सरकारी योजना Channel Join Now

खंडाळा घाटची संपूर्ण माहिती Khandala Ghat Information In Marathi

Khandala Ghat Information In Marathi महाराष्ट्रातील एक उत्तम हिल स्टेशन म्हटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर लोणावळा आणि खंडाळा घाट येत असतात. त्यातील लोणावळा व खंडाळा हे नाव जोडीने घेतले जात असले, तरी देखील या दोन्ही घाटांमध्ये थोडेसे अंतर आहे. लोणावळ्यापासून तीन किलोमीटर अंतर प्रवास केल्यानंतर हा खंडाळा घाट आपल्या निदर्शनास येत असतो. इतर शहरांचा विचार केला, तर खोपोली पासून १२ किलोमीटर त्याचबरोबर कर्जत पासून ३४ किलोमीटर प्रवास केला असता आपण या खंडाळा घाटामध्ये पोहोचू शकतो.

Khandala Ghat Information In Marathi

खंडाळा घाटची संपूर्ण माहिती Khandala Ghat Information In Marathi

अतिशय निसर्गरम्य असणारा हा घाट गिर्यारोहण करण्यासाठी एक उत्तम ठिकाण समजले जात असते. येथे एक ड्युक नोज असून, या ठिकाणावरून खंडाळा घाटासह भोर घाट देखील बघता येत असतो. खंडाळा घाटामध्ये अनेक लोक खास सनसेट बघण्यासाठी येत असतात. पुण्यापासून आणि मुंबईपासून अगदी सारख्याच अंतरावर असणारा हा घाट अनेक शेकडो वर्षांपासून वाहतुकीसाठी वापरला जात आहे.

पूर्वीच्या काळी या ठिकाणी घोड्यांच्या माध्यमातून वाहतूक केली जात असे, मात्र ब्रिटिश कालावधीमध्ये म्हणजेच १८४० या वर्षी या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्यामुळे हा घाट अतिशय वाहतुकीसाठी उत्तम ठरत आहे. याच घाटातून कोकण रेल्वे, अर्थात ग्रेट इंडियन सोलार रेल्वे देखील जात असते. व हा घाट देखील रेल्वेच्या विभागामार्फतच बांधण्यात आलेला आहे.

या ठिकाणी सेंट झेवियर्स विला देखील असून, या ठिकाणी बोगदा देखील बघायला मिळत असतो. त्यामुळे या ठिकाणी निसर्ग सौंदर्य अनुभवता येत असते. ब्रिटिश काळामध्ये या ठिकाणी कॉलरा आजाराच्या अतिशय भयानक चार साथी आल्यामुळे हे ठिकाण तत्कालीन काळामध्ये फारच प्रसिद्ध झाले होते. या ठिकाणी एक प्राचीन कारागृह देखील असून, त्याची निर्मिती १८९६ यावर्षी करण्यात आली असे सांगण्यात येते.

याच कारागृहामध्ये सेंट झेवियर्स कॉलेज येथील संस्थापक देखील राहिलेले आहेत, ज्यांना युद्धबंदीच्या कालखंडामध्ये प्रतिबंधात्मक उपायाच्या अंतर्गत तुरुंगवास भोगावा लागला होता. या ठिकाणचे वातावरण अतिशय आल्हाददायक असून, दिवसभर उबदार वातावरण असण्याबरोबरच रात्री अतिशय अल्हाददायक थंड वारा वाहत असतो. अगदी तीनही ऋतूंमध्ये या ठिकाणी प्रवास केला जाऊ शकतो. थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील या ठिकाणाला ओळखले जात असते.

या ठिकाणी उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाशाचा दाह काहीसा कमी जाणवत असल्यामुळे अनेक लोक उन्हाळ्याची सुट्टी घालण्यासाठी देखील खंडाळा घाटामध्ये येत असतात. या ठिकाणी राहण्याच्या देखील उत्तम सोयी असल्यामुळे पर्यटकांचे अतिशय आकर्षणाचे केंद्र म्हणून या खंडाळा घाटाला ओळखले जात असे. आजच्या भागामध्ये आपण या खंडाळा घाटाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नावखंडाळा
प्रकारघाट रस्ता
ठिकाणपश्चिम घाट
घाटाची लांबीसुमारे तीन किलोमीटर
भौगोलिक स्थळपुणे, महाराष्ट्र
जोड नाव लोणावळा – खंडाळा

पुणे व मुंबई अशा दोन्ही शहरातील पर्यटकांसाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणून या खंडाळा घाटाला ओळखले जात असते. अनेक लोक इथून केवळ प्रवास करत असले, तरी देखील जास्तीत जास्त लोक येथील निसर्ग सौंदर्य अनुभवात असतात. इंग्रजी राजवटीमध्ये देखील या घाटाचे फारच महत्त्व होते. हा घाट पठारी भाग आणि उत्तम बंदर असणाऱ्या मुंबई शहराला जोडण्याचे कार्य करत होते, त्यामुळे इंग्रजांनी या घाटाकडे खास लक्ष देऊन तेथे डांबरीकरण देखील घडवून आणले होते.

खंडाळा घाटातील अनेक ठिकाणे पर्यटकांच्या पसंतीस उतरणारी असून, यातील बेडसा लेणी भूतकाळाशी वर्तमान काळाचा दुवा म्हणून ओळखली जाते. अतिशय निसर्गरम्य जागेवर असणारी ही लेणी अनेक लोक ट्रेकिंग करण्यासाठी निवडत असतात. अतिशय उत्कृष्ट कोरीव काम असल्यामुळे प्रत्येक जण या लेणीच्या सौंदर्यामध्ये मिसळून जात असतो.

या लेणीमध्ये एक मोठा स्तूप असण्याबरोबरच प्रार्थना गृह देखील आहे, त्याचबरोबर इतिहासामध्ये घडलेल्या अनेक घटनांची साक्ष देणारे विशेष देखील येथे बघायला मिळू शकतात. त्याचबरोबर येथे असणारे रिव्हर्सिंग स्टेशन देखील अतिशय उत्तम असून, अनेक लोक येथे सेल्फी क्लिक करण्यासाठी येत असतात.

खंडाळा घाटाच्या प्रसिद्ध होण्यामागे तेथील उत्कृष्ट घाट रचना, आणि साहसी गिर्यारोहकांनी दिलेली पसंती समजली जाते. अतिशय निसर्गरम्य मनमोहक वातावरणामध्ये ट्रेकिंग करण्याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलाच पाहिजे. त्यासाठी खंडाळा घाटाला भेट देणे गरजेचे आहे.

खंडाळा घाट बघायचा असेल तर किमान दोन ते तीन दिवसांची सहल आखणे गरजेचे ठरते, कारण या ठिकाणी जवळ जवळच अनेक पर्यटन स्थळे असल्यामुळे प्रत्येक पर्यटन स्थळांना भेट द्यायची म्हटली तर एक दिवस पुरेसा ठरत नाही.

निष्कर्ष:

पर्यटन किंवा प्रवास माणसाच्या दैनंदिन जीवनातील थकवा दूर करण्यासाठी खूपच उपयुक्त समजले जात असते. अनेक लोक न चुकता आठवड्याच्या प्रत्येक शेवटी पर्यटन करण्यासाठी जात असतात, तर काही लोक ठराविक अंतराने पर्यटन करत असतात. महाराष्ट्रातील असे फारच क्वचित लोक असतील त्यांना लोणावळा आणि खंडाळा घाटाबद्दल माहिती नसेल. अनेक लोकांनी या घाटातून प्रवास केलेला असून, या ठिकाणचे निसर्ग सौंदर्य अनुभवलेले आहे.

खंडाळा या घाटाला निसर्ग सौंदर्याचे उत्तम वरदान लाभलेले असून, या ठिकाणी अनेक लोक उन्हाळी सुट्टी घालवण्याबरोबरच मधुचंद्रासाठी देखील येत असतात. अत्यंत निसर्गरम्य असण्याबरोबरच एक हिल स्टेशन किंवा थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील या खंडाळा घाटाला ओळखले जात असते.

पुणे आणि मुंबई या दोन्ही शहरांपासून एक दिवसीय सहलीसाठी जवळ असणारे हे ठिकाण नेहमीच पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले असते. हे ठिकाण सह्याद्री घाटामध्ये असून, समुद्रसपाटीपासून ते तब्बल ६२५ मीटर उंच आहे, त्यामुळे येथे नेहमीच अल्लाददायक वारे अनुभवता येत असतात. आजच्या भागामध्ये आपण या खंडाळा घाटाबद्दल संपूर्ण माहिती बघितलेली आहे.

त्यामध्ये खंडाळा घाटामध्ये बघितली जाऊ शकतील अशी आकर्षक पर्यटन स्थळे, खंडाळा घाटाच्या प्रसिद्धी मागील कारण, येथे आलेल्या कॉलराच्या साथी, येथे असणारे विविध तलाव आणि राजमाची पॉईंट याबद्दल जाणून घेतलेली आहे. सोबतच खंडाळ्यापासून अगदी जवळच असणाऱ्या कारले भाजे लेणी बद्दल देखील माहिती घेतानाच, लोहगड किल्ला देखील जाणून घेतलेला आहे. खंडाळा घाटात असणारे पक्षी अभयारण्य व विविध किल्ले, धबधबे आणि मंदिरे यांच्या बद्दल देखील माहिती घेतलेली आहे.

खंडाळा घाटामध्ये खास आकर्षणाचे केंद्र असणारे बंजी जंपिंग देखील माहिती करून घेतलेली आहे. खंडाळा घाट परिसरात असणारे भुशी धरण आणि टायगर पॉईंट देखील बघितलेले असून, जवळपास असणाऱ्या सर्वच पर्यटन स्थळांची माहिती घेतलेली आहे. आणि येथे जाण्याच्या उत्तम वेळा देखील समजून घेतलेल्या आहेत.

FAQ

खंडाळा हा घाट महाराष्ट्राचा कोणत्या प्राकृतिक विभागामध्ये वसलेला आहे व त्याची लांबी किती आहे?

खंडाळा हा घाट महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वत या प्राकृतिक विभागामध्ये वसलेला असून, त्याची लांबी साधारणपणे तीन किलोमीटर इतकी आहे.

खंडाळा हा घाट कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो, व त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे?

खंडाळा हा घाट पुणे जिल्ह्यामध्ये येतो, व त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ६२५ मीटर इतकी आहे.

खंडाळा घाटामध्ये असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्यामध्ये कोणकोणती ठिकाणी बघितले जाऊ शकतात?

खंडाळा घाटामध्ये असणाऱ्या कर्नाळा पक्षी अभयारण्य मध्ये लायन्स पॉईंट, तुंगा किल्ला, नारायणी धाम मंदिर, आणि कुने धबधबा इत्यादी ठिकाणे बघितली जाऊ शकतात.

खंडाळा हा घाट कोणत्या महामार्गावर निर्माण करण्यात आलेला आहे?

खंडाळा हा घाट पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर निर्माण करण्यात आलेला आहे.

खंडाळा हा घाट कोणत्या घाटाच्या जोडीने येत असतो?

खंडाळा हा घाट लोणावळा घाटाच्या जोडीने येत असतो.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment