Maldive Information In Marathi मालदीव हा एक प्रजासत्ताक देश असून तो दक्षिण आशियाच्या हिंद महासागराच्या अरबी समुद्रामधील द्वीप समूह आहे. हा देश भारताच्या लक्षद्वीप द्वीपसमूहाजवळ मिनिकॉय द्वीप आणि चागोस द्वीपसमूहांदरम्यान 26 बेटांवर उत्तर-दक्षिण असा वसलेला आहे. ही द्वीपे श्रीलंकेच्या नैर्ऋत्येस 750 किलोमीटरवर आणि भारताच्या नैर्ऋत्येस 600 किलोमीटरवर आहेत. माले ही मालदीवची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथील इस्लाम हा प्रमुख धर्म आहे. हा देश इस्लामिक सहकारी संघटना, सार्क राष्ट्रकुल परिषद, अलिप्त राष्ट्रगट चळवळ, संयुक्त राष्ट्रे इत्यादी आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे. या देशाचे चलन मालदेवी रुफीया हे आहे. 100 लारी मिळून एक रुफीया होतो.
मालदीव देशाची संपूर्ण माहिती Maldive Information In Marathi
क्षेत्रफळ व विस्तार :
मालदीव या देशाचे क्षेत्रफळ 298 चौरस किलोमीटर असून याचा दक्षिणोत्तर विस्तार 820 किमी. व पूर्व पश्चिम विस्तार हा 130 किमी. आहे. भारताच्या दक्षिणेला असलेले हे आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राष्ट्र आहे.
हवामान :
मालदीव बेटांचे हवामान हे विषुववृत्तीय प्रकारचे असून उष्ण व आर्द्र आहे. येथील वार्षिक सरासरी तापमान हे 27° c असते. ईशान्य मोसमी वाऱ्यांच्या काळात म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च या महिन्यात हवामान हे सौम्य उत्साहवर्धक असते तर नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या काळात हवामान हे वादळी स्वरूपाचे व जोरदार पावसाचे असते. दक्षिण भागात वार्षिक सरासरी पावसाचे प्रमाण 380 सेमी तर उत्तर भागात 250 सेमी असते.
भाषा :
मालदीवची राष्ट्रभाषा दिवेही असून तिचे श्रीलंकेतील जुन्या सिंहली भाषेशी साम्य दिसून येते. अलीकडे अरबी व उर्दू भाषांचाही येथे अधिक प्रभाव झालेला दिसून येतो. 17 व्या शतकात थाना डीपीचा विकास झाला असून ह्या लिपीत उजवीकडून डावीकडे लिहिण्याची प्रथा आहे. या देशातील 3% लोक इंग्रजी भाषा बोलतात.
मालदीवची राष्ट्रभाषा दिवेही असून तिचे श्रीलंकेतील जुन्या सिंहली भाषेशी साम्य दिसून येते. अलीकडे अरबी व उर्दू भाषांचाही येथे अधिक प्रभाव झालेला दिसून येतो. 17 व्या शतकात थाना डीपीचा विकास झाला असून ह्या लिपीत उजवीकडून डावीकडे लिहिण्याची प्रथा आहे. या देशातील 3% लोक इंग्रजी भाषा बोलतात.
इतिहास :
टॉलेमीच्या लेखनावरून पाश्चिमात्यांना दुसऱ्या शतकात मालदीव या बेटांविषयी प्रथमच माहिती मिळाली. दक्षिण आशियाई लोकांनी येथे सर्वप्रथम आपल्या वसाहती स्थापन केलेल्या असावेत. तसेच प्राचीन काळी मालदीव वर चीनचा ताबा असल्याचे दिसून येते. त्यानंतर पश्चिम भारतातील मनाली राज्यांकडे मालदींकडून वार्षिक खंडणी पाठवली गेली.
1153 मध्ये अरब व्यापाऱ्यांनी येथे इस्लाम धर्माचा प्रचार व प्रसार केला. तेव्हापासून 1953 पर्यंत 92 सुलतानांनी मालदीव व राज्य केले. तेराशे त्रेचाळीस मध्ये प्रसिद्ध अरबी प्रवासी इब्न बतूता याने या बेटांना भेट देऊन काही काळ येथे घालवला व त्यांची पत्नी ही ह्याच देशाची होती.
मालदीवमधील पर्यटनास 1972 मध्ये सुरुवात झाली. 1960 च्या दशकात मालदीव द्वीपसमूहाला भेट देणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या मिशनने मालदीव द्वीपसमूह पर्यटनासाठी योग्य स्थान नसल्याचे जाहीर केले.
त्यानंतर 1972 मध्ये मालदीवमध्ये प्रथम रिसॉर्ट सुरू करण्यात आले आणि त्याच वर्षी म्हणजे फेब्रुवारी 1972 मध्ये पहिल्या पर्यटकांच्या गटाचे आगमन झाले आणि तेव्हापासून मालदीवमध्ये पर्यटन व्यवसाय वाढला असे मानले जाते.
मालदीव मधील पर्यटनाची सुरुवात दोन रिसोर्ट ने सुरू झाली ज्याची क्षमता 280 लोकांना सामावून घेण्याची होती. कुरुंबा आयलँड रिसॉर्ट हे मालदीव मध्ये सुरू झालेले पहिले रिसॉर्ट होते.
वनस्पती व प्राणी :
मालदीव या देशांमध्ये बेटांवर खुरट्यावर लहान लहान झुडपांची दाट आच्छादन केलेल्या वनस्पती आढळतात. त्या व्यतिरिक्त नारळ, विलायची, फणस, पपई, केळी, आंबा, वड इत्यादी वृक्ष ही मोठ्या प्रमाणावर आढळतात.
प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उंदीर तसेच फळ खाणारे प्राणी ससे वटवाघुळे व पक्षांमध्ये कावळे, बदके, बिटर्न, गोविंदा पाणी लावा व अनेक प्रकारचे समुद्र पक्षी आढळतात. त्या व्यतिरिक्त भुंगेरे, विंचू जमिनीवर खेकडे सर्वत्र दिसून येतात. समुद्रकिनाऱ्यावर स्मरसमुद्रात कासवे व इतर कवचधारी प्राणी तलवार मासा, मुशा, घड्याळ मासा इत्यादी जलचर प्राणी मोठ्या प्रमाणात सापडतात.
शेती :
या देशातील 10% जमीन हे शेती योग्य असून या देशामध्ये भोपळा, रताळी, ज्वारी, अननस, ऊस, बदाम तसेच उष्णकटिबंधीय प्रदेशात येणाऱ्या भाजीपाल्यांचे व फळांचे उत्पादन घेतले जाते. हे उत्पादने आपल्या घराजवळील बागेमध्ये देखील घेतली जातात नारळाच्या झाडांपासून खोबरे व काथ्या तयार करणे ही येथील प्रमुख उत्पादने आहेत. येथील लोकांचे मुख्य अन्न भात व मासे हे असले तरी तांदळाची आयात त्यांना करावी लागते.
वाहतूक :
या देशांमध्ये बेटा बेटांमध्ये लहान लहान बोटीन द्वारे वाहतूक केली जाते. तसेच भारत श्रीलंका व सिंगापूर या देशांशी जहाजाने वाहतूक केली जाते. माले येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून हे हुलूलू बेटावर आहे. येथूनच हवाई वाहतूक चालवली जाते. तसेच माले येथे व इतर काही बेटांवर रस्ते वाहतूकही केली जाते देशात पायी किंवा सायकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप आहे.
लोक व समाजजीवन :
हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असल्यामुळे येथील लोकसंख्या ही खूपच कमी आहे. या देशातील मूळ रहिवाशांविषयी अजूनही येथे माहिती उपलब्ध नाही. कदाचित ते द्रविड वंशीय असावेत असा अंदाज आहे.
उत्तरेकडील बेटांवर लोकांचा पश्चिम भारत, अरबस्थान व उत्तर आफ्रिकेतील लोकांशी बेटी व्यवहार झाल्याने तेथे संमिश्र लोकसंख्या आढळून येते. तसेच दक्षिणेकडील बेटांवरील लोकांची श्रीलंकेमधील सिंहली लोकांशी शारीरिक साम्य आढळते. आफ्रिकन मधून आणलेल्या निग्रो गुलामांनी केलेल्या विवाह मुळे त्यांचे मिश्रण हे येथे आपल्याला पहायला मिळते.
प्राचीन काळी येथे लोक बौद्ध धर्मीय होते. 12 व्या शतकात त्यांची इस्लामीकरण करण्यात आले. आज इस्लाम हाच तेथील प्रमुख धर्म आहे. या देशात कायद्यानुसार वधूचे विवाह समयीचे वय किमान 15 वर्ष ठरवण्यात आले असून घटस्फोटाचे प्रमाणही येथे जास्त आढळून येते. येथील निम्म्यापेक्षा जास्त स्त्रियांनी चार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा विवाह केलेले आहे.
तसेच 80% स्त्रियांनी निदान दोन वेळा तरी विवाह केलेले आहेत. माले एक या शहरातील घरांचे कोलंबोतील घरांशी बरेचसे साम्य आढळून येते. बऱ्याच घरांच्या बांधणीत नारळाच्या लाकडाचा उपयोग केलेला दिसून येतो घराचे छपरा कौलारू किंवा जास्त विलेपित लोखंडाच्या पत्राचे असतात.
पर्यटन स्थळ :
मालदीव हे जगातील अनेक ठिकाणांपैकी एक आहे. जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असते मालदीव येथे व्हेल शार्कची संख्या खूप मोठी आहे. या व्हेल, शार्क माशांना आपण सहज समुद्रामध्ये सहज पाहू शकतो.
मालदीवच्या बऱ्याच किनार्यांवर सुंदर पांढरी वाळू आहे. ही पांढरी वाळू आश्चर्यकारक आणि अतिशय बारीक आहे. कोरलाइन बीच अत्यंत दुर्मिळ आहे आणि जगात फक्त 5% बीच आढळतात. त्यामुळे मालदीवच्या बीचला जगाचे स्वर्गही म्हटले जाते.
राजधानीचे शहर माले हे एकमेव पर्यटन स्थळ असून देशाच्या सर्वसाधारण मध्यभागी वसलेले आहे. येथे अनेक पर्यटक दरवर्षी भेट देत असतात.
मालदीवच्या समुद्रामध्ये अनेक प्रकारच्या दुर्मिळ कासवांच्या प्रजाती आढळून येतात. ज्यामध्ये लेदर बॅकपासून लांब मानेच्या आणि हिरव्या कासवांचाही समावेश होतो.
मालदीव हे जगातील सर्वात सपाट ठिकाण पैकी एक आहे. येथील उंची समुद्र सपाटीपासून केवळ 1.5 मीटर आहे.
मालदीव मध्ये पर्यटकांची संख्या हळूहळू वाढत चाललेली आहे. पर्यावरणाची काळजी घेणाऱ्यांनी ते वाचवता यावे म्हणून अनेक कायदे केले आहेत. येथे समुद्राच्या निसर्गरम्य आणि शांततेचा आनंद घेता येतो.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.