कर्नाटक राज्याची संपूर्ण माहिती Karnatak Information In Marathi

Karnatak Information In Marathi कर्नाटक हे भारतीय संघराज्यातील एक घटक राज्य आहे. कर्नाटक हे राज्य सुरुवातीला मैसूर या नावाने प्रसिद्ध होते. कर्नाटकची राजधानी बंगलोर हे आहे. तर चला मग कर्नाटक या राज्य विषयी आपण आणखीन माहिती जाणून घेऊया.

Karnatak Information In Marathi

कर्नाटक राज्याची संपूर्ण माहिती Karnatak Information In Marathi

विस्तार व क्षेत्रफळ :

कर्नाटकाच्या पश्चिमेला अरबी समुद्र व गोवा हे राज्य आहे उत्तरेला महाराष्ट्र, पूर्वेला आंध्रप्रदेश आणि दक्षिणेला केरळ व तमिळनाडू ही राज्ये येतात. राज्याचे क्षेत्रफळ 1,91,976 चौरस किलोमीटर इतके आहे. ते भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या 5.83% इतके आहे. कर्नाटक हे क्षेत्रफळानुसार भारतातले 8 वे मोठे राज्य आहे.

समाजजीवन :

कर्नाटकी राज्याची लोकसंख्या ही 5,28,50,562 एवढी आहे. कर्नाटक राज्याला द्रविड प्रदेश समजला जात असला, तरी तेथील लोकांमध्ये सर्व प्रकारचे मिश्रण आढळते.

येथे काही मूळ आदिवासी लोक अद्यापही भटके, शिकारी व कंदमुळे गोळा करणारे जीवन जगतात. गवती झोपड्यांत राहतात, पुढच्या वर्षी दुसर्‍या भागात जाताना पहिली जाळून टाकतात.

अशा अनुसूचित जमातींची संख्या 1971 मध्ये 0.08% असून त्यात तोडा, जेनू कुरुबा, बेट्टाद कुरुबा, इरूलिगा, कट्टुनायकन, कणियन, कम्मार, गौडलू, येरावा, हसालास इ. जमातींचा समावेश होतो. याशिवाय येथे अनुसूचित जाती 13.1% होत्या.

ऐतिहासिक काळात हा प्रदेश मध्यवर्ती वाटेवर येत असल्याने येथे तमिळ, तेलुगू, मराठी, मलयाळम्‌, उर्दू, हिंदी वगैरे भाषा बोलणार्‍यांची वसती झाली. यांची संख्या 1961 मध्ये 50% होती. कर्नाटकात, विशेषतः दक्षिणेकडे, पौर्वात्य संस्कृतीचा प्रभाव अधिक जाणवतो.

भाषा :

कन्नड ही राज्याची मुख्य भाषा असून मराठी, कोकणी, तुळू व तामिळ ह्याही काही भाषा बोलल्या जातात.

कर्नाटकातील कला व संगीत :

कर्नाटकातील कलापरंपरा व संगीत कला दीर्घ व समृद्ध आहे. पाचव्या शतकापासून सोळाव्या शतकापर्यंत कर्नाटकातील मंदिरादी वास्तुनिर्मितीचा प्रवाह अखंडपणे वाहत राहिला.

उत्तरेकडील नागर वास्तुशैली आणि दक्षिणेकडील द्राविड वास्तुशैली यांच्या सुरेख संगमातून चालुक्य वंशाच्या काळात चालुक्य वास्तुशैली जन्मास आली. या शैलीने नटलेली सर्वसाधारणतः सुस्थितीत असलेली अनेक मंदिरे पट्टदकल, बादामी, महाकूट, ऐहोळे, आलमपूर, इट्टगी, गदग वगैरे ठिकाणी आढळतात.

See also  गोवा राज्याची संपूर्ण माहिती Goa Information In Marathi

त्यांतील दुर्गा, हुच्चीमल्लीगुडी, पापनाथ, विरुपाक्ष, संगमेश्वर, विश्वब्रह्म वगैरे मंदिरे कलादृष्ट्या अप्रतिम आहेत. इट्टगी व गदग येथील मंदिरे अकराव्या शतकात चालुक्यांनी बांधली. या मंदिरांतील मूर्तिकाम हे प्रमाणबद्धता, सजीवता व ढब या दृष्टीने फारच बोलके आहे.

कर्नाटक संगीत ही कर्नाटकाने जोपासलेली श्रेष्ठ संगीत परंपरा आहे. कर्नाटकातील वीरशैव व वैष्णव संप्रदायातील कवींनी गीतरचनेची एक अखंड परंपराच निर्माण केली. पुरंदरदासाची कीर्तने म्हणजे संगीतविषयक वेगवेगळे प्रयोगच होत. त्यागराजाने कर्नाटक संगीत अधिक लोकप्रिय केले. लोक संगीताचा आविष्कार कन्नड यक्षगानातून दिसून येतो.

रंगभूमी :

कर्नाटकात तुंगभद्रेच्या उत्तरेस उत्तर भारतीय पद्धतीचे नृत्य, नाट्य, संगीत इ. लोकप्रिय आहे, तर तिच्या दक्षिणेस कर्नाटक संगीत व दाक्षिणात्य नृत्य, नाट्य, संगीत प्रचलित आहे. लोकजीवनात यक्षगान किंवा बयलाट हे नृत्यनाट्य अनुनर्श प्रचारात आहे.

म्हैसूर संस्थानात अनेक विद्वानांनी संस्कृत व इंग्रजी नाटकांची रूपांतरे केली, त्यांत बसप्पाशास्त्री, सुब्बाशास्त्री, अनंत नारायण शास्त्री, अय्यशास्त्री, गिरिभट्टरतिमय्य, व्यंकटाचार्य, नंजनगुडू श्रीकंठशास्त्री, बेळ्ळाबे नरहरिशास्त्री यांचा अंतर्भाव होतो.

कर्नाटक मधील व्यवसाय व उद्योग :

कर्नाटक हे कृषिप्रधान राज्य आहे. खरीप व रब्बी अशी दोन्ही पिके घेतली जातात. ज्वारी, भात, रागी, बाजरी, गहू व कडधान्ये ही राज्यातील मुख्य अन्नधान्याची पिके आहेत. नगदी पिकांत ऊस,

कापूस, तेलबिया, तंबाखू, मिरची, सुपारी, नारळ, कॉफी, काजू, वेलदोडे, मिरे व द्राक्ष-मोसंबी ही मुख्य पिके आहेत. कापूस, बाजरी आणि कडधान्यांच्या उत्पादनाविषयी उत्तर मैदान प्रसिद्ध आहे. दक्षिण मैदानात भात हे मुख्य पीक असून त्याखालोखाल रागीचे पीक महत्त्वाचे आहे.

निपाणी-चिकोडीचा तंबाखू संकेश्वर-ब्याडगीची मिरची मलनाडातील नारळ सह्याद्री पट्ट्यातील सुपारी, वेलदोडे, मिरी व बाबा बुढण प्रदेशाची कॉफी यांना भारतात व परदेशांत चांगली मागणी असते. रेशीम उद्योग हा कर्नाटकमधील प्राचीन उद्योग असून आता त्याला मोठ्या व्यवसायाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भारताच्या एकूण रेशीम उत्पादनाचा मोठा हिस्सा बंगळूर परिसरातून येतो.

See also  ओडिसा राज्याची संपूर्ण माहिती Odisha Information In Marathi

वाहतूक व दळणवळण मार्ग :

राज्याची मुख्य वाहतूक राज्य व ‍राष्ट्रीय महामार्गावरून होते. राज्यात एकूण 14,000 किमी लांबीचे रस्ते आहेत. कर्नाटक राज्य परिवाहन ही राज्यातील सर्वात मोठी प्रवासी वाहतूक संस्था असून 25,000 लोक काम करतात. जे दिवसाला सरासरी 22 लाख प्रवाशांची वाहतूक करतात.

कर्नाटकातील हवाई वाहतूक फारशी विकसित झालेली नाही.  बंगळूरचा केंपेगौडा विमानतळ राज्यातील सर्वात मोठा विमानतळ आहे.  मंगळूर, हुबळी, बेळगाव, हंपी व बेळ्ळारी येथेही विमानतळे आहे व बंगळूरहून बहुतेक जोडली आहेत. भारताच्या खाजगी विमान कंपन्यांपैकी किंगफिशर व एअर डेक्कन ह्या बेंगलोरमधल्या कंपन्या आहेत.

कर्नाटक मध्ये 3,089 किमी लांबीचे लोहमार्ग आहेत. किनारपट्टीच्या भागातील रेल्वे कोकण रेल्वेच्या अंतर्गत येते तर बहुतेक इतर भाग नैरुत्य विभागात येतात. रेल्वेचा काही भाग दक्षिण रेल्वे मध्येही मोडतो. बेंगलोरचे इतर शहरांशी लोहमार्गाचे जाळे विस्तृत आहे. परंतु इतर शहरांचे एकमेकांशी जाळे तेवढे विकसित झालेले नाही. कर्नाटकात एकूण 11 बंदरे आहेत. मेंगलोर हे सर्वात महत्त्वाचे बंदर आहे.

वनस्पती व प्राणी :

कर्नाटक हे राज्य विशेष वनांनी बहरलेल्या पर्वतरांगांनी आर्थिक दृष्ट्या उपयुक्त असलेल्या अनेक समृद्ध वृक्ष गट, दांडेली, बांदिपूर, नगरहोळे अशी अभयारण्ये व प्राणिज संपत्तीनी प्रसिद्ध आहे. राज्याच्या एकंदर क्षेत्रफळापैकी सु. 18.4% भाग वनांनी व्यापला आहे.

त्यात सह्याद्रीतील पावसाळी सदाहरित अरण्ये, त्यालगतच्या दोन्ही बाजूंस असलेली मोसमी पानझडी अरण्ये आणि मध्य व पूर्व भागी डोंगराळ प्रदेशातील गवताळ चराऊ राने, असे मुख्य भाग दिसतात.

खडकाळ प्रदेशात खुरटी व काटेरी वनस्पती, पावसाळी भागात कळकाची बेटे, पूर्व मैदानी प्रदेशांत नद्यांकाठी बाभळीची बने आणि समुद्र किनारा व खाड्या येथे सुंद्रीची बने, अशी स्थानिक विविधता आढळते. येल्लापूर, शिमोगा, बाबा बुढण व कूर्ग या परिसरात वनश्री आर्थिक दृष्ट्या सागवान व चंदन हे येथील विशेष महत्त्वाचे वृक्ष आहेत.

याव्यतिरिक्त इतर जातीच्या वृक्षांनाही पेठेत वाढती मागणी असते. बांबू व सिमूळ या प्रकारच्या मऊ लाकूड असणार्‍या वृक्षांपासून कागद व पुठ्ठे तयार करण्याचे कारखाने उभारलेले आहेत. मलबेरी, ऐन, धावडा, आंबा, सुरू, निलगिरी, शिसवी, रोजवुड इ. काही उपयुक्त वृक्षही राज्यात आढळतात.

See also  झारखंड राज्याची संपूर्ण माहिती Jharkhand Information In Marathi

अनेक रानटी पशुपक्ष्यांत हत्ती, गवे, रेडे, पट्ट्याचे वाघ, तरस, अस्वले, मोर, सांबर, चित्ते, लांडगे व निरनिराळ्या प्रकारची हरिणे मुख्यत्वे आढळतात. सरीसृपांचे विविध प्रकार आहेत. समुद्रात व नद्यांमध्ये विपुल मत्स्यसंपत्ती असून पक्षीही विविध प्रकारचे आहेत.

पर्यटन स्थळ :

पर्यटनात कर्नाटकचा भारतात चौथा क्रमांक लागतो. राज्यसरकारने आत्तापर्यंत 752 स्थळे संरक्षित केली आहेत. या स्थळांव्यतिरिक्त आणखी 25,000 स्थळे संरक्षित करण्याजोगी आहेत. भारताच्या दोन सर्वात जास्ती उंचीचे धबधबे कर्नाटकातच आहेत.

जोग धबधबा व कावेरी धबधबा हे भारताच्या सर्वात उंचीचे नदीवरील धबधबे आहेत. जोग धबधबा हा भारताच्या सर्वाधिक उंचीचा धबधबा आहे. इतर धबधब्यांमध्ये गोकाक, उन्चाली, मगूड हे येतात. पावसाळ्याच्या दिवसात यांना पहाण्यास पर्यटकांची पसंती असते.

कर्नाटकात 25 अभयारण्ये आणि 5 राष्ट्रीय उद्याने आहेत.  बंदीपूर राष्ट्रीय उद्यान, बणेरघट्टा राष्ट्रीय उद्यान आणि नागरहोळ राष्ट्रीय उद्यान ही सर्वात जास्त लोकप्रिय उद्याने आहेत.

हंपी येथील विजयनगर साम्राज्याचे अवशेष व  पट्टडकल येथील स्मारके यांना जागतिक वारसा म्हणून युनेस्कोच्या यादीत स्थान मिळाले आहे. बादामीच्या गुहांमधली मंदिरे आणि ऐहोळे येथील बदामी-चालुक्यीय ढंगात असलेल्या वास्तू पर्यटकांना आकर्षून घेतात.

विजापूरचा गोलघुमट हा दख्खनी सल्तनतींच्या स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना आहे. श्रवण बेळगोळा येथील मूर्तीस अभिषेक घालण्यास हजारो जैन धर्मीय भेट देतात.

केरळ मधील आयुर्वेदिक उपचार केंद्रांच्या कर्नाटक मध्ये अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू झाले आहेत. देशातून तसेच परदेशातून अनेक पर्यटक अशा प्रकारच्या उपचार केंद्रांमध्ये हवापालट व उपचारांसाठी येतात.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Child Labour Essay In Marathi

Doordarshan Essay In Marathi

Essay On Metro Rail In Marathi

Essay On World Wildlife Day In Marathi

My Country India Essay In Marathi

Subhash Chandra Bose Essay In Marathi

My School Essay In Marathi

Essay On Makar Sankranti In Marathi

Leave a Comment