Haryana Information In Marathi हरयाणा हे भारतातील एक कृषिप्रधान प्रगतिशील राज्य आहे. हिंदी ही राज्यातील प्रशासकीय व्यवहाराची प्रमुख भाषा असून हरियाणवी ही मातृभाषा आहे. येथे काही प्रमाणात उर्दू व पंजाबी या भाषाही बोलल्या जातात. तर चला मग पाहुया हरयाणा राज्य विषयी माहिती.
हरियाणा राज्याची संपूर्ण माहिती Haryana Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
हरयाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. हरयाणाची राजधानी चंदीगड असून राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ 44,212 चौरस किमी इतके आहे. हरयाणा या राज्याच्या पूर्वेस दिल्ली व उत्तर प्रदेश राज्य, उत्तरेस हिमाचल प्रदेशाचा काही भाग व चंडीगढ, वायव्येस पंजाब आणि दक्षिणेस व पश्चिमेस राजस्थान या राज्यांनी ते सीमित झाले आहे.
उत्तर सरहद्दीवर शिवालिक पर्वतश्रेणी, पूर्वेला यमुना नदी, नैर्ऋत्येला अरवली पर्वताच्या रांगा आणि पश्चिमेला काही भागांत घग्गर नदी यांच्या नैसर्गिक सीमा या राज्याला लाभल्या आहेत.
हरयाणाची स्थापना :
हरयाणा राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 रोजी करण्यात आली. 2011 च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या 2,53,53,081 इतकी आहे. राज्याची साक्षरता 76.64 टक्के आहे.
राज्याची अधिकृत भाषा हिंदी आहे तर पंजाबी ही भाषासुद्धा राज्यात ग्राह्य धरली जाते. राज्यातील सर्वात मोठे शहर फरिदाबाद हे असून राज्यात 21 जिल्हे समाविष्ट असून 93 तालुके आणि 6,841 गावे आहेत.
हरयाणाचा इतिहास :
हरयाणा या राज्याला वेदकालीन इतिहास आहे. दंतकथेतील भरत वंशावरून देशाचे नाव भारत. महाभारत या वीरकाव्यात हरयाणाचा उल्लेख आहे. कौरव-पांडवांच्या महायुद्धाची युद्धभूमी कुरूक्षेत्र हरयाणातच आहे.
भारताच्या इतिहासात मुस्लिमांच्या आगमनापासून दिल्ली भारताची राजधानी उदयास येईपर्यंत हरयाणाची महत्वाची भूमिका होती. हरयाणाची भूमी म्हणजे दिल्लीचाच भाग आहे. 1857 मधल्या भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य युद्धापर्यंत प्रत्यक्षात अपरिचित.
1857 चे बंड मोडून काढल्यानंतर ब्रिटीश राजवटीची पुनर्स्थापना आणि झाजर आणि बहादुर्गचा नवाब, बालाबगड्या राजा आणि रेवारीचा राव तुलाराम यांच्या अधिपत्याखालील मुलूख बळकावला. त्यातील काही प्रांत ब्रिटीश राजवटीत विलीन तर काही पतियाळा, नभा व जिंद येथील राजाकडे गेला.
हरयाणा हा पंजाबचा प्रांत आहे. 1 नोव्हेंबर 1966 ला पंजाबची पुनर्रचना झाली व हरयाणाला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. राज्याच्या पूर्वेला उत्तरप्रदेश, पश्चिमेला पंजाब, उत्तरेला हिमाचलप्रदेश तर दक्षिणेला राजस्थान आहे. दिल्लीचा काही भाग हरयाणात आहे.
हरयाणा हे उत्तर भारतातील राज्य आहे. दिल्लीच्या तिन्ही बाजूने व्यापलेले राज्य. यमुना नदी ही या राज्याच्या पूर्वेला वाहते आणि उत्तर प्रदेशासोबतची या राज्याची तीच सीमा आहे. चंदीगड ही या राज्याची राजधानी असली तरी पंजाबची राजधानीही चंदीगड हीच आहे.
डॉ. झाकीर हुसेन गुलाब गार्डन आणि रॉक गार्डनमधील शिल्पे पाहण्यासारखी आहेत. 75 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. निवडक अन्नधान्याचे उत्पादन जे राज्याच्या आरंभीच्या काळात जवळजवळ 25.92 लाख टन उत्पादन.
राज्यातील मुख्य पिके तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, मका, बारली, डाळी, ऊस, कापूस, तेलबिया व बटाटे ही आहेत. सूर्यफूल, सोयाबीन, फळे आणि भाज्यांसारख्या पिकांनासुद्धा प्राधान्य दिले जाते.
आग्रोहा हे प्राचीन ऐतिहासिक अवशेष व शक्ती सरोवर यासाठी प्रेक्षणीय शहर आहे. अंबाला हे ठिकाण शहर व छावणी या दोन विभागात विभागलेले आहे. शिखांचे धार्मिक स्थान. करनाल येथे असलेले रम्य व सुंदर चक्रवर्ती सरोवर.
कुरूक्षेत्र हे कौरव व पांडवातील महाभारतीय युद्धाचे स्थान. ज्योतिसर या जागी श्रीकृष्णाने अर्जुनास गीता सांगितली. थानेसर या ऐतिहासिक ठिकाणी राजा हर्षवर्धनाची राजधानी होती.
गुडगाव हे औद्योगिक शहर. जिंद हे ऐतिहासिक शहर, प्राचीन महाल. झज्जर हे सुद्धा ऐतिहासिक शहर. नारनौल हे प्राचीन शहर, ऐतिहासिक अवशेष, व्यापारी पेठ.
पानिपत ही हरियाणाची दुसरी युद्धभूमी इस 1526 मध्ये बाबर व ईब्राहीमखान लोधी, 1556 मध्ये अकबर व हिमू, 1761 मध्ये अहमदशहा अब्दाली व मराठे या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या लढायांचे स्थान. फरिदाबाद हे औद्योगिक शहर. रोहतक हे प्राचीन ऐतिहासिक शहर. सुलतानपूर पक्षी अभयारण्य. हान्सी येथील ऐतिहासिक अवशेष.
शेती व व्यवसाय :
हरयाणा राज्यात गहू आणि तांदूळ यांचे मुबलक उत्पादन होते. पंजाबखालोखाल देशातील 30% गहू या राज्यात होतो, यांबरोबरच ऊस, कापूस आणि मका ही येथील प्रमुख कृषि उत्पादने होत. त्यामुळे शेतीला उपयोगी अनेक उद्योगधंदे राज्यात असून कापड गिरण्या व साखर कारखानेही आहेत.
याशिवाय राज्यात सायकल निर्मितीचा मोठा उद्योग आहे. फरीदाबादमध्ये विजेची उपकरणे, ट्रॅक्टर, वैज्ञानिक उपकरणे, रेयॉन, मोटारसायकल, स्कूटर इत्यादींच्या निर्मितीचे कारखाने आहेत. अंबाला हे काचेचे सामान आणि वैज्ञानिक उपकरणांच्या निर्मितीसाठी भारतभर प्रसिद्ध आहे.
कैथलमध्ये शिवणयंत्रे आणि त्यांचे सुटे भाग यांची निर्मिती होते. विस्तीर्ण गाळाची मैदाने व शास्त्रशुद्ध रीतीने राज्यात अनेक लोकनृत्य प्रचलित आहेत. पैकी सांग, छाटी, खोरिया, रास लिला, धमाल, झुमार, लोर, गुग्गा, तेज, फाग, चौपारिया अशी काही लोकनृत्य महत्वाची आहेत.
सारंगी, हार्मोनियम, चिमटा, धाड, ढोलक, मंजिरा, खारताल, डमरू, डुग्गी, डफ, बासरी, बीन, घुंगरू, ढाक, घाऱ्हा, थाली, शंख आदी लोकवाद्य हरियाणात पारंपरिक पद्धतीने वाजवली जातात. हरयानवी हे आपल्या लोकगीतात खूप श्रीमंत भाषा आहे. रागिनी हे लोकगीत खूप लोकप्रिय असून लोकनाट्यात स्वाँग हे लोकनाट्य लोकप्रिय आहे.
हरियाणा लोकांचा पोशाख :
येथील लोकांचा पोशाख दोलायमान आणि रंगीबेरंगी आहे, जो त्यांची संस्कृती, परंपरा आणि जीवनशैली व्यक्त करतो. पुरुषांसाठी, हरियाणाचा पारंपारिक पोशाख धोती-कुर्ता-पगडी आहे आणि राज्यातील महिला कुर्ती-घागरा-ओधनी घालतात.
उत्सव :
लोहरी, बैसाखी, तेज, कुरूक्षेत्र उत्सव, आंबा उत्सव, हरयाणा दिवस, महाभारत उत्सव, सुरजकुंड यात्रा, सोहना कार रॅली, पिंजोर पारंपरिक उत्सव, कार्तिक सांस्कृतिक उत्सव साजरे होतात.
हवामान :
येथील हवामान विषम असून उन्हाळ्यात मे-जूनमहिन्यांत तापमान 46° से. पर्यंत वाढते तर हिवाळ्यात नोव्हेंबर–डिसेंबर-जानेवारी यांदरम्यान पारा -2° से. पर्यंत खाली जातो. मे-जून महिन्यांत उष्ण व कोरडे वारे वाहतात त्यांना स्थानिक भाषेत ‘लू’ म्हणतात.
मैदानी प्रदेशात बहुतांश पाऊस जुलै-सप्टेंबर महिन्यांतपडतो. आग्नेय मॉन्सून अथवा बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मॉन्सून वाऱ्यांमुळे सरासरी 760 मिमी. पाऊस पडतो तर जानेवारी-फेब्रुवारीया काळात पश्चिमेकडून येणाऱ्या आवर्तांपासूनही अल्पवृष्टी होते.
वार्षिक जलवायुमानाचा विचार करता नोव्हेंबर-फेब्रुवारीमध्ये थंड व आल्हाद-दायक हवा, एप्रिल-जूनमध्ये कडक उन्हाळा व जुलै- सप्टेंबरमध्ये पावसाळा असे हवामान आढळते.
खनिज संपत्ति :
या राज्याच्या दक्षिणेकडील अंतर्भागात निम्न प्रतीच्या लोहखनिजाचे साठे आहेत. अंबाला व महेंद्रगड जिल्ह्यांमध्येचुनखडी, संगमरवर, लोह धातुक, चिनी माती व पाटीचा दगड यांचे साठे आढळतात.
वनस्पती व प्राणी :
हरियाणाच्या जंगलात निलगिरी, देवदार, किकर, शिसम, बाभूळ तसेच मोठ्या प्रमाणात अलुबुखार इ. वृक्ष आढळतात तसेच मैदानी प्रदेशात प्रामुख्याने शुष्क, काटेरी झुडपांसह पानझडी वृक्ष व सखल भागात लहान झुडपे आढळतात. पुष्पीय वनांच्या दृष्टीने शिवालिक भाग समृद्ध आहे.
हरयाणाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3.3% जंगल आहे. एकेकाळी येथे सिंह, वाघ हे प्राणी डोंगराळ दऱ्याखोऱ्यांत आढळत होते. सांप्रत खार, रानडुक्कर, लांडगे, ससे, हरणे, कोल्हे, काळवीट, रानटीमांजरे इ. प्राणी आढळतात. यांशिवाय अंगावर मऊ लव असणारे ऊद मांजर, हॉग हरिण, बिबट्या, नीलगाय इ. प्राणी प्रसिद्ध असून नदीपात्रात मगरी आढळतात.
पक्ष्यांमध्ये मोर, पारवे, क्वेल, लांब चोचीचा पक्षी, सँड ग्राउझ इ. आढळतात. विषरी नाग आणि क्रेट हे सरपटणारे प्राणीही आढळतात. येथे रेशीम किडे, मधमाशा, उंट, गाय, म्हैस तसेच घोडे इ. प्राण्यांचे पालन केले जाते.
हरयाणातील प्रमुख नद्या :
अरवली आणि शिवालिक हे पर्वत असून धग्गर- हरका, मार्कंडा, यमुना, चौतांग, दांग्री, कौशल्या, तांग्री, इंदोरी, दोहान, कृष्णावती, साहिवी, सरस्वती, सरसुती, सोंब या नद्या या राज्यातून वाहतात.
पर्यटन स्थळ :
हरयाणा राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे पुढीलप्रमाणे आहे.
- सुल्तानपुर राष्ट्रीय उद्यान
- बादशाहपुर चा किल्ला
- बेगम समरू पॅलेस
- सूरजकुंड
- काबुली बाग
- पानीपत संग्रहालय
- फारुख चा किल्ला
- सीआरपीएफ शूटिंग रेंज
- फरीदाबाद
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
FAQ
हरियाणा ची राजधानी काय?
चंदिगढ
हरियाणा हे विकसित राज्य आहे का?
ऐतिहासिकदृष्ट्या एक कृषीप्रधान राज्य, हरियाणा आज एक विकसित औद्योगिक राज्य आहे.
हरियाणा पंजाबपासून कधी वेगळे झाले?
पंजाबी भाषिक पंजाब आणि हिंदी भाषिक हरियाणा या दोन वेगळ्या राज्यांमध्ये पूर्वीच्या पंजाब राज्याचे विभाजन झाल्यामुळे 1 नोव्हेंबर 1966 रोजी हरियाणाची स्थापना झाली.
पंजाबमध्ये किती गावे आहेत?
2011 च्या जनगणनेनुसार पंजाबमध्ये एकूण 12581 गावे लोकवस्तीची आहेत. हा लेख जिल्ह्याद्वारे विभक्त केलेल्या भारतातील काही सर्वात प्रसिद्ध पंजाबी गावांची यादी प्रदान करतो.
पंजाबमधील सर्वात लहान जिल्हा कोणता आहे?
पठाणकोट हा पंजाबमधील एकूण क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा आहे. हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. पठाणकोट जिल्ह्याची सीमा जम्मू आणि काश्मीर आणि हिमाचल प्रदेशशी आहे.