सरकारी योजना Channel Join Now

वसुबारस सणाची संपूर्ण माहिती Vasubaras Festival Information In Marathi

Vasubaras Festival Information In Marathi दिवाळी हा असा सण आहे ज्याची अगदी लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येक जण आतुरतेने वाट बघत असतो. अनेक लोकांच्या मते केवळ लक्ष्मीपूजन म्हणजे दिवाळी असते, मात्र या दिवाळी सणांमध्ये अनेक वेगवेगळ्या सणांचा देखील समावेश असतो. ज्यामधील एक उत्कृष्ट सण म्हणून वसुबारस या सणाला ओळखले जाते. गोमातेला भारतीय संस्कृतीमध्ये देवतेचे स्थान देण्यात आलेले असून या गोमातेची पूजा करणे भाग्याचे लक्षण समजले जाते.

Vasubaras Festival Information In Marathi

वसुबारस सणाची संपूर्ण माहिती Vasubaras Festival Information In Marathi

दिवाळी सणातील सर्वात पहिला दिवस म्हणून वसुबारस ओळखली जाते. त्यानंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज इत्यादी सणांची रेलचेल सुरू होते. दिवाळीतील सर्वात पहिल्या दिवशी अर्थात वसुबारस या दिवशी गाय आणि वासरू या दोघांचीही मनोभावे पूजा केली जाते. यातील वसू आणि बारस हे दोन शब्द वासरू आणि गाय इत्यादींना सुचित करीत असतात. आजच्या भागामध्ये आपण या वसुबारस सणाविषयी माहिती बघणार आहोत.

नाववसुबारस
प्रकारसण
पूजकहिंदूधर्म
देवता गाय आणि वासरू
ओळखदिवाळीतील पहिला दिवस
तिथीकार्तिक कृष्ण द्वादशी
स्वरूपगाईला स्नान घालून तिची पूजा करणे

वसुबारस पूजा विधि:

मित्रांनो वसुबारस हा सण दिवाळीशी संबंधित आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या दिवशी सूर्य उगण्याच्या आधीच गाय आणि वासरू यांना स्नान घालून त्यांची विधिवत पूजा केली जाते व त्यांची आरती करून त्यांना प्रसाद किंवा नैवेद्य दिला जातो. खेडेगावांमध्ये उदरनिर्वाह आणि प्रजनन या गोष्टींशी वसुबारसेचा संदर्भ असल्यामुळे अनेक विवाहित स्त्रिया या दिवशी उपवास करत असतात जेणेकरून त्यांच्या संततीचे रक्षण होत असते.

वसुबारस सणाचे महत्त्व:

वसुबारस हा सण पुराणांमध्ये देखील उल्लेख केलेला असून त्याला बच बारस या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी नंदी व नंदिनी यांचे फार महत्व मानले जाते त्यामुळे या दिवसाच्या उपवासाला नंदिनी उपवास किंवा नंदिनी व्रत या नावाने देखील ओळखले जाते. या दिवशी वंशाचे पूजन करणे हा मुख्य उद्देश असतो.

गाय व वासरू यांची एकत्र पूजा केल्यामुळे ते एक मातृत्व देखील दर्शवत असते. या दिवशी सर्वत्र सुट्टी देखील दिली जाते. या दिवशी गाईला व वासरांना गव्हाच्या पदार्थापासून तयार करण्यात आलेले नैवेद्य दाखविले जातात तर गोपालक या दिवशी गव्हाचे पदार्थ सेवन करणे टाळत असतात.

उत्तरेकडील राज्यांमध्ये हा सण कर्जफिडीचा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी व्यापारी लोक आपल्या वही खात्याला नवीन रूप देत असतात, त्याचबरोबर मागील उधारी जमा करणे किंवा कोणाची उधारी असेल तर ती फेडणे इत्यादी कार्य देखील या दिवशी पूर्ण केले जातात, जेणेकरून सर्व मनोकामना पूर्ण होत असतात.

या सणाचे महत्त्व महाराष्ट्र राज्यामध्ये फार मोठे असून प्रत्येक  पालक या दिवशी कृष्ण पूजा करत उपवास साजरा करत असतात. नवनवीन कपडे घालून, रांगोळी काढणे, दिव्यांनी घर सजविणे, इत्यादी गोष्टी या दिवशी केल्या जातात.

मित्रांनो कामधेनू ही अशी गाय असते जी वासराला जन्म न देताच दुग्ध उत्पादन करत असते त्यामुळे एक प्रजननाचे प्रतीक म्हणून अनेक लोक कामधेनूचा आशीर्वाद घेणे उचित समजतात. अलीकडेच राम मंदिराची निर्मिती झालेली असून त्यामध्ये २२ जानेवारी २०२४ रोजी राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्या दिवशी देखील कामधेनू स्वरूपाच्या गाईपासून मिळवलेल्या दुधाने प्रभू श्रीरामांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला.

मित्रांनो हा सण गोवत्स द्वादशीच्या दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी गाईंसह महिलांना देखील फार मोठा सन्मान दिला जातो. अनेक लोक कृष्ण पूजा देखील करून कृष्णाच्या आवडीच्या गायींची पूजा करत असतात. गुजरात राज्यामध्ये याच सणाला वाघ बारस या नावाने देखील ओळखले जाते. प्रत्येक राज्याची हा सण साजरा करण्याची पद्धत वेगळी असली तरी देखील यामागे असणारा सर्व धर्मीय आणि सर्व राज्यातील लोकांचा एकच उद्देश असतो.

ऐतिहासिक दृष्टया विचार केला तर पौराणिक कथांमध्ये देखील या वसुबारस सणाला फार महत्त्व दिलेले आहे. गाईला चारा घालणे हे मानवाचे कर्तव्य असले तरी देखील या दिवशी गाईला चारा घालणे खूपच पुण्याचे कार्य समजले जाते. ज्या लोकांकडे गाई नसतील असे लोक देखील इतरांच्या गोठ्यामध्ये जाऊन गाईला चारा घालण्याचे पुण्य कार्य करत असतात.

त्याचबरोबर त्या दिवशी गायींची पूजा केल्यामुळे एक प्रसन्न व चैतन्यमय वातावरण निर्मिती होणे स्वाभाविकच आहे. गाईपासून मानवाला विविध उत्पादने मिळत असतात मात्र त्या गाईचा मानसन्मान ठेवण्याकरिता वसुबारस या दिवशी दूध व दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ सेवन करणे टाळले जाते.  हा गाई प्रति दाखवलेला एक आदरच असतो.

निष्कर्ष:

मित्रांनो हिंदू धर्म हा असा एकमेव धर्म आहे जो फार पूर्वीपासून चालत आलेला असून कालपरत्वे या धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा किंवा सणांची निर्मिती झालेली आहे. त्या प्रत्येक सणांना एक काहीतरी ऐतिहासिक महत्त्व लाभलेले असून आज देखील प्रत्येक हिंदू नागरिक या सणांना मोठ्या उत्साहाने साजरा करत असतो.

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सन्मान ओळखला जात असला तरी देखील या सणांमध्ये इतरही सणांचा समावेश होतो, त्यातील सर्वात पहिल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणून वसुबारस ला ओळखले जाते. हिंदू धर्मात गाईला प्रचंड महत्व दिलेले असून या दिवशी गायीची पूजा करून दिवाळीच्या पर्वाची सुरुवात केली जाते.

आजच्या भागामध्ये आपण या वसुबारस सणाविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये तुम्हाला वसुबारस म्हणजे काय? या दिवशीच्या पूजेचे महत्त्व, ही पूजा कशी करावी? या सणाचे ऐतिहासिक महत्त्व, या सणाला लाभलेला दैदीप्यमान इतिहास, या सणाला साजरा करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.

FAQ

वसुबारस या सणाच्या दिवशी कशाची पूजा केली जाते?

वसुबारस या दिवशी वसु आणि बारस अर्थात गाय व वासराची पूजा केली जाते.

वसुबारस च्या दिवशी कशा पद्धतीने पूजा केली जाते?

वसुबारस हा सण गायीची व वासराची पूजा करण्याचा दिवस आहे. या दिवशी भल्या पहाटे गाय आणि वासराला अंघोळ घालून त्यांचे औक्षण केले जाते. त्याचबरोबर त्यांना सजवून त्यांना हळदी व कुंकू लावले जाते. त्याचबरोबर त्यांना गव्हापासून केलेले विविध पदार्थ खाऊ घातले जातात व त्यांची आरती देखील केली जाते.

वसुबारस हा सण कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

दिवाळी सणाच्या समूहातील सर्वात पहिला सण असून हा कार्तिक महिन्यामधील कृष्ण पक्षाच्या द्वादशीला साजरा केला जातो.

वसुबारस सणाचे महत्त्व काय आहे?

वसुबारस हा सण प्रजनन प्रक्रियेशी संबंधित समजला जातो त्यामुळे अनेक विवाहित महिला या दिवशी उपवास देखील करत असतात त्यामुळे संततीचे रक्षण होते अशी मान्यता आहे.

वसुबारस हा सण साजरा करण्यामागे काय इतिहास सांगितला जातो?

वसुबारस या सणाला देखील दैदिप्यमानइतिहास लाभलेला असून, सर्वात प्रथम राजा उत्तानपाद तसेच त्याची धर्मपत्नी सुनीती या दोघांनी देखील गाईसाठी उपवास केला होता, आणि या उपवासाच्या परिणाम स्वरूप त्यांना एक मुलगा झाला. ज्याचे नाव ध्रुव असे ठेवण्यात आले, आणि तेव्हापासून या सणाला साजरे केले जाऊ लागले.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment