Best Slogans On Independence Day In Marathi 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले . हा दिवस सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहेत. आज मी इथे स्वातंत्र्य दिन वर काही घोषवाक्य लिहित आहेत . भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली . त्यांची आठवण म्हणून आपण हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतो .

“स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Slogans On Independence Day In Marathi
भारत माता कि जय !
जय जवान , जय किसान !
बलसागर भारत होवो , विश्वात शोभूनी राहो .
वंदेमातरम् !
देश विविध रंगाचा , देश विविध ढंगाचा ……
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा …..
रंग , रूप ,वेश , भाषा जरी अनेक आहेत ,
तरी सारे भारतीय एक आहेत ….
स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम ,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान …!
भारतीय राज्यघटना जगात आहे महान ,
तिच्या रक्षणाचे सदा राहू द्या भान ….!
तीन रंग प्रतिभेचे , नारंगी , पांढरा आणि हिरवा ,
रंगले न जाणे किती रक्ताने , तरी फडकतो मोठ्या उत्साहाने ..!!
तिरंगा तीन रंगांचा आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला .
स्वातंत्र्यासाठी ध्वज फडकतो , सूर्य तळपतो प्रगतीचा ,
भारतभूमीच्या पराक्रमाला मुजरा आमुचा मानाचा !!!
सुरक्षित भारत , सुविकसित भारत !!!
निशाण फडकत राही , निशाण झळकत राही ,
देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही !!!
देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं ,
ते कायमच मनात असावं ……
तर मित्रांनो “स्वातंत्र्य दिन” वर घोषवाक्य Slogans On Independence Day In Marathi तुम्हाला कसे वाटले याबद्दल आम्हाला जरूर कळवा , धन्यवाद !
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Metro Rail In Marathi
Essay On World Wildlife Day In Marathi
My Country India Essay In Marathi