Tambora Instrument Information In Marathi भारत देशाला संगीताचा दैदीप्यमान असा वारसा लाभलेला आहे. भारतीय इतिहासामध्ये मुख्यतः तंतुवाद्य प्रकाराला फार महत्त्व दिले गेलेले असुन, भारतीय शास्त्रीय संगीतात या तंतुमय वाद्य प्रकारांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. अशाच प्रकारचे एक वाद्य म्हणून तंबोरा किंवा तानपुरा याला ओळखले जाते.

तंबोरा वाद्याची संपूर्ण माहिती Tambora Instrument Information In Marathi
चार तारेंपासून तयार करण्यात आलेले हे वाद्य अतिशय सुरेल संगीत निर्माण करण्यासाठी ओळखले जाते. या तंबोरा वाद्याबद्दल काही आख्यायिका देखील सांगितल्या जातात. त्यामधील एक आख्यायिका म्हणजे पौराणिक काळामध्ये तुंबरु नावाचा एक गंधर्व होता, त्याने सर्वप्रथम या पद्धतीने निर्मिती केलेली आहे.
आधी या वाद्यांमध्ये केवळ एकच तार होती, नंतर हळूहळू या तारिंची संख्या वाढवत चार केली गेली. आज देखील काही तंबोरा वाद्याला पाच ते सहा तार आढळून येत असतात. आजच्या भागामध्ये आपण या तानपुरा अर्थात तंबोरा वाद्याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | तंबोरा |
इतर नाव | तानपुरा |
प्रकार | भारतीय वाद्य |
उपप्रकार | तंतुमय वाद्य |
निर्मिती | पौराणिक काळामध्ये |
वापर | शास्त्रीय संगीत |
निर्माता | तुंबरु गंधर्व |
शास्त्रीय संगीतामध्ये तानपुरावाद्याचा मुख्य आधार:
शास्त्रीय संगीतामध्ये विविध प्रकारच्या स्वरांना व त्यातील ध्वनींना फार महत्त्व दिले जाते. त्यामुळे शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांमध्ये तंबोरा वाद्य खूपच महत्त्वपूर्ण ठरते. त्याचबरोबर विविध प्रकारच्या नृत्यांसाठी देखील हे वाद्य उपयोगात आणले जाते.
या वाद्याच्या तारेला छेडल्या नंतर विविध प्रकारच्या स्वरांची निर्मिती होत असते, ज्यामुळे आसपासचे वातावरण अतिशय मंत्रमुग्ध होत असते. शास्त्रीय दृष्ट्या बघितले तरी देखील या वाद्याच्या एका तारेपासून सुमारे पाच सप्तांपर्यंतचे वेगवेगळ्या प्रकारचे स्वर आणि नाद निर्माण केले जाऊ शकतात. स्वर हा मूळ ध्वनी असतो, त्यामुळे इतर प्रकारच्या ध्वनीची निर्मिती केली जात असते.
यातील काही स्वर हे स्वयंभू प्रकारचे असतात, तर काही स्वर हे असिस्टंट प्रकारचे असतात. शास्त्रीय संगीताच्या गायनामध्ये स्वयंभू स्वर प्रत्येक वेगळ्या प्रकारे निर्माण केला जाऊ शकतो. आणि त्याला आपले स्वतंत्र असे स्थान दिलेले असते. त्यामुळे वेगवेगळ्या स्वरूपाचे आवाज निर्माण करणे आणि हे आवाज ओळखणे एका जाणत्या संगीतकाराला सहज शक्य असते.
तानपुरा वाद्याचे विविध भाग:
तंबोरा या नावाने ओळखले जाणारे हे तंबोरा वाद्य विविध घटकांपासून तयार करण्यात आलेले असते. जे मुख्यतः शास्त्रीय संगीतामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या वाद्यापासून अतिशय मधुर स्वरूपाचा स्वर निर्माण होण्याबरोबरच, शांतता निर्माण देखील होत असते. या तंबोऱ्याच्या स्वराने एक गायक लगेच गाऊ लागतो असे सांगितले जाते. या तानपुरा वाद्यांमध्ये विविध प्रकार चे घटक असतात. ज्यांमध्ये खुंट्या, भोपळा, घोडी अर्थात ब्रिडज, जव्हार किंवा मनी इत्यादी घटकांचा समावेश होत असतो.
तानपुरा वादनाची पद्धत:
कुठलेही वाद्य वाजवायचे असेल तर त्या वाद्याची वाजवण्याची योग्य प्रक्रिया माहित असली पाहिजे. अन्यथा सूर्य निर्माण होण्याऐवजी त्यामधून कर्कश्य ध्वनी निघत असतो. तानपुरा वाजवण्याच्या पद्धतीला तानपुरा छेडणे या नावाने ओळखले जाते. हाताच्या मधील तीन बोटांच्या सहाय्याने या तारा छेडल्या जातात, तर दुसऱ्या हाताने त्या तारांना नियंत्रित केले जात असते.
या दोन्ही हातामध्ये व्यवस्थित सुसंगतता असेल तर अतिशय मधूर आवाजाची निर्मिती होत असते. या तानपुरा वादनाकरिता अनेक लोक एकत्र येऊन देखील तानपुरा वाजवू शकतात.
तानपुरा वाजवत असताना मूळ नाद फार महत्वाचा असतो. तानपुरा छेडल्यानंतर सर्वात आधी निर्माण होणाऱ्या स्वराला मूळ स्वर किंवा नाद म्हणून ओळखले जाते. त्याचबरोबर या मूळ स्वराच्या सहाय्याने तयार होणारा इतर स्वरांना किंवा नादांना सहाय्यक नाद या नावाने ओळखले जाते. सहाय्यक ध्वनींनी निर्माण होणाऱ्या स्वरांना स्वघोषित स्वर असे देखील नाव आहे. संस्कृत भाषेशी निगडित असणारे हे स्वर ऐकणाऱ्याला खूपच मंत्रमुग्ध करत असतात.
तानपुरा वाद्याच्या तारेमुळे निर्माण होणारे विविध स्वर एकत्र येत अलौकिक ध्वनीची निर्मिती होत असते. त्यामुळे हे वाद्य इतर वाद्यापासून फार वेगळे समजले जाते.
तानपुरा वाद्य वाजविणे काही सोपे काम नाही. यासाठी खूप सरावाची आवश्यकता असते. यामधील स्वर अतिशय बारकाईने तयार केलेले असल्यामुळे, ते सर्वसामान्य व्यक्तींना समजत नाहीत. मात्र एक प्रख्यात तानपुरा वादक आणि संगीत क्षेत्रातील जाण असणारा व्यक्ती या स्वरांना सहज हेरू शकतो, आणि त्यानुसार विविध संगीताची निर्मिती केली जाते.
या तानपुरा वाद्यांमध्ये विविध प्रकारच्या तारा असतात. ज्यामध्ये मुख्यतः चार तारांचा समावेश होतो, तर आधुनिक काळामध्ये काही ठिकाणी या तारांची संख्या चार पेक्षा अधिक देखील असते. या वेगवेगळ्या तारेंपासून वेगवेगळ्या स्वरूपाचे ध्वनी निर्माण केले जात असतात, त्यामुळे कोणात्या स्वरासाठी कोणती तार वापरायची हे समजण्याकरिता उमेदवारांनी त्या पटीमध्ये सराव करणे गरजेचे असते. जेणेकरून उमेदवाराला किंवा त्या वादन करणाऱ्या व्यक्तीला यामध्ये प्रभूत्व मिळवणे सोयीचे होईल. तानपुरा वादनाकरिता योग्य प्रशिक्षण घेणे गरजेचे असते, तेव्हा कुठेतरी हे वाद्य वाजविणे सोयीचे होते.
निष्कर्ष:
संगीत म्हटलं की कितीही वाईट मूड असला तरी देखील माणूस प्रसन्न होण्यास मदत मिळत असते. संगीत ही एक थेरपी देखील असून, त्या अंतर्गत मानसिक रुग्णांना देखील उपचार केले जात असतात. संगीतामुळे सर्वत्र चैतन्यमय वातावरणाची निर्मिती होत असते.
संगीताचे अनेक प्रकार असले, तरी देखील मंजूळ संगीत अनेकांना आवडत असते. मंजूळ संगीताच्या निर्मिती करिता अनेक वाद्य प्रकार आजकाल भारतामध्ये उपलब्ध आहेत. त्यातील पौराणिक किंवा अतिशय जुन्या काळातील वाद्य म्हणून तानपुरा अर्थात तंबोरा या वाद्याला ओळखले जाते.
आजच्या भागामध्ये आपण या तानपुरा वाद्याबद्दल माहिती घेतलेली असून, त्याचा भारतीय संगीतामधील वापर व परिचय, भारतीय संगीतात मूळ आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तानपुरा वाद्याची महती, त्याचे विविध घटक आणि भाग, तानपुराचे विविध वाद्यांशी केलेले मिश्रण, आणि या तानपुरा वादनाच्या विविध पद्धती इत्यादी बद्दल माहिती घेतली आहे.
FAQ
तानपुरा या वाद्यातील तारा कोणत्या धातूपासून बनवलेल्या असतात?
तानपुरा या वाद्यातील तारा या तांबे आणि स्टील या धातूपासून बनवण्यात आलेले असतात. यातील तीन तारा या स्टील पासून, तर शेवटची खर्ज निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारी तार तांबे धातूपासून बनवण्यात आलेली असते.
तंबोरा वाद्याच्या पहिल्या तारेमध्ये कोणकोणते निशाद लावले जाऊ शकतात.
तंबोरा वाद्याच्या पहिल्या तारेमध्ये मद्रा पंचम, मद्र शुद्ध, किंवा मद्रा शुद्ध मध्यम इत्यादी प्रकारचे निशाद लावले जाऊ शकतात.
तंबोरा वाद्यातील मधल्या दोन तारांना काय म्हणून ओळखले जाते?
तंबोरा वाद्यातील मधल्या दोन तारांना जोड या नावाने ओळखले जाते.
तंबोरा वाद्यातील मधल्या दोन तारा कशाच्या निर्मिती करतात कारणीभूत असतात?
तंबाखद्यातील मधील दोन तारा या षड्ज लावण्यासाठी कारणीभूत असतात.
तंबोरा वाद्यातील विविध भागांपैकी सर्वात महत्त्वाचा व उपयुक्त भाग म्हणून कोणत्या भागाला ओळखले जाते?
तंबोरा या वाद्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भाग असतात. त्यातील प्रत्येक भाग आवाज निर्मितीसाठी योगदान देत असला, तरी देखील याचा भोपळा खूपच महत्त्वाचा समजला जातो.