संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Maharaj Information In Marathi

Sant Namdev Maharaj Information In Marathi थोर संतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात खूप अगणित संत होऊन गेले आहेत.या संतांनी त्यांच्या आपल्या अलौकिक अभंगातून व वागमयातून समाजाला आपल्या प्रबोधन पर वाणीतून वेगवेगळे विचार जनसामान्यासमोर रुजवले. असेच एक संत म्हणजे “संत शिरोमणी नामदेव” संत नामदेवांची अभंग गाथा ही खूप प्रसिद्ध आहे. त्यांनी सुमारे 62 अभंग शीख पंथाच्या गुरु ग्रंथ साहेब मध्ये गुरुमुखी लिपीत लिहिलेले आहेत.

Sant Namdev Maharaj Information In Marathi

संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Maharaj Information In Marathi

संत नामदेव महाराजांची अभंगाची गाथा ही खूप प्रसिद्ध आहे. ज्यामध्ये त्यांनी 2500 अभंग लिहिलेले आहेत. संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात भक्त शिरोमणी संत नामदेव हे होऊन गेलेले आहेत. नामदेव महाराज हे वारकरी संप्रदायाचे नामविद्येचे आद्य प्रणेते व असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत होते.आपल्या कीर्तन कलेमुळे त्यांनी प्रत्यक्ष पांडुरंगालाही डोलायला लावले अशी त्यांची कीर्ती असल्यामुळे संत नामदेव हे प्रत्यक्ष श्री विठ्ठलाच्या सर्वात जवळचा सखा आहे असे म्हणले जाते.

संत नामदेव महाराजांनी आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रचार हा भारतभर केला. तसेच भागवत धर्माची पताका ही पंजाबपर्यंत घेऊन जाण्याचे कार्यही स्वकर्तृत्वाने करून दाखवले. नामदेव महाराजानंवर वैष्णव धर्माचा प्रभाव होता.

संत नामदेव महाराजांचा जन्म व स्थान

संत नामदेव यांचा जन्म शके 1192 मध्ये कार्तिक शुद्ध एकादशीत रोहिणी नक्षत्रास रविवारी 26 ऑक्टोबर 1270 रोजी महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव ( नरसी बामनी) या गावांमध्ये झाला. संत नामदेव महाराजांचा जन्म हा पंढरपूर की नरसी बामणी येथे झाला असे काहिंमध्ये मतभेद आहे.

अनेकांच्या मते नामदेवांच्या जन्मा अगोदर काही वर्षे त्यांचे आई-वडील पंढरपूर येथे येऊन स्थानिक झाले होते. तेथेच पंढरपूर मध्येच नामदेवांचा जन्म झाला असे काहींचे मत आहे. त्यामुळे त्यांच्या जन्म ठिकणा वरून निश्चित असे मत नाही. संत नामदेवांचे पूर्ण नाव हे नामदेव दामाशेट्टी रेळेकर असे होते. नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामा शेट्टी व आईचे नाव गोणाई असे होते.

नामदेव महाराजांच्या वडिलांचा व्यवसाय हा कपडे शिवणे हा होतो. म्हणजेच ते जातीने शिंपी होते. हे मराठवाड्यातील नरसी बामणी या गावचे रहिवासी होते. परंतु पुढे ते पंढरपूरास येऊन स्थानिक झाली. नामदेव महाराजांचे बालपण हे पंढरपूरमध्ये गेले त्यामुळे ते लहानपणापासूनच श्री विठ्ठलाच्या अनन्यसाधारण भक्ती मध्ये लीन झाले होते.

संत नामदेव महाराजांचे लहानपण

नामदेव महाराज हे पंढरपूरला स्थायिक झाल्यानंतर त्यांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची ओढ लागली. त्यांच्या घरात आजोबांपासूनच विठ्ठल भक्तीचे वातावरण होते व तोच वारसा नामदेव महाराजानी पुढे चालु ठेवला.नामदेव महाराज हे वयाच्या दुसऱ्या वर्षीच बोलण्यास सुरुवात केली.

तेव्हा त्यांची आई गोनाबाई रोज त्यांना देवतांच्या पूजेसाठी विठोबाच्या मंदिरात घेऊन जात असत. तसेच त्यांनी वयाच्या सातव्या वर्षी झांजाची जोडी तयार केली आणि नृत्य, भजन ,अभंग यामध्ये वेळ घालून इतर सर्व गोष्टींकडे म्हणजेच शाळेतले शिक्षण, विश्रांती ,झोप इत्यादी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले. ते विठ्ठलाच्या भक्तीत इतके लिन झाले होते की, त्यांना बाकीच्या गोष्टीची आठवणही होत नसे.

संत नामदेव महाराजां विषयीच्या आख्यायिका

नामदेव महाराजांच्या बालपणी त्यांच्या वडिलांच्या आज्ञेनुसार त्यांना एकदा विठ्ठलाला नैवेद्य घेऊन देवळात जाण्यास सांगितले. त्या दिवशी नामदेवांनी देवाला फक्त नैवेद्यच दाखवला नाही तर तो देवाला खाऊही घातला. ते देवासमोर नैवेद्य घेऊन गेले व देवाला नैवेद्य दाखवला व ते तिथे बसून राहिले की, देव हा नैवेद्य कधी खाईल त्यानंतर ते रडू लागले या बाल भक्ताची भक्ती पाहून साक्षात विठ्ठलाने प्रत्यक्ष प्रकट होऊन तो नैवेद्य खाल्ला.

तसेच एकदा कुत्र्याने चपाती पळवून नेलेली त्यांना दिसली तेव्हा त्याला ती चपाती कोरडी लागू नये म्हणून संत नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन त्या कुत्र्याच्या मागे धावू लागले. तसेच आपल्या कीर्तन कलेमुळे साक्षात पांडुरंगालाही डोलायला भाग पाडणारे असे हे संत शिरोमणी नामदेव महाराज होते.

एके दिवशी महाशिवरात्री असताना संत नामदेव महाराज नागनाथांच्या दर्शनासाठी गेले होते तेव्हा मंदिरात किर्तन चालू होते त्या मंदिरात असणाऱ्या पुजाऱ्यांनी त्यांना विनंती केली की ,तुम्ही मंदिराच्या मागे बसा व नागनाथांची प्रार्थना करा. संत नामदेवांच्या भक्तीवर नागनाथ प्रसन्न झाले व जे मंदिर पूर्वाभिमुख होते ते मंदिर पाश्चिमाभिमुक केले जे असही तसेच आहे.

संत नामदेव महाराजांचे वैवाहिक जीवन

संत नामदेव महाराज यांचा विवाह वयाच्या अकराव्या वर्षी सावकारांची मुलगी राजाई हिच्याशी झाला. संत नामदेवांना एक मोठी बहीण आऊबाई होती. संत नामदेवांना चार मुले नारायन, विठ्ठल ,गोविंद, महादेव अशी त्यांची नावे आहेत.एक मुलगी तिचे नाव लिंबाई असा संत नामदेवांचा परिवार होता. त्यांच्या कुटुंबात एकूण 15 माणसे होती. संत जनाबाई जिला आपण नामयाची दासी असे संबंधतो त्याही त्यांच्याच परिवारातील एक सदस्य होती.

संत नामदेव महाराज विठ्ठलाच्या भक्तीत एवढे लिन झाले होते की, त्यांना संसारात मन रमत नव्हते. त्यांची संसारातली ओढ कमी होत गेली होती. त्यामुळे त्यांच्या या विठ्ठल भक्तीला घरातून विरोध होऊ लागला परंतु त्यांनी माघार घेतली नाही. त्यांची ही भक्ती पाहून त्यांचे सर्व कुटुंब भक्ती मार्गाशी एकरूप झाले.

नामदेव महाराजांना सुरुवातीपासूनच आपल्या वडिलांच्या शिंपी या व्यवसायात रस नव्हता. दिवस-रात्र ते फक्त विठ्ठलाच्या भक्तीत रंगून जात असे. त्यांचे आई-वडील आता म्हातारे झाले होते. त्यामुळे त्यांना असे वाटत होते की, नामदेव महाराजांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळावी व आपला व्यवसाय पुढे चालू ठेवावा.

त्या हेतूने त्यांच्या वडिलांनी एकदा त्यांना बाजारात कपडे विकण्यासाठी पाठवले. परंतु नामदेव महाराजांना व्यापारात पैशाचे व किमतीचे मूल्य या गोष्टी अज्ञात होत्या. ते कपड्यांसह बाजारात गेले व तेथे एका दगडावर भजन करीत बसले व भजन करता करता ते विसरूनच गेले की, आपण येथे कपडे विकण्याच्या कामानिमित्त आलेलो आहे. सूर्य मावळला संध्याकाळ झाली सर्व लोक निघून गेले. नंतर त्यांना आठवले की, आपण कपडे विकले नाहीत.

आता आपल्याला वडिलांकडून मारहाण होईल. मग त्यांनी आपण ज्या दगडावर बसलो होतो. त्या दगडाला ते कपडे विकून टाकले म्हणजे ते कपडे त्यांनी त्या दगडावर ठेवले आणि पैसे नेण्यासाठी दुसऱ्या दिवशी येतो असे सांगून त्या दगडाचा साक्षीदार म्हणून आणखी एक दगड नेमला व तेथून ते निघून गेले. आपल्या मुलाचे असे कृत्य पाहून नामदेवांच्या वडिलांना राग आनावर झाला. नंतर त्यांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला आणण्यास सांगितले.

दुसऱ्या दिवशी परत नामदेव बाजाराकडे गेले तर त्यांना असे आढळले की,ज्या दगडावर आपण कपडे ठेवले होते. ते कपडे गायब झालेले आहेत. म्हणून त्यांनी दुसरा दगड घरी नेला त्यानंतर ते विठ्ठलाच्या मंदिरात गेले व विठोबाला आपली सर्व घटना सांगितली. जेव्हा नामदेव महाराजांच्या वडिलांनी पैशाची हमी देणाऱ्या दगडाला दाखवायला सांगितले.

तेव्हा नामदेवांनी घराच्या बंद खोलीत ठेवण्यात आलेला दगड खोलीत ठेवला आहे असे वडिलांना सांगितले व नामदेव महाराज देवळात पळून गेले. वडिलांनी खोलीचे दार उघडले असता तेथे त्यांना सोन्याचा ढिग पहावयास मिळाला.

वडिलांना खूप आनंद झाला अशा प्रकारे विठोबाने नामदेवांची भक्ती पाहून त्यांना संकटमुक्त केले. नामदेव महाराजांची ज्ञानदेवांशी जेव्हा भेट झाली .तेव्हा आपली भक्ती ही गुरूंशिवाय अपुरी आहे याची जाणीव त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर झाली. प्रत्येक संताला हा गुरु असणे आवश्यक आहे. कारण गुरु शिवाय भक्तिमय प्रवासात त्याचा उद्धार होत नाही. मग त्यांनी औंढा नागनाथ येथे जाऊन विसोबा खेचरांकडून उपदेश घेतला व त्यांचे शिष्यत्व स्वीकारून त्यांना आपले गुरु मानले.

संत नामदेव महाराजांचे कार्य

संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतल्यानंतर सुमारे पन्नास वर्ष संत नामदेव महाराजांनी भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून भागवत धर्माचा प्रचार केला. महाराष्ट्रातील भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड काम हे संत नामदेवांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये ही पार पाडले.

मूर्तिपूजा, कर्मकांड, जातपात यांच्या विषयी त्यांनी स्पष्ट विचार आपल्या अभंगातून मांडले. संत नामदेव महाराज हे मराठीतील पहिले असे कीर्तनकार होते ज्यांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म हा पंजाब पर्यंत नेऊन पोहचवण्याचे काम केले. नामदेव महाराजांनी आपल्या आयुष्याची उर्वरित 54 वर्षे भागवत धर्माच्या प्रचारासाठी वाहून घेतली.

“नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी”||
समाजाला दुःखापासून मुक्ती मिळवण्यासाठी व सुख ,शांती समाधान मिळवण्यासाठी नामस्मरणाचा सोपा मार्ग नामदेव महाराजांनी दाखवून दिला. लोकांना कर्मकांडापासून परावृत्त करण्यासाठी खरा धर्म सर्वसामान्यांच्या मनात रुजवला.

“विठ्ठल आवडी प्रेमभावे, आधी रचली पंढरी | मग वैकुंठ नगरी|

‘अमृताहुनी गोड ,नाम तुझे देवा’

“देह जाओ अथवा राहो, माझे तीर्थ पंढरी”|

अशाप्रकारे पंढरीचा महिमा ही ते लोकांना पटवून देत असत. अशाप्रकारे नामदेव महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप लावण्याचे महान कार्य केले. खऱ्या अर्थाने नामदेव महाराजांनी ज्ञानदेवांनी लावलेल्या भागवत पंथाच्या रोपट्याचा महावृक्ष केला असे म्हटले जाते.

गुजरात ,सौराष्ट्र ,राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब ,हिमाचल प्रदेश या सर्व ठिकाणी नामदेव महाराजांनी आपले वास्तव्य केले व लोकजागृतीच्या ध्येयपूर्तीसाठी वेगवेगळ्या भाषा आत्मसात करून आपला प्रवास चालू ठेवला नामदेव महाराजांचे पंजाबमधील वास्तव्य व त्यांच्या कार्याची पडसाडे अजूनही उमटलेली आपल्याला दिसत आहे.

‘नामदेवजिकि मुखबानी’ या प्रसिद्ध असलेली नामदेवांची हिंदी भाषेतील 61 पदे शिखांच्या ग्रंथासाहिबात आहेत. नामदेव महाराजांची अनेक मंदिरे आजही आपल्याला पंजाब राज्यात पाहावयास मिळतात. पंजाब मधील गुरुदासपूर जिल्ह्यात घुमान किंवा घोमान गावी असलेले मंदिर हे खूप प्रसिद्ध आहे .त्यांचे शिष्य बोहरदास यांनी हे मंदिर उभारलेले आहे असे म्हटले जाते. तसेच राजस्थान व उत्तर प्रदेशातही नामदेव महाराजांची मंदिरे आहेत.

नामदेव महाराजांचा मृत्यू व समाधी

नामदेव महाराजांचे 80 वर्षाचे वय झाल्यानंतर त्यांनी समाधी घेण्याचे ठरवले. आषाढ शुद्ध एकादशी शके 1272 रोजी त्यांनी विठ्ठला पुढे जाऊन मला आता आज्ञा द्यावी अशी विनंती केली व त्यानंतर आषाढवद्य त्रयोदशी शके 1272 या दिवशी त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिराच्या महाद्वारातच समाधी घेतली. की जेणेकरून जे लोकं विठ्ठल दर्शनासाठी येतील त्या सर्व संतसज्जनांची धूळ आपल्या मस्तकी लागावी अशी इच्छा असल्यामुळे त्यांनी महाद्वाराच्या पहिल्या पायरीखालीच समाधी घेतली.

असे म्हटले जाते की, नामदेवांच्या कुटुंबीयां बरोबरच जनाबाई सह याच दिवशी सर्वांनी समाधी घेतली. परंतु त्यावेळेस फक्त नामदेवांची सून लाडाई ही प्रसूतीसाठी गेलेली होती. त्यामुळे तिला मात्र या भाग्याला वंचित व्हावे लागले.
‘ऐकीला वृत्तांत सर्व झाले गुप्त| माझेंची संचित खोटे केसे’|| असे उद्गार त्यांच्या अभंगात आढळतात.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment