Best Slogans On Road Safety In Marathi रस्ता सुरक्षा म्हणजे रस्त्यावर होणारे अपघात रोखण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना व तंत्राचा संदर्भ आणि रस्ता वापरणाऱ्यांना जखमी किंवा बळी जाण्यापासून वाचवण्यासाठी. रस्ता वापरणाऱ्यामध्ये सायकलस्वार, पादचारी, दुचाकीस्वार, मोटार चालक, कार चालक, बस चालक आणि इतर खाजगी वाहन प्रवासी तसेच सार्वजनिक बसचा वापर, रिक्षा, टॅक्सी इत्यादींचा वापर करणाऱ्या प्रवाश्यांचा समावेश आहे.
20+ रस्ता सुरक्षा वर मराठी घोषवाक्य Slogans On Road Safety In Marathi
रस्ता सुरक्षा प्रणालीची मूलभूत रणनीती अधिक जबाबदार आणि सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित करणे आणि प्रोत्साहित करणे, वाहतुकीचा प्रवाह कमी करणे तसेच क्रॅश किंवा अपघाताच्या कोणत्याही परिस्थितीत प्रभाव शक्ती उंबरठ्याखाली गंभीर जखम किंवा मृत्यूची कारणीभूत असल्याचे सुनिश्चित करणे आहे.
अति घाई ,
संकटात नेई .
आवरा वेगाला,
सावरा जीवाला .
मनाचा ब्रेक ,
उत्तम ब्रेक .
हेल्मेटचा वापर करा,
नियम पालनात सहयोग करा.
पाळूया निर्बंध रहदारीचा ,
करूया प्रवास आनंदाचा .
रहदारी नियमांचे पालन करा,
त्यांचे कधीही उल्लंघन करू नका.
वेग कमी ,
जीवनाची हमी.
दारू पिऊन वाहन चालवितो,
यमराज त्यांना हाक मारतो.
डोके आहेत सर्वात नाजूक,
हेल्मेट लावून व्हा जागरूक.
जेव्हा आपण चालवितात वाहन,
तेव्हा जरूर करा नियमांचे पालन .
शुद्ध हवा मुलांना,
तर ब्रेक आपल्या वाहनांना.
आपला जीव सांभाळा ,
दुर्घटना व अपघात टाळा.
रस्ताही तुमचाच, वेळही तुमचीच ,
घाई केली तर , मृत्यूही तुमचाच .
नका देऊ प्राण , नका घेऊ प्राण ,
डावीकडून चालून राखा आयुष्याची शान .
रहदारीचे नियम पाळा,
उलटसुलट होणारे अपघात टाळा.
होईल दोन मिनिटाचा उशीर,
पण जीवन राहील सुरक्षित.
वाहन हळू चालवा,
आपले अमूल्य जीवन वाचवा.
वेगाने वाहने चालवू नका,
मृत्यूस आमंत्रण देऊ नका.
उल्लंघन कराल रहदारी नियमांचे ,
अपंग व्हाल आयुष्यात कायमचे .
लागता मोबाईल कानाला ,
थांबवा वाहन बाजूला.
ज्यांची शाबूत बुद्धी ,
तो रोकेल वेग वृद्धी .
कदर व्हावया तुमच्या प्राणाची,
आदर करा रस्ता सुरक्षा नियमाची.
सुरक्षा नियमाकडे लक्ष द्या,
स्वतःबरोबर इतरानाही जगण्याची संधी द्या .
Slogans On Road Safety In Marathi हे तुम्हाला आवडले असेलच , धन्यवाद.
हे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-
Essay On Importance Of Cleanliness In Marathi
Essay On Save Electricity In Marathi
My Best Friend Essay In Marathi
My Country India Essay In Marathi