संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

संत ज्ञानेश्वर महाराज
आता विश्वात्मके देवें ! येणे वाग्यज्ञे तोषावे !
तोषोनि मज द्यावे ! पसायदान हे !!
जे खळांची व्यंकटी सांडो ! तया सत्कर्मी रति वाढो !!
भूतां परस्परें जडों ! मैत्र जीवाचे !! नमस्कार मित्रांनो वरील काव्यपंक्ती किंवा अभंग रचना ऐकली की आपल्याला आठवतात ते महान संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराज होय .

Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

महाराष्ट्राच्या या महान संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला खूपच महत्त्व आहे. अशातच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक मंदिराला परमार्थाचा कळस लावून ज्यांचे अलौकिक चरित्र पुढे आले ते म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. सुमारे जवळजवळ 725 वर्ष ज्या व्यक्तीमत्वाने महाराष्ट्रातील व समाजातील लोकांमध्ये आढळ स्थान निर्माण केले ते व्यक्तिमत्व म्हणजे संत ज्ञानेश्वर होय. संत ज्ञानेश्वर महाराज हे तेराव्या शतकातील एक थोर संत, वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक, कुशाग्र संत कवी, तत्त्वज्ञानी म्हणून ओळखले जात असे. त्यांनी वारकरी संप्रदायाचा वारसा आपल्या पुढील पिढीला देत मोलाची कामगिरी बजावलेली आहे.

प्राथमिक माहिती-

संत ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन १२७५ औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण मधील आपेगाव येथे झालेला आहे. त्यांचं हे गाव गोदावरी नदीच्या काठी वसलेले आहे त्यांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी ला झाला होता.संत ज्ञानेश्वर यांचा जन्म कुलकर्णी घराण्यात झाला होता.विठ्ठलपंत व रुक्मिणी बाई या दाम्पत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. संत ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव हे ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी असे होते.

त्यांचे वडील हे आधीपासूनच संन्याशी होते म्हणजेच त्यांनी आपल्या संसारिक जीवनाचा त्याग करून काशीला जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांच्या गुरूंना जेव्हा हे समजले की ते विवाहित आहेत तेव्हा त्यांच्या गुरुजींनी त्यांना परत गृहाश्रमात पाठवले गुरूंच्या आज्ञाचे पालन संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांनी केले व परत आल्यानंतर त्यांना चार मुले झाली .निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, व मुक्ताबाई अशी त्यांच्या अपत्यांची नावे आहेत.

See also  संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Maharaj Information In Marathi

सामाजिक जीवन-

त्यांचे वडील हे नेहमी तीर्थयात्रेला जात असे .अशाच वेळी तीर्थयात्रा करत करत त्यांचे वडील व त्यांचे संपूर्ण कुटुंब आळंदी येथे स्थायिक झाले .जसे की आपण वर पाहिले की त्यांच्या वडिलांनी आधी संन्यास घेतला होता पण गुरूंच्या आज्ञेचे पालन करत त्यांनी परत गृहाश्रमात प्रवेश केला होता.

पण एका संन्याशी व्यक्तीने परत गृहस्थाश्रम स्वीकारणे हे समाजाला काही मंजूर नव्हते. त्यामुळे विठ्ठल पंतांच्या कुटुंबाला समाजाकडून वाळीत टाकण्यात आले. त्यांनी धर्मशास्त्रींना विचारणा केली असता की यावर उपाय काय असेल त्यावेळी धर्मशास्त्रींनी त्यांना सांगितले की यावर एकच शिक्षा असते ती म्हणजे देह डंडाची शिक्षा.

ही शिक्षा विठ्ठल पंत व रुक्मिणीबाई यांनी स्वीकारली पण त्यांची मुलं बाळे ही पोरकी झाली. समाजाकडून त्यांना खूपच अवहेलना सहन करावी लागत असे. या चार मुलांना अन्न निवारा पाणी वस्त्र या मूलभूत गरजा देखील भागवणे अवघड झाले होते. समाजाने या मुलांची मुंज करणे देखील नाकारले होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांची कथा-

आपल्या आई-वडिलांनंतर आपल्याला कोणीही नसते ही जाणीव संत ज्ञानेश्वरांना झाली. व त्यांनी समाजातील अवहेलना व आजूबाजूची परिस्थिती पाहून गाव सोडण्याचा निर्णय घेतला व ते पैठणला रवाना झाले .तेथे जाऊन संत ज्ञानेश्वरांनी विद्वत्ता धारण करण्यास सुरुवात केली.

त्यांनी आपल्या कुशाग्र काव्य करण्याच्या बुद्धीचा वापर करून शब्दरचना करण्यास सुरुवात केली. आपले बंधू संत नामदेवांच्या साथीने त्यांनी भागवत धर्माचा प्रसार करण्यास सुरुवात केली. ही सर्व भावंडे घरोघरी जाऊन भिक्षा मागत असे व जे काही अन्न मिळेल त्यातून आपला उदरनिर्वाह करत असे.

अख्यायिका-

संत ज्ञानेश्वरांविषयी अनेक आख्यायिका या समाजामध्ये आजही प्रचलित आहेत. एके दिवशी मुक्ताबाई या आपल्या शेजाऱ्यांच्या घरी मांडे भाजण्यासाठी खापर मागायला गेल्या असताना त्यांना कोणीही खापर दिले नाही हे ज्ञानेश्वरांना समजताच त्यांनी मुक्ताबाईला आपल्या पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. असे म्हटले जाते की संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतलेले होते.

See also  संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

त्यांनी श्राद्धाच्या कार्यक्रमात प्रत्यक्ष मंत्राद्वारे पितृ पक्षांना उपस्थित केले असल्याची देखील आख्यायिका आहे. असे सांगितले जाते की जेव्हा चांगदेव महाराज वाघावर बसून संत ज्ञानेश्वर यांना भेटायला निघाले होते तेव्हा चांगदेव महाराजांचा अहंकार मोडण्यासाठी आपल्या भावंडासह एका निर्जीव भिंतीवर बसून ती भिंत संत ज्ञानेश्वरांनी चालवली असे सांगितले जाते.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे प्रसिद्ध ग्रंथ साहित्य-

वारकरी संप्रदायांना ज्या अभंगांनी भुरळ घातली त्या अभंगांची निर्मिती करणारे संत तुकाराम, संत निवृत्ती महाराज, संत ज्ञानदेव, संत सोपान ,मुक्ताबाई हा एक संतांचा वेळात होऊन गेला होता.

संत ज्ञानेश्वर महाराजांची गुरु हे संत निवृत्तीनाथ महाराज होते. गुरूंच्या कृपाशीर्वादाने नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांनी गीतेवर टीका लिहिली ही टीका ज्ञानेश्वरांनी सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ही लिखित केली.

हाच ग्रंथ आज ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका या नावाने ओळखला जातो. याच ज्ञानेश्वरीच्या रूपाने हिंदू धर्मीयांचा ग्रंथ धर्मग्रंथ म्हणून ओळखली जाणारी ज्ञानेश्वरी ही लोकभाषेत प्रचलित झाली.
संस्कृत भाषेतील ज्ञान जे सामान्य लोकांना समजत नाही ते संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून प्राकृत भाषेत आणण्याचा प्रयत्न केला .ज्ञानेश्वरी मध्ये एकूण 9000 ओव्या रचलेल्या आहेत.

कर्मयोग ,ज्ञानयोग ,भक्तीयोग हे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले जाते. इसवी सन 1290 रोजी हा ग्रंथ लिहिला असल्याचे सांगितले जाते. ज्ञानेश्वरी या ग्रंथाच्या शेवटी ज्ञानेश्वरांनी स्वतःची नातसंप्रदायाशी असलेली गुरुपरंपरा देखील सांगितलेली आहे. संत ज्ञानेश्वरांनी जीव ब्रह्म ऐक्याचा दुसरा ग्रंथ लिहिला तो म्हणजे अमृतानुभव किंवा अमृतभावामृत.

या ग्रंथामध्ये सुमारे 800 ओव्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा एक श्रेष्ठ ग्रंथ मानला जातो. हा ग्रंथ लिहिल्यानंतर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रा केली .चांगदेव महाराजांचे गर्वहरण करून त्यांना उपदेश देणारा ग्रंथ म्हणजेच चांगदेव पासष्ठी हा ग्रंथ देखील लिहिला .

See also  संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

चांगदेव महाराज हे चौदाशे वर्षे जगले असे मानले जाते. पण ज्ञानेश्वरांनी त्यांचा गर्वहरण करूनही त्यांचा अहंकार काही गेला नव्हता. त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी 65 ओव्यांचे उपदेश पर पत्र चांगदेवांना लिहून अर्पण केले. तोच ग्रंथ म्हणजे आजचा चांगदेव पासष्टी हा ग्रंथ होय. संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठ हे हरिनामाचे महत्त्व सांगणारे थोर विचार जनसमुदायाला दिले.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी च्या शेवटी पसायदान देखील रचलेले आहे .ज्ञानेश्वरी ही सध्या अनेक भाषांमध्ये प्रचलित झालेली आहे .विश्वबंधुत्वाची प्रेरणा देणारा हा ग्रंथ मानला जातो. ज्ञानेश्वरीय ग्रंथामुळे भारतीय संस्कृतीकडे व वाङ्मयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेलेले आहे.

आजही ज्ञानेश्वरीचे अध्ययन हे अनेक ठिकाणी व विद्यालयांमध्ये देखील केले जाते. ज्ञानेश्वरी मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेविषयी त्यांचा असलेला अभिमान व मराठीची महती सांगितलेली आहे .सुरुवातीला अध्यात्मिक किंवा तत्त्वज्ञानाविषयीचे विचार हे फक्त संस्कृत मधूनच प्रचलित होते पण संत ज्ञानेश्वरांनी सामान्य लोकांना हे पटवून दिले की अध्यात्माचे ज्ञान हे मराठीतून देखील व्यक्त करता येते .त्यामुळे समाजातील सर्व लोकांना अध्यात्माची प्रेरणा मिळाली .

संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी –

संत ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशी शके 1218 इसवी सन 1296 या साली संजीवन समाधी प्राप्त केली .त्यांनी वयाच्या 21व्या वर्षी पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे म्हणजेच इंद्रायणीच्या नदीकाठी समाधी घेतली. आपला मोठा बंधू ज्ञानेश्वर यांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ, सोपानदेव ,मुक्ताबाई, या तिन्ही भावंडांनी आपली जीवन यात्रा संपवली.
अश्या या माउलींनी समजाला मोलाची शिकवण दिली जी आज देखील जन समाजात प्रचलित आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काही प्रचलित काव्यरचना-

आत्ता विश्वात्मके देवे।
येणे वाग्यज्ञे तोषावे ।
तोषोनि मज द्यावे ।
पसायदान हे।।
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सतकर्मी रती लाभो।।
भुता परस्परे घडो।
मैत्र जीवाचे।।
माझ्या मराठीची बोलू कौतुके परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे। रसिके मेळवीन।।

Leave a Comment