६०
गुजरातचे नाव कसे पडले?
इसवी सनाच्या पाचव्या शतकात गुर्जर नावाची एक जमात गुजरातमध्ये आली. गुजरात हे नाव या गुर्जरांवरून आले आहे .
गुजरातच्या संस्कृतीत विशेष काय आहे?
गुजरात हे सांस्कृतिक वैविध्य असलेले समृद्ध राज्य आहे. समृद्ध वारसा आणि सांस्कृतिक परंपरांच्या खऱ्या रंगांनी ते दोलायमान आहे . हडप्पा संस्कृतीच्या इतिहासाशी संबंधित, हे राज्य हिंदू, इस्लाम, जैन आणि बौद्ध या अनेक धर्मांचे संगम बनले आहे.
गुजरातमध्ये कोणत्या प्रकारचे जंगल सर्वाधिक आहे?
फॉरेस्ट कॅनोपी डेन्सिटी वर्गांच्या बाबतीत, राज्यामध्ये अत्यंत घनदाट जंगल (VDF) अंतर्गत 377.90 चौरस किमी, मध्यम घनदाट जंगल (MDF) अंतर्गत 5,092 चौरस किमी आणि खुल्या वन (OF) अंतर्गत 9,387.43 चौरस किमी आहे.
Nice information