सरकारी योजना Channel Join Now

पी एफ विषयी संपूर्ण माहिती PF Information In Marathi

PF Information In Marathi आपल्यातील अनेक जण नोकरी करत असतील मग ते खाजगी क्षेत्रातील असो किंवा सरकारी क्षेत्रातील प्रत्येक जण विशिष्ट पगारासाठी काम करत असतो मात्र या पगारातून दरमहा काही रक्कम कापली जाते याला पीएफ असे म्हटले जाते. जे लोक सध्या नोकरी करत आहेत त्यांना याबद्दल माहिती असली तरी देखील ज्यांना नवीनच नोकरी जॉईन करायची आहे अशा लोकांसाठी हा पी एफ म्हणजे काय हे समजणे थोडेसे कठीण असते त्यामुळेच आजच्या भागामध्ये आपण या पीएफ बद्दल माहिती बघूया जेणेकरून नव्याने नोकरी सुरु करणाऱ्या लोकांसाठी ही माहिती अतिशय  उपयुक्त ठरेल.

PF Information In Marathi

पी एफ विषयी संपूर्ण माहिती PF Information In Marathi

पीएफ ही अशी योजना आहे ज्यामुळे तुमच्या भविष्यातील खर्चाचे आधीच नियोजन केले जाते. ज्यावेळी आपल्याला विशिष्ट पगार मिळतो त्यातील काही रक्कम कापून घेतली जाते त्यानंतर ज्या ठिकाणी आपण काम करत आहोत ती संस्था किंवा फर्म कापलेल्या रकमे इतकीच रक्कम स्वतः त्यात मिसळून कर्मचाऱ्यांच्या भविष्याची तरतूद करत असते.

ज्यावेळी व्यक्ती रिटायर होतो किंवा सदर नोकरी सोडतो त्यावेळी ही रक्कम त्याला काढता येते ज्यामुळे तो काही दिवस आपले घर चालवू शकतो किंवा काही महत्त्वाच्या खर्चांना ती रक्कम वापरू शकतो. चला तर मग वेळ न दवडता या पीएफ बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नावपी एफ
संपूर्ण स्वरूपप्रॉव्हिडंट फंड
मराठी नावकर्मचारी भविष्य निर्वाह निधी
साधारण प्रमाणपगाराच्या 12%
नोंदणी मर्यादाकिमान २० कर्मचारी
पेन्शनची मर्यादापी एफ च्या ८.३३%

नवीन नोकरी मध्ये रुजू झाले की आपल्याला एक खाते खोलायला लावले जाते ते खाते म्हणजे पी एफ खाते होय. पी एफ हा कर्मचाऱ्यांच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेला आहे त्यामुळे निवृत्तीच्या वेळेस किंवा नोकरी गेल्यानंतर उमेदवाराला एक रक्कम पैसा उपलब्ध होतो ज्या अंतर्गत तो आपला घर खर्च चालू  शकतो किंवा काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी हा पैसा खर्च करू शकतो.

पी एफ म्हणजे काय?

भारताच्या कामगार मंत्रालयाने या पीएफ योजनेची सुरुवात केलेली असून त्याला मराठी मध्ये भविष्य निर्वाह निधी म्हणून ओळखले जाते ज्या अंतर्गत कर्मचाऱ्यांना  निवृत्तीनंतर त्यांनी वाचविलेली किंवा बचत केलेली रक्कम खर्च करण्यासाठी मिळते. ज्यामुळे त्यांना निवृत्तीनंतर आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत नाही.

प्रत्येक पी एफ धारक व्यक्तीसाठी एक यु.ए.एन अर्थात युनिव्हर्सल अकाउंट नंबर तयार केला जातो त्या अंतर्गत त्याचे खाते चालविले जाते. हा खाते क्रमांक लाभार्थी व्यक्तीला ओळखण्यासाठी फायदेशीर असतो.

या पीएफच्या विविध नियमांसाठी तसे तरतुदींसाठी १९५२ या वर्षी कायदा तयार करण्यात आलेला असून त्या अंतर्गत वीस पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थेला हे पीएफ देणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये १० कर्मचाऱ्यांच्या संस्थेला देखील पीएफ बंधनकारक केला जाऊ शकतो.

पीएफ आणि महिला कामगार:

अनेक ठिकाणी आजकाल महिला मोठ्या आघाडीवर नोकरी करताना दिसत आहेत त्यामुळे महिलांचा देखील पीएफ असणे गरजेचे असते. महिलांना पुरुषांपेक्षा या पीएफ खात्यामध्ये अधिक सूट मिळत असते ज्या अंतर्गत महिलांना त्यांच्या पगाराचा केवळ ८ टक्के रक्कम देण्याचे

बंधनकारक करण्यात आलेले आहे. १५००० रुपयांपेक्षा जास्त पगार असेल तरी देखील पंधरा हजार रुपयांच्या टक्केवारी मध्ये आपण पीएफ जमा करू शकतो.

सतत नोकरी बदलणाऱ्या लोकांसाठी पीएफ:

अनेक लोक विविध कंपन्यांमध्ये काम करण्यास प्राधान्य देत असतात जे वरचेवर आपली नोकरी बदलत असतात. अशा लोकांसाठी सतत नवीन पीएफ खाते सुरू करणे बंधनकारक नसते या जुन्याच पीएफ खात्याचा तपशील नवीन फॉर्म किंवा संस्थाचालकाला दिल्यास याच खात्यामध्ये तुमचे पुढील योगदान देणे सुरू शकता. मात्र काही कारणास्तव ते यशस्वी न झाल्यास नवीन खात्या अंतर्गत देखील योगदान करण्याची मुभा दिली जाते.

निष्कर्ष:

आज काल कुठल्याही गोष्टी शाश्वत राहिलेल्या नाहीत अगदी कुठलाही मनुष्य आज जगेल की उद्या मरेल त्याबद्दलही कोणी सांगू शकत नाही तर नोकरी देखील आज काल शाश्वत राहिली नाही त्यामुळे जर अचानक कुठल्याही व्यक्तीची नोकरी सुटली तर अशा व्यक्तीला अचानक घर कसे चालवावे हा प्रश्न पडत असतो.

जर त्या व्यक्तीने बचत केली नसेल तर त्यासाठी ही गोष्ट अतिशय कठीण होऊन जाते त्यामुळेच पीएफ ही संकल्पना पुढे आलेली आहे. पीएफ म्हणजे दुसर काही नसून तुमच्या पगारातील विशिष्ट रक्कम प्रति महिना बचत म्हणून बाजूला काढून ठेवली जाते आणि तुम्हाला गरज असताना किंवा नोकरी गेल्यानंतर ही रक्कम तुम्ही काढू शकता.

या पीएफचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जेवढी रक्कम पगारातून कापून देता तेवढीच रक्कम तुम्ही काम करत असलेली संस्था देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करत असते. आजच्या भागामध्ये आपण याच पीएफ बद्दल माहिती बघितली आहे. त्यामध्ये पी एफ म्हणजे काय?

या पीएफ खाते काढण्याचे काही नियम, कंपनीने जमा करण्याची व पगारातून कापण्याच्या रकमेचे प्रमाण, त्यातील पेन्शनसाठी उपलब्ध असणाऱ्या रकमेचे प्रमाण, त्यावर मिळणारे व्याजदर, निवृत्तीनंतर पीएफ कसा मिळवावा? नोकरी केल्यानंतर किंवा सोडल्यानंतर किती दिवसानंतर हे पैसे काढू शकतो? अचानक काही आणीबाणी आल्यास पैसे काढता येतात का? त्याचबरोबर पीएफ सोबत असणारी पेन्शन योजना कशी असते? इत्यादी बद्दल संपूर्ण माहिती बघितली आहे.

FAQ

पी एफ ची स्थापना केव्हा व कोणत्या मंत्रालयाद्वारे करण्यात आली होती?

पी एफ ची स्थापना इसवी सन १९५१ मध्ये करण्यात आली होती जी कामगार मंत्रालय यांच्याद्वारे निर्माण केली गेलेली आहे.

पीएफ बद्दल नियम व अटी वाचायचे असतील त्याचबरोबर याच्या विविध तरतुदी जाणून घ्यायचे असतील तर त्या कोणत्या कायद्यामध्ये वाचायला मिळतील?

पीएफ बद्दल काही नियम व अटी वाचायच्या असतील तर कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा १९५२ यामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील.

कोणाकोणाच्या संस्थांवर किंवा फर्मवर कर्मचाऱ्यांना पीएफ खाते उघडणे बंधनकारक करण्यात आलेले आहेत?

ज्या संस्था किंवा फॉर्म यामधील कर्मचाऱ्यांची संख्या २० पेक्षा जास्त असेल अशा सर्व संस्था अथवा फार्म यांना कर्मचाऱ्यांचे पीएफ खाते उघडणे बंधनकारक करण्यात आलेली आहे.

पीएफ योजनेमध्ये सहभाग घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वेतन कमीत कमी किती असायला हवे?

पी एफ योजनेसाठी पगाराची मर्यादा ही १५००० रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे ज्या कामगारांना पंधरा हजार रुपयांपेक्षा जास्त वेतन आहे व जे अशा ठिकाणी काम करतात तिथे कर्मचाऱ्यांची संख्या २० पेक्षा जास्त आहे अशे सर्व उमेदवार पीएफ योजनेसाठी पात्र ठरू शकतात.

पी एफ कापताना त्याचे प्रमाण किती असते व संस्था किती प्रमाण देते?

पीएफ कापून घेताना उमेदवाराच्या पगाराच्या दहा ते बारा टक्के कापून घेतले जातात तर संस्था चालकाला त्यामध्ये १२ टक्के रक्कम टाकावी लागते. अशा एकूण पगाराच्या २४ किंवा २२ टक्के रकमेला दरवर्षी पीएफ खात्यामध्ये जमा केले जाते.

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment