HDFC Bank Information In Marathi भारतातील खाजगी क्षेत्रामध्ये सर्वोच्च समजली जाणारी बँक म्हणजे एचडीएफसी बँक होय. ही एक भारतीय वित्तीय संस्था असून, मुंबई या ठिकाणी मुख्यालय असणारी ही बँक खाजगी क्षेत्रातील सर्वात जास्त बाजार भांडवल असणारी बँक ठरलेली आहे.
एच डी एफ सी बँकची संपूर्ण माहिती HDFC Bank Information In Marathi
एचडीएफसी या बँकेचे संपूर्ण स्वरूप हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असे असून, भारतीय आर्थिक क्षेत्रामध्ये योगदान देण्यामध्ये या बँकेचा फार मोठा व मोलाचा वाटा समजला जातो. आर्थिक क्षेत्रातील एका नावाजलेल्या या एच डी एफ सी बँकेबद्दल आता आपण माहिती बघणार आहोत…
नाव | एच डी एफ सी |
प्रकार | बँक |
संपूर्ण स्वरूप | हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन |
मुख्यालय | मुंबई |
स्थापना दिनांक | १७ ऑक्टोबर १९७७ |
प्रोत्साहन | आयसीआयसीआय बँकेकडून |
भारतातील एक महत्त्वाची खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून एचडीएफसी या बँकेला ओळखले जाते. मुंबई या ठिकाणी मुख्यालय असणारी ही बँक संपूर्ण भारतभर आपल्या शाखा स्थापन करून सेवा प्रदान करत आहे. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सेवा पुरविणे हे एचडीएफसी या बँकेचे ध्येय असून, ग्राहकांच्या प्रश्नांना समजून घेऊन त्यावर तात्काळ प्रतिक्रिया देण्यामध्ये एचडीएफसी बँक सर्वात पुढे आहे.
या बँकेने आपल्या ग्राहक सेवा प्रणालीमध्ये मोठा विस्तार केलेला असून, त्यामुळे ग्राहकांना या बँकेकडून चांगला लाभ मिळत आहे. या बँकेकडून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, पेमेंट सेटलमेंट, इत्यादी सेवा प्रदान केल्या जातात. त्याचबरोबर ग्राहकांना कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, किंवा अभिप्राय द्यायचा असेल तरीदेखील या बँकेमध्ये सहजतेने शक्य होते.
हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन या संपूर्ण नावाने ओळखली जाणारी ही बँक महाराष्ट्र मधील आणि पर्यायाने संपूर्ण भारतामधील एक वित्तीय क्षेत्रातील सर्वात महत्त्वाची बँक असून, खाजगी क्षेत्रातील बँकांमध्ये सर्वात जास्त भाग भांडवल एचडीएफसी बँकेचे आहे.
एचडीएफसी बँकेबद्दल ऐतिहासिक माहिती:
सर्वात प्रथम १७ ऑक्टोबर १९७७ या दिवशी एचडीएफसी या संस्थेची स्थापना झाली होती. स्थापनेच्या वेळी ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी होती. पुढे आयसीआयसीआय च्या प्रोत्साहनाने १९८० यावर्षी एच डी एफ सी बँकेने ठेवी स्वीकारणे व कर्ज देणे इत्यादी कार्य सुरू केली.
पुढे १९८१ यावर्षी अनिवासी भारतीय करिता डिपॉझिट स्कीम,१९८५ या वर्षी गृह बचत योजना इत्यादी आकर्षक योजना सादर करून ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. लोकांना अगदी साडेआठ टक्के व्याजदराने गृह कर्ज प्रदान केल्यामुळे अनेकांची घर घेण्याची स्वप्न पूर्ण झाली, त्यामुळे या बँकेचे नावलौकिक अल्पावधीतच मोठ्या प्रमाणावर वाढले. पुढे १९८६ यावर्षी बँकेने प्रगती प्रक्रिया सुविधा नावाची एक सेवा देखील सुरू केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर या बँकेचा विस्तार होण्यास मदत झाली.
होम इम्प्रूमेंट लोन्स आणि होम एक्सटेंशन लोन्स या दोन कार्यक्रमांचे अनावरण इसवी सन १९८९ मध्ये करून या बँकेने आर्थिक वंचित घटकांना देखील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली. पुढे १९९४ यावर्षी या हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन संस्थेचे एचडीएफसी बँकेमध्ये रूपांतरण करण्यात आले. व या रूपांतरणाला ऑगस्ट १९९४ मध्ये आरबीआयकडून अधिकृतरित्या मान्यता देखील देण्यात आली.
या बँकेने आपली वेबसाईट सर्वात प्रथम १९९९ या वर्षी लॉन्च केली. त्या मार्फत ग्राहकांना सेवा मिळवणे, अधिकच सोयीचे होऊ लागले. पुढे एचडीएफसी बँकेने इन्शुरन्स क्षेत्रांमध्ये देखील पदार्पण करत २००० या वर्षी मुंबईमध्ये स्टॅंडर्ड लाईफ ऑफिस स्थापन केले. पुढे अनेक सेवा प्रदान करून या बँकेने मोठा टप्पा गाठला, आणि भारतातील महत्त्वाच्या बँकेमध्ये सहभागी झाली.
एचडीएफसी बँकेमध्ये खाते उघडणे:
आजकाल कुठल्याही बँकेमध्ये खाते सुरू करणे खूपच सोयीचे झाले असून, एचडीएफसी बँकेमध्ये खाते उघडायचे असेल तर केवळ बँकेमध्ये जाऊन एक फॉर्म घ्यावा लागतो. हा फॉर्म व्यवस्थित भरून योग्य त्या कागदपत्रांसह बँकेमध्ये सादर केला, की अवघ्या काही दिवसांमध्येच तुमचे खाते उघडले जाते, व तुम्हाला पासबुक देखील प्रदान केले जाते. पुढे काही दिवसांनी तुम्हाला बँकेकडून एटीएम कार्ड अर्थात डेबिट कार्ड देखील दिले जाते. तुम्हाला गरज असेल तर चेक बुक साठी सुद्धा तुम्ही अर्ज दाखल करू शकता.
आजकाल सर्वत्र ऑनलाईन प्रणाली राबविण्यात येते, त्यामुळे या बँकेचे खाते तुम्ही ऑनलाईन स्वरूपामध्ये सुद्धा सुरू करू शकता. त्यासाठी एचडीएफसी या बँकेचे अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन, तेथे नवीन खाते बचत खाते निवडून, योग्य माहिती भरून फॉर्म पूर्ण करावा. त्यासोबत विविध आवश्यक कागदपत्रांची ऑनलाइन प्रत सोबत अपलोड करावी व सर्वात शेवटी फॉर्म सबमिट करावा.
एचडीएफसी बँकेमध्ये केवळ भारतीय नागरिकांनाच खाते उघडता येते. त्याचबरोबर अशा नागरिकाचे वय १८ वर्षे पूर्ण असणे गरजेचे ठरते. यासोबत उमेदवाराचे दोन पासपोर्ट फोटो, पॅन कार्ड, पत्त्याचा व ओळखीचा पुरावा इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.
एचडीएफसी बँकेतील व्याजदर:
मित्रांनो, कुठल्याही बँकेमध्ये ठेव ठेवली असता त्यातून चांगले रिटर्न्स मिळवणे हेच प्रत्येक ग्राहकाचे ध्येय किंवा उद्दिष्ट असते. एच डी एफ सी बँक ही साडेसहा ते साडेसात टक्क्यांच्या दरम्यान वेगवेगळ्या प्रकारच्या नागरिकांना मुदत ठेवीवर व्याजदर देत असते. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरीता एक टक्का अधिकचे व्याज प्रदान केले जाते.
एचडीएफसी बँकेसोबत मिळून तुम्ही गुंतवणूक योजना देखील निवडू शकता. याकरिता विविध प्लॅन बँकेकडून सादर केले जातात. बँकेच्या शाखेला भेट देऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती मिळवू शकता.
एचडीएफसी बँकेमध्ये खाते सुरू करण्याचे फायदे:
एचडीएफसी बँक विश्वसनीय असण्याबरोबरच भारतातील मोठ्या बँकेमध्ये समाविष्ट आहे. या बँकेमध्ये निधी हस्तांतरण प्रक्रिया अतिशय सुलभ असून, त्या अंतर्गत तुम्हाला अगदी सहजरित्या पैसे देवाण-घेवाण करता येऊ शकते. तुम्ही ऑनलाईन बँकिंग च्या स्वरूपात देखील तुमचे खाते हाताळू शकता, ज्यामुळे तुमचे बँकेच्या शाखेमध्ये जाणे टळू शकते. त्याचबरोबर आकर्षक व्याजदरासह तुम्ही येथे मुदत ठेवीदेखील समाविष्ट करू शकता, व तुम्हाला लॉकर्स सेवा देखील मिळू शकते.
निष्कर्ष:
खाजगी क्षेत्रातील एक सर्वोत्तम व सर्वोच्च भाग भांडवल असणारी बँक म्हणून एचडीएफसी या बँकेला ओळखले जाते. एचडीएफसी ही पूर्वी हाउसिंग फायनान्स क्षेत्रामध्ये कार्य करणारी संस्था असून, तिने बँकिंग क्षेत्रामध्ये देखील पदार्पण केलेले आहे.
आजच्या भागामध्ये आपण या एच डी एफ सी बँकेबद्दल माहिती बघितली. यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी समजल्या असतील. यामध्ये एचडीएफसी या शब्दाचा संपूर्ण अर्थ काय होतो, या बँकेला कसा इतिहास लाभलेला आहे, या बँकेत खाते सुरू करताना काय केले पाहिजे, तसेच काही आवश्यक गोष्टी, लागणारी कागदपत्रे, या बँकेमध्ये मिळणारे व्याजदर, या बँकेची विविध गुंतवणूक धोरणे, या बँकेमध्ये खाते असण्याचे फायदे किंवा तोटे व विविध मनोरंजक तथ्य इत्यादी माहिती बघितली आहे.
FAQ
एचडीएफसी या बँकेचे संपूर्ण स्वरूप काय आहे?
एचडीएफसी या बँकेचे संपूर्ण स्वरूप हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन असे आहे.
एचडीएफसी या बँकेची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती?
एच डी एफ सी या बँकेची १७ ऑक्टोबर १९७७ या दिवशी एक पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणून स्थापना झाली होती.
एचडीएफसी या संस्थेचे बँकेमध्ये रूपांतरण कोणत्या वर्षी झाले होते?
एचडीएफसी या संस्थेचे बँकेमध्ये रूपांतरण हे १९९४ या वर्षी झाली होती.
एच डी एफ सी या बँकेची स्थापना कोणा मार्फत करण्यात आली होती?
एचडीएफसी या बँकेची स्थापना एच टी पारेख यांच्याद्वारे करण्यात आली होती.
सद्यस्थितीमध्ये एच डी एफ सी या बँकेचे एमडी पदी कोण विराजमान आहेत?
सद्यस्थितीमध्ये एच डी एफ सी या बँकेमध्ये एम डी पदी शशीधर जगदिशन हे विराजमान आहेत.