Rabindranath Tagore Quotes In Marathi रवींद्रनाथ टागोर ज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मोपंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी, संगीतकार होते. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेलविजेते होते.

रवींद्रनाथ टागोर यांचे सर्वश्रेष्ठ विचार Rabindranath Tagore Quotes In Marathi
आत्म्यामध्ये परमात्म्याचा साक्षात्कार प्राप्त करणे हेच जीवनाचे ध्येय असते.
आपण आपल्याला पटलेल्या तत्त्वाप्रमाणे वागावे आणि दुसऱ्यालाही वागू द्यावे.
आपण सर्व श्रेष्ठाची निवड करू शकत नाही सर्व श्रेष्ठ आपली निवड करते.
कला हि जीवनाची दासी आहे, तिचे कार्य जीवनाची सेवा करणे हे आहे.
कलाकार हा निसर्ग प्रेमी असतो त्यामुळे तो निसर्गाचा दासही असतो आणि स्वामीही असतो.
जीवन म्हणजे एक अनंत आव्हान, प्रदीर्घ साहस व पात्रतेची कसोटी आहे.
जे चांगले आहे ते काही एकट्यानेच येत नाही ते सर्व मंगल गोष्टी सोबत घेवून येते.
जेव्हा आम्ही नम्रते मध्ये महान होतो, तेव्हा आम्ही महानतेच्या निकट जातो.
जो मनुष्य आपल्या मनाची वेदना – मनातली दु:ख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही त्याला अधिक राग येत असतो.
ज्याप्रमाणे पक्ष्यांचे आश्रय स्थान घरटे असते, त्याचप्रमाणे आपल्या वाणीचे आश्रय स्थान मौन असते.
थोडे वचने पण अधिक विचार करणे, थोडे बोलणे पण अधिक ऐकणे हाच बुद्धिमान बनण्याचा उपाय आहे.
निर्भीड नव जीवनाच्या दिशेने चला.
परमेश्वराच्या महान शक्तीचे दर्शन वादळ वाऱ्यात होत नसून ते वाऱ्याच्या झुळके च होते.
पात्रता नाही म्हणून आपण परस्परांना भेटणे बंद केले तर आपल्यापैकी बर्याच जणांना अज्ञातवासात जावे लागेल.
पायदळी चुरगळलेली फुले, चुरगळानाऱ्या पायाला आपण सुगंध अर्पण करतात. खऱ्या क्षमेचे हेच कारण आहे.
प्रकाश जेव्हा काळ्या ढगांना स्पर्श करतो तेव्हा तो स्वर्गाचे फुल बनवतो.
प्रांतीय आणि जातीय भावना मनात आणू न देता व्यक्ती व्यक्तींनी भेदभाव विसरायला हवा आणि आपण सगळे एक आहोत हीच भावना मनात बाळगावयास हवी.
फुलांच्या पाकळ्या तोडणाऱ्याला फुलांचे सौंदर्य कधीच अनुभवता येत नाही.
महत्त्वाकांक्षेच्या लतेला पाणी घातल्याशिवाय यशाची मधुर फळे हाती लागत नाही.
मानवी जीवन नितीनिरपेक्ष कधीच असू शकत नाही त्याला नीतीचा पाया असलाच पाहिजे.
विश्वास हा असा पक्षी आहे कि, जो उष:कालापुर्वीच्या अंधारात प्रकाशाचा अनुभव घेत असतो.
रवींद्रनाथ टागोर यांचे सर्वश्रेष्ठ विचार Rabindranath Tagore Quotes In Marathi हे सुविचार तुम्हाला कसे वाटले याबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा, धन्यवाद .
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi