सिंगापूर देशाची संपूर्ण माहिती Singapore Information In Marathi

Singapore Information In Marathi सिंगापूर हे जगातील धार्मिक दृष्ट्या विविधता आढळून येणारा देश आहे. हा देश अग्नी आशियातील मलाय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकास वसलेले एक द्वीपराष्ट्र आहे. सिंगापूरमधील धर्म वेगवेगळ्या देशांमधून आलेल्या विविध धर्मांच्या मिश्रणामुळे विविध धार्मिक विश्वास आणि प्रथांची विविधता दर्शविते. सिंगापूरमध्ये बहुतेक प्रमुख धार्मिक गट-संप्रदाय उपलब्ध आहेत. आंतर-धार्मिक संघटनासह, सिंगापूर शहरात 10 प्रमुख धर्म ओळखले जातात. प्यू रिसर्च सेंटरच्या 2014 च्या विश्लेषणात सिंगापूर हे जगातील सर्वात धार्मिकदृष्ट्या विविधता असलेले राष्ट्र आढळून आले. येथे सर्वाधिक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत, अलीकडील जनगणना 2015 मध्ये देशातील 33.12% लोकसंख्या बौद्ध अनुयायी म्हणून घोषित करण्यात आली आहे. तर चला पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Singapore Information In Marathi

सिंगापूर देशाची संपूर्ण माहिती Singapore information in Marathi

क्षेत्रफळ :

सिंगापूरचे क्षेत्रफळ हे 684 चौरस किलोमीटर असून हा एक छोटा देश आहे. या देशाची राजधानी ही सिंगापूर सिटी आहे तसेच देशातील सिंगापूर हे मुख्य बेट असून ते जोहरच्या अरुंद सामुद्रधुनीने मले द्विपकल्पापासून, तर नैऋत्यकडील मलॅका समुद्रध्वनीने इंडोनेशियाच्या सुमित्रा बेटापासून वेगळे झाले आहे.

भूरचना :

सिंगापुरात मुख्य भूमी धरून 63 बेटे आहेत. दोन मानवनिर्मित पुलांद्वारे सिंगापूर मलाय द्वीपकल्पाला जोडले आहे.  जोहोर-सिंगापूर कॉजवे हा पूल सिंगापुराला उत्तरेकडच्या जोहोर  नावाच्या मलेशियन प्रांताला जोडतो.

तर तुआस सेकंड लिंक हा पूल पश्चिमेकडून जोहोरला जोडतो.  जूरोंग बेट, पुलाउ तेकोंग, पुलाउ उबिन व सेंटोसा ही सिंगापुराची प्रमुख बेटे आहेत. सिंगापूर बेटावरील बराचसा भाग समुद्रसपाटीलगतच असून बुकित तिमा ही 166 मी. उंची असलेली टेकडी देशातील सर्वात उंच ठिकाण आहे.

लोकसंख्या :

सिंगापूर देशाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 51,83,700 एवढी आहे. या देशातील लोकांचा जास्तीत जास्त जन्म हा ऑक्टोबर महिन्यात झालेला दिसून येतो. येथील नावांमध्ये सामान्यतः प्रसिद्ध असलेली चिनी नावे आणि उपनावे हे ली आणि लिम आहेत.

राष्ट्रीय फूल :

सिंगापूरचे राष्ट्रीय फुल हे वांडा मिस जोकोम आहे. या फुलाचा शोध 1893 मध्ये सर्वप्रथम एगजेस जोकोम नावाच्या एका अर्मेनियनने लावला होता.

हवामान :

सिंगापूर येथील हवामानाचा विचार केला असता विषुववृत्तीय मोसमी प्रकारचे हवामान असून येथे हवामान उष्ण व दमट प्रकारचे असते. सिंगापूर बेटावरील जानेवारीचे तापमान 25°c तर जून महिन्यातील तापमान 27°c असते. जास्तीत जास्त 36°c पर्यंत तापमानाची नोंद झाली.

येथे ईशान्य मान्सून वाऱ्यांपासून जोरदार वारे वाहतात डिसेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण 25 सेंमी असते. नैऋत्य मान्सूनच्या काळात पावसाची वार्‍याचे प्रमाण जुलैमध्ये सरासरी 17 सेमी पाऊस पडतो. एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात स्थानिक वाऱ्यांपासून पाऊस पडत असतो. येथील एकूण पर्जन्यमान 238 सेंमी आहे.

वनस्पती व प्राणी :

या देशातील 85 टक्के जंगल व्याप्त प्रदेश असून येथे प्राणी वनस्पती यांचे प्रमाण खूपच कमी दिसते. आता केवळ पाच टक्केच भूभाग हा जंगलांनी व्यक्त असून तो सर्वसाधारणपणे तीमाही टेकडीच्या परिसरात आढळतो. या प्रदेशात लालांग या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या खुरट्या वनस्पती सर्वत्र दिसून येतात.

सिंगापूर मधील जंगलाचे प्रमाण कमी झाल्यामुळे येथे प्राणी जीवनही खूपच कमी प्रमाणात दिसून येते. या प्रदेशात लांब शेपटीची माकडे, शेपूट नसलेले व मोठ्या डोळ्यांचे निशाचर लेमूर, मांजर, कस्तुरी, खवल्यांचे मुंगी खाऊ, इत्यादी प्राणी तर पक्षांपैकी सुतारपक्षी लांब शेपटीचा टेलर, हिरवा बघ पांढरा व रंगीत किंगफिशर व सनबर्ड इत्यादी पक्षी आढळतात. तसेच सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये कोब्रा, सरडा सिसॅक इत्यादी कीटक आढळतात.

इतिहास :

सिंगापूर या देशाचा इतिहास हा प्रागैतिहासिक काळापासून लिखित आहे. या बेटावर या काळात वस्ती असावी तसेच या बेटांचा तुमसिक वाटे टेमासिक असा उल्लेख आढळतो. तिथे कोळ्यांची वस्ती होती आणि चाचीगिरी करणारे लोक राहत होते.

सातव्या शतकात सुमात्रा मधील पालेंबांग येथील श्रीविजय यासाम्राज्याचा सिंगापूर हा एक भाग होता. त्यावेळी त्याचे नाव टेमासिक असे होते. दक्षिण आशियातील व्यापाराचे ते मोठे केंद्र होते.

सँग नीला उतामा हा पालेंबांग या राज्याचा असून तो टेमासिकला आला होता. या प्रदेशात लाल रंगाचा, घाऱ्या डोळ्याचा, काळ्या डोक्याचा चट्टेपट्टे असलेला प्राणी दिसला. हा प्राणी त्याला सिंहच वाटला आणि त्याने टेमासिक हे नाव बदलून या बेटाला सिंहापुरा असे नाव दिल्याचे हे प्रचलित आहे. चौदाव्या शतकापर्यंत हे बेट श्री विजयाच्या ताब्यात होते. त्यानंतर त्यावर जावाच्या मजपहित राजाची आणि त्यानंतर सयामी आयुथ्थ राजाची सत्ता होती.

त्यानंतर बॅटम मेलका साम्राज्याच्या अधिपत्याखाली हे 15 व्या शतकात गेले त्यानंतर पोर्तुगीजांनी तेहस्तगत केले आणि येथील सर्व बेटे डचांच्या अंमलाखाली आली. सन 1819 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा प्रशासक सर स्टँफर्ड रॅफेल्स याने जोहोरच्या सुलतानाशी करार करुन हे बेट स्वतःच्या ताब्यात घेतले.

हिंदू धर्म :

सिंगापूरमधील हिंदू धर्म आणि संस्कृती 7 व्या शतकात पुन्हा पाहिली जाऊ शकते, जेव्हा टेमासेक हिंदू-बौद्ध श्रीविजय साम्राज्याचे व्यापार स्थळ होते. एक हजार वर्षानंतर दक्षिण भारतातील अनेक प्रवासी सिंगापूर येथे आणण्यात आले, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी आणि औपनिवेशिक ब्रिटिश साम्राज्याने त्यांना कुळी आणि बंधुवर्धक कामगार म्हणून काम करण्यास आणले होते. सिंगापूरमध्ये सध्या 30 प्रमुख हिंदू मंदिर आहेत, जी विविध देव आणि देवतांना समर्पित आहेत.

समाज जीवन :

सिंगापूर मधील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. याशिवाय तेथे हिंदु, मुस्लिम व ख्रिश्चन धर्मीय सुद्धा राहतात. सिंगापूर हे जगात मोजक्या संख्येने उरलेल्या नगरराज्यांपैकी एक असून आग्नेय आशियातील सर्वात छोटे राष्ट्र आहे. सिंगापूर बेटावर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने 1819 साली वखार स्थापली. त्याकाळी बेटावरील सिंगापूर नदीच्या मुखालगत मलाय कोळ्यांचीच तेवढी वस्ती होती.

ओरांग लाउट जमातीतले हे स्थानिक लोक सिंगापूर बेटावर आणि नजीकच्या इतर छोट्या बेटांवर कैक वर्षांपासून नांदत आले होते. व्यूहात्मक दृष्टीकोनातून मोक्याच्या जागी वसलेले असल्यामुळे सिंगापूर मसाला मार्गावरील महत्त्वाचे केंद्र ठरू लागले.  ब्रिटिश साम्राज्यातील सामरिक आणि व्यापारी महत्त्वाचे ठाणे बनले. आशियाई देशांच्या दृष्टीने सिंगापूर या शहराला सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे.

2010 मध्ये सिंगापूरमध्ये अंदाजे 2,60,00 हिंदू होते. हिंदू अल्पसंख्याक आहेत जे सिंगापूरचे 5.1% प्रौढ नागरिक आहेत आणि 2010 मध्ये कायम रहिवासी आहेत. सिंगापूरमधील जवळजवळ सर्व हिंदू भारतीय आहेत व इतर ज्यांनी हिंदू कुटुंबात लग्न केले आहे.

1931 मध्ये हिंदू एकूण लोकसंख्येच्या 5.5% वर पोहोचले होते, ते आतापर्यंत सर्वात जास्त प्रमाण होते. सिंगापूरमध्ये दीपावलीचा हिंदू सण राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून ओळखला जातो. काही गैर-भारतीय, सामान्यत: बौद्ध चीनी, विविध हिंदू कार्यात सहभागी होतात.  मलेशिया आणि इंडोनेशियाच्या वेगवेगळ्या राज्यांव्यतिरिक्त, सिंगापूर हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्यांवर कोणतेही बंधन ठेवत नाही.

सिंगापूरमधील पर्यटन स्थळ :

सिंगापूर मधील पर्यटन स्थळांविषयी माहिती पाहूया.

सिंगापूर टुरिस्ट प्लेस चायना टाउन :

चायना टाउन येथे लोकांची गर्दी नियमित असते. येथील मिठाई खूपच प्रसिद्ध आहे. चायना टाऊन एक बाजारपेठ असून ते चायनीज खाद्यपदार्थ तसेच विदेशी वस्तुंनी भरलेली दुकाने पारंपारिक चिनी उत्पादने यांनी भरलेली असते. याशिवाय येथे श्रीमरी यम्मन हिंदू मंदिर आणि बुद्ध टूथ अवशेष मंदीर पाहण्यासारखे आहेत.

चांगी बीच  :

हा सिंगांगचा सर्वात प्रसिद्ध बीच आहे.  सिंगापूरच्या येथील पर्यटनाचा प्रवास करत असताना या ठिकाणाला तुम्ही नक्की भेट दिली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला कळेल की आपली यात्राखूपच प्रेरणादायी होती. येथे सर्वात जुना कोस्टल पार्क आहे, तसेच ओप्लेस हे समुद्रकिनारी असलेले उद्यान आहे. तसेच 28 किलोमीटर समुद्रकिनारा शांत पसरलेला असून चांगी हे पॉईंट आणि चांगी फेरी रोड दरम्यान वसलेले उद्यान आहे.

ही माहिती तुम्हाला कशी वाटते, ते मला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment