बिहार राज्याची संपूर्ण माहिती Bihar Information In Marathi

Bihar Information In Marathi बिहार हे भारताच्या उत्तर-पूर्व भागात स्थित एक प्रसिद्ध ऐतिहासिक राज्य आहे आणि त्याची राजधानी पाटणा आहे. लोकसंख्येच्या बाबतीत हे भारतातील तिसरे सर्वात मोठे राज्य आहे, तर देशातील राज्यांपैकी क्षेत्रफळाच्या बाबतीत 12 वा क्रमांक आहे. 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहारच्या दक्षिणेकडील भागातून झारखंड या नवीन राज्याची निर्मिती करण्यात आली. तर चला मग पाहूया बिहार राज्य विषयी माहिती.

Bihar Information In Marathi

बिहार राज्याची संपूर्ण माहिती Bihar Information In Marathi

बिहार राज्याचा विस्तार व क्षेत्रफळ :

बिहारच्या उत्तरेला नेपाळ, दक्षिणेला झारखंड, पूर्वेला पश्चिम बंगाल आणि पश्चिमेला उत्तर प्रदेश आहे. हा प्रदेश गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सुपीक मैदानात वसलेला आहे. त्यात गंगा पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहते. बिहार हे भारतातील सर्वात मोठ्या राज्यांपैकी एक आहे.

बिहार हे उत्तर भारतातील राज्य आहे. राज्याचे एकूण क्षेत्रफळ 94,163 चौरस किलोमीटर असून त्यापैकी 92,257.51 चौरस किलोमीटर हे ग्रामीण क्षेत्र आहे. झारखंड वेगळे झाल्यानंतर, बिहारची जमीन प्रामुख्याने नदीचे मैदान आणि शेतीयोग्य सपाट जमीन आहे.

गंगेच्या पूर्वेकडील मैदानात वसलेल्या राज्याची सरासरी उंची 173 फूट आहे. भौगोलिकदृष्ट्या, बिहार तीन नैसर्गिक विभागांमध्ये विभागला गेला आहे. उत्तरेकडील पर्वतीय आणि सखल भाग, मध्यभागी विस्तीर्ण मैदाने आणि दक्षिणेकडील पर्वतीय भाग आहे.

उत्तरेकडील डोंगराळ प्रदेश सोमेश्वरश्रेणीचा भाग आहे. या श्रेणीची सरासरी उंची 455 मीटर आहे परंतु त्याचे सर्वोच्च शिखर 874 मीटर उंच आहे. सोमेश्वर रांगेच्या दक्षिणेला तराई प्रदेश आहे. साल वृक्षाचे घनदाट जंगल असलेला हा दलदलीचा प्रदेश आहे. या जंगलांमध्ये राज्यातील एकमेव व्याघ्र प्रकल्प वाल्मिकीनगर येथे आहे.

लोकसंख्या :

2011 च्या जनगणनेनुसार बिहारची लोकसंख्या 2,77,04,236 एवढी आहे. साक्षरता प्रमाण 63.82 % आहे. लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 918 स्त्रियांचे प्रमाण आहे. घनता 2,850 चौरस मैल आहे. राज्याची साक्षरता 63.82 टक्के आहे.

राज्याची अधिकृत भाषा हिंदी ही आहेत. राज्यात 38 जिल्हे समाविष्ट आहेत. फक्‍त 11.3 टक्के लोक शहरात राहतात, बाकी सर्व ग्रामीण भागात राहतात. बिहारमधील 58 टक्के लोक 25 वर्ष वयाच्या आतील आहेत. म्हणून हे राज्य तरूणांचे राज्य म्हणून ओळखले जाते.

See also  गुजरात राज्याची संपूर्ण माहिती Gujarat Information In Marathi

बिहार मधील शेती व प्रमुख पिके :

बिहार राज्यातील मृदा उत्तर भागात पिवळसर बांगर किंवा जुन्या गाळाची असून ती पुष्कळदा कंकरमिश्रित आढळते. सखल भागात गंगेला मिळणाऱ्या नद्यांच्या पुरांनी हिमालयातून वाहून आणलेला गाळ आढळतो. छोटा नागपूर पठारावर खडे व पालापाचोळामिश्रित लाल माती दिसून येते.

उत्तरेकडील जमीन बहुतांशी सुपीक आणि लागवडी योग्य आहे. भात, गहू, कडधान्य, मका, तेलबिया, तंबाखू , भाजीपाला आणि केळी, आंबा, लिची यांसारख्या काही फळांची लागवड केली जाते. हाजीपूरची केळी आणि मुझफ्फरपूरची लिची खूप प्रसिद्ध आहेत.

बिहारचा इतिहास :

बिहार राज्याचा इतिहास खूपच प्राचीन आहे. वेद, पुराण व महाकाव्यात बिहारचा उल्लेख आहे. 24 जैन तीर्थकार आणि बौद्धांचे कार्यक्षेत्र, ख्रिस्तपूर्व काळात बिंबीसार, उदय यांचे साम्राज्य व पाटलीपुत्र शहराची स्थापना झाली. चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, मौर्य राजवंश, सुंग आणि कनवास यांचे साम्राज्य.

त्यानंतर कुषाणांचे राज्य आले. गुप्ता राजवंशाचे चंद्रगुप्त विक्रमादित्य यांचे राज्य आहे.मध्ययुगीन काळात मुस्लीम राज्यकर्त्यांचा राज्यात प्रवेश झाला. मुहम्मद बिन बर्खातआर खिलजी हा पहिला मुस्लीम राज्यकर्ता आहे.

नंतर तुघलक मोगल यांची सत्ता आली. भारतीय गणराज्यांचे हे एक प्रमुख राज्य आहे. उत्तरेस नेपाळ, पूर्वेस पश्चिम बंगाल, पश्चिमेस उत्तर प्रदेश आणि दक्षिणेस झारखंड.

दरभंगा हे मैथिली संस्कृतीचे केंद्र. नालंदा हे प्राचीन गौरवशाली विद्यापीठाचे स्थान, बौध्दकालीन अवशेष व संग्रहालय आहे. पाटणा हे गंगा व शोण नद्यांच्या संगमावरील बिहारचे राजधानीचे ठिकाण. प्राचीन मगधची राजधानी होती.

बोलीभाषा :

हिंदी आणि उर्दु या येथील प्रमुख भाषा आहेत. भोजपुरी, मैथिली, माघी, बाज्जीका आणि अंगिका या येथील लोकभाषा आहेत. बिहार राज्यात काही आदिवासी लोक वास्तव्य करतात. ते आपल्या काही स्वत:च्या भाषा बोलतात.

See also  मिझोराम राज्याची संपूर्ण माहिती Mizoram Information In Marathi

लोकनृत्य व कला :

झिझिन, जात-जतीन, कजारी, सोहर-खिलौना, होली, झुमेरी आदी लोकनृत्य बिहार राज्यात प्रचलित आहेत. यापैकी जात- जतीन हे लोकनृत्य खूप लोकप्रिय आहे. हे लोकनृत्य उत्तर बिहारमध्ये मिथिला आणि कोसी प्रांतात जास्त लोकप्रिय आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या जोडीने हे नृत्य केले जाते.

हस्तकलांमध्ये पाटण्याचे जरी भरतकाम, बिहारशरीफ व रांचीचे हातमागावरील गृहसजावाटीचे कापड, भागलपूरचे टसर रेशीम कापड, रांची जिल्ह्यातील लाखेने मढविलेल्या शोभेच्या लाकडी वस्तू, बांबूच्या आणि सिक्की गवताच्या चटया, टोपल्या, हेट इ. विविध प्रकार बिहारच्या पारंपारिक कारागिरीतील कल्पकता व सौंदर्य दर्शवितात.

बिहारमधील प्रमुख पर्वत व नद्या :

राजमहाल, कैमूर हे बिहार मध्ये पर्वत आहेत तर गंगा, घागरा, गंडक, फाल्गुन, शोण, दामोदर, पुनपुन, कारमानसा, दुर्गावती, कोसी, अजय, बागमती, बुरही गंदक, गांजेस, कमला, कानकाइ, करमानसा, कीउल, लखनदेइ, लिलाजान, महानंदा, मेची, मोहना, रतुआ, या नद्या बिहार मधून वाहतात. राज्यातील प्रमुख नदी गंगा ही आहे.

राज्यव्यवस्था :

भारतीय संघराज्यातील हे एक घटक राज्य आहे. राष्ट्रपतींनी नेमलेला राज्यपाल राज्यप्रमुख असला, तरी विधिमंडळाला जबाबदार असलेला मुख्यमंत्री मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार कामकाज पाहतात. विधिमंडळ द्विसदनी असून विधानसभेत 314 आणि विधानपरिषदेत 96 सदस्य असतात.

लोकसभेवर 53 व राज्यसभेवर 22 सदस्य राज्यातून निवडून जातात. शासनाच्या सोयीसाठी पाटणा, भागलपूर, तिर्हूत व छोटा नागपूर असे चार विभाग केलेले असून 31 जिल्हे आहेत. पाटणा ही राज्याची राजधानी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात जमीनदारी नाहीशी व्हावी, ‘बकस्त’ जमिनीचे तंटे मिटावे, म्हणून खास कायदे करण्यात आले.

‘पंचायती राज’च्या कायद्यानुसार ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा-परिषद अशी त्रिसूत्री पंचायत योजना अंमलात आली असून औद्योगिकीकरण, शिक्षण, आरोग्य, वीज, पाटबंधारे, घरबांधणी, समाजकल्याण या क्षेत्रांत राज्याने प्रगती केली आहे.

बिहार मधील उत्सव :

बिहारचे लोक सामान्यतः उत्तर भारतीय व बंगाली हिंदूंचे सण पाळतात. ‘खिचडीका दिन’ (संक्रांत), सरस्वतीपूजा, होळी, दसरा, दिवाळी आणि त्रिपुरी पौर्णिमा या सणांखेरीज ‘छठ’ म्हणजे कार्तिक शुद्ध षष्ठी या सूर्यपूजेच्या सणाला बिहारी स्त्रियांत विशेष महत्त्व आहे. ‘रक्षाबंधन’, कृष्ण-जन्माष्टमी आणि तीज अथवा भाद्रपद शुद्ध तृतीया हे सणाचे दिवस मानण्यात येतात.

See also  हरियाणा राज्याची संपूर्ण माहिती Haryana Information In Marathi

बिहारमधील पर्यटन स्थळ :

भागलपूर शहराच्या पूर्वेस सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर असलेल्या अंतिचक गावात वसलेल्या विक्रमशीला विद्यापीठाचे अवशेष पर्यटकांचे आकर्षण आहे. हे आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध आहे आणि परदेशातूनही पर्यटक या विद्यापीठाला भेट देण्यासाठी येतात.

पावापुरी : नालंदा जिल्ह्यातील पावापुरी बिहारच्या धार्मिक स्थळांमध्ये समाविष्ट आहे आणि ती जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांपेक्षा कमी नाही. येथे भगवान महावीरांचे पाचशे इ.पू.मध्ये अंत्यसंकार करण्यात आले होते आणि हे ठिकाण आपापुरी म्हणूनही ओळखले जाते. याव्यतिरिक्त श्वेतांबर जैन मंदिर, समोसरन मंदिर, दिगंबर जैन मंदिर आणि दादा गुरुदेव यांचे मंदिर पाहण्यासारखे आहे.

राजगीर हे बिहारमधील धार्मिक स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट असलेले एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे. राजगीर शहर जैन आणि बौद्ध धर्माशी संबंधित आहे. भगवान बुद्ध आणि भगवान महावीर यांनी आपल्या जीवनाचा काही काळ या ठिकाणी आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व देणारे भाषण दिले होते. हे शहर सुंदर मैदाने, टेकड्या, घनदाट जंगले, धबधबे आणि लेण्यांसाठी प्रसिद्ध आहे.

मुजफ्फरपूर : बिहारचे मुख्य आकर्षण असलेले मुझफ्फरपूर हे बागमती आणि लखनदेई नद्यांच्या जवळ आहे. पाटण्यापासून सुमारे 71 कि.मी. अंतरावर लीचीसाठी प्रसिद्ध मुझफ्फरपूर. येथील प्रमुख पर्यटनस्थळांमध्ये बाबा गरीब नाथ मंदिर, जुब्बा सहानी पार्क, रामचंद्र साही संग्रहालय, खुदीराम बोस स्मारक, चतुर्भुज स्थान मंदिर, श्री राम मंदिर, रामन देवी मंदिर यांचा समावेश आहे.

बिहार राज्याविषयी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करू नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Essay On Election In Marathi

Essay On Yoga In Marathi

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Leave a Comment