विष्णू सखाराम खांडेकर यांचे अनमोल विचार Best V.S.Khandekar Quotes In Marathi

V.S.Khandekar Quotes In Marathi विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. खांडेकरांच्या कथेत रचनाकौशल्य व तंत्रनिपुणता आढळून येत नाही, पण कथालेखनातून व्यक्त होणारे जीवनदर्शन आणि धेयनिष्ठा वाचकांना प्रभावित करतात, म्हणूनच तर वि.स.खांडेकर हे जीवनवादी लेखक म्हणून ओळखले जातात.

Best V.S.Khandekar Quotes In Marathi

विष्णू सखाराम खांडेकर यांचे अनमोल विचार Best V.S.Khandekar Quotes In Marathi

आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठी मागे वात्सल्याचे सागर उचं बळात असतात.

आजच्या जगात कलेला खऱ्या खुऱ्या जीवनाची – जीवन विषयक तत्त्वज्ञानाची जोड आवश्यक हवी.

उद्दात्त प्रीतिभावना मानवी संबंध जपते, वाढवते.

उद्याचे जग ध्येय निष्ठेने व प्रेम भावनेने उभारावयास हवे.

कुणाची तरी काळजी केल्याविना स्त्रीला चैन पडत नाही, लहानपणी बाहुलीची, तारुण्यात नवऱ्याची नि उतारवयात मुलांची.

खेडी सुधारतील तेव्हाच देश सुधारेल.

जीवनाला बुद्धीप्रमाणे भावनेचीही जोड असावी.

धर्म, संस्कृती आणि इतिहास यांच्या जुन्या पुराण्या गोड गोड गप्पांनी जगात कुणाचा उद्धार झाला आहे?

नवा मनुष्य निर्माण व्हायला सुध्दा त्याच्या भोवतालचे जुने जग बदलत राहायला हवे.

नव्या युगाच्या नव्या तत्वज्ञानात स्वप्नाळपणाला, विषमतेला थारा नाही, या जगात एकच जात आहे आणि ती म्हणजे माणूस

पराक्रमाचा अभिमान असावा पण उन्माद नसावा.

पहिले प्रेम असफल झाले तर त्यात जीवनाचे वीट येण्यासारखे काही नाही.

मनुष्य मोठा विचित्र आहे, तो सुख घटाघटा पितो व दु:ख चघळीत बसतो.

माणूस मेला तरी चालेल पण माणुसकी मरता कामा नये.

स्त्री ही त्यागाची मंगलमुर्ती आहे, देवता आहे, माझा प्राण जाऊ दे पण माझ्या बाळाला वाचवा, असे उद्गार फक्त माताच काढते.

V.S.Khandekar Quotes In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला अवश्य कळवा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment