सरकारी योजना Channel Join Now

अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती Amravati District Information In Marathi

Amravati District Information In Marathi शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थि प्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र आहे. शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ.  वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. तर चला मग पाहूया अमरावती या जिल्ह्याविषयी विस्तृत माहिती.

Amravati District Information In Marathi

अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती Amravati District Information In Marathi

क्षेत्रफळ व लोकसंख्या :

महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील जिल्हा. 20°32′ ते 11° 46′ उ. आणि 76° 38’ते 78° 27′ पू. क्षेत्रफळ 12,150 चौ.किमी. असून लोकसंख्या 15,41,209 आहे. अमरावती जिल्ह्याला अकोला, यवतमाळ, वर्धा आणि वाशीम या जिल्ह्यांच्या सीमा लागल्या आहेत.

अमरावती जिल्ह्याची सर्वात जास्त सीमा मध्यप्रदेश या राज्याला लागली आहे. अमरावती जिल्ह्यातील सातपुडा पर्वत हा मध्यप्रदेश आणि महाराष्ट्राचा सीमावर्ती प्रदेश आहे.

अमरावती जिल्ह्यातील तालुके :

चांदुर बाजार, चांदुर रेल्वे, चिखलदरा, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, अमरावती तालुका, तिवसा, धामण गाव रेल्वे, साधारण, दर्यापूर, नांदगाव खंडेश्वर, भातकुली, मोर्शी व वरुड हे तालुके अमरावती जिल्ह्यात आहेत.

अमरावती जिल्ह्याचा इतिहास:

प्राचीन इतिहासात अमरावती शहराचा उल्लेख महाभारतात आढळतो. महाभारत काळात श्रीकृष्णाने कौंडिण्यपूर या ठिकाणाहून रुक्मिणीचे हरण केले होते. श्रीकृष्णाने हरण करताना अमरावतीच्या एकवीरा देवीच्या तळाखालून ते कौडिण्यपूरपर्यंत भुयार खणले होते असे सांगतात.

अमरावतीचे प्राचीन नाव ‘उदुंबरावती’ याचे प्राकृत नाव ‘उमरावती’ आणी अमरावती हे नाव अनेक शतकापासुन आहे. अमरावतीला प्राचीन अंबादेवी मंदीर आहे त्यापमुळे अमरावती नाव आहे असा समज आहे. अमरावतीला प्राचीन शिलालेख आहेत ते ही 1097 मध्ये भगवान आदीनाथ आणी भगवान रिशबनाथ यांचे संगमरवरी दगडाचे पुतळे उभारले आहेत.

भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांनी स्थापन केलेली शिवाजी शिक्षण संस्था विदर्भातील मोठी संस्था आहे. स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभागी होणारे दादासाहेब खापर्डे, वीर वामनराव जोशी याच जिल्ह्यातील होते.

उत्सव :

तटबंदीच्या आतमध्ये भाजी बाजार आणि बुधवारा असे दोन प्रभाग आहेत. हे दोन्ही प्रभाग गणेश चतुर्थीच्या उत्सवासाठी प्रसिद्ध आहेत. भाजी बाजारमधील छत्रपती शिवाजी मंडळ व सार्वजनिक मंडळ ही नावाजलेली गणेशोत्सव मंडळे आहेत.

बुधवाऱ्यामधील लक्ष्मीकांत गणेशोत्सव मंडळ, आझाद हिंद मंडळ, नीलकंठ मंडळ, आणि अनंत मंडळ ही प्रसिद्ध आहेत. या मंडळांतर्फे गणेशोत्सवाच्या काळात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात.

हवामान :

जिल्ह्यात उन्हाळ्यात सरासरी 41°से. तर हिवाळ्यात 16° से. तापमान असते. उंचीमुळे मेळघाट भाग नऊ महिने थंड असतो. पण पावसाळ्यातील तीन महिने येथील हवामान रोगट असते. पावसाची वार्षिक सरासरी उत्तरेस 110 पश्चिम भागात 79.6 पूर्व भागात 84.4 व दक्षिणेस 77.8 सेंमी. असून 10 % पाऊस हिवाळ्यात पडतो.

वाहतूक :

अमरावतीत मध्य रेल्वेचे 195 किमी. लांबीचे मार्ग या जिल्ह्यात असून त्यांचे प्रमाण दर 100 चौ.किमी. ला 1.5 किमी. पडते. मुंबई-कलकत्ता, खांडवा-हिंगोली व अचलपूर -मुर्तिजापूर हे रेल्वेमार्ग ह्या जिल्ह्यातून जातात.

मोर्शीखेरीज सर्व तालुक्यांस रेल्वे दळणवळण उपलब्ध आहे. अमरावती-बडनेरा या 9.6 किमी. लांबीच्या फाट्याने अमरावती मुंबई-कलकत्ता रेल्वेमार्गास जोडलेली आहे.

अमरावती शहर मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय हमरस्त्यावर असून ते तालुक्याच्या शहरांशी व शेजारील जिल्ह्यांशी सडकांनी जोडलेले आहे. एकूण 1,103 किमी. लांबीच्या सडका असून त्यांपैकी 436 किमी. डांबरी आहेत.

शेती :

अमरावती जिल्ह्यातील जमीन लाव्हा रसाच्या दगडापासून बनलेली आहे. पयानघाटातील जमीन काळी, खोल व सुपीक, तर मेळघाटातील जमीन तांबडी व उथळ आहे. शेतीत 79% लोक शेती हा व्यवसाय करतात.

पेरणीचे निव्वळ क्षेत्र 58.3% असून दर्यापूर तालुक्यात ते 89% तर मेळघाटात फक्त 7% आहे. जिल्ह्यातील 92% पीक खरीप आहे. मात्र मेळघाटात 21 टक्के रब्बी पीक निघते. ज्वारी, कापूस, तूर, भूईमूग, गहू, हरभरा, जवस ही येथील मुख्य पिके आहे. कापूस व तूर या पिकांसाठी हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

मोर्शी, अमरावती व अचलपूर तालुक्यांत भाजीपाला, मिरची, संत्री, लिंबू, केळी, द्राक्षे ही बागायती पिके होतात. चिखलदरा उत्तम प्रतीच्या कॉफीसाठी व अंजनगाव-सुर्जी आणि अंजनगाव-बारी नागवेलीच्या पानांसाठी प्रसिद्ध आहे. याशिवाय हातमाग, चामडे कमविणे व रंगविणे, तूरडाळ करणे, कुंकू तयार करणे इ. उद्योगधंदे या जिल्ह्यात आहेत.

प्रमुख नद्या :

मेळघाटातील नद्यांचे पाणी कामदा, कापरा, गार्गा व सिपना या तापीच्या उपनद्यांतून वायव्य सीमेवरील तापी नदीत जाते. पूर्व सीमेवरून वर्धा नदी दक्षिणेकडे वाहते.

चंडामनी, मातू, विदर्भा, बेवळा व खोलाट या तिच्या उपनद्या होत. मध्यभागातील प्रथम दक्षिणवाहिनी व नंतर पश्चिम वाहिनी पूर्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी असून शहानूर, चंद्रभागा व पेंढी या तिच्या उपनद्यांमधला जमिनीचा पट्टा खाऱ्या पाण्याचा आहे.

वनक्षेत्र :

अमरावती जिल्ह्याच्या  क्षेत्रफळाच्या 31% क्षेत्र जंगलव्याप्त असून त्यातील 81% एकट्या मेळघाट तालुक्यात आहे. सागवान, तिवस, सलई, धावडा, नालडू, आवळा, तेंदू ही उपयोगी झाडे असून रोशा गवत व बांबू यांचेही उत्पादन होते. येथे वाघ, चित्ता, हरिण, सांबर, अस्वल वगैरे प्राणी आढळतात. पयानघाटात बाभळीची बने आहेत.

शैक्षणिक व्यवस्थापन :

अमरावतीला विदर्भातील शिक्षणाचे माहेरघर संबोधले जाते, येथील शैक्षणिक वातावरणामुळे पूर्ण विदर्भ तसेच मराठवाडा व मध्य प्रदेशातून विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.  अमरावती विद्यापीठ हे शहराच्या पूर्वेस आहे.

पर्वत पायथ्याशी असलेले हे विद्यापीठ अतिशय नयनरम्य वातावरणात आहे. विविध प्रकारच्या झाडांनी समृद्ध असलेला याचा परिसर खूप मोठा आहे. या विद्यापीठाला आता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव देण्यात आले आहे.

येथे संत गाडगेबाबा अध्यासन चालवले जाते. शैक्षणिकदृष्ट्या अमरावती हे विदर्भात फार विद्यार्थिप्रिय ठिकाण आहे. येथे अनेक महाविद्यालये आहेत. शिक्षणाच्या सोयींमुळे अमरावती हे पश्चिम विदर्भाचे महत्त्वाचे शिक्षणकेंद्र आहे.

शहराचे एक मोठे आकर्षण म्हणजे श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ.  वीर वामनराव जोशी यांच्या प्रेरणेने अमरावतीत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाची स्थापना झाली. हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बरेच जुने शारीरिक शिक्षण महाविद्यालय असून संपूर्ण भारतातून मुले येथे शिक्षणासाठी येतात.

या व्यायामशाळेच्या परिसरात 1989 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले होते. या व्यायामशाळेने 1936 साली यवतमाळच्या डॉ. सिद्धनाथ कृष्ण काळे यांच्या नेतृत्वाखाली बर्लिन ऑलिम्पिकच्या वेळी भरलेल्या जागतिक व्यायाम परिषदेला आपला चमू पाठवला होता.

दीड-दोन महिने आगबोटीने प्रवास करीत हा चमू आपला भगवा झेंडा घेऊन जर्मनीत पोहोचला. तिथे व्यायाम परिषदेत व्यायामशाळेच्या खेळाडूंनी मल्लखांब, योगासने आणि गदगा फिरवणे हे भारतीय व्यायामप्रकार करून दाखवले, त्याचे जगभर कौतुक झाले होते. प्रेक्षकांमध्ये व्यासपीठावर हिटलर, गोबेल्स प्रभृति हजर होते.

पर्यटन स्थळ :

मेळघाट व्याघ्रप्रकल्प, कोलखास आणि सेमाडोह हे निसर्गरम्य स्थळे. गाविलगड किल्ला, नर्नाळा किल्ला, पंडित नेहरू बॉटनिकल गार्डन इ.

ट्रायबल म्युझियम :

अलीकडच्या काळात चिखलदरा हे ठिकाण पॅराग्लायडिंगसाठी हळूहळू उदयास येत आहे. भारतात पॅराग्लायडिंग मोजक्याच ठिकाणी होते. महाराष्ट्रातील हे तिसरे ठिकाण आहे.

सालबर्डी येथे लव-कुशांनी श्यामकर्ण घोडा अडविला, अशी लोककथा आहे. सालबर्डीसच ऊन व थंड पाण्याचे झरे आहेत, त्यांत स्‍नान केल्याने त्वचारोग बरा होतो असा समज आहे.

अमरावती शहरात आणखी काही पर्यटन व प्रेक्षणीय स्थळे खालीलप्रमाणे :

अंबादेवी मंदिर, अमरावती, एकविरा देवी मंदिर, बांबू उद्यान अमरावती, श्री क्षेत्र कोंडेश्वर अमरावती, छत्री तलाव, वडाळी तलाव.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

FAQ

अमरावती जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?

अमरावती हे नाव प्राचीन अंबादेवी मंदिरासाठी ठेवण्यात आल्याचे सांगितले जाते.

अमरावती जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?

या जिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहेत. 

अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे?

चिखलदरा

अमरावतीची संस्कृती काय आहे?

अमरावती हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या दोलायमान शहर आहे, आणि हिंदूंसाठी एक महत्त्वाचे तीर्थ केंद्र आहे आणि विविध उत्सव मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने आयोजित केले जातात.

अमरावतीचे मुख्य अन्न कोणते?

सीरा, पुरी, बासुंदी आणि श्रीखंड हे या प्रदेशातील काही प्रसिद्ध गोड पदार्थ आहेत, जे बहुतेक दुधाच्या प्रभावाने तयार केले जातात. पुरणपोळी हा एक प्रसिद्ध गोड पदार्थ आहे

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

1 thought on “अमरावती जिल्ह्याची संपूर्ण माहिती Amravati District Information In Marathi”

Leave a Comment