एके दिवशी सर्व आवाज बंद झाले तर ……मराठी निबंध Sarv Aawaj Band Jhale Tar Marathi Nibandh

Sarv Aawaj Band Jhale Tar Marathi Nibandh माझ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी एके दिवशी सर्व आवाज बंद झाले तर ……. हा निबंध लिहित आहेत. हा निबंध मला माझे एक वाचक समृद्धी घाडगे यांनी लिहायला सांगितला आहेत. असेच तुम्हाला काही निबंध हवे असतील तर आम्हाला कॉमेंट करून सांगू शकता.

Sarv Aawaj Band Jhale Tar Marathi Nibandh

एके दिवशी सर्व आवाज बंद झाले तर ……मराठी निबंध Sarv Aawaj Band Jhale Tar Marathi Nibandh

असा कोणता दिवस येणार माहिती नाही , कि त्या दिवशी सर्व आवाज बंद होणार ? जर असे झाले तर बरेच आपले फायदे आणि नुकसान पण आहेत. जे मोठमोठ्या कंपन्यामुळे खूप आवाज येतात , वाहनामुळे खूप कर्कश आवाज येत असतात , त्याचा आपल्याला फायदा मिळेल.

आपण आताच पहिले होते कि, कोरोना च्या काळात मार्च ते एप्रिल महिन्यात संपूर्ण लॉकडाऊन झाले होते, तेव्हा आपल्या देशातील प्रदूषणात काही प्रमाणात घट झाली होती. तर अशाप्रकारे आपल्याला काहीसा फायदा होणार आहेत. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी झाल्यामुळे काहीसे ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण कमी झाले होते.

See also  शाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त मराठी निबंध Essay On Autobiography Of School Bag In Marathi

जर सर्व आवाज बंद झाले तर काहीसा चमत्कार झाला असेच समजायला हवेत. सर्व आवाज बंद झाले तर कुणी काहीपण बोलले तर आपल्याला ऐकू येणार नाही. केवळ ओठ हलविल्यासारखे आपल्याला वाटेल. मग मुक्या व्यक्तीप्रमाणे आपल्याला वागावे लागेल आणि हातवारे कसे बोलतात ती भाषा आपल्याला आत्मसात करावी लागेल.

खूप काही अडचणीना सामोरे जावे लागणार. आपण टी.व्ही. पाहू शकणार परंतु तिथे काय बोलत आहेत ते आपल्याला कळणार पण नाही. आपण जर कुणाला आवाज देतो म्हटलो तर ते शक्य होणार नाही , कारण समोरच्या व्यक्तीला आपला आवाज जाणारच नाही. आपल्याला संगीत ऐकायचे असेल तर आपण ते ऐकू शकणार नाही.

आपल्याला मोबाईल फोनवर बोलायचे असेल तर आपण बोलू शकणार नाहीत. सारे जग शांत झाल्यासारखे वाटेल. खरच हा एक अद्भुत चमत्कार होणार . आपण शाळेत शिकायला जात असतो तर आवाज बंद झाल्यामुळे आपल्याला काही समजणार नाही. नाहीतर सर्वांना मुक्याची शाळा सुरु करावी लागेल.

See also  भ्रष्टाचार वर मराठी निबंध Essay On Corruption In Marathi

सर्वांना हातवारे करून शिकवावे लागेल. आवाज बंद झाल्यामुळे होणारे फायदे तर आहेतच पण त्यापेक्षा नुकसान सुद्धा खूप आहेत. कुणाला मदत करायचे असेल तर त्याला जवळ यावेच लागेल. एके दिवशी पूर्ण आवाज बंद झाला तर आपल्याला असे वाटेल का आपण बहिरे तर नाही झालोत ? आपल्याला बहिरेपणा तर नाही आलात ? असे काही प्रश्न आपल्या समोर उभे होणार.

पशु- पक्ष्यांचा सुंदर आवाज आपल्याला ऐकू येणार नाही. कोकिळेचे ते सुंदर गाणे कुहू…. कुहू….. ऐकायला मिळणार नाहीत. खूप काही आवाज ऐकायला आपले कान तयार असतात. पण ते अशक्य होणार.

पण देव करो असा दिवस कधीच पहायला न मिळावा. नाहीतर खूप काही नुकसान सहन करावे लागेल.

See also  वेळेचे मूल्य वर मराठी निबंध Essay on Value of Time In Marathi

हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-

Leave a Comment