सरकारी योजना Channel Join Now

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Lokmanya Bal Gangadhar Tilak Information In Marathi

Lokmanya Bal Gangadhar Tilak Information In Marathi नमस्कार मित्रांनो ज्ञान माहिती च्या या प्रवासाची तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे थोर महापुरुष म्हणजेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होय. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते अशी त्यांची ख्याती ही जगप्रसिद्ध आहे.

Lokmanya Bal Gangadhar Tilak Information In Marathi

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची संपूर्ण माहिती Lokmanya Bal Gangadhar Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या जीवन प्रवासात शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, क्रांतिकारी, स्वातंत्र सेनानी अश्या अनेक भूमिका त्यांनी निभावल्या. ह्या लेखात आपण लोकमान्य टीळकांबद्दल माहिती पाहणार आहोत. भारतीय अशांततेचे जनक म्हणून ब्रिटिश अधिकारी त्यांना संबोधत असे. त्यामुळे लोकमान्य ही पदवी त्यांना देण्यात आली.

प्राथमिक माहिती-

टिळकांचे पूर्ण नाव हे बाळ केशव गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म हा 23 जुलै 1856 रोजी चिखलगाव दापोली तालुक्यात रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव हे गंगाधर पंथ व आईचे नाव हे पार्वतीबाई होते लोकमान्य टिळकांच्या पत्नीचे नाव हे सत्यभामाबाई होते.

सुरवातीचे आयुष्य व पारिवारिक माहिती-

टिळकांचा जन्म हा एका ब्राह्मण कुटुंबात झालेला होता. कोकणातील चिखली हे त्यांचे मुळगाव होते .टिळकांचे वडील हे एक उत्तम संस्कृत पंडित होते व त्यांना संस्कृतचे चांगले ज्ञान होते. ते एका शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. लोकमान्य टिळक हे 16 वर्षांचे असताना त्यांचे वडील स्वर्गवासी झाले. तो असा काळ होता ज्यावेळी काहीच लोक फक्त महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकणारे ह होते .

तेव्हा सन 1877 रोजी पुणे येथील डेक्कन महाविद्यालयातून टिळकांनी पदवी मिळवली .सत्यभामा म्हणजेच तापीबाईंसोबत 1861 रोजी टिळकांचा विवाह संपन्न झाला .त्यावेळी त्यांचे वय 16 वर्ष होते व तापीबाई त्यांच्याही पेक्षा लहान होत्या.

शिक्षण-

पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून सन 1879 रोजी वकिलीची पदवी मिळवली. टिळकांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक शिक्षक म्हणून एका खाजगी शाळेत सुरू केली. तेथे ते गणिताचे शिक्षक म्हणून कार्यरत होते पुढे जाऊन त्यांनी पत्रकारिता देखील निभावली.

पत्रकार म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक चळवळींमध्ये देखील सहभाग घेतला होता. टिळकांचे असे मत होते की फक्त संन्यास घेऊन जीवनाचा मुख्य हेतू पूर्ण होत नसतो तर आपल्या देशाला आपलं घर समजून त्याच्यासाठी कार्य करणे हा मानवी जीवनाचा मूळ हेतू असायला हवा .

त्यांचे म्हणणे होते की माणसांनी आधी आपल्यातल्या मानवतेची पूजा करण्यास सुरुवात करावी तेव्हाच ते परमेश्वराच्या पूजेसाठी लायक बनतील. पदवी घेताना त्यांनी फार मोलाचे मित्र जमवलेले होते जसे की गोपाळ गणेश आगरकर, बल्लाळ नाम जोशी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, त्यांच्या याच मित्रांच्या सोबतीने त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली.

या शिक्षण संस्थेचा मुख्य उद्देश हा होता की युवकांना व युवतींना शिक्षणाची प्रेरणा मिळवून देणे .शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी पुढे टिळकांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी आजचे प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजची स्थापना केली होती. व उच्च माध्यमिक शिक्षणाकरिता न्यू इंग्लिश हायस्कूल ची स्थापना देखील केली होती.

महत्वपूर्ण व इतर कार्य-

जसे की शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी फर्गुसन कॉलेज व न्यू इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. तसेच सन 1881 रोजी त्यांनी समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी केसरी व मराठा अशी दोन वृत्तपत्रे अनुक्रमे चालू केली. त्यांचे मित्र आगरकर हे केसरीचे संपादक तर टिळक हे मराठा वृत्तपत्राचे संपादक बनले.सण 1884 रोजी पुण्यात त्यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची यशस्वीरित्या स्थापना केली.

आज जो गणेश उत्सव आपण खूप गोळामेळाने साजरा करतो तो गणेश उत्सव लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सव व शिवजयंती साजरे करण्यास सुरुवात केली.

लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी व लोकांनी एकत्र यावे यासाठी हा उपक्रम त्यांनी राबवला. मुंबई प्रांत विनियम बोर्ड ची निवडणूक टिळकांनी लढवली होती व सण 1895 रोजी विनियम बोर्डाचे सभासद म्हणून ते निवडून देखील आले. टिळक हे भारत स्वतंत्र व्हावा म्हणून अनेक चळवळी सतत राबवत होते .सन 1897 रोजी टिळकांवर राजद्रोहाचे आरोप लावण्यात आले व त्यांना दीड वर्षाची कैदेची शिक्षा ही सुनावण्यात आली .त्यावेळेस आपला बचाव करण्यासाठी टिळकांनी भाषण केले हे भाषण चार तास व 21 दिवस चालणारे भाषण होते.

जसे की तुम्ही जाणताच की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये दोन गट पडलेले होते एक जहाल व एक मवाळ तर जहाल समूहाचे नेतृत्व हे टिळकांकडे होते .1907 रोजी झालेल्या सुरत येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जहाल व मवाळ या दोन गटातील संघर्ष खूप विकोपाला गेला पण मवाळ समूहाने जहाल समूहातील कार्यकर्त्यांना काँग्रेस मधून काढून टाकण्याची घोषणा केली.

परत सन 1908 रोजी टिळकांवर राजद्रोहाचे खटले चालवण्यात आले व त्यांना सहा वर्षाची शिक्षा देखील सुनावली. त्यांना कारागृहात रवाना करण्यात आले .

ब्रह्मदेशातील मंडालेच्या कारागृहात त्यांनी ही शिक्षा भोगली. कारागृहात असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ देखील लिहिला.डॉ अँनी बेझंट यांच्या सहकार्याने सन 1916 रोजी बाल गंगाधर टिळकांनी होमरूल लीग ची स्थापना देखील केली.होमरूल याचा अर्थ म्हणजे राज्याचे प्रशासन स्वतःच करणे होमरूल लीग चा अर्थ स्वशासन देखील होतो.

लाल बाल आणि पाल हे त्रिकूट तर तुम्ही इतिहासात अनेकदा ऐकले असेल त्यातीलच लोकमान्य टिळक हे एक होते. लोकमान्य टिळकांना भारतीय अशांततेचे जनक किंवा असंतोषाचे जनक असे ब्रिटिश अधिकारी संबोधत असे.

लोकमान्य टिळकांचे लेखन-

राजकीय क्षेत्रात किंवा तुरुंगात असताना त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांना जेव्हा थोडी उसंत मिळत असे तेव्हा ते लिखाणाचे कार्य करत असे. त्यांच्या लेखनामध्ये संशोधन होते व त्यांच्या लेखनात स्वातंत्र्याबद्दल विविध मते प्रतिपादन केलेली असत. त्यांनी आरोयन, ग्रंथ गीतारहस्य, वेदांग ज्योतिष आणि आर्टिक होम इन वेदाज हे प्रमुख ग्रंथ लिहिले. 1910 ते 11 या दरम्यान जेव्हा ते मांडलेच्या तुरुंगात होते तेव्हा त्यांनी गीतारहस्य ज्याला आज कर्मयोग शास्त्र म्हणतात हा ग्रंथ लिहिला व हा ग्रंथ 1915 रोजी प्रसिद्ध देखील करण्यात आला .

वृत्तपत्रात देखील लोकमान्य टिळक यांनी लेखन केलेले होते केसरी वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी स्कुटलेखन केलेले होते. मराठा या इंग्रजी वृत्तपत्रासाठी देखील त्यांनी लेखन केलेले होते. टिळकांना संस्कृत व वाङ्मयाचा खूप चांगला अभ्यास होता व भारतीय तत्त्वज्ञान हा देखील त्यांचा आवडीचा विषय होता .

टिळकांनी आरोयन हा एक संशोधनात्मक प्रबंध लिहिलेला आहे .1892 रोजी इंग्लंड येथील ओरिएंटल परिषदेसाठी हा ग्रंथ तयार करण्यात आलेला होता. त्यात टिळकांनी वेदांचा काल निर्णय हा विषय हाताळला होता. यामध्ये मार्क्स न्यूलरने जो वेदांचा काळ ठरवलेला होता तो भाषिक संशोधनावर ठरवलेला होता ते टिळकांना पटलेले नाही त्यांचे म्हणणे होते संशोधनाची ही पद्धत नसून ती पद्धत एकाकी आहे म्हणून त्यांनी खूप संशोधन करून भाषण शास्त्र ,दैवतशास्त्र ,ज्योतिष शास्त्र, हे सर्व अभ्यास जाणून त्याचे ज्ञान गठित केले व वेदांचा काळ हा इसवी सन पूर्व 4500 हा ठरवला .

आर्टिक होम इन द वेदास हा देखील टिळकांनी संशोधन पर प्रबंध लिहिलेला असून हा त्यांनी येरवडा जेलमध्ये तुरुंगात असताना लिहिलेला आहे. या प्रबंधामध्ये त्यांनी आर्य लोकांचे मूळ उगम स्थान हे उत्तर ध्रुवाच्या प्रदेशातच असायला हवे असे सांगितले. त्यांनी हे अनुमान वेदांच्या आधारे मांडण्याचा प्रयत्न केला.

टिळकांची भाषणे-

टिळक एक चांगले वक्ते देखील होते .त्यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक भाषणे केलेली होती. त्यांची ही भाषणे कित्येक तरुणांना प्रेरणा देणारी होती. त्यांचे काही वाक्य म्हणजे मी स्वाभिमानी तरुण आहे माझे शरीर जरी वृद्ध झाले असले तरी माझ्यातील एक स्वातंत्र्य सैनिक तरुण अजूनही जिवंत आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे खूप प्रखर ,रोखठोक बोलणारे, व जाज्वल्य असे होते. त्यामुळे अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांवरही त्यांचा वचक बसला होता. सन एक ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळक यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खारीचा वाटा उचललेला होता. त्यामुळे आजही प्रत्येक भारतीयांच्या मनात त्यांचे स्थान हे अढळ आहे .

धन्यवाद!!!!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment