Hockey Information In Marathi हॉकी या भारताचा राष्ट्रीय खेळ आहे.भारतामध्ये सर्वप्रथम हॉकी हा खेळ कोलकत्ता या शहरांमध्ये खेळला गेला व या खेळाबद्दल लोकांच्या मनामध्ये लोकप्रियता वाढवणार व्यक्ती म्हणजेच मेजर ध्यानचंद हे होते.
हॉकी खेळाची संपूर्ण माहिती Hockey Information In Marathi
हॉकी या खेळाचा उगम कोठे झाला हा नेहमीच एक वादाचा विषय राहिलेला आहे. हा खेळ आधुनिक हॉकी पेक्षा बराच वेगळा असतो. व काही काळा नंतर या खेळामध्ये काहीसे बदल घडले व हा खेळ ग्रीस मध्ये पोहोचला जिथे ह्या खेळाला सर्वात जास्त लोकप्रियता मिळाली . व या खेळाने कमावलेल्या लोकप्रियते नंतर हा खेळ ग्रीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये खेळला जाऊ लागला. व काही कालावधीनंतर ग्रीसमधील ऑलम्पिक मध्ये रोमन यांनी देखील हा खेळ खेळायला सुरुवात केली. ई.स.पू.१२७२ पूर्वी हा खेळ आयर्लंड मध्ये खेळला जात होता व ई.स.पू.६०० यादरम्यान प्राचीन ग्रीस तसेच रोमन देश देखील हा खेळ खेळत होते.
पाहायला गेले तर हॉकी या खेळाचा उगम हा सुरवातीच्या सभ्यतेच्या काळापासून झाला असावा असे मानले जाते. व अशाप्रकारे बऱ्याचशा राष्ट्रांमध्ये हा खेळ खेळला जाऊ लागला. भारताने ऑलिंपिक मध्ये हॉकी ह्या खेळामध्ये सहा सुवर्णपदक व तशीच अनेक पदे जिंकून अनेक सामने जिंकले आहेत. हॉकी हा एक सांघिक खेळ आहे व हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो.
हा एक लोकप्रिय तसेच मनोरंजक खेळ आहे व हा खेळ बऱ्याचशा देशांमध्ये खेळला जातो. हॉकी या खेळासाठी बरेचसे वेगवेगळे नियम आहेत ज्याचे पालन करणे खेळाडूंना अतिशय महत्त्वाचे असते. हॉकी हा एक प्राचीन खेळ असल्याचे आपल्याला समजते व हा खेळ वर्षानुवर्षे भारतात खेळला जात आहे व हा खेळ खेळण्यासाठी आपल्याला एक स्टिक आणि बॉलची गरज असते.
हॉकी हा एक मैदानी खेळ आहे. व हॉकी या खेळाचे मैदान हे आयताकृती असते व या मैदानाची लांबी ही ९० मीटर आणि रुंदी ही 60 मीटर असते. हॉकी हा खेळ खेळण्यासाठी एकूण 11 खेळाडू लागतात व त्यामधील पाच खेळाडू हे राखीव खेळाडू असतात. हॉकी हा या खेळाचा कालावधी हा ७० मिनिटांचा असतो.
हॉकी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो या खेळामध्ये रबर किंवा कडक प्लास्टिकचा चेंडू हा लाकूड किंवा कडक धातू किंवा फायबर पासून बनलेल्या एका विशेष काठ्यांच्या मदतीने विरोधी संघाच्या जाळ्यामध्ये किंवा गोल मध्ये ढकलायचा प्रयत्न करायचा असतो. हॉकी या खेळाचा उगम 2010 पासून 4000 वर्षांपूर्वी इजिप्ट या देशामध्ये झाला. व यानंतर या खेळाला बरीच प्रसिद्धी मिळाली व हा खेळ अनेक देशांमध्ये पोहोचला मात्र त्याला योग्य स्थान हे मिळू शकले नाही.
हॉकी या खेळाची सुरुवात भारतामध्ये दीडशे वर्षांपूर्वी झाली व 11 खेळाडूंच्या दोन विरोधी संघांमध्ये हा खेळ खेळू जाऊ लागला. व बर्फावर खेळल्या जाणाऱ्या समान खेळ म्हणजेच आईस हॉकी यापासून या खेळाला वेगळे नाव किंवा ओळख देण्यासाठी याला फिल्ड हॉकी म्हणून ओळखले जाते. तसेच चार भिंतींमध्ये खेळली जाणारी हॉकीमध्ये एका संघामध्ये सहा खेळाडू असतात तसेच सहा खेळाडू हे राखीव ठेवलेले असतात.
तसेच पाहायला गेले तर विशेषतः भारत किंवा सदर पूर्वेतील हॉकी या खेळाचा विस्तार याचे श्रेय हे ब्रिटिश लष्कराला दिले जाते. त्याकाळी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये व स्पर्धांच्या आव्हानामुळे १९७१ मध्ये विश्वचषक स्पर्धा सुरू करण्यात आल्या. इतर इंटरनॅशनल टूर्नामेंट्स मध्ये म्हणजेच ऑलिम्पिक्स ,एशिया कप ,एशियन गेम्स ,युरोपियन कप तसेच पॅन अमेरिकन गेम्स या सर्व इंटरनॅशनल टूर्नामेंट मध्ये हॉकीला स्थान मिळाले.
हॉकीचे काही प्रकार
फिल्ड हॉकी- फिल्ड हॉकी ही मैदानात खेळली जाते.
आईस हॉकी- आईस हॉकी ही बर्फावर खेळली जाते व या खेळासाठी बरेचसे नियम हे फिल्ड हॉकी सारखेच असतात मात्र हा खेळ फिल्ड हॉकी पेक्षा काही वेगळा असतो.
रोलर हॉकी- रोलर हॉकी या खेळाची सुरुवात १८७८ मध्ये झाली हा खेळ सर्वात आधी डेन्मार्क येथे रोलर रिंग लंडन इंग्लंड या देशांमध्ये खेळला गेला. हा खेळ त्यानंतर युनायटेड स्टेट्स व बऱ्याचशा देशांमध्ये लोकप्रिय झाला. रोलर हॉकी हे काठी म्हणजेच केन्स याच्या मदतीने खेळली जाते व पायामध्ये क्वाड स्कटेस घातले जातात.
स्लेज हॉकी- स्लेज हॉकी या खेळाचा उगम १९६० मध्ये स्वीड्स म्हणजेच स्टॉकहोम मध्ये झाला. या खेळामध्ये खेळाडू दोन हॉकी ब्लेड्स वरती बसतात व त्यांच्या हातात असलेल्या काठीला खालून मेटल पिक्स असतात ज्यामुळे ते स्वतःला पुढे ढकलू शकतात व याच पद्धतीने विरोधी पक्षाच्या गोल मध्ये खेळाडू गोल करतो.
अंडरवॉटर हॉकी- अंडरवॉटर हॉकी हा एक आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा खेळ आहे ज्यामध्ये दोन संघ असतात एक संघ हा स्विमिंग तलावामध्ये दोन बाजूला असतो आणि प्रतिस्पर्धी संघ ध्येयाकडे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो.
फ्लोअर बॉल हॉकी- फ्लोअर बॉल हॉकी ही विविध प्रकारच्या फ्लॉवर्स वर खेळली जाते. या खेळामध्ये प्रत्येक संघामध्ये पाच खेळाडू असतात व एक गोलरक्षक असतो. पुरुष तसेच स्त्रिया हे 96 ते 115 सेंटीमीटर लांबीच्या लाठीच्या मदतीने 22 ते 23 सेंटीमीटर प्लास्टिकचा बॉल चित्रासह खेळतात. फ्लोअर बॉल या खेळामध्ये हॉकीचे तीन सामने होतात व या मध्ये एक सामना हा वीस मिनिट या कालावधीचा असतो.
हॉकी या खेळाचा इतिहास
१९ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये या खेळाच्या विस्ताराची श्रेय हे मुख्य म्हणजे ब्रिटिशांना दिले जाते तसेच नैसर्गिक परिणाम म्हणूनच हा खेळ कंटेनमेंट शहरांच्या आसपास किंवा युद्धप्रेमी लोकांमध्ये तसेच सैनिकांमध्ये याची लोकप्रियता सर्वात जास्त होती. तसेच लाहोर, जालंधर ,लखनऊ, झाशी ,जबलपूर ही सर्व लष्करी छावण्या स्थित असलेली शहरे भारतीय हॉकीचे गड म्हणून ओळखले जातात. व तसेच इंडिया पाकिस्तान फाळणीपूर्वी भारतामधील शेत जमिनीतील कष्टाळू तसेच कणखर पंजाबी यांनी हा खेळ स्वाभाविकपणे शिकला होता.
हॉकी ही कॉन्व्हेंट स्कूल मध्ये एकोणिसाव्या शतकामध्ये खेळली गेली व तसेच १८६१ च्या अहवालानुसार पहिले मेन्स हॉकी क्लब हे ब्लॅकहेथ ,साउथ ईस्ट लंडन येथे स्थित असल्याचे आपल्याला कळते. 1908 आणि 1920 या मध्ये ऑलम्पिक खेळामध्ये पहिल्यांदा पुरुषांची फिल्ड हॉकी खेळली गेली तसेच 1928 पासून हॉकी या खेळाला कायमस्वरूपी ऑलम्पिक गेम्स मध्ये समाविष्ट करून घेण्यात आले. व अशा या आधुनिक युगामध्ये प्रथमच हॉकी हा खेळ पहिल्यांदा 21 ऑक्टोबर 1908 रोजी लंडन येथे झालेल्या ऑलिंपिक गेम्स मध्ये खेळला गेला. व त्यावेळेस यामध्ये सहा संघ सहभागी होते.
1924 या सालामध्ये आंतरराष्ट्रीय कारणांमुळे व वादामुळे या खेळाचा ऑलिंपिक गेम्स मध्ये समावेश होऊ शकला नाही मात्र ऑलम्पिक मधून हॉकी या खेळाला वळल्यानंतर जानेवारी १८८४ या सालामध्ये आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन म्हणजेच इंटरनॅशनल हॉकी फेडरेशन याची स्थापना करण्यात आली.
हॉकी हा खेळ आशिया खंडामध्ये सर्वप्रथम भारतामध्ये खेळला गेला होता. तसेच पहिल्या दोन एशियन गेम्स मध्ये भारताला खेळण्याची संधी मिळू शकली नव्हती मात्र तिसऱ्या एशियन गेम्स मध्ये भारताला पहिल्यांदाच ही संधी मिळाली होती . हॉकीमध्ये भारताची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. पाहायला गेलो तर भारताने आत्तापर्यंत ऑलम्पिक गेम्स मध्ये आठ सुवर्णपदक तसेच एक दोन कांस्यपदक जिंकलेली आहेत.
व त्यानंतर भारताने हॉकी या खेळामध्ये पुढील सुवर्णपदक हे 1964 मध्ये आणि शेवटचे सुवर्णपदक हे 1980 या साली जिंकले. व भारताची सर्वात मोठी कामगिरी म्हणजेच 1928 च्या ऍमस्टरडॅम ऑलम्पिक मध्ये भारताने नेदरलँडविरुद्ध 3-0 ने पराभव करून भारताला हॉकी या खेळामध्ये पहिले सुवर्णपदक मिळवून दिले होते. भारताने पुन्हा 1936 च्या गेम्स मध्ये जर्मनीला 8-1 ने पराभूत करून भारताने आपली क्रीडाक्षमता साऱ्या जगाला पुन्हा एकदा सिद्ध केली.
व हॉकीचे जादूगर म्हणूनच प्रसिद्ध असलेले मेजर ध्यानचंद यांनी 1928 तसेच 1932 आणि 1936 या तीनही सामन्यांमध्ये भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व केले. 1932 ऑलिंपिक गेम्स मध्ये भारताने 37 सामन्यांमध्ये केलेले 330 गोल यापैकी ध्यानचंद यांचे 133 गोल होते. मेजर ध्यानचंद यांच्या प्रति आदर प्रदान करण्यासाठी त्यांचा वाढदिवस हा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.
हॉकी ह्या खेळाचे नियम-
लंडनमध्ये स्थित टेडिंग्टन क्लब ने हॉकी या खेळामध्ये अनेक मोठे बदल केले, म्हणजेच यामध्ये हात वापरण्यावर बंदी आणली गेली तसेच काठी खांद्यावर उचलणे आणि रबर क्युबॉइड बॉल ऐवजी गोलाकार बॉल चा वापर करणे हे सर्व नियम या खेळामध्ये समाविष्ट करण्यात आले.
१८८६ मध्ये लंडन येथे स्थापित करण्यात आलेल्या तात्कालीन हॉकी असोसिएशनने आपल्या नियमावली मध्ये हे सर्व नियम समाविष्ट करून घेतले व यामध्ये मार्क चक्राचे अवलंबन करणे हा सर्वात महत्त्वाचा नियम मानला जातो. हॉकी या खेळाच्या नेहमीच्या संघरचनेमध्ये पाच फॉरवर्ड खेळाडू तीन हाफ बॅक आणि दोन फोटो फुलबॅक आणि एक गोलकीपर अशी रचना असते. या खेळामध्ये दोन भाग असतात एका गेम मध्ये पाच किंवा दहा मिनिटांच्या अंतराने 35 मिनिटांच्या कालावधीचे हे दोन भाग खेळले जातात.
एखाद्या खेळाडू दुखापत झाली तर खेळ थांबवला जातो. गोल रक्षक स्वतःची सुरक्षा करण्यासाठी जाड पण हलके पॅड घालतात व त्याला 30 यार्ड वर्तुळाच्या अंतरात पायाने चेंडू मारण्याची किंवा शरीराच्या मदतीने तो चेंडू थांबवण्याची परवानगी असते. व इतर मैदानात खेळणारे खेळाडू फक्त काठीच्या मदतीने चेंडू थांबवू शकतात.