सरकारी योजना Channel Join Now

ग्लोबल वार्मिंग विषयी संपूर्ण माहिती Global Warming Information In Marathi

Global Warming Information In Marathi आजकाल जग झपाट्याने बदलत चाललेले आहे, त्यामुळे निसर्गामध्ये व हवामानामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यातीलच एक बदल म्हणून जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वार्मिंग समजली जाते. आज संपूर्ण पृथ्वीवर सर्वात महत्त्वाची समस्या म्हणून या ग्लोबल वार्मिंग ला ओळखले जाते.

Global Warming Information In Marathi

ग्लोबल वार्मिंग विषयी संपूर्ण माहिती Global Warming Information In Marathi

ज्यावेळी कार्बन डायऑक्साइड सारख्या विविध हरितगृह वायूंच्या प्रमाणामध्ये वाढ होते, त्यावेळेस या वायूमुळे सूर्याचे किरण पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळच ट्रॅप केले जातात. त्यामुळे पृथ्वीची उष्णता बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होतो, परिणामी पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढत जाते.

हल्ली या पृथ्वीच्या तापमानामध्ये झपाट्याने वाढ होत चाललेली आहे, त्यामुळे संपूर्ण जग तापमान वाढीचा सामना करत आहे. पूर्वीच्या सरासरी तापमानामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली असून, यामुळे बर्फाचे डोंगर वितळत चाललेले आहेत. यामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळी देखील वाढल्यामुळे समुद्रकिनारे धोक्यात आलेले आहेत.

आजच्या भागामध्ये आपण जागतिक तापमान वाढ किंवा ग्लोबल वार्मिंग याबद्दल संपूर्ण माहिती बघत आहोत…

नावजागतिक तापमान वाढ
इंग्रजी नावग्लोबल वार्मिंग
प्रकारजागतिक समस्या
स्वरूपपृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ तापमान वाढणे
कारणीभूत घटकहरितगृह वायू
हरितगृह वायूंचे उदाहरणकार्बन डाय-ऑक्साइड

आज भारतासह संपूर्ण जग ज्या समस्येणे ग्रस्त आहे, ती समस्या म्हणजे जागतिक तापमान वाढ होय.  त्यामुळे मोठ्या प्रमाणावर निसर्गामध्ये बदल घडून आले असून, नैसर्गिक आपत्ती देखील वाढत आहेत. सोबतच पर्यावरणाचा ऱ्हास देखील झाल्यामुळे जीवसृष्टी मध्ये असणारा समतोल देखील ढासळलेला आहे. ज्या प्राण्यावर जागतिक तापमान वाढीचे सर्वात जास्त प्रभाव दिसून आले तो प्राणी म्हणजे ध्रुवीय अस्वल होय. या जागतिक तापमान वाढीमुळे हा प्राणी नाश पावण्याच्या मार्गावर आहे.

ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय:

ग्लोबल म्हणजे जागतिक किंवा संपूर्ण पृथ्वीच्या पातळीवर आणि वॉर्मिंग म्हणजे उष्णता वाढ किंवा तापमान वाढ होय. ज्यावेळी पृथ्वीच्या संपूर्ण पृष्ठभागावर तापमान वाढीचे साम्राज्य पसरते, त्या स्थितीला ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढ म्हणून ओळखले जाते.

गेल्या शंभर वर्षांच्या अभ्यासानुसार पृथ्वीच्या तापमानामध्ये सुमारे दहा फॅरेनहाईट इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगितले जाते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीय क्षेत्रातील बर्फ वितळू लागलेला आहे. आणि या बर्फाच्या वितळण्यामुळे समुद्राला मिळणारे पाणी देखील वाढले आहे. त्यातून समुद्राची पातळी वाढल्यामुळे किनाऱ्या जवळील गावांना आणि तेथील जीवसृष्टीला धोका निर्माण झालेला आहे.

ग्लोबल वॉर्मिंग ही संकल्पना सामान्य लोकांमध्ये चघळली जात नाही, त्यामुळे हा काहीतरी एक तांत्रिक शब्द असून आपल्या काहीही उपयोगाचा नाही असे म्हणून अनेक लोक त्याचा विचार करणे सोडून देतात. मात्र प्रत्येक व्यक्ती येथील ग्लोबल वार्मिंग साठी कारणीभूत असून, प्रत्येकाने ठरविले तरच या हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी केले जाऊ शकेल. परिणामी इथून पुढे होणाऱ्या तापमान वाढीला आळा देखील घालता येऊ शकेल.

जागतिक तापमान वाढीचे मुख्य कारण:

जागतिक तापमान वाढीचे अप्रत्यक्ष अनेक कारणे असले तरी देखील प्रत्यक्ष कारण म्हणून हरितगृह वायूंना जबाबदार धरले जाते. हे हरितगृह वायू जमिनीच्या पृष्ठभागाजवळ अस्तित्वात असल्यास सूर्याकडून येणाऱ्या उष्णतेला स्वतःमध्ये शोषुण घेण्याचे कार्य करत असतात. परिणामी ही उष्णता त्या वायूच्या स्वरूपात वातावरणात वाढतच जाते.

ग्रीन हाऊस म्हणजे वनस्पतींना उबदार ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले स्ट्रक्चर असते. यामध्ये असणारे विविध वायू आतील तापमानाला ट्रॅप करून घेत असतात, परिणामी थंडीमध्ये देखील उष्ण स्वरूपाच्या वनस्पती उगवले जाऊ शकतात. यावरूनच ग्लोबल वार्मिंग ला कारणीभूत असलेल्या वायूंना हरितगृह वायू असे नाव देण्यात आलेले आहे.

पृथ्वीला उबदार ठेवण्यामागे या हरितगृह वायूंचा मोठा वाटा असतो, मात्र त्यांचे प्रमाण योग्य असेल तर पृथ्वीवर आल्हाददायक उबदार वातावरण निर्माण होत असते. मात्र हल्ली या वायूंचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे उष्णतेचे प्रमाण देखील वाढत आहे.

सामान्य माणूस या जागतिक तापमान वाढ समस्येविषयी इतका जागृत नाही, त्यामुळे सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण झाली तरच वाढणारी ही समस्या आटोक्यात आणली जाऊ शकेल. आणि समाजाकडून हरितगृह वांयूचे उत्सर्जन कमी केले जाऊ शकेल. मात्र त्यासाठी संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करणे फार गरजेचे असते. याच संकल्पनेतून २००६ यावर्षी एका माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले होते.

त्याचे नाव ‘द इनकन्विनिअंट ट्रुथ’ असे होते. या माहितीपटामध्ये अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून भूमिका बजावलेल्या अलगोर यांनी काम केलेले आहे. ग्लोबल वॉर्मिंग कशा स्वरूपाने एक धोका आहे, व मानवामुळे हा धोका कसा वाढत चाललेला आहे या आशयाचा हा माहितीपट होता.

समाजातून या माहितीपटाला उत्तम प्रतिसाद मिळण्याबरोबरच या माहितीपटाने विविध पुरस्कार देखील जिंकले होते. ज्यामध्ये बेस्ट डॉक्युमेंटरी ऑस्कर सारख्या पुरस्काराचा समावेश होता.

ग्लोबल वार्मिंग चे परिणाम:

ग्लोबल वॉर्मिंगचे दृश्य परिणाम दिसत असले, तरी देखील दुरगामी परिणाम संपूर्ण समाजासह जीवसृष्टीवर आणि पर्यावरणावर होत आहेत. यामुळे जागतिक तापमान झपाट्याने वाढत आहे, परिणामी पावसाचे चक्र बिघडलेले आहे. अनेक विनाशकारी नैसर्गिक आपत्ती देखील येत आहेत, विविध बर्फाच्छादित शिखरे देखील वितळत आहेत, त्यामुळे हळूहळू समाजावर विपरीत परिणाम होत आहे.

हे जर असेच सुरू राहिले आणि हरितगृह वायुंचे प्रमाण वाढत चालले, तर येत्या काही दिवसांमध्ये पृथ्वीवर मानवास वास्तव्य करणे अतिशय कठीण होऊन जाईल. आणि वाढत्या उष्णतेला मानव तग धरू शकणार नाही, परिणामी पृथ्वीवरील जीवसृष्टी देखील धोक्यात येऊ शकते. यासाठी मोठा कालावधी जाणार असला, तरी देखील आजपासूनच यावर उपाय केले तरच हा संभाव्य धोका टाळला जाऊ शकतो.

निष्कर्ष:

आज काल प्रत्येकाला प्रगती करण्याची घाई झालेली आहे. अनेक प्रगतिशील राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारखानदारी क्षेत्र वाढलेले आहे. परिणामी प्रदूषणात वाढ झालेली आहे. विविध मोटारी, मानवी क्रियाकलाप यांच्यामुळे हवेतील कार्बन डाय ऑक्साईड सारख्या हरितगृह वायूंचे प्रमाण वाढलेले आहे, आणि याचा परिणाम होऊन जागतिक तापमान वाढीची समस्या वर डोके काढत आहे.

यामुळे संपूर्ण जगाला मोठी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बर्फाचे डोंगर वितळत चालल्यामुळे, समुद्र पातळी देखील झपाट्याने वाढत आहे. आजच्या भागामध्ये आपण याच जागतिक तापमान वाढ या विषयावर या लेखाद्वारे चर्चा केलेली असून, ज्यामध्ये ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय, या समस्येचे मूळ कारण काय आहे, यामुळे पृथ्वीवर आणि समाज मनावर होणारे विविध धोके,  परिणाम, या समस्येविरुद्ध करण्यात येणारे विविध उपाय, आणि लोकांमध्ये पसरवण्यात येणारी जागरूकता इत्यादी विषयांवर माहिती जाणून घेतलेली आहे.

FAQ

जागतिक तापमान वाढ या समस्येला इंग्रजी मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

जागतिक तापमान वाढ या समस्येला इंग्रजी मध्ये ग्लोबल वॉर्मिंग या नावाने ओळखले जाते.

जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंना कोणते वायू म्हटले जाते?

जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंना  हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते.

जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत असणाऱ्या वायूंना  हरितगृह वायू म्हणून ओळखले जाते.

हरितगृह वायूंचे सर्वात मोठे उदाहरण म्हणून कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूला ओळखले जाते.

ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमुळे कोणकोणत्या समस्या दिसून येतात?

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्वत्र तापमान वाढते, हिमनग वितळू लागतात, आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढते इत्यादी परिणाम दिसून येतात.

जागतिक तापमान वाढ या समस्येवर कोणता माहितीपट प्रदर्शित झाला होता?

जागतिक तापमान वाढ या समस्येवर ‘द इनकनविनियंट ट्रुथ’ हा माहितीपट २००६ या वर्षी प्रदर्शित झाला होता.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment