Bhutan Information in Marathi भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा देश असून चारही बाजू जमिनीने व्यापलेले आहेत. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतान हा पूर्व हिमालयाच्या पर्वतीय प्रदेशात स्थित एक देश आहे आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील सर्वात स्वच्छ देशांपैकी एक आहे. भूतानला ‘लँड ऑफ द थंडर ड्रॅगन’ असेही म्हटले जाते. भूतान हा देश विविध सौंदर्य सृष्टीने नटलेला असून येथे तुम्हालाही वेळ घालायला आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता. व येथील सौंदर्य पाहू शकता. तर चला मग जाणून घेऊया या देशाविषयी माहिती.
भूतान देशाची संपूर्ण माहिती Bhutan Information in Marathi
क्षेत्रफळ व सीमा :
भूतान या देशाचे क्षेत्रफळ 38,394 चौरस किलोमीटर असून या देशाच्या तीन दिशा भारताच्या सीमेला लागून असून एक दिशा चीन या देशाला लागलेली आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे.
लोकसंख्या :
भूतान या देशाची 2016 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या 7,99,000 एवढी आहे. येथील 94% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय असून या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म हा आहे येथे विविध सुंदर व भव्य बुद्ध मठ तसेच बुद्ध विहारे आहेत. या देशात 6% लोकसंख्या ही हिंदू आहे व बौद्ध संस्कृती सुंदर निसर्गाचा अद्भुत संगम या देशाने केलेला आहे.
हवामान :
या देशांमध्ये भिन्न आकाराची जमीन प्रदेश आढळून येत असल्यामुळे याचा परिणाम येथील हवामानावर होतो. पर्वतरांगा व जमले यामुळे तापमान उन्हाळ्यातही अल्हाददायक आपल्याला दिसून येते तर हिवाळ्यात हिमरेषेच्यावर बर्फवृष्टी होते. मध्य भूतान मध्ये 1100 ते 2300 मीटर उंचीच्या प्रदेशात हिवाळे थंड व उन्हाळे उबदार असतात.
तसेच उत्तर भूतानमध्ये टंड्रा प्रकारचे हवामान आढळते. तर येथील अधिक उंचीच्या भागांमध्ये बर्फा च्या टेकड्या असून येथे हिवाळे अति तीव्र व उन्हाळे सौम्य तसेच उंचीनुसार पर्जन्यमान अवलंबून असते 100 सेमी पासून 508 सेमी पर्यंत येथे पाऊस पडतो.
खनीज संपत्ती :
या देशांमध्ये जिप्सम तांबे हे दोन प्रमुख खनिजा आढळतात. या व्यतिरिक्त येथे शिसे, जस्त, वैदूर्य, टूफा, डोलोमाइट, ग्रॅफाइट, चुनखडी, संगमरवर, पाटीचा दगड, अभ्रक, पायराइट, संगजिरे हे खनिजही मोठ्या प्रमाणात देशांमध्ये सापडते. व बऱ्याच भागात दगडी कोळशाचे उत्पादन हे होते. या खनिजांवर येथे छोटे छोटे उद्योग चालतात.
वनस्पती व प्राणी :
या देशात जमिनीच्या उंच सखल प्रदेशानुसार येथे वनस्पतींमध्ये विविधता आढळून येते. भरपूर पावसाच्या प्रदेशात सदाहरित अरण्य आढळून येतात तर डोंगर माथ्यावर फर, पाइन, स्प्रूस, लार्च, ओक, बीच, मॅपल, सायप्रस, जूनिपर या जातींचे वृक्ष आढळतात. उत्तर भूतानमध्ये आल्पीय प्रकारच्या वनस्पती असून त्यांची उंची जास्त असते.
या देशांमध्ये तृणभक्षक व हिंस्रपाणी मोठ्या प्रमाणात आढळून येतात. कमी उंचीच्या प्रदेशातील जंगलांमध्ये चित्ता, वाघ, गेंडा हे प्राणी आढळतात अति दक्षिणेकडील प्रदेशात सांबर, अस्वल हत्ती, हरीण कस्तुरी, मृग, काळवीट, खेचर असे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आढळून येतात.
शेती :
मध्य भूतांमध्ये शेती योग्य असल्याने सुपीक मातीची खोरी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची आहे तसेच या खोऱ्यांमध्ये शेती हा व्यवसाय केला जातो. ही खोरी पूर्णतः एकत्रित नसून हिमालयाच्या दक्षिण उत्तर पर्वतरांगांमुळे एकमेकींपासून अलग झालेले आहेत. प्रदेशांच्या भिन्नतेनुसार सोपान शेती, डोंगर शेती व सखोल शेती अशा प्रकारची येथे शेती केल्या जाते.
शेताला दगडांचे बांधलेले असतात व सूची करणे वृक्षांचे आपल्याला कुंपण दिसते. दगडाने केलेल्या कालव्यातून दुरून पाणी आणले जाते व येथे गहू, तांदूळ, मक्का, सातू, सफरचंद ही प्रमुख उत्पादने घेतली जातात.
समाज जीवन :
भूतान या देशांमध्ये वेगवेगळ्या वंशाचे व जातीचे लोक असले तरी येथील बहुसंख्य लोक हे भुतिया व ड्रुक्पा संप्रदायाची अनुयायी आहेत.
महायान बौद्ध हा देशाचा अधिकृत धर्म असून 6000 लामांची वास्तव्य या देशात आहे तासी चोद् झांग येथे मुख्य धर्मपीठ आहे. देशाच्या महसुलांपैकी बराचसा महसूल लामा व त्यांचे मठ यांवर खर्च होतो.
कुटुंब रचना :
भूतानी कुटुंबांमध्ये, वारसा हक्क हा साधारणतः महिला नियोजित पुरुषांकडेच वळला जातो. मुलांची संगोपन स्त्रिया करतात. या देशातही प्रेम विवाह शहरी भागांमध्ये सामान्य मानले जाते परंतु लग्नांमध्ये परंपरा गावांमध्ये अजूनही सामान्यच आहे.
आहार :
या देशातील लोक आपल्या खाद्यपदार्थांमध्ये तांदूळ आणि मक्का रोजच्या गरजेनुसार समाविष्ट करतात. त्याव्यतिरिक्त मासा हारांमध्ये डुकराचे मांस गोमांस, वनगाय मास, चिकन आणि कुकरू यांचा समावेश होतो. चीज आणि मिरच्या फार मसालेदार तयार केला सर्वव्यापकता राष्ट्रीय डिश लोकांमध्ये लोकप्रिय आहे.
या देशात याक या प्राण्यांचा उपयोग बरचसा केला जातो त्या व्यतिरिक्त गाईच्या दुधापासून विशेष लोणी व चीज केले जाते व तेथील लोकांमध्ये हे लोकप्रिय आहे. येथील लोकांचा पेय लोणी चहा, काळा चहा, स्थानिक पातळीवर तांदुळाची दारू आणि बियर यांचा समावेश होतो. भूतान जगातील पहिला देश 2010च्या त्याच्या तंबाखू कायदा अंतर्गत तंबाखू विक्री बंदी घालण्यात आली आहे आहे.
खेळ :
भूतान या देशाचा सर्वात लोकप्रिय व राष्ट्रीय खेळ हा तिरंदाजी आहे. येथे अनेक स्पर्धा घेण्यात येतात तसेच खेड्यातही नियमित आपल्या खेळाचा सराव युवक करत असतात. त्यापैकी आणखीन एक लोकप्रिय खेळ म्हणजे बास्केटबॉल हा आहे.
वाहतूक व्यवस्था :
भूतानमध्ये रस्ते वाहतूक व हवाई मार्गे वाहतूक चालते परंतु या देशांमध्ये अजूनही रेल्वे सेवा उपलब्ध नाही. भारत सरकारने यासाठी त्यांना मदतीचा हात पुढे केला होता पण अजूनही यावर काहीही झालेलं नाही भूतान मध्ये पारो येथील विमानतळ हे भूतानमधील एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे.
भूतान मधील पर्यटन स्थळ :
भूतान या देशांमध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत त्या स्थळांविषयी आपण माहिती पाहूया.
झाकर :
झाकर ही चोखर व्हॅलीच्या पायथ्याशी वसलेली सुंदर अशी सर्वात मोठी दरी आहे. यालाच लिटल स्विझर्लंड म्हणूनही ओळखले जाते.
झाकर हे बुमथांग जिल्ह्याचे प्रमुख प्रशासकीय शहर आहे. हे ठिकाण मठ आणि झोंगांनी नटलेले आहे, ज्यामुळे ते इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमी दोघांसाठी एक आदर्श ठिकाण बनले आहे. झाकर अनेक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळांनी भरलेले आहे.
पारो शहर :
पारो हे भूतानच्या पारो व्हॅलीमध्ये असलेले एक छोटे शहर आहे जिथे 155 मंदिरे आणि मठ आहेत. पारो हे पर्यटन स्थळ असून जगातील बऱ्याच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करते. पारो हे 1259 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेले सुमारे 2280 मीटर उंचीवर चू नदीच्या काठावर वसलेले आहे. तसेच ही भूतांचे एकमेव आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि ते पृथ्वीवर उतरण्यासाठी सर्वात आव्हानात्मक विमानतळ मानली जाते.
थिंपू :
थिंपू हे भुतानची राजधानी आहे तसेच हे भुतानचे केंद्र म्हणून ओळखले जाते. हे देशाच्या मध्य पश्चिम भागात वसलेला आहे. जी पुनाखा नंतर 1961 मध्ये राजधानी घोषित करण्यात आली होती. या शहरात भुतानची जुनी रुढी, परंपरा अजूनही कायम आहे. त्यात बुद्ध डोरदेन्मा सारख्या विविध वास्तू संरचना आहेत, ज्या थिम्पूमध्ये प्रवेश केल्यावर दिसतात. टेक्सटाईल म्युझियम, लायब्ररी, आर्ट स्कूल आणि वीकेंड मार्केट ही येथील प्रमुख आकर्षणे आहेत.
फुंटशोलिंग
हे भूतानमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. जे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याची सीमा सामायिक करते. कोलकाता आणि सिलीगुडी येथील प्रवाशांसाठी हे प्रवेश बिंदू म्हणून काम करते आणि भूतानचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र आहे. इतर शहरांपेक्षा हे शहर नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने नटलेले आहे.
ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व इतरांनाही शेअर करा.