Beed District Information In Marathi बीड हा जिल्हा ऊस या पिकासाठी खूप प्रसिद्ध आहे. ऊस कामगार म्हणून त्याची ओळख आहे. त्या व्यतिरिक्त त्याचा इतिहासही खूप प्राचीन आहे. बीड या जिल्ह्यात आजही अनेक प्राचीन वास्तूंचे त्या लोकांनी अभिमानाने जतन करून ठेवलेले आहे. जसे या शहराचे प्रवेशव्दार ज्याला आपण वेस असे देखील म्हणतो ते या शहरात आपल्याला पहायला मिळते. तर चला मग आणखीन जाणून घेऊया बीड या जिल्हा विषयी माहिती.
बीड जिल्ह्याची संपूर्ण माहिती Beed District Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार
या जिल्ह्याचे क्षेत्रफळ 10,693 वर्ग कि.मी. असून जिल्ह्याची उत्तर व दक्षिण सीमा गोदावरी व मांजरा नदी ने बंदीस्थ आहे. जिल्ह्याच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला ऊस उत्पादन मोठया प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्याच्या मधोमध पूर्व पश्चिम बालाघाट डोंगररांग आढळते. बालाघाट डोंगररांगे मुळे जलविभाजन होऊन उत्तर व दक्षिण वाहिन्या नद्यांचा उगम होतो.
लोकसंख्या :
बीड जिल्ह्याची लोकसंख्या 25,85,962 एवढी असून साक्षरतेचे प्रमाण 88.56% एक हजार पुरुषांमागे स्त्रियांचे प्रमाण 933 असे आहे. तसेच येथील लोकांची मुख्य भाषा ही मराठी आहे.
बीड जिल्ह्यातील तालुके :
बीड जिल्हयात एकुण 11 तालुके आहेत.
बीड, आष्टी, गेवराई, अंबेजोगाई, कैज, परळी (वैजनाथ), माजलगांव, पातोडा, शिरूर (कासार), वाडवणी, धारूर.
हवामान :
जिल्ह्याचे हवामान सामान्यपणे हवा कोरडी असते. स्थलपरत्वे मात्र हवामानात थोडाफार बदल आढळतो. पश्चिम भागात उंच डोंगराळ प्रदेशात उन्हाळ्यात हवा थंड असते, तर सखल भागात उबदार व दमट असते. आंबेजोगाई तालुक्यात मात्र हवामान आल्हाददायक असते.
1977 मध्ये जिल्ह्याचे कमाल तापमान 39.4° से. व किमान तापमान 29.9° से. होते. पावसाचे प्रमाण कमी असून ते सरासरी 65 ते 80 सेमी. आहे. जिल्ह्याच्या मध्यभागात पर्जन्याचे प्रमाण जास्त असून तो जून ते सप्टेंबर या काळात जास्त पडतो. पावसाची अनिश्चितता व कमी प्रमाण यांमुळे या जिल्ह्याचा काही भाग सतत दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
इतिहास :
बालाघाट डोंगरांच्या पायथ्याशी बिंदुसरा नदीच्या खोऱ्यात खळग्यासारख्या किंवा बिळा सारख्या ठिकाणी हे शहर वसले असल्याने ‘बीळ’ या शब्दाच्या अपभ्रंशातून ‘बीड’ हे नाव पडले असावे, अशी ‘बीड’ नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते.
बीड शहरातील जटाशंकर मंदिराचा संबंध थेट रामायणाशी जोडणाऱ्या दंतकथा प्रचलित आहेत.रामायणानुसार, रावण हा सीता पुष्पक विमानातून पळवून नेत असताना त्यास रोखण्याचा प्रयत्न जटायू नावाच्या गिधाडाने केला, पण रावणाने तलवारीने त्याचे पंख छाटून टाकले. मृत्यूला कवटाळताना त्याने रामाला ही हकीकत सांगितली. जटायूची आठवण म्हणून या जागी देवगिरी यादव काळात जटाशंकर मंदिर बांधले आहे, असे म्हणतात.
बीडला पांडवकाळात ‘दुर्गावतीनगर’ म्हणत असत. पुढे चालुक्यकालीन चंपावतीराणीच्या नावावरून देण्यात आलेले ‘चंपावतीनगर’ हे या शहराचे दुसरे नाव आहे. पूर्वी राणी चंपावतीने या भागावर राज्य केल्याचा उल्लेख काही पुराणांमध्ये आहे.
शहरात पूर्वी चंपावतीचा किल्ला असल्याच्या खुणाही आहेत. शहराच्या आजूबाजूला तटबंदी आहे. 19 व्या शतकापर्यंत मराठवाड्यातील हा भाग निजामाच्या आधिन होता पण पुढे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि निजामांमधे झालेल्या युध्दानंतर हा भाग भारतीय गणराज्यात समाविष्ट झाले.
वनक्षेत्र व वनस्पती :
1978-89 साली जिल्ह्यात 21,600 हे. क्षेत्र जंगलांखाली होते. बहुतेक जंगले पाटोदा, आंबेजोगाई, आष्टी, केज, बीड, इ. तालुक्यांतच आढळतात. जंगले विस्तीर्ण प्रदेशात नसून लहानलहान टांपूमध्ये विखुरलेली आढळतात.
धावडा, आपटा, आवळा, सलाई,तेंदू, चंदन, टेम्रू, कांदोळ, लोखंडी, खैर, महुवा, पळस, हेन इ. येथील प्रमुख वनस्पति जंगलात आढळतात. जंगलांत बराचसा गवताळ प्रदेश असून कुसळी व शेडा हे गवताचे प्रमुख प्रकार तेथे आढळतात. यांशिवाय रोशा, मारवेल. सोफिआ, बोनी, कुंदा जातींचे गवतही आढळते.
शेती :
बीड जिल्हा कृषिप्रधान असून 80% लोक शेतीवर अवलंबून आहेत. ज्वारी हे जिल्ह्यातील प्रमुख पीक असून ते वर्षातून दोन वेळा घेतले जाते. ‘ज्वारीचा जिल्हा’ म्हणूनच याची प्रसिध्दी आहे. खरीप हंगमात ज्वारी, बाजरी, मूग, तूर, भात, भुईमूग इ. मुख्य पिके घेतली जातात.
रब्बी हंगामात जिल्ह्यात ज्वारी, गहू, हरभरा, यांचे प्रमाण जास्त असते. एकूण लागवडीखालील जमिनीपैकी 95% जमीन कोरडवाहू आहे. जिल्ह्यात भात, गहू, ज्वारी, बाजरी या पिकांखाली 5,13,570 हे. व हरभरा, तूर, व इतर कडधान्यांखाली 1,17,952 हे. क्षेत्र होते. या पिकांबरोबरच जलसिंचनाची सोय असलेल्या भागांत ऊस, फळे व भाजीपाला केला जातो.
नेताजी मैदान :
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांचा बीडच्या तरुणांवर मोठा पगडा होता. अंबाजोगाईच्या श्रीनिवास खोत यांना तर लोकांनी ‘छोटा सुभाष’ ही पदवीच दिली होती.
सुभाषबाबू बीडला येणार होते. ज्या रस्त्यावरून त्यांची मिरवणूक निघणार होती त्या रस्त्याला हळूहळू लोक ‘सुभाष रोड’ संबोधू लागले तर ज्या मैदानावर त्यांची सभा होणार होती त्या मैदानालाही ‘नेताजी मैदान’ संबोधले गेले. मात्र, काही कारणांमुळे नेताजी सुभाषचंद्र बीडला येऊ शकले नाहीत, पण त्यांचे नाव कायमपणे बीडच्या जनजीवनाचा भाग झाले.
सटवाई मंदिर :
सटवाई ही शंभर वर्षापूर्वी बीडकरांची ग्रामदेवता होती. मूल जन्मल्यावर पाचव्या दिवशी लोक सटवाईचे दर्शन घेऊन त्याचे भविष्य लिहून घ्यायचे. माळीवेस परिसरात उत्तरेस शिंदेंच्या मळ्यात आजही हे सटवाईचे मंदिर आहे. याच मंदिरामुळे हा सर्व भाग ‘सटवाई मैदान’ म्हणून ओळखला जात असे.
नंतर ‘बारादरी’ व आज ‘माळीवेस’ या नावाने हा भाग ओळखला जातो. आज माळीवेस नाही. ती साधारणत: दीडशे वर्षापूर्वी पाडण्यात आली. इतिहास संशोधक डॉ. सतीश साळुंके यांच्या ‘बीड जिल्ह्याचा प्राचीन व मध्ययुगीन इतिहास’ या ग्रंथात या वेशीवरील शिलालेख आला आहे.
शंभर वर्षांपूर्वीच्या बीडच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक जीवनात महत्त्वाची सामूहिक स्थळे असणारे सटवाई मैदान, नेताजी मैदान, किल्ले मैदान आज वाढत्या लोकसंख्येने आपल्या उदरात घेतली. नेताजी मैदानाचे रूपांतर आज नव्या भाजी मंडईत, तर सटवाई मैदानाचे प्रशस्त वस्तीत रूपांतर झाले. याच भागात बारादरी नावाची वास्तू होती.
ही बारादरी म्हणजे सुलतानजी निंबाळकरांचे निवासस्थान होते. या वास्तूत काही काळ न्यायालय चालले. याच न्यायालयाने इ.स. 1890 मध्ये बीडला झालेल्या उठावातील सात क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते व महत्त्वाच्या स्थळांना आज ज्या नावाने संबोधले जाते, ही नावे कशी पडली याची ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी अभ्यासताना बीडच्या इतिहासातील अनेक दुव्यांवर प्रकाश पडतो.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळ :
बालाघाट डोंगरावर व गोदावरी नदीच्या काठावर अनेक प्रसिध्द धार्मिक ठिकाणे आहेत. बीड शहर जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून येथील कनकालेश्वराचे जलमंदिर कलात्मक बांधणीमुळे प्रसिध्द आहे.
बीडपासून 20 किमी. अंतरावरील मांजरसुंभा गावाजवळच मन्मथ स्वामींचे मंदिर असून ते लिंगायत लोकांचे पूज्य स्थान आहे. येथील कपिलधार धबधबा प्रसिद्ध आहे.
शहरातील खंडोबा मंदिरासमोरील उंच दीपमाळा व शहराजवळच असलेले टेकडीवरील खंडेश्वरीचे प्राचीन मंदिर ही प्रेक्षणीय आहेत. येथील शहेनशावली, बालाशाह इ. दर्गे प्रसिध्द आहेत. बीड शहराच्या पश्चिमेस 4 किमी. वर प्रसिध्द ‘खजाना विहीर’ आहे.
आंबेजोगाई येथे आद्य कवी मुकुंदराजांची समाधी, दासोपंत,जोगाई, खोलेश्वर यांची प्रेक्षणीय मंदिरे, प्राचीन गुफा व दासोपंताची ‘पासोडी’ आजही पहावयास मिळते.
जिल्ह्यात महानुभाव संप्रदायाची तीर्थस्थळे असून पांचाळेश्चर हे विशेष प्रसिद्ध आहे. हे स्थळ गोदावरी नदीच्या तीरावर असून नदीपात्रात मध्यभागी दत्तमंदिर आहे. हे ठिकाण दत्तात्रेयाचे भोजनस्थळ म्हणून मानले जाते.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
- Essay On Taj Mahal In Marathi
- Essay On Indian Constitution Day In Marathi
- Essay On Mobile Addiction In Marathi
- Essay On Bank In Marathi
- Essay On Election In Marathi
- Essay On Yoga In Marathi
- Child Labour Essay In Marathi
- Doordarshan Essay In Marathi
- Essay On Metro Rail In Marathi
- Essay On World Wildlife Day In Marathi
- My Country India Essay In Marathi
FAQ
बीड जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे?
परळी-वैजनाथचे ज्योतिर्लिंग आणि अंबेजोगाईचे योगेश्वरी मंदिर हे देशातील प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील एकमेव मोर अभयारण्य बीड जिल्ह्यात आहे.
बीड जिल्ह्याचे जुने नाव काय आहे?
चंपावती-नगरी
बीडमध्ये कोणते फळ प्रसिद्ध आहे?
सीताफळ
बीड जिल्ह्यात कोणती पिके घेतली जातात?
बीड. खरीप हंगामात बीड जिल्ह्यात सोयाबीन, कबुतर वाटाणा, मोती बाजरी, मका (धान्य), काळा हरभरा (कडधान्य), ज्वारी, शेंगदाणे, सूर्यफूल (तेलबिया) आणि कापूस, ऊस (नगदी) ही प्रमुख पिके आहेत.
बीडमधील प्रसिद्ध खाद्यपदार्थ कोणते?
वडा पाव आणि मिसळ पाव यांसारख्या लिप-स्माकिंग स्ट्रीट स्नॅक्सपासून ते वरण भात आणि पिठला भाकरी सारख्या स्वादिष्ट मुख्य कोर्सेसपर्यंत, तुम्ही प्रत्येक चाव्यात महाराष्ट्रातील अस्सल चव चाखू शकता.