डेन्मार्क देशाची संपूर्ण माहिती Denmark Information In Marathi

Denmark Information In Marathi डेन्मार्क हा  देश उत्तर युरोपामधील व  स्कॅंडिनेव्हियातील  असून अतिशय विकसित आहे तसेच या देशाचे दरडोई उत्पन्न हे उच्च असून डेन्मार्क हा दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीसाठी जगात त्याचा पहिला क्रमांक लागतो. डेनमार्कची राजधानी कोपनहेगन ही असून येथील सर्वात मोठे शहर आहे. चला मग पाहूया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Denmark Information In Marathi

डेन्मार्क देशाची संपूर्ण माहिती Denmark Information In Marathi

डेन्मार्क देशात नास्तिकांची संख्या एकवटली आहे. डेन्मार्कचा राष्ट्रीय ध्वज जगातील सर्वात जुना ध्वज असून तो आजपर्यंत ही तिथे वापरला जातो. या देशाचा राष्ट्रीय पक्षी हंस हा असून राष्ट्रीय खेळ फुटबॉल आहे व तेथील लोकांमध्ये तो खेळ लोकप्रिय आहे.

क्षेत्रफळ व विस्तार :

डेन्मार्कचे क्षेत्रफळ 43,069 असून या देशाच्या सीमा ह्या मुख्य भूमीच्या दक्षिण दिशेला जर्मनी तर ईशान्य दिशेला स्वीडन व उत्तरेला नॉर्वे आहे. डेन्मार्कला उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्रांचा किनारा आहे.

राष्ट्रीय भाषा :

डेन्मार्क या देशाची राष्ट्रीय भाषा ही ज्ञानेश असून ती इंडो युरोपीय भाषा आहे.

भुरचना :

डेन्मार्कचा मुख्य भूप्रदेश जूटलँड नावाचा द्वीपकल्प आहे. याशिवाय स्यीलंड, फुनेन, व्हेन्ड्सिसेल, लोलॅंड, फाल्स्टर आणि बॉर्नहोम सह शेकडो छोटी बेटे डेन्मार्कचा भाग आहेत. फेरो द्वीपसमूह व ग्रीनलॅंड डेन्मार्कच्या आधिपत्याखालील प्रदेश आहेत. तेथे स्थानिक स्वराज्य असून हे दोन्ही भाग युरोपीय संघाचे भाग नाहीत.

हवामान :

डेन्मार्क या देशाच्या हवामानाविषयी अभ्यास केला असता असे आढळून येते की हा देश समशीतोष्ण हवामानाच्या पट्ट्यात येत असल्यामुळे येथे पूर्व युरोप आर्टिक व अटलांटिक यावरून अगदी भिन्न प्रकारचे वारे वाहत येत असल्यामुळे हवा नेहमी बदलती राहते. पश्चिम किनाऱ्याजवळ वाहत जाणाऱ्या उत्तर अटलांटिक प्रवाह आला गल्फ प्रवाहाच्या अंतिम भागामुळे हिवाळ्यात फार लाभ होतो.

या देशातील जानेवारी फेब्रुवारी महिन्यातील सरासरी तापमान -1°c पर्यंत तर जुलै महिन्यातील सरासरी तापमान 16°c असते. येथील पश्चिमी वारे वाहत असल्यामुळे रात्री व दिवसा मधील तापमानात सहसा जास्त फरक आढळून येत नाही. या देशातील वर्षभर पावसाचे प्रमाण 40 ते 80 cm असते. या देशात उन्हाळ्याच्या उत्तरार्धात जास्तीत जास्त पाऊस पडतो. व येथील बर्फाचा काढ किनाऱ्यावर 70 दिवसांचा तर अंतर्भागात 120 दिवसांचा असतो.

वनस्पती व प्राणी :

या देशाचा सुमारे दहा टक्के भाग वनक्षेत्राने व्यापला असून या देशात चौदाशे जातींची फुलझाडे व चारशे शेवाळे 30 प्रकारचे नेचे व कवक आहेत. येथील जंगलात आढळणाऱ्या वृक्षांमध्ये ॲश, रेड फर, बीच, स्प्रूस, लार्च, पाइन, ओक, आल्डर, पॉपलर, एल्म, मॅपल ही वृक्ष आढळून येतात. काही भागात लहान झुडपे आढळून येतात.

वन्य प्राण्यांमध्ये हिंस्र पशु या देशात जास्त नसून सशांचे काही प्रकार व मृग, बॅजार, खार, मार्टिन, खोकड इत्यादी प्राण्यांची संख्या बरीच आहे. त्या व्यतिरिक्त इथे पक्षांमध्ये 333 प्रकारचे पक्षी आढळतात व त्यापैकी 163 पक्षी हे हिवाळ्यात स्थलांतरण करून हे अन्य देशावरून येथे येतात.

इतिहास :

डेन्मार्क या देशाचा खूप प्राचीन इतिहास असा उपलब्ध नाही. येथे 11,000 वर्षापूर्वी मानव मच्छीमारी व शिकारी करून जगत होता व ते समाजाने राहत होते. दुसऱ्या तिसऱ्या शतकात येथे सिब्री व ट्यूटॉनी ह्या टोळ्या राहत होत्या.

या डोळ्यांनी युरोपीय देशांमध्ये जाऊन त्यांना त्रास दिला व 102 च्या सुमारास रोमन सैन्यांनी यांचा पराभव केला तरी डेन्मार्क मधील निरनिराळ्या डोळ्यांचे इतर देशावर आक्रमण सुरूच होते. जेटलंडमधील जूट व व ॲगल्स टोळ्या इंग्लंडवर चालून गेल्या व इंग्लंडच्या काही प्रदेशात त्यांनी वसाहतीही स्थापन केल्या.

मध्ययुगाच्या सुरुवातीपासून व्हाय किंग डोळ्यांनी युरोपमध्ये आपला धुमाकड घातला होता त्यांचा तळ झिलंडमधील ट्रेलबॉर्य येथे असून, तेथूनच फ्रान्स व इंग्लंडवर त्यांच्या स्वाऱ्या होत होत्या. असे उत्खननामध्ये सापडले आहे.

878 मध्ये ह्या वायटिंग यांना इंग्लंडच्या अल्फ्रेड द ग्रेट यांनी वेड मोर्चा तहाने लंडन चेस्टरच्या पूर्वेकडील मुलुख तोडून दिला. त्यालाच डॅनिललॉ म्हणजे डेन लोकांचा प्रांत असा इंग्लंडच्या इतिहासामध्ये म्हटले गेले.

या देशाचा पहिला राजा गार्म द ओल्ड यांनी 900 ते 940 पर्यंत डेन्मार्कवर राज्य केले. याचा मुलगा हॅरॉल्ड ब्लूटूथने नॉर्वेवर ताबा मिळविला व लोकांना ख्रिस्ती बनविले.

कान्यूट याने डेन्मार्क, स्वीडन, स्कॉटलांड, नॉर्वे, इंग्लंड, वेल्स, हेब्रिडीझ, ऑर्कनी व झेटलंड बेटे, दक्षिण स्वीडन व एस्टोनिया अशा विस्तृत साम्राज्यावर राज्य केले. तसेच यांच्या कारकिर्दीत इंग्लिश व डेन लोकांचे संबंधही सुधारले व दोन्ही देशांची एकमेकांशी चांगले संबंध झाले. मात्र त्याच्या मृत्यूनंतर पुन्हा हे साम्राज्य विस्कळीत झाले.

वाहतूक व दळणवळण :

या देशामध्ये व्यापारी लोक हे जहाजाच्या मार्फत वाहतूक करत असून ही वाहतूक प्रमुख वाहतूक मानली जाते. दुसऱ्या महायुद्धात झालेली हानी भरून काढण्यासाठी आता या क्षेत्रात इंग्लंड व नॉर्वे यांच्या सारख्या देशाशी हा देश स्पर्धा करू लागला आहे. याव्यतिरिक्त या देशांमध्ये लोहमार्ग व रस्ते सुविधा उपलब्ध असून डेन्मार्क मधील हवाई वाहतूक डॅनिश एअरलाइन्स मार्फत चालवली जाते.

लोक व समाजजीवन :

डेन्मार्क या देशातील लोकांचे समाज जीवन हे अतिशय आनंदाने व्यतीत होते. डेन्मार्कची लोक ट्युटॉनिक वर्षाचे असून त्यांची मुख्य भाषा डॅश ही आहे. येथील मोठ्या प्रमाणावर स्कँडिनेव्हियन असून 1960 मध्ये 97.8% लोक डेन्मार्क मध्येच जन्मले होते. येथील लोकांचा वर्ण गोरा केस पिंगट रंगाचे व डोळे निळ्या रंगाचे असतात ते स्वभावने स्नेहल अतिथ्यशील, उदार, आनंदी व विनोदी वृत्ताचे असतात.

येथील लोक उद्योगी असून स्वदेशातील व जगातील घोडामुळीची चांगलीच माहिती यांना असते. या देशातील 98 टक्के लोक हे ल्यूथरप्रणीत प्रॉटेस्टंट पंथाचे आहेत. त्यांना संविधानाने धार्मिक स्वातंत्र्य वहाल केलेले आहे. डेन्मार्कमध्ये काही ज्यू व रोमन कॅथलिक, बॅप्टिस्ट मेथीडिस्ट पंथाचे नागरिक आहेत.

डेन्मार्क मधील पर्यटन स्थळ :

डेन्मार्कला समुद्री किनारे लाभले असल्यामुळे येथील उत्कृष्ट असे बेट आपल्याला पाहायला मिळतात येथील नैसर्गिक सौंदर्यदृष्टी मनमोहून टाकणारी आहे. तर चला मग पाहूया या देशातील पर्यटन स्थळ.

दक्षिण सीलँड, लोलँड, फाल्स्टर आणि मूनी बेट :

या देशापासून जर्मन हा जवळ असल्यामुळे सीलँडची दक्षिण आणि शेजारची बेटे डेन्मार्कच्या पर्यटनासाठी अतिशय लोकप्रिय आहे. येथील  लिसेलंड पार्क आणि त्याचा वालुकामय समुद्रकिनारा हे येथील पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे.  फाल्स्टरमध्ये मेरीलिस्टसह अनेक वालुकामय किनारे आहेत. या भागात नुथेनबोर्ग सफारी पार्क आणि  मिडेलडरसेंट्रेट या दोन्ही लॉलँड, एनस्टवेड जवळील बॉनबॉन-लँड आणि मॉन्स क्लिंट बॉर्नहोम असे येथे अनेक पर्यटन स्थळ आहेत. तुम्हीही येथे येऊन आनंद घेऊ शकता.

हम्मार्श :

स्वीडनच्या दक्षिणेकडील बाल्टिक समुद्रातील बोर्नहोम बेटावर अनेक पर्यटक स्थळ आहे. ज्यामध्ये खडकाळ समुद्र, मासेमारीची गावे, वालुकामय किनारे यांचा समावेश आहे. त्या व्यतिरिक्त गुडजेम, सँडविग, स्वनेके आणि रोने ही शहरे आहेत.  येथे सर्वात मोठा राजवाड्यांचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. हे बेटांचे सर्वात प्रिय स्मारक आहे.

फनान :

ग्रेट बेल्ट ब्रिजद्वारे सीलँडशी जोडलेले फनेनचे ओडेन्समध्ये जन्मलेल्या हॅन्स ख्रिश्चन अँडरसनशी मजबूत संबंध आहेत.  फॅबर्ग आणि स्व्हेंडबोर्ग ही लहान किनारी शहरे पर्यटकांचे आकर्षण लोकप्रिय आहे. हवेढोलमच्या किल्ल्यांना आणि ऐरोची असुरक्षित बेटांना अनेक पर्यटक येत असतात.

जटलँड :

उत्तरेकडील अलबर्ग आणि पूर्वेकडील आरहस ही शहरी व्यवसायासाठी किंवा आनंदसाठी मोठ्या संख्येने पर्यटकांना आकर्षित करतात. तुम्ही या देशातील पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment