आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

Iceland Information In Marathi आइसलँड हा उत्तर युरोपातील उत्तर अटलांटिक महासागरात वसलेला एक द्वीप देश असून त्याची राजधनी रेयक्यविक ही व सर्वांत मोठे शहर आहे. या देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर अकुरे हे आहे. या देशाचे राष्ट्रीय चलन हे आइसलँडिक क्रोना हे आहे. हा आइसलँड निसर्ग सौंदर्यसृष्टीने नटलेले असून येथे अनेक पर्यटन स्थळ आहेत. जे पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतात. तर चला मग जाणून घेऊया या देशाविषयी सविस्तर माहिती.

Iceland Information In Marathi

आइसलँड देशाची संपूर्ण माहिती Iceland Information In Marathi

क्षेत्रफळ व विस्तार :

आइसलँडचे क्षेत्रफळ 1,03,100 चौरस किलोमीटर असून या देशाचा अक्षांश 63° 24′ ते 66° 33′ उत्तर आहे तसेच उत्तरेकडील व दक्षिणेकडील बेटे धरून 63°19′ उत्तर ते 67°10′ उत्तर व रेखांश13°30′ ते 24°32′ पश्चिम आहे पूर्व पश्चिम लांबी 480 किलोमीटर असून दक्षिण उत्तर लांबी 300 किलोमीटर आहे. तसेच हे ग्रीनलँडच्या आग्नेयला 190 किलोमीटरवर स्कॉटलंडच्या वायव्य दिशेला 800 किलोमीटर दूर आहे.

हवामान :

आइसलँड हे उत्तर ध्रुवाजवळ असले तर हे गल्फ प्रवाहामुळे आइसलँडचे तापमान हिवाळ्यातही फार जास्त खाली जात नाही. येथील हिवाळा मोठा व उन्हाळा खूपच कमी कालावधीचा असतो. राजधानीच्या शहरांमध्ये -1°c ते 11°c पर्यंत तापमान असते. तसे पाहता आइसलँड चे हवामान एक सारखे नसून नित्य बदलणारे असते.

या देशात वारे पाऊस व धोके हे नियमित असतात परंतु विजांचा कडकडाट येथे अनुभवाला येत नाही. वादळे ही निर्माण होत नाही वर्षाकाठी सरासरी 85 सेंटीमीटर पाऊस येथे पडतो तर काही भागांमध्ये पाऊस खूपच कमी पडतो उत्तरेकडील बेटांवर मध्यरात्रीचा सूर्य दिसतो.

भूरचना :

आइसलँड ची निर्मिती ज्वालामुखी प्रक्रियेने झालेली आहे. हिमयुगातील घडामोडींचे अनेक अवशेष येथे सापडतात. नैऋत्य किनाऱ्यालगातचा व काही दऱ्याखोऱ्यांच्या प्रदेश वगळला असता, बाकी सर्व प्रदेश पर्वतमय व पठारी आहे. याचा बारा टक्के भाग हिम नद्या व हिम क्षेत्राने व्यापलेला असून आग्नेयकडील वात्‍नायकूत्ल हिमक्षेत्र सर्वांत मोठे आहे त्याचे क्षेत्रफळ 7,547 चौ. कीमी. आहे. तसेच आइसलँडचा 11% प्रदेश लाव्हारसाच्या उद्रेकापासून बनलेला असून सध्या तिथे जिवंत ज्वालामुखींची संख्या 100 पर्यंत आहे.

लोकसंख्या व भाषा :

या देशाची लोकसंख्या जुलै 2009 च्या जनगणने प्रमाणे 3,06,694 एवढी असून या देशाची मुख्य भाषा नॉर्न या लोकांनी आणली पश्चिम नॉर्वे ची ती पूर्वी एक बोली होती. आजही त्याच सुरुवाती टिकून आहे. आइसलँडमध्ये आईसलॅडिक ही भाषा बोलली जाते.

इतिहास :

या देशाचा सुसंगत इतिहास उपलब्ध नाही परंतु प्राचीन काळी ग्रीक व रोहन लोकांना आइसलँडची माहिती होती. नॉर्वेचा इंगोल्फर आरनॉरसन याने 874 मध्ये रेक्याव्हीक येथे प्रथम वस्ती केली. त्यानंतर नॉर्वे, स्कॉटलंड, आयर्लंड, ऑर्कनी, शेटलंड व हेब्रिडीझमधून अरे त्या लोकांनी आपल्या वसाहती स्थापन केल्या.

व्हायकिंग राजांच्या एकतंत्री अंमलाचा कटू वृत्तीचा अनुभव घेतलेल्या वसाहत वाल्यांनी 930 मध्ये आइसलँडमध्ये उमरावशाहीसद्दश लोकशासन स्थापण्याचा प्रयत्न केला त्यांनी सर्व वसाहतींचे छत्तीस गटांमध्ये विभाजन केले व प्रत्येक गटाला एक नायक असे नेमून दिले.

नंतर वर्षातून दोन आठवडे थींगव्हेट्लिर येथे सर्व प्रमुखांची व जमाती यांची परिषद भरे. या भरलेल्या परिषदेला आल्थिंग असे म्हणत होते. आजही आईन्स्टाईन मधील संसदेला त्याच नावाने ओळखले जाते.

तसेच या परिषदेला कायदे करण्याचे व न्यायदानाचे अधिकार देखील होते. याच काळात एरिक द रेड च्या नेतृत्वाखाली ग्रीनलँडची वसाहत व त्यांचा मुलगा लेव्ह एरिक्सन याने लावलेला अमेरिकेचा शोध ह्या प्रमुख घटना घडल्यात. यांचे वर्णन आइस त्यांच्या सागा या साहित्य प्रकारांमध्ये मिळते.

वनस्पती व प्राणी :

आइसलँड मध्ये मोठ्या वनस्पती दुर्मिळ आहे परंतु गवत शेवाळ खुरटी वनस्पती व झुडपे येथे प्रमुख वनस्पती आहेत त्या व्यतिरिक्त ॲश, ॲस्पेन, बर्च आणि विलो हे वृक्ष ही काही ठिकाणी आढळतात. येथील वनांमध्ये फुलांच्या चारशे जाती आढळून येतात.

पाळीव प्राण्यांमध्ये जनावरात मेंढरे, घोडे, बकऱ्या, गाई हे मुख्य प्राणी असून येथे 16% लोकांचा व्यवसाय पशुपालन हा आहे. येथील जंगलांमध्ये खोकड मोर्चा प्राणी असून 18 व्या शतकापासून रेंडीयर येथे आणला गेला. या देशात पक्षी समूहांमध्ये बदक, सोनेरी प्लव्हर, कर्ल्यू, गिज, किरा, हंस हे मुख्य पक्षी आढळतात त्या व्यतिरिक्त आयडर डक व टर्मिझन हे पक्षी आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाच्या आहेत.

शेती व उद्योग :

आइसलँड मधील जमीन धारकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते प्रत्येक भूधारकांजवळ सरासरी पाचशे सहा हेक्टर जमीन आहे. येथील शेती ही यंत्रण द्वारा केली जाते. त्या शेतीमध्ये सरगम बटाटे व गवत हीच प्रमुख पिके घेतली जातात.

गरम झाल्याच्या सहाय्याने हॉट हाऊस कृषी पद्धतीने फळे, फुले व भाज्या यांचे उत्पन्न देखील काढले जाते पशुपालन हा शेतीला पूरक व्यवसाय असल्याने गवताच्या लागवडीला येथे फार महत्त्व आहे. बऱ्याच शेतकऱ्यांजवळ घोडा, गाय, कोंबड्या असे विविध प्राणी पाळतात. दूध व मास यांचा स्थानिक वापरातच खप होतो.

लोक व समाजजीवन :

आइसलँड चे लोक प्रामुख्याने स्कँडिनेव्हियनचे वंशज आहेत. येथील लोक शरीराने उंच, सशक्त व निळ्या डोळ्यांचे असतात. येथील 96% लोकधर्माने इव्हँजेलिकल ल्यूथरन पंथाचे आहेत. येथील शंभर टक्के लोकांचा साक्षरता असून सात ते पंधरा वयाच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आहे. येथील लोक आपापसात भेदभाव करीत नाही राष्ट्राध्यक्ष ही सामान्य माणसांप्रमाणेच वावरताना दिसतो. लोक मोकळ्या मनाचे व उदार स्वभावाचे आहेत.

खेळ :

आइसलँडचा कुस्ती हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जातो. त्या व्यतिरिक्त येथे सॉकर हँडबॉल बास्केटबॉल बर्फावरील खेळ आणि इतर व्यायाम प्रकार सर्वत्र पाहायला मिळतात. येथील सर्व मुलांना पोहता येणे हे कायद्याने आवश्यक आहे. ऊन पाणी खेळवलेले तलाव गावोगावी आढळतात. बुद्धिबळाचा खेळ देखील येथे लोकप्रिय आहे.

पर्यटन स्थळ :

आइसलँड मध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत. जे पर्यटकांना आकर्षित करत असतात व त्यांच्या मनाला मोहित करतात. अशाच काही पर्यटन स्थळांविषयी माहिती पाहूया.

नॉर्दन लाइट्स, आइसलँड :

आइसलँड त्याच्या सौंदर्य सृष्टीसाठी खूप प्रसिद्ध आहे येथे रंगीबिरंगी पर्वत आणि ज्वालामुखीच्या नद्या तुम्हाला पाहायला मिळतात. तसेच सर्वात विशेष म्हणजे नादर्न लाईट्स जगभरातील छायाचित्रकारांना त्यांच्या कॅमेऱ्यात टिपण्याचे वेड लावते.

व्हेल सफारी अँड पफिन बेट :

हे एक नैसर्गिक वातावरण असलेले ठिकाण असून यामध्ये वन्यजीव जवळून पाहता येतात. येथे समुद्रामध्ये व्हेल आणि डॉल्फिन पाहायला मिळतात तसेच देशी पक्षीही पाहता येतात. येथे आपण कुटुंब घेऊन जाऊ शकतो. व सहलीचा आनंद घेऊ शकतो.

टेगरा स्टोन न्यूअस :

हे आइसलँड मधील सर्वात लोकप्रिय ठिकाण आहे. हे आपल्या कुटुंबासाठी एक उत्तम स्थळ आहे.
येथे आपण नॅशनल पार्क, गर्लफोसचा धबधबा, एक भुतापीय गाव आणि अगदी गरम स्प्रिंग्स, गेयसर आणि स्ट्रोककुर पहायला मिळतो. व आपल्याला सहलीचा अनुभव घेता येतो.

आइसलँडचा दक्षिण कोस्ट टूर :

या ठिकाणावर मी ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये आपण जाऊ शकतो. येथे धबधबा आणि राष्ट्रीय उद्यान आहे. तसेच निसर्ग रम्य वातावरणाचा आपण आनंद घेऊ शकता. तुम्हालाही जर आइसलँडमध्ये सुट्टी घालायला जायचे असेल तर आपण नक्की जाऊ शकता.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांना शेअर करा.

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment