सरकारी योजना Channel Join Now

सह्याद्री पर्वताची संपूर्ण माहिती Sahyadri Mountain Information In Marathi

Sahyadri Mountain Information In Marathi महाराष्ट्राबद्दल कुठलीही माहिती सांगायची म्हटलं की सह्याद्रीचा उल्लेख येतोच. सह्याद्री म्हणजे महाराष्ट्राचा कणा असून, महाराष्ट्राच्या निसर्ग सौंदर्यामध्ये भर घालणारा एक नैसर्गिक घटक आहे. या सह्याद्री घाटाला पश्चिम घाट या नावाने देखील ओळखले जाते.

Sahyadri Mountain Information In Marathi

सह्याद्री पर्वताची संपूर्ण माहिती Sahyadri Mountain Information In Marathi

भारतातील मुख्य पर्वतांमध्ये या सह्याद्री पर्वताचा समावेश होतो. सुमारे एक हजार मीटर उंच असणार हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्राचा कोकणामध्ये आढळून येतो. कोकणामध्ये भरपूर पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असणारा हा सह्याद्री पर्वत दक्खनचे पठार आणि कोकणचा विभाग यांना एकमेकांपासून वेगळे करत असतो.

येथे सरासरी ४०० सेंटीमीटर पाऊस पडत असतो, मात्र दक्षिण विभागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक असते. यामुळे कोकणातील नारळ, भात यांसारख्या पिकांना मोठा फायदा होत असतो. सह्याद्री ही निसर्ग सौंदर्याने अतिशय उत्तम ठिकाण असल्यामुळे, या ठिकाणी अनेक गिर्यारोहक, उत्साही पर्यटक, आणि निसर्गप्रेमी यांच्यासाठी खास मेजवानी असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

महाराष्ट्रातून पुढे गेल्यानंतर त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. जसे की निलगिरी पर्वतरांग, अण्णा मलाई डोंगररांग, इत्यादी. या घाटामध्ये वेलची टेकड्या आणि सह्य पर्वत यांसारख्या पर्वतरांगा देखील आढळून येतात.

आजच्या भागामध्ये आपण या सह्याद्री पर्वताबद्दल माहिती बघणार आहोत…

नावसह्याद्री
प्रकारपर्वतरांग
राज्यमहाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू
महाराष्ट्रात नावसह्याद्री
तामिळनाडूत नावअण्णामलाई
कर्नाटकात नावनिलगिरी
साधारण उंची९०० ते १००० मीटर
स्थानसाल्हेर मुल्हेर ते कन्याकुमारी

सह्याद्री पर्वताचा भौगोलिक वारसा:

पश्चिम घाट या नावाने ओळखला जाणारा सह्याद्री पर्वत दखन पठार व कोकण यांना वेगळे करणारा आहे. पूर्वी ज्यावेळी गोंडवन नावाच्या खंडाचा विकास झाला, त्यावेळी प्रस्तरभंग क्रिया किंवा ज्वालामुखी क्रिया या द्वारे या सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे असे सांगितले जाते.

या पर्वताचे साधारण वय १०० दशलक्ष वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. सुमारे एक हजार मीटर उंच असणारा हा पर्वत अनेक ठिकाणी कमी जास्त उंचीचा आढळून येतो. यातील महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई असून, संपूर्ण पर्वतात बघितल्यास अण्णाईमुडी हे शिखर सर्वात उंच आहे. मात्र ते महाराष्ट्र मध्ये नाही.

या सह्याद्री पर्वताची निर्मिती होताना भारतीय उपखंड व गोंडवाना खंड एकमेकांपासून वेगळा झाला, त्या ठिकाणी या पर्वताची निर्मिती झालेली आहे. आणि यामुळेच वाहिलेल्या लावारसामुळे दख्खन पठाराची देखील निर्मिती झालेली आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर बेसाल्ट प्रकारचा खडक आपल्याला आढळून येतो.

सह्याद्री पर्वतात बेसाल्ट प्रणालीचा खडक आढळून येतो. त्याचबरोबर या ठिकाणी इतरही काही खडक आढळतात. यांना खोंडलाईट,ग्रॅनाईट, आणि चारकोनाइट इत्यादी नावाने ओळखले जाते. त्याचबरोबर याच्यादक्षिणेच्या भागात लेटराईट व बॉक्साईट प्रकारचे खडक देखील आढळून येतात.

सह्याद्री पर्वतातील विविध शिखरे:

सह्याद्री पर्वत हा महाराष्ट्र मध्ये स्थित असला तरी देखील त्याचा विस्तार तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये देखील आढळून येतो. महाराष्ट्र मध्ये सह्याद्री पर्वतात पाचगणी, महाबळेश्वर, माथेरान यांसारखी अनेक ठिकाणे आहेत. त्याचबरोबर वेलची पर्वत देखील स्थित आहे.

महाराष्ट्र मध्ये या पर्वतरांगेत सर्वात उंच शिखर म्हणून कळसुबाई शिखराला ओळखले जाते. त्याचप्रमाणे कर्नाटकामध्ये निलगिरी पर्वत असून, यामध्ये दोडाबेटा हे सर्वात उंच शिखर आहे. याची उंची सुमारे २६२३ मीटर इतकी असून, अन्नामलाई डोंगररांग ही तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे.

या डोंगररांगेमध्ये अण्णाईमुडी नावाचे पर्वत शिखर असून, त्याची उंची सुमारे २६९५ मीटर इतकी आहे. हे तामिळनाडू मधील सर्वोच्च शिखर असण्याबरोबरच, संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगेच्या श्रेणीमध्ये सर्वात उंच शिखर आहे. त्याचबरोबर येथे चेंबरा शिखर, वेल्हारी माला शिखर, बाणासुर शिखर, आणि अगस्त्यमाला शिखर इत्यादी देखील शिखरे प्रसिद्ध आहेत.

या पश्चिम घाटामध्ये केरळच्या काही भागात चहा व कॉफी यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्याचप्रमाणे रबर उत्पादन देखील घेतले जाते. या पर्वतरांगेमध्ये अनेक दऱ्या असून या डोंगरा रांगेतून अनेक घाट रस्ते देखील निर्माण करण्यात आलेले आहे.

ज्यामध्ये पालघाट ची खिंड व सर्वात महत्त्वाची आहे, कारण सह्याद्री पर्वताला विभागण्याचे काम या पालघाट खिंडीद्वारे केले जाते. जी महाराष्ट्र मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे. यामुळेच कर्नाटक व महाराष्ट्र यामधील पर्वत वेगळा होत असतो.

सह्याद्री पर्वताच्या अरबी समुद्राकडील भाग अतिशय चिंचोळा पट्टा आहे, ज्याला कोकण किनार पट्टी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्र मध्ये कोकण या नावाने ओळखला जाणारा हा प्रदेश दक्षिणेकडे मालाबार नावाने देखील ओळखला जातो.

मित्रांनो, हा सह्याद्री पर्वत महाराष्ट्र मध्ये पर्जन्य निर्मितीसाठी अतिशय फायदेशीर असून, कोकणात सर्वाधिक पाऊस पडण्यामागे या घाटाचा मुख्य फायदा होतो. त्याचमुळे कोकणाच्या भागांमध्ये अनेक प्रकारच्या भात शेती केल्या जातात. त्याचबरोबर अनेक प्रकारच्या नद्यांना देखील पाण्याची उपलब्धता होत असते.

सह्याद्री पर्वतामध्ये हवामान हे वेगवेगळ्या स्वरूपात आढळून येते, जे उंचीनुसार बदलत असते तरीदेखील सरासरी १५ अंश सेल्सिअस तापमान सह्याद्री घाटामध्ये आहे, असे समजले जाते. हिवाळ्यामध्ये हे तापमान चार ते पाच अंश सेल्सिअस पर्यंत कमी होते, तर उन्हाळ्यामध्ये ते सुमारे २० ते २४ अंश सेल्सिअस पर्यंत जात असते.

सह्याद्री पर्वतामध्ये अनेक मोठमोठी जंगले आढळून येतात, ही शक्यतो सदाहरित स्वरूपाची असतात. त्याचप्रमाणे तेथे मोठ्या प्रमाणावर प्राण्यांचे देखील संख्या आढळून येत असते. जैवविविधतेने हा सह्याद्री पर्वत फारच नटलेला आहे.

निष्कर्ष:

महाराष्ट्रातील निसर्ग सौंदर्याचा द्योतक असणाऱ्या सह्याद्री पर्वताचा भाग अतिशय नैसर्गिक सौंदर्याने नटलेला असून, या ठिकाणी गिर्यारोहक, धाडसी पर्यटक, यांसारख्या लोकांना मोठी मेजवानी असते. या ठिकाणी निसर्गसौंदर्य इतके खास आहे, की तुम्हाला अगदी स्वर्गामध्ये असल्याचा भास निर्माण होत असतो.

आजच्या भागामध्ये आपण या सह्याद्री पर्वताविषयी इत्यंभूत माहिती बघितलेली आहे. त्यामध्ये तुम्हाला या सह्याद्री पर्वताचा भौगोलिक वारसा, यामध्ये असणारी उंच शिखरे, त्याचप्रमाणे या ठिकाणी आढळणारे विविध धबधबे व नद्या, या पर्वतरांगेमध्ये असणारे हवामान, व येथे आढळून येणारी जैवविविधता त्याचबरोबर विविध प्राणी व वनस्पती यांच्या विषयी माहिती बघितली आहे. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

सह्याद्री पर्वतरांग कोणत्या ठिकाणापासून कोणत्या ठिकाणापर्यंत वसलेली आहे?

सह्याद्री पर्वतरांग ही उत्तरेकडे साल्हेर मुल्हेर अर्थात नाशिक पासून थेट तामिळनाडूमध्ये पसरलेली आहे.

सह्याद्री पर्वताची साधारण उंची किती आहे?

सह्याद्री पर्वताचे साधारण उंची ही ९०० ते १००० मीटर इतकी समजली जाते.

सह्याद्री पर्वताला कर्नाटक व तामिळनाडू मध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते?

महाराष्ट्र मध्ये सह्याद्री नावाने ओळखला जाणारा हा पर्वत कर्नाटकात मात्र निलगिरी नावाने ओळखला जातो. त्याचप्रमाणे तामिळनाडूमध्ये याला अण्णामलाई डोंगररांग ओळखले जाते.

सह्याद्री पर्वताची निर्मिती साधारणपणे किती वर्षांपूर्वी झाली असावी असे सांगितले जाते?

मित्रांनो, उपलब्ध संदर्भानुसार सह्याद्री पर्वत हा सुमारे १०० दशलक्ष वर्षे जुना आहे असे सांगितले जाते. याची निर्मिती ज्वालामुखी प्रक्रियेने झालेली आहे.

सह्याद्री पर्वताच्या विभागामध्ये कोणत्या प्रकारची खडक आढळून येतात?

सह्याद्री पर्वत हा ज्वालामुखी प्रक्रियेने निर्माण झाला आहे, असे आपण पाहिले. आणि यामध्ये बेसाल्ट नावाचा खडक तयार होऊन या सह्याद्री पर्वताची निर्मिती झालेली आहे.

आज आपण सह्याद्री पर्वता विषयी संपूर्ण माहिती बघितली आहे. ही माहिती आमच्या वाचकांना नक्कीच आवडली असेल, याबाबत काहीही साशंकता नाही. ही माहिती इतरांना देखील वाचायला मिळायला हवी, त्यामुळे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पाडाल अशी आशा आहे.

धन्यवाद…!

माझे नाव सृष्टी आहे आणि मी या ब्लॉग ची संस्थापक आहे. मला माहिती लिहायला खूप आवडतात, म्हणून मी या माझ्या ब्लॉग वर मराठी मध्ये माहिती लिहित असते.

Leave a Comment