नॉर्वे देशाची संपूर्ण माहिती Norway Information In Marathi

Norway information in Marathi नॉर्वे हा देश युरोप खंडाच्या उत्तरेला स्थित एक देश आहे. या देशाचे स्थान हे पृथ्वीच्या उत्तर ध्रुवाजवळ असल्याने या देशात खूपच थंड वातावरण असते आणि बर्फाच्या पहाडांनी भरलेला हा हा देश आपल्याला दिसतो.  तर चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Norway information in Marathi

नॉर्वे देशाची संपूर्ण माहिती Norway information in Marathi

ओस्लो ही नॉर्वेची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. नॉर्वेचा राजा हॅराल्ड हा पाचवा आणि या देशाचे पंतप्रधान जेन्स स्टोल्टनबर्ग  आहेत. या देशाचे चलन हे नॉर्वेजियन क्रोन हे आहे. येथील लोकांची राष्ट्रीय भाषा ही नॉर्वेजियन असून कॅनडाच्या तुलनेत नॉर्वेमध्ये इंग्रजी बोलणारे लोक जास्त आहेत. कॅनडाची लोकसंख्या 76% इंग्रजी भाषा बोलते आणि नॉर्वेमधील लोकसंख्येन पैकी 86 टक्के लोक इंग्रजी भाषा बोलतात.

क्षेत्रफळ व सीमा :

नॉर्वेचे एकूण क्षेत्रफळ 3,85,207 चौरस किलोमीटर असून या देशाची सर्वात मोठी सीमा ही स्वीडन या देशाशी जोडली गेली आहे. फिनलँड व रशिया देश नॉर्वेच्या उत्तर सीमेकडे आहे. पश्चिम व दक्षिणेस नॉर्वेजियन समुद्र व उत्तर समुद्र आहेत.

लोकसंख्या :

नॉर्वे या देशाची लोकसंख्या ही 53.8 लाख असून भारतीयांची संख्या येथे 25 हजार पर्यंत आहे. युरोप मधील सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेल्या देशांमध्ये या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. या देशांमध्ये 17 मे हा राष्ट्रीय दिवस म्हणून साजरा केला जातो तसेच 1814 मध्ये नॉर्वेची राज्यघटना तयार करण्यात आली देशाच्या संसदेला Storting असे म्हणतात. याचे दर चार वर्षांनी सदस्य निवडले जातात.

खनीज संपत्ती :

या देशांमध्ये लोहखनिज व लोहगंधकाचे मुख्य साठे आहेत. त्याव्यतिरिक्त चांदी, तांबे, शीशे, जस्त हे देखील काही प्रमाणात आढळतात. त्या व्यतिरिक्त दगडी कोळसा खनिज तेल इत्यादी खनिजे आढळतात.

हवामान :

या देशाचे तापमान हे शीतकटिबंधात असून येथे अटलांटिक वरून येणाऱ्या विस्तीर्ण व उष्ण, गल्फ प्रवाहामुळे हे हवामान समशीतोष्ण राहिले आहे. यामुळे अगदी उत्तरेकडील किनारादेखील वर्षभर खुला राहतो.

देशातील हवामान नेहमीच बदलते राहते. या देशातील पश्चिम किनाऱ्यावरील तापमान हे 15°c च्या आसपास असते. मात्र उत्तरेकडे उन्हाळ्यातील महिने सूर्य मावळतच नाही. म्हणून नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ही म्हणतात.

नॉर्वेमध्ये सौम्य हिवाळे शितल उन्हाळे तर पावसाळ्यामध्ये 200 सेमी पाऊस पडतो. तसेच उन्हाळ्यातही 100 सेमी पाऊस नॉर्मलमध्ये पडतो. त्यामुळे येथे पाण्याची कमतरता दिसून येत नाही.
हिवाळ्यात अनेक ठिकाणी पर्वतांवर हिम कडून अनेक नद्या व सरोवरे गोठतात.

इतिहास :

नॉर्वे या देशाच्या इतिहासाविषयी बोलायचं झाले तर या देशाचा बायझंटिन रोमन साम्राज्याची संपर्क होता. आठव्या नव्या शतकापर्यंतचा या देशाचा इतिहास उपलब्ध नाही. त्यानंतर नॉर्वे मधील वाय किंग या दर्जा वरती आक्रमक व्यापारामुळे त्यांचा युरोपशी संबंध आला व पुढे वायकींगच्या चाचीगिरीमुळे युरोप हा त्रस्त होऊन मध्ययुगात नॉर्वे मधील अनेक लहान लहान राज्य एकत्रित येण्याचे कार्य पहिला हाराल, ट्रेयूग्व्हेसॉन व दुसरा ओलाफ या तीन राजांनी केले.

या देशांमध्ये पहिला ओलाफ याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार करून फिरस्ती धर्माचा प्रचार झपाट्याने केला. यामुळे नॉर्वेमध्ये एक राष्ट्रीयत्वाची भावना रुसली गेली व दुसरा ओलाफ या राजर्षीने एकछत्री अंमल स्थापन केला. पण त्यालाही यादवीचा पूर्णतः नाश करता आला नाही.

1030 मध्ये लढाईत त्याला मृत्यू आला. त्यानंतरच्या काळात स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या साम्राज्य तृष्णेत नॉर्वे देश भरडून निघाला. यांच्या पारतंत्र्यात नॉर्वेची आर्थिक स्थिती सुधारली गेली व माशांची निर्यात मोठ्या प्रमाणात वाढली तसेच धान्य मसाल्याचे पदार्थ कापड मध यांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढले. व त्यांचा इंग्लंड जर्मनी या देशांशी व्यापार वाढला.

चौदाव्या शतकात नॉर्मल मध्ये प्लेगची साथ आली तेव्हा देशातील अर्धी लोकसंख्या या संकटाला बळी पडली गेली व या संकटांमुळे नॉर्वे हा एक दुर्बल देश बनला व 1536 मध्ये डेन्मार्कच्या अंमलाखाली जाऊन त्याचा एक प्रांत मानला जाऊ लागला याचे परिणाम म्हणजे पुढील तीनशे वर्ष नॉर्वेतील कॅथोलिक पंथ संपुष्टात येऊन तेथे ल्युथर प्रणालीत प्रोटेस्टंट पंथ दृढ झाला.

वाहतूक व्यवस्था :

या देशांमध्ये रस्ते वाहतूक रेल्वे वाहतूक व जलवाहतूक ही मुख्य वाहतूक आहे. देशात 1854 मध्ये रेल्वेची सुरुवात झाली व 1976 मध्ये लोहमार्गाची लांबी ही 4,241 किमी. करण्यात आली.

देशात विमान वाहतूक वाढते असून ती हिवाळ्यात जास्त असते. येथील अंतर्गत वाहतूक हे खाजगी विमान कंपन्यांमार्फत चालते. या देशात आंतरराष्ट्रीय चार दर्जाचे व अन्य 34 विमानतळ आहेत.

लोक व समाजजीवन :

नॉर्वेमध्ये युरोपातील नॉर्डीक वंशाचे लोक हे दोन हजार वर्षांपूर्वीपासून राहू लागलेत. येथील ननॉर्डिक वंशाचे लोक हे गौरवर्णीय, उंच बांध्याचे, उभट चेहऱ्याचे असून यांची येथे बहुसंख्या आहे.

नॉर्वे कडील दक्षिणेकडे गेल्यास गोल चेहऱ्याच्या अल्पाइन वंशांचे मिश्रण आपल्याला पाहायला मिळते, तसेच अतिउत्तरेकडे गेल्यास शुद्ध लॅप वंशाचे लोक राहतात. येथील डोंगराळ भागात विरळ लोकसंख्या असून पश्चिम किनार लागत व दक्षिणेकडे दाट लोकसंख्या दिसते.

नॉर्वेतील समाज हा ग्रामीण समाजच आहे. येथिल ऑस्लो, त्रॉनहेम व स्टाव्हांगर ही मोठी शहरे आहेत. या देशात लोकशाहीची भावना खूप लोकांमध्ये रुजली आहे. या देशातील लोकांमध्ये उच्च-नीच, सेवक, स्त्री-पुरुष असा भेदभाव आढळत नाही. येथील बरेच लोक उत्तर अमेरिकेत स्थावर झाले आहे, म्हणून या देशाची स्थिती आता बदललेली आहे.

कला व क्रीडा :

नॉर्वे या देशांमध्ये कला व क्रीडा खूप प्रसिद्ध आहे येथील नाट्य, शिल्प व संगीत यांसारख्या आदिकला उल्लेखनीय आहे. येथील ब्यर्न्‌सॉन हा समकालीन नाटककार ओळखला जातो त्यांनी गोपालांचे व ग्रामीण जनतेचे जीवन आपल्या कलेच्या माध्यमातून रंगविले होते.

पर्यटन स्थळ :

या देशात अनेक पर्यटन स्थळ आहेत म्हणून येथे हे पर्यटन स्थळ पाहण्याकरिता अनेक पर्यटक येत असतात व या स्थळांना भेटी देत असतात आपला आनंद द्विगुडीत करत असतात तुम्ही हे नक्की या स्थळांना भेट देण्यासाठी या देशाचा सफर करा. तर पाहूया कोणती मुख्य स्थळ आहेत.

अलेसुंड :

हे शहर आकाराने लहान असून खूपच मनोरंजक आहे येथे सात बेटांवर त्याची स्थान आहे.अलेसुंड हे नॉर्वेमधील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे आणि पर्यटकांचे आकर्षण आहे.

उत्तर नॉर्वे मधील ट्रॉम्सो :

हे ठिकाण सहलीसाठी उत्तम मानले जाते तसेच मासेमारी करणाऱ्यांना येथे भरपूर प्रमाणात मासे उपलब्ध होऊ शकतात.

ड्रॅमेन :

हे अतिशय सुंदर किनारपट्टी आहे, जी नॉर्वेजीयन या शहरासाठी स्थित आहे. याशिवाय माउंट ब्रेगर्नेसवरील निरीक्षण डेकवरून फजॉर्डच्या सौंदर्यांचे आकर्षण आपल्याला मोहित करते. येथे नागमोडी आग आकाराच्या बोगद्यातून आपल्याला कारने प्रवास करता येतो.

ओड्डा :

नॉर्वेमधील ओड्डा शहर पर्यटन स्थळ आहे तसेच ही स्थानिक पर्यटकांसाठी व इतर पर्यटकांसाठी ही एक आकर्षण आहे तसेच हे पर्यटकांचे निवास स्थान म्हणूनही ओळखले जाते. येथे तुम्हाला परिसरातील सौंदर्य पाहायला मिळते तसेच पर्वतीय नद्या धबधबे व हिमनदी ही या शहरात तुम्हाला पाहायला मिळेल.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment