Informal Letter Information In Marathi मित्रांनो नमस्कार, आपण पाहिलेच असेल की, दळणवळणाच्या दृष्टीने जग हे अत्यंत जवळ आलेले आपल्याला दिसत आहे. जगात दूरवर असलेल्या आपल्या लोकांना एकमेकांशी संपर्क साधण्याचे विविध मार्ग उपलब्ध झालेले आहेत. उदाहरणार्थ मोबाईल, संगणक ,इंटरनेट इत्यादी. या अनेक माध्यमांद्वारे आपण एकमेकांशी लांब असून सुद्धा संवाद साधू शकतो.
तसेच मोबाईल या माध्यमाद्वारे इंटरनेट नुसार आपण लांब असलो तरी एकमेकांना पाहूही शकतो आणि एकमेकांशी बोलूही शकतो. तरीसुद्धा आजही माणसे एकमेकांना पत्रे लिहीत असतात. कारण पत्र हे असे माध्यम आहे की जे आपले मन दुसऱ्या जवळ आपण व्यक्त करू शकतो .म्हणून पत्रलेखन आजही अपरिहार्य आहे. पूर्वीच्या काळी पत्र हे एक संदेश पाठवण्याचे साधन होते.
अनौपचारिक पत्राची संपूर्ण माहिती Informal Letter Information In Marathi
पूर्वीच्या काळी लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश पाठवण्यासाठी पत्राचा वापर करायचे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल व इंटरनेट मुळे पत्रलेखन हा प्रकार जरी संपुष्टात येत असला तरी विद्यार्थ्यांना पेपर मध्ये पत्र लेखन हा विषय नक्कीच विचारला जातो.
पत्रलेखन हा विषय अभ्यासक्रमास आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी पत्रलेखन म्हणजे काय हे माहिती असणे गरजेचे आहे. या पत्राचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे औपचारिक पत्रे म्हणजेच इंग्लिश मध्ये आपण याला फॉर्मल लेटर असे म्हणतो व दुसरे म्हणजे अनौपचारिक पत्रे याला आपण इंग्रजीमध्ये इनफॉर्मल लेटर असे म्हणतो .
औपचारिक पत्रे म्हणजे दैनंदिन जीवनात आपल्याला काही अडचणी सोडवण्यासाठी व तसेच काही सुविधा मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयात किंवा खाजगी कंपन्यांमध्ये आपल्याला जावे लागते व आपली कामे पूर्ण व्हावी म्हणून या कार्यालयात आपल्याला काही पत्रे सादर करावी लागतात. तसेच कार्यालयीन कामकाजासाठी व व्यावसायिक कामासाठी आपल्याला काही पत्रे लिहावी लागतात.
यालाच आपण औपचारिक पत्रे असे म्हणतो. औपचारिक पत्रांमध्ये मागणी पत्र, तक्रार पत्र,व्यावसायिक पत्र असे वेगवेगळे प्रकार असतात. तर अनौपचारिक पत्र ही प्रामुख्याने वैयक्तिक संवादासाठी वापरली जातात. तर आजच्या पोस्टमध्ये मी तुम्हाला इनफॉर्मल लेटर म्हणजेच अनौपचारिक पत्रे कसे असते ते कसे लिहितात याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे.
अनौपचारिक पत्रे ही प्रामुख्याने वैयक्तिक संवादासाठी वापरली जातात म्हणजेच ही वैयक्तिक पत्रे म्हणून ओळखली जातात. आपल्या प्रियकरांना, नातेवाईकांना, मित्रांना किंवा जवळच्या व्यक्तींना लिहिलेल्या पत्रांना अनौपचारिक पत्र असे म्हणतात. ही पत्रे आपण आपल्या मित्रांना व कुटुंबीयांना आपल्या आयुष्यात काय चालले आहे तसेच आपली खुशाली कळवण्यासाठी आणि तसेच एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी किंवा एखाद्याचे अभिनंदन करण्यासाठी आपण हे पत्र लिहीत असतो. अनौपचारिक पत्र ही सहसा आपल्या कुटुंबातील सदस्याला आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा मित्राला लिहिले जाते. अनौपचारिक पत्रात वापरलेली भाषा ही प्रासंगिक किंवा वैयक्तिक असते.
अनौपचारिक पत्राचे स्वरूप
अनौपचारिक पत्रामध्ये आपण आपले सुख, दुःख, आनंद ,उत्साह ,अभिनंदन, शुभेच्छा इत्यादी प्रकारचे वर्णन करू शकतो. त्यामुळे या पत्राची भाषा ही भावपूर्ण ,हृदयस्पर्शी असते. हे पत्र आपण विशेषतः जवळील लोकांशी चौकशी करण्यासाठी, आमंत्रन पाठवण्यासाठी व काही महत्त्वाची माहिती देण्यासाठी लिहीत असतो.
त्यामुळे या पत्रांमधील शब्दांची संख्या ही अमर्यादित असून ती लिहिणाऱ्या व्यक्तीवर व विषयावर अवलंबून असते. जसे की आपल्याला माहीतच असेल की औपचारिक पत्र लिहिताना अगदी शिस्तबद्ध पद्धतीने लिहावे लागते .तसे अनौपचारिक पत्र लिहिताना काही अटी नसतात. म्हणजेच हे पत्र लिहिताना शिस्त, क्रमबद्धता वगैरे गोष्टी विचारात घेतल्या जात नाहीत.
अनौपचारिक पत्र लिहिताना लक्षात ठेवणाऱ्या गोष्टी व ती पत्रे लिहिण्याची उद्दिष्टे
अनौपचारिक पत्र लिहिण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या म्हणजे पत्र लिहिताना भाषा ही सोपी व स्पष्ट असावी .तसेच पत्राची भाषा ही नातेसंबंध व वयानुसार योग्य असावी म्हणजे उदाहरणार्थ ,संबोधन व नमस्कार. पत्र हे थोडक्यात लिहिलेले असावे व पत्राची सुरुवात व शेवट ही प्रभावी असावी. पत्र लिहिताना भाषा शुद्धलेखन व त्याचबरोबर लेखन हे स्वच्छ असावे. पत्र लिहिताना लांब वाक्यांपेक्षा लहान वाक्य ही अधिक शक्तिशाली असतात. परिच्छेद हे लहान असावे.
अनौपचारिक पत्राचा नमुना
अनौपचारिक पत्र लिहिताना पुढील गोष्टी समाविष्ट असतात पाठवणाऱ्याचा पत्ता
पत्र लिहिण्याची तारीख
अभिवादन
परिचय पत्राचा मुख्य भाग निष्कर्ष
स्वाक्षरी
प्रेक्षक पत्ता
………….
…………
पिनकोड
दिनांक
अभिवादन
परिचय
पत्राचा मुख्य भाग……………………
…………………………….
……………………………….
…..………………………………
स्वाक्षरी
पत्ता व तारीख
या पत्रामध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे प्रेक्षकाचा पत्ता!! पत्राची सुरुवात करताना प्रेक्षकाच्या पत्त्याने करावी .पत्ता हा कागदाच्या डाव्या बाजूला लिहिलेला असावा. आपल्याला पूर्ण पत्ता लिहिणे आवश्यक आहे. की जेणेकरून प्राप्त करता आपल्या पत्राला उत्तर देऊ शकेल. पत्त्याच्या खाली तारीख लिहावी. म्हणजे आपण ज्या दिवशी पत्र लिहीत आहे त्या दिवशीची तारीख टाकणे गरजेचे आहे. तारीख टाकताना 16/9/2022 अशी टाकावी किंवा 16 नोव्हेंबर 2022 अशी टाकावी.तसेच तारखे नंतर पिनकोड टाकणे महत्त्वाचे आहे.
आपण ज्याला पत्र पाठवत आहे ती व्यक्ती जर दुसऱ्या देशात असेल तर त्या पत्त्यावर आपला देश देखील लिहायला विसरू नका.
अभिवादनाचे प्रकार
पत्राची सुरुवात करताना आपल्या मित्रांना, प्रियजनांना व कुटुंबांना आपण त्यांच्या नावासमोर प्रिय, डीअर असे संबोधन लावतो.
उदाहरणार्थ प्रिय आई, प्रिय आजी, माय डियर कजीन्स
अभिवादन टाकताना सुद्धा दर्जा पाहून टाकावे लागते.
पत्राचा परिचय आणि मुख्य भाग या परिच्छेदात तुम्ही जे शब्द वापरता त्यानुसार तुमच्या अक्षराचे स्वरूप ठरत असते .ज्या विषयावर तुम्ही चर्चा करणार आहेत त्याची सुरुवात म्हणजे परिचय .तुम्ही प्राप्त करता त्याच्या आरोग्याची किंवा कल्याणाची चौकशी करून सुरुवात करू शकता. तुम्ही पत्र लिहिताना अतिशय प्रासंगिक आणि वैयक्तिक स्वरात लिहू शकतात. यामध्ये तुम्ही तुमच्या सुख दुःखाच्या गोष्टी, भावना लिखित स्वरूपात मांडू शकता.
तसेच तुम्हाला आमंत्रण द्यायचे असेल तर येथे तुम्ही आमंत्रण देऊ शकता किंवा एखाद्याचे तुम्हाला आभार मानायचे असेल ते इथे मांडू शकता. तसेच तुम्हाला एखाद्याचे अभिनंदन करायचे असेल त्यासाठी हा परिच्छेद असतो. पहिल्या परिच्छेदात तुम्ही त्या व्यक्तीबद्दल चौकशी करावी. उदाहरणार्थ आम्ही येथे सर्वजण ठीक आहे. तुम्ही सर्वजण कसे आहात. दुसऱ्या परिच्छेदात आपण पत्र लिहिण्याचे कारण सांगू शकता.
निष्कर्ष येथे आपण आपल्या पत्राचा शेवट करतो. पत्राचा शेवट करताना शब्द अशाप्रकारे वापरा की प्राप्तकार्त्याला असे वाटेल की त्यांनी तुमच्याशी गप्पा मारण्यात खूप छान वेळ घालवला आहे व तुम्ही सुद्धा तुमच्या पत्राला त्याच्या प्रतिसादाची वाट पहात आहात हे तुम्ही येथे सांगू शकता.
स्वाक्षरी
येथे आपण आपली,आपला ,तुझी प्रेमळ ,तुझी प्रिय असे शब्द वापरून सही करून पत्राचा शेवट करतो.
अनौपचारिक पत्रांचे विषय पुढील प्रमाणे
एखाद्या समारंभासाठी किंवा वाढदिवसासाठी मित्राला आमंत्रित करणे
मित्राला सल्ला देणे.
आपण केलेल्या चुकांसाठी मित्राची माफी मागणे.
सहलीसाठी जाऊन सुट्टी एकत्र घालवल्याबद्दल मित्राचे आभार.
मित्राची आठवण करून देतो.
एखाद्या मित्राचे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन करणे.
एखाद्या मित्राला मदतीची विनंती करत आहे.
लग्नाचे आमंत्रण
कुटुंबात किंवा मित्रांमध्ये एखाद्याच्या निधनाबद्दल माहिती देणे.
वर दिलेल्या कारणांव्यतिरिक्त इतर प्रकारची अनेक कारणे असू शकतात. त्यासाठी आपण अनौपचारिक पत्र लिहू शकतो.