Train Information In Marathi लहानपणी झुकू झुकू झुकू झुकू अगीनगाडी हे गाणे तुम्ही नक्कीच गायले असेल, किंवा रेल्वे विषयी अनेक कथा देखील ऐकल्या असतील. रेल्वे म्हणजे काय हे आज कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. रेल्वे ही एक बोगीचा किंवा डब्यांचा लांब समूह असून, ज्याला इंजिन द्वारे ओढले जाते. त्या मार्फत प्रवासी तयार वस्तू, कच्चामाल, कचरा यांसारख्या अनेक गोष्टींची वाहतूक केली जाते.

रेल्वेची संपूर्ण माहिती Train Information In Marathi
प्रवासी वाहतूक करणाऱ्या डब्यांना कोच तर मालवाहतूक करणाऱ्या डब्यांना वॅगन म्हणून ओळखले जाते. रेल्वे स्थानक, रेल्वे रूळ, रेल्वे इंजिन, रेल्वे डब्बा, यांसारख्या कितीतरी शब्दांशी आपण अगदी ओळखीचे झालेलो आहोत. मात्र अजूनही काही माहिती अशी आहे जी आपल्यातील बऱ्याच जणांना माहिती नाही. आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आम्ही हा लेख प्रपंच करत आहोत. आजच्या भागामध्ये आपण या रेल्वे विषयी संपूर्ण माहिती बघणार आहोत…
नाव | आगगाडी |
इंग्रजी नाव | रेल्वे किंवा ट्रेन |
मार्गाचे नाव | रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे रूळ |
प्रवासी डब्यांचे नाव | कोच |
इंजिनचे नाव | लोकोमोटिव्ह |
मालवाहतूक डब्यांचे नाव | वेगन |
डब्यांचे नाव | रेल्वे स्टेशन |
रेल्वेचा इतिहास:
रेल्वेचा शोध लागण्यापूर्वी सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन म्हणून घोडेगाडी या प्रकारच्या गाडीला ओळखले जात असे. त्यानंतर रेल्वे रुळावरून धावणाऱ्या घोडे गाडीचा शोध लागला. मात्र सर्वात पहिली वाफेची इंजिन असणारी रेल्वे २१ फेब्रुवारी १८०४ या दिवशी युनायटेड किंगडम येथील वेल्स या ठिकाणी धावली होती.
या रेल्वे इंजिनच्या निर्मितीमध्ये सॅम्युअल होमफे आणि रिचर्ड ट्रेविथक त्यांनी फार मोलाची भूमिका बजावली होती. १९२५ या वर्षी सर्वप्रथम रेल्वे चालवण्याचे प्रशिक्षण दाखविण्यात आले. सर्वात पहिला रेल्वे मार्ग हा १८३० मध्ये लिव्हरपूल ते मँचेस्टर असा बनवण्यात आला होता. त्यानंतर अनेक राष्ट्रांमध्ये या रेल्वेचा प्रसार झाला.
या रेल्वेच्या शोधामुळे प्रवाशांसह मालवाहतूक करणे देखील खूप सोयीचे झाले, व अतिशय कमी खर्चामध्ये अधिकाधिक प्रमाणावर वाहतूक करणे सोपे गेले. त्यानंतर १८३० नंतर वाफेवर चालणारी इंजिन आली, जी प्रत्येक रेल्वे गाडीमध्ये वापरण्यास सुरुवात झाली.
जवळजवळ १९६० पर्यंत ही वाफेवर चालणारी इंजिने रेल्वेमध्ये प्राथमिक रेल्वे इंजिन म्हणून वापरली जात असत. मात्र हळूहळू डिझेल किंवा पेट्रोलियम तेलावर चालणाऱ्या इंजिनचा शोध लागला, आणि या वाफेवर चालणाऱ्या कोळशाच्या इंजिनांचा वापर हळूहळू कमी झाला.
त्यातही या इंजनांना अधिक मेंटेनन्स व खर्च लागत असल्यामुळे नवीन आलेले डिझेल किंवा पेट्रोल इंजिन अतिशय फायदेशीर होते. स्वीडन मध्ये १९१३ मध्ये सुरू झालेला रेल्वे व्यवसाय १९३९ पर्यंत चालल्यानंतर पुन्हा बंद करण्यात आला. खरे तर १९२० च्या दशकातच डिझेल गाड्यांची सुरुवात झाली होती, मात्र त्यांचा वापर वाढण्यामध्ये अनेक दिवस गेले.
यानंतर रेल्वे मध्ये एक क्रांतिकारी बद्दल घेऊन विजेवर चालणारी रेल्वे इंजिन आली, ज्याची सुरुवात खरे तर १८३५ मध्येच झाली असली तरी देखील १८९० नंतर त्यांचा वापर सुरू झाला.
रेल्वेचे विविध प्रकार:
रेल्वेचे इंजिन कसे चालत आहे आणि रेल्वे चा वापर कशासाठी करण्यात येणार आहे, यानुसार रेल्वेचे विविध प्रकार पडत असतात. ज्यामध्ये मालवाहतूक रेल्वे, प्रवासी रेल्वे, शहरी रेल्वे, लांब पल्ल्याची रेल्वे, जलद धावणारी रेल्वे यासारखे प्रकार पडत असतात.
मालवाहतूक रेल्वे असणाऱ्या रेल्वेच्या डब्यांना वॅगन म्हणून ओळखले जाते. या मार्फत माल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाणे अतिशय सोपे होते. एका वेळी मोठ्या प्रमाणावर माल घेऊन गेल्यामुळे, अतिशय स्वस्त प्रकारची वाहतूक म्हणून या प्रकाराला ओळखले जाते.
प्रवासी रेल्वे ही एका स्थानकावरून दुसऱ्या स्थानकावर प्रवाशांची ये जा करण्यासाठी असते. या डब्यांमध्ये सामान्यतः खुर्च्या किंवा सीट लावलेले असतात, ज्या मार्फत प्रवाशांना वाहतूक करणे सोपे होते. आजकाल अगदी एसी स्वरूपातील प्रवासी रेल्वे आल्यामुळे रेल्वेचा प्रवास खरंच खूप सुखकर झालेला आहे.
शहरी गाड्या या फक्त एका शहरांमध्ये विविध ठिकाणांवरून प्रवाशांची ने आन करणासाठी वापरल्या जातात. यांना ट्राम किंवा लोकल ट्रेन या नावाने देखील ओळखले जाते. या फारशा लांब धावत नाहीत.
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या या दूरवरच्या शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी वापरल्या जातात. या रेल्वे गाड्या शक्यतो महत्त्वाच्या स्टेशनवरच थांबतात व अतिशय लांबचा प्रवास करत असतात. त्यामुळे या रेल्वेचा प्रवास अगदी काही दिवसांमध्ये असतो.
जलद गाड्या ज्यांना इंग्रजी मध्ये हाय स्पीड रेल्वे म्हटले जाते, त्यादेखील भारतामध्ये तयार होत आहेत. ज्यामध्ये हल्लीच आलेल्या वंदे भारत ट्रेनचा देखील समावेश होतो. या रेल्वेमध्ये रुळांवर होणारे घर्षण रोखण्याकरिता चुंबकाचा वापर केला जातो, ज्यामुळे या रेल्वेला गती प्राप्त होण्यास मदत मिळत असते.
निष्कर्ष:
रेल्वे म्हटलं की लगेच आपल्यासमोर रेल्वे रूळ आणि हवेमध्ये धुराचे मोठे मोठे लोट सोडणारी आणि अतिशय जोरात धावणारी रेल्वे समोर येते. आपल्या विशिष्ट हॉर्नसाठी प्रसिद्ध असणारी ही रेल्वे भारताच्या प्रत्येक राज्यांमधून वाहतूक करत असते. मोठ्या प्रमाणावर मालाचे वाहतूक आणि प्रवासी वाहतूक करण्यासाठी रेल्वे ओळखली जाते.
आज भारतातील कितीतरी प्रवाशांच्या वाहतुकीचा आधार ही रेल्वे आपल्या खांद्यावर पेलत असते. रेल्वे ही भारतीय सरकारच्या मालकीची असून, संपूर्ण देशभर दळणवळणाचे जाळे या रेल्वेने पसरलेले आहे. इंग्रज काळामध्ये सर्वप्रथम धावणारी ही रेल्वे व तिच्याबद्दल आज आपण माहिती बघितलेली आहे.
यामध्ये ट्रेन म्हणजे काय, या ट्रेनचा किंवा रेल्वेचा इतिहास, त्याचे विविध प्रकार, ज्यामध्ये प्रवासी रेल्वे, मालवाहतूक रेल्वे, शहरी रेल्वे, लांब पल्ल्याची रेल्वे, किंवा जलद धावणारी रेल्वे यांसारखे प्रकार बघितले आहेत. त्याचबरोबर ट्रेन म्हणजे काय याबद्दल देखील माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये नक्कीच भर पडलेली असेल, अशी आशा आहे.
FAQ
आगगाडी ला इतर कोणकोणत्या नावाने ओळखले जाते?
आगगाडी ला इंग्रजी भाषेमध्ये रेल्वे, ट्रेन यांसारख्या नावाने ओळखले जाते.
रेल्वेच्या डब्यांचे कोणकोणते प्रकार असतात?
रेल्वे डब्याचे दोन प्रकार पडतात. ज्यामध्ये कोच म्हणजे प्रवासी वाहतूक करणारे डब्बे, तर वॅगन म्हणजे मालवाहतूक करणारे डब्बे होय.
भारतामध्ये सर्वात पहिली रेल्वे कोणत्या ठिकाणावरून धावली होती?
भारतामध्ये सर्वात पहिली रेल्वे ही १८५३ यावर्षी बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान धावली होती.
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे कोणत्या दिवशी व कोणत्या अंतरावर धावली होती?
भारतातील पहिली प्रवासी रेल्वे ही दिनांक १५ ऑगस्ट १८५४ या दिवशी हावडा ते हुबळी यादरम्यान २४ मैलांचे अंतर धावली होती.
भारतामध्ये सर्वात प्रथम धावलेल्या रेल्वे बद्दल काय सांगता येईल?
भारतामध्ये सर्वात पहिली धावलेली रेल्वे ही मुंबई च्या बोरीबंदर पासून ठाण्यापर्यंत धावली होती. त्यावेळी लॉर्ड डलहौसी या इंग्रज अधिकाऱ्यांनी तिचे लोकार्पण केले होते. या रेल्वेला सिंध, साहेब आणि सुलतान अशी तीन इंजिन होती. यामध्ये १४ डब्बे असून चारशे प्रवाशांना घेऊन सुमारे ३४ किलोमीटरचे अंतर या रेल्वेने कापले होते.
प्रश्न५.
उत्तर.
आजच्या भागामध्ये आपण ट्रेन अर्थात रेल्वे याविषयी संपूर्ण माहिती बघितलेली आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला तुम्ही नेहमी कळवत असताच, मात्र थोडासा वेळात वेळ काढून या माहितीच्या प्रसारासाठी तुमच्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती शेअर करून थोडासा हातभार लावावा ही विनंती.