Best Sarvepalli Radhakrishnan Quotes In Marathi सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ज्ञ होते. डॉ सर्वेपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते. त्यांच्या कार्यकाळ (इ.स. १९५२ – इ.स. १९६२) असा आहे. त्यांचा जन्म दक्षिण भारतात तिरुत्तनी या ठिकाणी झाला. हे गाव चेन्नई (मद्रास) शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावर आहे. राधाकृष्णन यांचा ५ सप्टेंबर हा जन्मदिवस भारतात शिक्षक-दिन म्हणून साजरा केला जातो.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार Sarvepalli Radhakrishnan Quotes In Marathi
अंतिम सत्याचा अनुभव हे धर्माचे लक्ष्य असते.
अत्तर लावताना लावणाऱ्या च्याही हाताला लागते, सुखाचेही तसेच आहे, दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते.
आपण माणसाप्रमाणे वागण्यास शिकलो पाहिजे.
केवळ पुस्तके वाचून ढीगभर ज्ञान साठवणे म्हणजे विद्या नव्हे, ते ज्ञान जीवनात उतरविणे म्हणजे खरी विद्या.
ज्या विद्येमध्ये स्वतंत्र पणे, वस्तुनिष्ठ विचार करण्याची बुद्धी आहे, कर्तव्य शक्ती आहे ती विद्या विज्ञानातून मिळते.
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते.
मनुष्य पक्ष्यांसारखं हवेत उडण्यास शिकला आहे, मांशासारखा पाण्यात पोहण्यास शिकला आहे, आता त्याने माणूस म्हणून पृथ्वी तलावर जगण्यास शिकावे.
मौन म्हणजे परिस आहे, ज्याला त्याचा स्पर्श होईल त्याचे जीवन सुवर्णमय होऊन जाते.
समाधान माणुसकीत आहे, निर्मल प्रेमात आहे, वृथा अभिमान, धनाचा व कुळा बद्दल वाटणारा गर्व काय कामाचा
सुखाला सोबत लागते, पण दु:खाला एकटे पणानेच जगावे लागते.
स्त्री ही पुरुषाची जीवनसाथी, त्याच्या धर्माची रक्षक, त्याची गृह लक्ष्मि व त्याला देवत्वाकडे घेवून जाणारी साधिका असते.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे अनमोल विचार Sarvepalli Radhakrishnan Quotes In Marathi हे विचार कसे वाटले याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला अवश्य कळवा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi